विचारपुष्प ३९.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
राबिया नावाची एक सूफी संत होती.रात्रीची वेळ होती. ती हातात कंदील घेऊन घराबाहेर काहीतरी शोधत होती.
 एकानं विचारलं, ' काय शोधताय ?'  राबिया म्हणाली , ' सुई हरवलीय. '
  दुसऱ्यान प्रश्न केला, 'कुठं?'
राबिया म्हणाली ,  'घरात '. मग घराबाहेर कशाला शोधताय? घरात शोधा.'
एकजण  म्हणाला.

एव्हाना सगळं गाव तिथे गोळा झालं. तेव्हा जमलेल्या लोकांच्याकडं पाहून राबिया हसून म्हणाली, 'लोक हो ! अनेक वर्षापासून मी हेच सांगत आलेय की; देवाला बाहेर शोधू नका, त्याला तुमच्या ह्दयातच शोधा.
 
खरं तर आपणच आपल्या मनातील 'आनंदाची वनराई' जपून ठेवली पाहिजे . या विचारतच आपल्या जीवनाचा खरा शोध लपलेला आहे.

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment