*माझी शाळा माझे उपक्रम*
*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग ११२*
〰〰〰〰〰〰〰
*🌺 योग्य निवड*🌺
=================
*प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले*.
*त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं*
*या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला.दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यानी विचारले. कामात काही अडचणी आल्या तर नाही ना?*
*पहिला अभिमानाने म्हणाला, "आईला ताप होता. वडील पोटदुखीनं हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता; पण माझी साधना मी सोडली नाही. व हे रसायन तयार करून आणलं आहे. "दुसरा म्हणाला, "आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धन होता. बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. त्यामुळे आपण दिलेलं काम मी पूर्ण करु शकलो नाही.कृपया आणखी दोन दिवसांची सवड द्यावी.*"
*आचार्यांनी आपल्या सहाय्यक म्हणून त्याचीच निवड केली.*
*तात्पर्यः ज्ञान असून ते जर योग्य वेळेला उपयोगात नाही आणले तर त्याचा काय उपयोग. समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

No comments:
Post a Comment