कथा क्रमांक ४.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ४📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ सुभेदार व त्याचा घोडा♻
👳व 🐴
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका सुभेदाराचा👳 घोडा🐴 खुप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतीचा एक घोडा 🐎त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराच वेळ घालवू लागला.एकदा तो घोडा पहिल्या 🐴घोड्याला म्हणाला,🐎 'दादा, तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात इतका आनंद वाटतो, याचे कारण काय? पहिला घोडा म्हणाला, 'कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी जुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा🙂 स्वभाव आहे. आजकाल मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसांत तूही त्याला आवडणार नाहीस व तुझ्याजागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे'!
👉 तात्पर्यः
-- नव्याचे नऊ दिवस!
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://pramilasenkude.blogspot.in/?m=1
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment