🌷उंबराचे झाड एक औषधी वनस्पती 🌷
उंबराच्या झाडाजवळ जमिनीखाली पाणी असते, असे म्हणतात. उंबराची साल, फळ, चीक, रस, पाने यांचा औषधात वापर करतात.
उंबर हे पित्तशामक, तसेच तहान भागविणारे आहे. अम्लपित्तावर उंबराची पिकलेली फळे साखरेबरोबर देतात. उष्णतेने अंगाची आग होत असल्यास सालीचे चूर्ण किंवा काढ्याचा उपयोग होतो. रक्तपित्त नावाच्या आजारात याचा चांगला उपयोग होतो. अंगावरून जास्त जाणे या स्त्रियांच्या विकारात फळे, सालीचा काढा घ्यावा. सारखे जुलाब होत असल्यास उंबराचा चीक साखरेतून खावा.
लहान मुलांच्या गोवर, कांजिण्या यामध्ये होणाऱ्या उष्णतेवर उंबराचा रस किंवा सालीचे चूर्ण मधातून चाटवावे. मुलांच्या नाकातून घोळाणा फुटणे यावर फळांचा उपयोग होतो.
खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, सारखी खा खा सुटणे, या भस्मक रोगावर सालीचे चूर्ण किंवा मुळाचे पाणी द्यावे.
जुन्या उंबराचे मूळ कापून त्याखाली भांडे ठेवावे, म्हणजे त्यामध्ये मुळाचे पाणी साठेल. हे पाणी अतिशय थंड असते. उंबरापासून ’उदुंबरावलेह’ करतात, तो ही थंड आहे.

No comments:
Post a Comment