कळत नाई भाऊ मले
कसं सांगू तुमाले |
कमी काऊन लेखता तुमी
जिल्हा परिषद शाळेले ||
पोषण आहार, पुस्तकं
कपडे इथं भेटतात |
गरिबाचे पोरं सारे
याच शाळेत शिकतात ||
बंद झाली पाटी आता
कमी झाला फळा |
जिकडं तिकडं झाल्या आता
डिजीटल शाळा ||
ज्ञानरचना वादानं त
कहरचं केला |
क-२ वाला पोरगा एकदम
अ-२ वरचं नेला ||
स्कॉलरशिप,नवोदयची
स्पर्धा इथं घेतात |
विज्ञान प्रदर्शना मंधी
मेडल घेऊन येतात ||
नाई इथं फी कोणती
नाई इथं डोनेशन |
वर्गामधे शिकवल्यावर
हवी कशाला ट्यूशन ||
जिकडे तिकडे कॉन्वेंटचा
होत आहे प्रचार |
कोण म्हणतय भाऊ इथं
पोरं नाहीत हुशार ||
एक वेळ जि.प. शाळेत
येऊन तर बघा |
उत्तर दयायला प्रश्नांचे
वर्ग दिसेल उभा.......
सारा वर्ग दिसेल उभा ||
🏵 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
कसं सांगू तुमाले |
कमी काऊन लेखता तुमी
जिल्हा परिषद शाळेले ||
पोषण आहार, पुस्तकं
कपडे इथं भेटतात |
गरिबाचे पोरं सारे
याच शाळेत शिकतात ||
बंद झाली पाटी आता
कमी झाला फळा |
जिकडं तिकडं झाल्या आता
डिजीटल शाळा ||
ज्ञानरचना वादानं त
कहरचं केला |
क-२ वाला पोरगा एकदम
अ-२ वरचं नेला ||
स्कॉलरशिप,नवोदयची
स्पर्धा इथं घेतात |
विज्ञान प्रदर्शना मंधी
मेडल घेऊन येतात ||
नाई इथं फी कोणती
नाई इथं डोनेशन |
वर्गामधे शिकवल्यावर
हवी कशाला ट्यूशन ||
जिकडे तिकडे कॉन्वेंटचा
होत आहे प्रचार |
कोण म्हणतय भाऊ इथं
पोरं नाहीत हुशार ||
एक वेळ जि.प. शाळेत
येऊन तर बघा |
उत्तर दयायला प्रश्नांचे
वर्ग दिसेल उभा.......
सारा वर्ग दिसेल उभा ||
🏵 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
No comments:
Post a Comment