श्लोक
मना सर्वदा सत्य सांडू नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे
मना सत्य ते सत्य वाचे वदावे
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनी द्यावे
जनी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तुचि शोधूनी पाहे
मना त्वाची रे पूर्व संचिते केले
तयासारखे भोगणे प्राप्त झाले
मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी
संकलित
No comments:
Post a Comment