कथा क्रमांक ४.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ४ 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻  आईचे प्रेम  ♻
👩‍👩‍👦💗

=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका परीने एकदा जाहीर केले,
"ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात सुंदर 👌असेल, त्याला मी छान बक्षीस देईन."

           ते एकूण  सर्व प्राणी🐘🐪🐏🐑🐎🐖🐃🐂🐂🐃🐍🐓🐈🐿🐇🐕 एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपल्याबरोबर आपली पिले आणली होती. परीने एकामागून एक सर्व पिलांना निरखले. तिने माकडिणीच्या🐒 पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, "किती कुरुप आहे हे पिल्लू! या पिलाला कधी बक्षीस मिळणारच नाही."

    परीचे हे बोलणे एकूण त्या पिलाच्या आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पिलाला ह्दयाशी 💗 धरले आणि ती पिलाच्या कानात 👂कुजबुजली. " माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ  नकोस.माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो."

तात्पर्यः  'आईच्या ❤प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.'
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड.

©मराठीचे शिलेदार समूह 🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment