एक सुंदर कविता......
खरंच मनाला दार असते तर
एखाद्याला आत घ्यायचे कि नाही हे ठरवता आले असते
नको ते विचार मनातून काढून टाकता आले असते
मनाला हसवणाऱ्या क्षणांना कुलुपबंद करता आले असते.
खरंच मनाला दार असते तर
आयुष्यातून जाणाऱ्या व्यक्ती च्या आठवणींना पण काढले
असते
आज हातात काही नसताना,
मनाला उद्याची स्वप्न पाहण्यापासून लांबच ठेवले असते.
खरंच मनाला दार असते तर
नाजुकशा त्या मनाला सगळ्यांपासून वाचवून ठेवले असते
दुसर्यांच्या मनाला जपतो तसं आपल्याही मनाला जपता आले असते
दाराला कुलूप लावून मनाला जगापासून लपवले असते
अनुभवातलं शहाणपण न देता, फक्त निरागस ठेवले असते!!!!
जर मनाला दार असते तर..

No comments:
Post a Comment