विचारपुष्प ५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🚩अभंग 🚩

सोनें दावी वरी तांबें तयापोटीं | खरियाचेसाठीं विकुं पाहे ||१||

पारखी तो जाणें तयाचे जिवींचें | निवडी दोहींचें वेगाळालें ||धृ.||

क्षीरा नीरा कैसें होय एकपण | स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ||३||

तुका म्हणे थीता आपणचि खोटा | अपमान मोठ पावईल ||४||

🚩🚩🚩🚩
       जगदगुरु संत तूकोबाराय लोकांना नेहमी चांगले वागण्याचा उपदेश करतात. मनुष्याने स्वतःचे वर्तन चांगले ठेवले तरच त्याला जगताना कमी त्रास होईल. अन्यथा त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल.
          या अभंगात तूकोबाराय आपले मत व्यक्त करताना म्हणतात की दुसऱ्यांना फसवुन आपल्याला कधीच लाभ होत नसतो. उलट अशा वागण्याने भविष्यात आपल्यालाच त्रास होऊ शकतो.
   पूढे ते म्हणतात की सोन्याच्या मुलामा देऊन तांबे कधीच सोने म्हणुन विकता येत नाही. कारण सोने आणि तांबे हे दिसण्यास जरी समरंगी असले तरी त्यांचे गुणधर्म हे वेगवेगळेच असतात. त्यामुळे तांब्याला कधीच सोने म्हणुन विकता येणार नाही. जरी असा प्रयत्न करायचा प्रयत्न केला तरी पारखीला यातील फरक लगेच समजत असतो. आणि त्यामुळेच तो दोन्ही वस्तुंना वेगवेगळे करतो.
        पाणी आणि दूध हे एकमेका मध्ये अगदी ओळखु न येण्या इतपत मिसळून जातात परंतु, जेंव्हा तहान लागते तेंव्हा पाणीच प्यावे लागते. कारण इथे गुणधर्म स्पष्टपणे जाणवतात.
           त्यामूळे शेवटी ते म्हणतात की आपण अंतरंगातुन आणि बाह्य रंगातुन सारखे पणानेच वागले पाहिजे. कारण आपण जर दूट्टपी पणाने वागण्याचा प्रयत्न केला तर आपले हे वागणे जास्त दिवस लपून राहत नाहीत. त्यामुळे नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा.
🚩जय संत तूकोबाराय🚩
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment