⛳अभंग ⛳
परपुरुषाचें सुख भोगे तरी | उतरोनि करीं घ्यावे सीस ||१||
संवसारा आगी आपुलेनि हातें | लावुनि मागुतें पाहूं नये ||२||
तुका म्हणे व्हावें धीट | पतंग हा नीट दीपा सोई ||३||
⛳⛳⛳⛳⛳⛳
संत तूकोबाराय या अभंगात म्हणतात की आपण या भौतिक जगतातील सगळे सुख जरी घेण्याचा अट्हास केला आणि जरी घेतले तरी त्याचा काही उपगोय होणार नाही.
आपले संचित प्रारब्ध एकदा का संपले की आपल्या हाती शेवटी काहीही राहत नाही.
त्यामुळे संत तूकोबाराय म्हणतात की आपण भौतिक सुखा पेक्षा आत्मसुखाच्या संकल्पनेला जाणले पाहिजे.
आणि आत्मसुखाची संकल्पना जाणायची असेल तर आपल्याला आधी पांडुरंगाच्या भक्तीचा अनुभव घ्यावा लागेल.
पुढे ते म्हणतात की एखाद्या स्त्रीने व्याभिचार करून पर-पुरुषाशी संबंध ठेवले तर त्या स्त्रीचे चारित्र्य हे कंलकित झालेले असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या वागण्यातुन जर आपले चारित्र्य कंलकित केले तर त्याची भरपाई कधीही करता येत नाही. त्या पांडुरंगाने आपल्याला दिलेल्या आयुष्याचा पतंग हा ईतका सहजा-सहजी टिकणारा नाही. त्यासाठी आपल्याला धीट होऊन हा पतंग आध्यात्माच्या आकाशात खुप उंचीवर घेवून जायचा आहे आणि निश्चित केलेले ध्येय गाठायचे आहे.
⛳जय संत तूकोबाराय⛳

No comments:
Post a Comment