शाळा माझी Z,P.ची (गीत )

🏡 *शाळा माझी झेड पी ची*🏡

🏡●शाळा माझी  झेड.पी.ची ,
आवडते  मज  फार ।
आम्हां मुलांना  ज्ञान देई ,
अन् जीवनास आकार ...आमच्या जीवनास आकार* ।धृ।।
📚●*ज्ञानार्जन हा धर्म आमचा ,
मानवसेवा  ध्येय  असे ।
प्रण करू या  विद्यामंदिरी
तेजवू भारता सूर्य  जसे ।
सावित्रीचे दुत आम्ही ….अन् शिवबाचे  सरदार ....
आम्ही शिवबाचे सरदार ।
शाळा माझी  झेड.पी.ची*....।।१।।
●🏃🏻भविष्य  आमुचे हो उज्ज्वल ,
ध्यास एकच  हा  ज्यांना।
देवासम हे गुरूजन माझे ,
करीतो प्रणाम  मी त्यांना।
संस्कारांचा  दिला  ठेवा …अन् जगण्याला आधार ....
आमच्या जगण्याला आधार  ।
शाळा माझी झेड.पी.ची ....।।२।।
●🏚शाळा म्हणजे  समाज मंदिर ,
माणूस येथ घडत असे ।
जातपात न धर्म  आम्हां ,
ठाऊक  यांतले काही नसे ।
आदर्श भारत बनवू आम्ही ...शिक्षण
 हीच ललकार...
आमची शिक्षण ही ललकार ।
शाळा  माझी झेड.पी.ची......।।३।।
       
    *✍ _गीतलेखन_*✍
⭕  *श्री.सुभाष ब.सुसर*✍⭕
🌹संकलित🌹

No comments:

Post a Comment