🎄जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय 🎄
🌹पटलं तर असे वागा 🌹
1)जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा
अहंकार जर असेल तर
खरंच लवकर सोडा 🌹
2)जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल
गप्पा च्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल 🌹
3)महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे
पक्वान्नाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे 🌹
4)ठेचा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही 🌹
5)सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हटलं पाहिजे🌹
6)एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून 🌹
7)काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं 🌹
8)नवरा बायको दोन लेकरात
" दिवाळ सण " असतो का ?
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का ?🌹
9)साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो 🌹
10)सुख वास्तुत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे 🌹
11)दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं 🌹
🌹पटलं तर असे वागा 🌹
1)जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा
अहंकार जर असेल तर
खरंच लवकर सोडा 🌹
2)जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल
गप्पा च्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल 🌹
3)महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे
पक्वान्नाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे 🌹
4)ठेचा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही 🌹
5)सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हटलं पाहिजे🌹
6)एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून 🌹
7)काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं 🌹
8)नवरा बायको दोन लेकरात
" दिवाळ सण " असतो का ?
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का ?🌹
9)साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो 🌹
10)सुख वास्तुत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे 🌹
11)दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं 🌹
No comments:
Post a Comment