विचारपुष्प क्रमांक १४५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
महान दार्शनिक कनफ्यूशियसने आपल्या वाणीचा सदुपयोग माणसाने कसा करावा हे सांगितले आहे.
माणूस समाधान मिळावे म्हणून जगत असतो . जीवनाचे समाधान समतोल वाणीच्या सयंमावर आणि सदुपयोगावर अवलंबून आहे.
       त्यामुळे त्याचे स्वतःचे हित तर होतेच , पण समाजाचेही हित झाल्याशिवाय राहत नाही.

       विनोबा म्हणतात , " वाणीने सख्य साधता येते , वाणीने वैरही बांधता येते.  वाणीचे वैर टिकते , तितके शस्ञांचे टिकत नाही ".

 म्हणून  विश्वाशी मैत्री इच्छिणाऱ्या विश्वामिञाची प्रार्थना आहे 🙏-- ' अमृत मे आस' ( माझ्या वाणीत अमृत असावे.)

समर्थ रामदासही सांगतात -- ' जगामध्ये  जगमिञ, जिव्हेपाशी आहे सूञ!
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन/ समूह प्रशासक🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment