सांग पांडुरंगा...
कर्ज काढून पेरले रे
स्वप्न वावरात,
चिंतेन पावसाच्या
धडकी या उरात.
आत्ता मी वावरात
दाणा पेरीला,
सांग पांडुरंगा
कसा येवू वारीला....
दोन तिन साल गेले
दुष्काळच माथी,
लग्नासाठी पोरीच्या मी
जागलोया राती.
थेंब भर पाणी नाही
माझ्या विहिरीला,
सांग पांडुरंगा
कसा येवू वारीला....
गारपिट झाली,नाही
हाती आल काही,
काय सांगू दैना माह्या
पाठी बारमाही.
निसर्गान काय सांगू
घाव मारीला,
सांग पांडुरंगा
कसा येवू वारीला....
आबादाणी होउ दे रे
येवू दे रे पिक,
काळ्या काळ्या ढेकळाचा
वाटु दे हारीक...
येवू दे रे सोन्यावाणी
पिक जवारीला,
तवा पांडुरंगा
मी येईल वारीला....
संकलित.
कर्ज काढून पेरले रे
स्वप्न वावरात,
चिंतेन पावसाच्या
धडकी या उरात.
आत्ता मी वावरात
दाणा पेरीला,
सांग पांडुरंगा
कसा येवू वारीला....
दोन तिन साल गेले
दुष्काळच माथी,
लग्नासाठी पोरीच्या मी
जागलोया राती.
थेंब भर पाणी नाही
माझ्या विहिरीला,
सांग पांडुरंगा
कसा येवू वारीला....
गारपिट झाली,नाही
हाती आल काही,
काय सांगू दैना माह्या
पाठी बारमाही.
निसर्गान काय सांगू
घाव मारीला,
सांग पांडुरंगा
कसा येवू वारीला....
आबादाणी होउ दे रे
येवू दे रे पिक,
काळ्या काळ्या ढेकळाचा
वाटु दे हारीक...
येवू दे रे सोन्यावाणी
पिक जवारीला,
तवा पांडुरंगा
मी येईल वारीला....
संकलित.
No comments:
Post a Comment