कथा क्रमांक ३८.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
*मराठी शिलेदार समुहाचा उपक्रम*
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ३८. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ नेतृत्व सिंहाचे ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका आश्रमात ऋषींचा यज्ञ चालू होता,
एव्हढ्यात दूर कुठूनतरी प्रचंड धाड यावी असा आवाज यायला लागला.
ऋषींनी शिष्यांना सांगितलं की बघ जरा....
शिष्यांनी बाहेर जाऊन पाहिलं आणि घाबरून पळत आले ...
गुरुदेव, एक मोठ्ठा सिंहाचा समुह आश्रमाच्या दिशेनी येत आहे...
ऋषी म्हणाले की सिंहांच्या समूहाचे नेतृत्व कोण करतंय?...
शिष्य म्हणाले की एक अजस्त्र मेंढा त्यांचा नेता आहे ....
ऋषी म्हणाले की मग घाबरायचं काही कारण नाही..
यज्ञ चालू ठेवा...

दुस-या दिवशी पुन्हा दूर कुठूनतरी प्रचंड धाड यावी असा आवाज यायला लागला.
ऋषींनी शिष्यांना सांगितलं की बघ जरा....
शिष्यांनी बाहेर जाऊन पाहिलं आणि शांतपणे आले आणि म्हणाले की एक मेंढ्यांचा कळप आश्रमाच्या दिशेनी येत आहे...
ऋषी म्हणाले कि मेंढ्यांच्या कळपाचे नेतृत्व कोण करतंय?...
शिष्य म्हणाले की एक सिंह......
ऋषी म्हणाले ताबडतोब यज्ञ आवरा आणि आश्रमाचे दरवाजे बंद करा..
शस्त्र घेऊन सज्ज राहा...
शिष्य म्हणाले की, गुरुदेव..मेंढ्यांच्या कळपाची का एव्हडी काळजी करायची?........
ऋषी म्हणाले की जोवर एक सिंह त्यांचं नेतृत्व करतोय तोवर प्रत्येक मेंढा म्हणजे एक सिंह आहे...
आणि आता भिती एका सिंहाची नसून..
सिहांच्या समूहाची आहे.....

तात्पर्य: लीडर सर्व समूहाची मानसिकता बदलू शकतो...👍
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment