कथा क्रमांक ४४

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४४ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻सत्कार्याचे फळ*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक शेतकरी शेतात फेरफटका मारत असतानाच त्याला एका काटेरी झाडाला एक गरुड अडकलेला दिसला. त्या सुंदर गरुडाची दया येऊन त्याने हळुवार त्याची सुटका केली.

       कडक ऊन्हामुळे तो शेतकरी एक पडक्या भिंतीच्या सावलीत बसला. इतक्यात घिरट्या घालणारा गरुड खाली आला आणि त्याच्या डोक्यावरील पागोटे चोचीत पकडून दूर टाकले.
ह्या प्रकाराने शेतकऱ्याला फारच  राग आला.संतापाने तो तिथून उठला आणि थोडे अंतर गेला नसेल, तोच  ती पडकी भिंत पडली.
हे पहाताच गरुडामुळे आज आपला जीव वाचला.हे त्याच्या ध्यानात आले आणि त्याने गरुडाचे शतशाः मनापासून आभार मानले.

*तात्पर्यः आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडलो,तर दुसरेही संकटकाळीआपल्याला मदत करतील.*

*'कर भला तो होगा भला'!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment