विचारपुष्प २६.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🚩अभंग 🚩

चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ | तेंचि किती काळ वाढवावें ||१||

अबोल्याचा काळ आतां ऐशावरी | वचनाची उरी उरली नाहीं ||धृ.||

करूं आला तो तो केला लावलाहो | उरोंचि संदेहो दिला नाहीं ||३||

तुका म्हणे मोहो परतेचि ना मागें | म्हणऊुनि त्यागें त्याग झाला ||४||

🚩🚩🚩🚩
       आम्ही ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो पाहिजे.
               या अभंगात संत  तूकोबाराय म्हणतात  की आपण चिंतनाच्या माध्यमातुन स्वतःचे आत्मबल वाढवले पाहिजे.
         एकदा आपले आत्मबल वाढले की ध्येया साठी आपण अढळ विश्वासाने मार्गक्रमण  करू शकतो
        बदलत्या काळात आपण स्वतः मध्ये बदल घडवला पाहिजे. तरच काळानुरूप होत असलेले बदल अभ्यासता येतात.
     पुढे म्हणतात की आम्हाला हा बदल समजल्या मुळे आम्ही अध्यात्मात मार्गक्रमित झालेलो आहोत. सगळ्या मोह-मायेतून दूर राहत आणि त्याग भावना उरी बाळगत स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत आहोत.

🚩जय संत तूकोबाराय 🚩

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏💦Water is the driving force of nature🌳🌴🌳
💦💦💦💦💦💦💦
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment