कविता सुखाची वाट

सुखाची वाट .....


 आपलं मन
 एकच करतं
 सुख विसरून जातं
 वेदनांना आठवत बसतं
 या वेदनाच हळूहळू
 मनास कुरतडत रहातात
 नकारात्मक भावनांचं
 भांडार होऊन जातात
 सूड , असूया मनात
 या भावना निर्माण करतात
 न आपल्यालाच नकळत
 त्या जाळत रहातात
 जीवनाला नैराश्यात
 या ढकलून देतात
 सुखाला कोसो दूर
 या नेऊन सोडतात
 आपणच आहोत गुन्हेगार
 असं मला तरी वाटत
 कां वेदनांना हृदयाशी
 मन कवटाळून बसतं
 मनाचा मार्ग बदलणं
 आपल्याच हातात असतं
 त्याला सुखाच्या रुळांवर
 आपणच आणायचं असतं
 दुधातन माशी काढतो तसं
 वेदनांना मनातून काढावं
 जे भोगलंय सुख
 ते चघळत बसावं
 कशाला वेदनेच्या नादी लागून
 आयुष्य नासवून टाकावं
 पुन्हा येणाऱ्या सुखाला
 वाट मोकळी करून द्याव .

 🌸🌸🌸🍁🍁🌸

No comments:

Post a Comment