माणूस ( कविता )

*माणूस स्वस्त झालायं*

मी पाहिले, पैसे पडले
लगेच त्याने उचलले..
पण माणूस जेव्हा पडला
तो हसून निघून गेला..

तेव्हा कळले मला..
पैश्याला भाव आलायं
माणूस म्हणून माणूस..
खुप स्वस्त झालायं

घरातील आई बाबा
रस्त्यावरआले..
अन् रस्त्यावरील,
 कुत्रा मांजर
घरात राहू लागले..

अरे खरच...!
माणूस खुप स्वस्त झालायं..
सुख दुःखात, कोणीच कोणाच्या
कामा नाही आलायं..

पैशाच्या मागे लागला
सर्वच विसरून गेला,
नात्याचे भान राहीले
ना-त्याचे त्याला भान उरले,
बेभान होऊन,तो स्वत्वाला विसरला....

*माणूस*
*माणूस*


*माणूस स्वस्त झालायं....*

No comments:

Post a Comment