चांगल्या कर्मातच देव असतो.

खालील प्रश्नांची उत्तरे शोधा
म्हणजे गणपती कुठे आहे समजेल..!
१.लालबाग चा राजा हा गणपतीच
ना?
जर तो नवसाला पावतो अशी
लोकांची श्रद्धा आहे मग
देव्हाऱ्यात असलेला गणपती हा
वेगळा आहे का ?
मनोभावे पूजन
केल्यावर तो देखील नवसाला
पावणार नाही का?
मग
त्यासाठी लालबाग ला जावेच
लागते असे आहे का ?

२. शास्त्रामध्ये
स्पष्ट सांगितले आहे की मूर्ती शाडू
मातीपासून तयार करावी मग
प्लास्टर पासून तयार केलेली मूर्ती
खरंच शास्त्रोक्त आहे का?

३.
गणपती च्या एवढ्या अवाढव्य
मुर्त्या तयार केल्या जातात की
विधी करण्यासाठी चक्क त्या
मूर्ती वर चढावे लागते , घरी पूजा
करताना देवाच्या पाटाला कधी
पाय लागू न देणारे आपले संस्कार ,
खरच या मोठ्या मूर्तींचे पावित्र्य
राखले जाते का?

४. दरवर्षी या
मोठ्या मुर्त्या पडल्याची एक तरी
दुर्घटना होते , यामुळे अनेकांच्या
भावना दुखावल्या जातात मग
यातून काही बोध घेण्याऐवजी
पुन्हा तीच कृती करणे कितपत योग्य
आहे?

५. या मोठ्या मुर्त्या
विसर्जनाकरिता समुद्रावर नेऊन
मूर्त्यांच्या गळ्यात दोरी टाकून
समुद्रात पाडल्या जातात , हे आपले
विधिवत विसर्जन ?
ही आपली संस्कृती ?
ही आपली धार्मिक श्रद्धा ?

६. लालबाग ला २४-२४
तास रांगेत उभे राहून जीवाचे हाल
करून एका दिवसात पुण्य प्राप्ती
होते का?
त्याऐवजी रोज केवळ १०
मिनिटे आई वडिलांची सेवा
केल्यास कमी त्रासामध्ये जास्त
पुण्य मिळणार नाही का?

देव हा सर्व.ठिकाणी सारखाच आहे ,
आकारांची पूजा करण्याऐवजी
विचारांची पूजा करा , देवाला
केवळ नवस केल्याने इच्छा पूर्ण होत
नाही , त्याला जोड लागते
मेहनतीची , सत्याची आणि
चांगल्या कर्मांची !
 🙏

No comments:

Post a Comment