कथा क्रमांक ६४

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ६४ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ मनामनांतील अंतर*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"

सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."

यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो".

यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.

शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.
ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"
असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले....
"कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.

*तात्पर्यः शिकवण - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment