कविता शासन ............ ( संकलित )

षंढ झालय शासन,
षंढ झालीय प्रजा,
सैनिक सोसतोय सजा,
अन् पाकडा घेतोय मजा...

आम्ही लढतोय घरातच
काढतोय मूकमोर्चा,
टीह्वी पहात, चणे खात,
नुसत्या बाष्कळ चर्चा......

कुणाला पडलय देशाच,
कूणाल पडलय मातीच,
इथ महत्वाचं आहे,
स्थान आपल्या जातीचं.....

तिरंग्याचे रंग वाटून
आम्ही जपतो धर्म.....
जातीसाठी जगणंमरणं
हेच आमच कर्म......

वृद्धाश्रमात राहते आई,
बाप मागतोय भीक,
आमचा आपला एकच धंदा,
जमिनजुमला विक.....

बूजत चालल्या नद्या,
विझल्या दिव्यांच्या वाती,
मनामनातून मिटत चाललीय,
माणसांची ओली नाती......

उठा मर्दहो जागे होवून,
बलिदानांचे करा स्मरण,
ओळखा खतरा,गेले सतरा,
विसरु नका वीरमरण

अजून किती मरणांची ,
पहायची आहे वाट.....
अजून किती वहायला
 हवेत रक्तांचे पाट.....

फक्त सगळे थूंकलेतरी,
वाहून जाईल सारा पाक,
नूसत वळून बघितलतरी,
होउन जाईल राख राख......

कसल चरताय गु-हाळ रोज,
कसल्या करताय बाता,
नागड करून भर चौकात,
ढूंगणावर घाला लाथा....

खादीमधल्या नेत्यांनो,
बस्स झाल्या चर्चा,
झेपत नसेल तर सांगा,
ऊबऊ नका खूर्च्या......

जमत नसेल तर सांगा,
आम्ही घालू गोळ्या....
तूम्ही बांगड्या घालून
लाटत बसा पोळ्या......

ठणकावून सांगा मोदी
आता करणार नाही माफ,
काश्मिरकडे बघाल जरी,
तर करून टाकू सगळ साफ

No comments:

Post a Comment