भेट काव्य (संकलित )

*"भेट"*

किती प्रगल्भ व्याप्ती आहे...
*"भेट"* या शब्दाची ...
खरचं खूपच् अर्थपूर्ण .....
               
कोण..... कुणाला.... कुठे....
केव्हा ... कशाला .... *"भेटेल"* आणि का *"भेटणार नाही"...* ह्याला प्रारब्द्ध म्हणावं लागेल....

*"भेट" ह्या शब्द संकल्पने विषयी.....थोडंसं काव्यात्मक विवेचन ...*

*भेट* कधी थेट असते
कधी ती गळाभेट असते
कधी meeting असते
कधी नुसतंच greeting असते

*भेट* कधी 'वस्तू' असते
प्रेमाखातर दिलेली
*भेट* कधी देणगी असते
कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली

*भेट* कधी 'धमकी' असते ...
"बाहेर भेट" म्हणून दटावलेली
*भेट* कधी 'उपरोधक' असते
"वर भेटू नका" म्हणून सुनावलेली

*भेट* थोरा-मोठ्यांची असते
इतिहासाच्या पानात मिरवते....
*भेट* दोन बाल-मित्रांची असते
फारा वर्षांनी भेटल्यावर
पिकल्या केसांचा अंदाज घेत
चाचपलेली.....

*भेट* कधी अवघडलेली
'झक' मारल्या सारखी ....
*भेट* कधी मनमोकळी
मनसोक्त मैफील रंगवलेली

*भेट* कधी गुलदस्त्यातली
कट-कारस्थान रचण्यासाठी
*भेट* कधी जाहीरपणे
खुलं आव्हान देण्यासाठी

*भेट* कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
*भेट* कधी अखेरची ठरते . .
मनाला चुटपुट लावुन जाते

*भेट* कधी अपुरी भासते
बरंच काही राहून गेल्यासारखी
*भेट* कधी कंटाळवाणी
घड्याळाकडे पाहुन
ढकलल्या सारखी . .

*भेट* कधी चुकुन घडते
पण आयुष्यभर पुरून उरते
*भेट* कधी 'संधी' असते
निसटुन पुढे निघुन जाते

*भेट* कोवळ्या प्रेमीकांची
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर
*भेट* घटस्फोटीतांची ही असते
हक्क सांगण्यासाठी मुलांवर

*भेट* एखादी आठवणीतली असते
मस्त nostalgic करते
*भेट* नकोशी भूतकाळातली
. . सर्रकन अंगावर काटा आणते

*भेट .....*
विधिलिखीत ... काळाशी-
न टाळता येण्याजोगी !

*भेट ....*
कधीतरी . . .
आपलीच आपल्याशी
अंतरातल्या.....स्वत:शी !
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी....

संकलित 

No comments:

Post a Comment