कथा क्रमांक ४०

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४० 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ *मोठेपणाचे ढोंग*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰
एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.

इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय.
पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन.

 त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा.
तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!

तात्पर्यः
काहीजनांना आपण फार मोठे आहोत असे वाटते. स्वतः ला  सर्वश्रेष्ठ समजतात.

〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment