आभाळातला चंद्र (संकलित पु.ल.) साभार

"आभाळातल्या चंद्राला मी कधी पौर्णिमेसाठी झुरताना पाहिलं नाही, अर्ध्या चंद्रकोरीतसुद्धा तो परिपूर्ण असतो .
अमावास्येच्या रात्री आभाळाचा निरोप घेऊन निघून जातानासुद्धा त्याला कधी दु:ख होत नाही आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याची घाई पण कधी असते असं नाही.

पहिल्या दिवशी तो जितका स्थितप्रज्ञ आणि निश्चल असतो तितकाच तो शेवटपर्यंत असतो आणि यापुढेही असेल याची मला खात्री आहे

पूर्णत्वाचा गर्व नाही, अपूर्णतेचे दु:ख नाही आणि अस्तित्वाची चिंता नाही.
आहे तो फक्त प्रवास - अखंड आणि अविरत. या प्रवासाला सुरुवातही नाही अन शेवटही नाही...
म्हणूनच तो सुंदर आहे, शांत आणि परिपूर्ण आहे."

पु.लं.

संकलित

No comments:

Post a Comment