जीवन विचार


दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे पुण्य.दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप.यापेक्षा पाप- पुण्याची दुसरी व्याख्या करता येणार नाही।।
सत्याने वागणे हा धर्म व असत्याने वागणे हा अधर्म आहे.यासारख दुसरं सूत्र नाही.।।
विठ्ठलाचे(विवेकाचे) नामस्मरण करने ही गती विठ्ठलाचे नाम न घेणे ही तर अधोगती।।
चांगल्या माणसांची संगत हा स्वर्गवास तर वाईट माणसांच्या संगतीत राहणे हा नरकवास।।
तुकाराम महाराज म्हणतात-
तुमचे हीत आणि अहित मी उघड करून सांगितले आहे. तुम्हाला योग्य वाटेल ते करा.।।

समाजात पाप -पुण्य,धर्म-अधर्म,स्वर्ग-नरक याबद्दलच्या कल्पना रंगवुन सांगितल्या जातात.प्रसारमाध्यमांचा आधार घेऊन त्या माणसांच्या मनात रुजवल्या जातात.त्यामुळे बहुजनांच्या मनामध्ये भय/भीती तयार केली जाते. त्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती संपवली जाते. त्यांना मानसिक गुलमगिरीमध्ये जखडले जाते.
       म्हणून सर्वसामान्य माणसांना तुकाराम महाराजांनी या कल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.त्या आचरणात आणणे सुद्धा सोपे आहे.त्यामुळे बहूजणांच्या मनातील भीती,न्युनगंड कमी होण्यास,तसेच नष्ट होण्यास निश्चितच मदत होते.

🍃🌸🍃🌸

No comments:

Post a Comment