सुंदर विचार

आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसल तरी एकट्यानेच ते फुलवत रहा
वादळात सगळ वाहून गेल म्हणून रडत बसू नका.
वेगळ अस काही नाही माझ्यात खास म्हणून उदास होऊ नका.
मृगाकडे कस्तुरी आहे फुलात सुगंध आहे,
सागराकडे अथांगता आहे माझ्याकडे काय आहे अस म्हुणुन रडू नका,
अंधाराला जळणारा एक सूर्यही तुमच्यात लपलेला आहे,
आव्हान करा त्या सूर्याला,
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितीज घेऊन.
अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणे सजवून.
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ उत्साह ध्येयाने भरून म्हणून....
आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसल तरी ते एकट्यानेच फुलवत राहा...
      

No comments:

Post a Comment