कथा क्रमांक ११

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ११📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगा  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एके दिवशी एका लांडग्याला मेंढीचे कातडे सापडले. त्याने ते कातडे अंगावर पांघरले. मग तो कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपात सामील झाला.
   
       लांडग्याने मनात विचार केला , " मेंढपाळ संध्याकाळी सर्व मेंढ्यांना कोंडवाड्यात बंद करील. मग  मीही शिरेन मग  रात्री एखाद्या मेंढीला घेऊन पळून जाईल आणि तिला खाईन."

           संध्याकाळी मेंढपाळाने सर्व  मेंढ्यांना कोंडवाड्यात बंद  केले आणि  तो निघून गेला.  हळूहळू काळोख गडद होत गेला.
 अचानक मेंढपाळाचा एक नोकर तिथे आला. रात्रीचा जेवणासाठी एक  लठ्ठशी मेंढी आणण्यासाठी त्याला त्याच्या  मालकाने पाठवले होते. त्या नोकराने मेंढीचे कातडे पांघरलेल्या लांडग्यालाच मेंढी समजून उचलले आणि ठार मारले.
त्या  रात्री मेंढपाळाने आणि  त्याच्या पाहुण्यांनी लांडग्याच्या मांसावर ताव मारला.


तात्पर्यः  दुष्टांचा शेवट दुर्दैवीच होतो.
〰〰〰 〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment