विचारपुष्प २४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
'प्रेम म्हणजे मरण असतं. 'मी' हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करु  शकतो'.
 
  🌞 'सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू 💧आपोआप नाहीसे होतात'.
  🌞 सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

'अंधा-या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो. मग काही काळ चालणं अवघड जातं.
चालणं,
 ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं, एकाकी पडणं,  संकटाचा दरीत कोसळणं, हे सगळं घडु दे. ते पण जीवनात महत्त्वाचे असते . नियती, प्रारब्ध हे अडथळे  मानू नकोस. ते आपल्या वाट्याला  आलेल सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं  उरेल.

'अनुभव घेणारा प्रत्येकजण एकमेकांपेक्षा वेगळा असतो'.

कलेचे पराक्रम, विद्येतील यश, लौकिक या सा-या गोष्टी कोंदणासारख्या आहेत. त्यात सफल झालेल्या प्रेमाची हिरकणी चमकत असेल तरच त्या  कोंदणाची शोभा वाढते.
म्हणून

'माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.प्राणीमात्रावर  हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता'.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰
🙏🌳💦💦💦💦💦     '  पाणी हेच जीवन आहे'.🌳
💧💧 💧 💧💧 💧💧
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव,  जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment