🏠 *: घरात मोठ कुणीतरी पाहीजेच...👵👴*
पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी (वयस्कर) माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा . कुठल्याही कार्याचा श्रीगणेशाय करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा निर्णय अंतिम असायचा, ते म्हणतील तीच पुर्व दिशा सगळे निमुटपणे मानायचे व त्यांचा आदेश कृतीत आणायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील मोठ्यांचे...!!
आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागला...... स्वयंपाक खोली काय अन् देवघर काय सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली.......
मोठी माणसं नाहीसी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे . मर्यादा , धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहील्या आहेत . पूर्वी ह्याच गोष्टी , चालिरिती घरातील मोठी माणसे सांगायची.....
*म्हणून 🏠 घरात मोठी माणसे पाहीजेच......*
संध्याकाळी दिवे लावणीला शुभमकरोति - रामरक्षा चा सूर कानावर पडलाच पाहीजे...... रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहीजे....
रात्रीच उरलेल अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणार कुणीतरी पाहीजे.......
मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारे कुणीतरी पाहीजे . चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला ....
🏠 *घरात कुणीतरी मोठ पाहीजे हो......*
एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं......
टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करावं यामागच कारण उत्तमरित्या पटवून देणारं.......
बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...
आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणार तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणार ......
*खरच 🏠घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.*.....
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...
आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...
एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान....
कसं का असेना...सांगसवर करणारं .......
*🏠घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.*ज्या झाडाला फळ-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते, त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात. घरातील मोठी-वयस्कर माणसं ही तशीच असतात...
त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोक ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच.
🏠 *घरात मोठ कुणीतरी पाहीजेच*... 👵 👴

No comments:
Post a Comment