कथा क्रमांक ६२

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ६२ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ यथायोग्य निर्णय* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक कुंभार मातीची चिलीम बनवित होता. चिलीमचा आकार सुध्दा केला होता ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला !

मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?"

कुंभार म्हणाला, "मी चिलीम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"

माती म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलीम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !"

तात्पर्य : *जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन/ समूह प्रशासक📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment