*📚पत्रलेखन📚* *विषयः सासुरवाशीन मुलीचे आईवडीलास पञ.* (दि. 24- 05-2020) *श्री* तीर्थस्वरूप आई-बाबास चरणी श्रीसाष्टांग नमस्कार.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आईबाबा मी बरेच दिवसा नंतर आपणास पत्र लिहीत आहे. क्षमा असावी. आईबाबा मला तुमची फार आठवण येते ग. तुम्ही खुशाल आहात ना! इकडे माझ्या सासरची सर्व मंडळी व मी कुशलपूर्वक आहे. ईश्वर कृपेने आई-बाबा तुम्ही पण कुशलपूर्वक असालच. आई बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा. वेळेवर जेवण करीत रहा. मी इकडे खूप आनंदात आहे. माझी काळजी करत जाऊ नका. माझ्या घरची मंडळी अतिशय चांगली आहे. माझे सासू-सासरे, व तुमचे जावई हे सर्व जण मला खूप लाडात ठेवतात. मी सासरी आहे की माहेरी आहे हा भास सुद्धा मला होऊ देत नाहीत. अगदी लाडाने मला वागवतात. आई तू बाबा ची काळजी घेत जा, त्यांना वेळेवर औषधी देत जा. बाबा तुम्ही आईची काळजी घेत जा. तुम्हाला माझी आठवण आली तर मनाला दुःख करून घेत जाऊ नका. मलाही तुमची फार आठवण येते. परंतु काय करावं मुलीचे लग्न झाल्यावर आपल्या घरी सासरी नांदायला प्रत्येक मुलगी जाते. तिचा जन्म ज्या घरात झाला , ती लहानाची मोठी जिथे झाली तिथेे तिचे सर्व लाड आई-वडिलांनी पुरवले तिला लहानाची मोठी करून शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करून शेवटी तिला ते घर सोडून लग्न करून सासरी जावं लागतं. बरं असो. आई बाबा ही तर जगाची रीतच झाली. मी इकडे खुप आनंदात जरी असली तरी मला तुमच्या सर्वांची खुप आठवण येते. तुमच्या आठवणीचा कल्लोळ माझ्या हृदयात सारखा होत असतो. आपल्या चाळीतील मित्र-मैत्रिणींसोबत खेळणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे . त्यानंतर आई तू मला गरम गरम जेवायला देणे. माझे आवडते पदार्थ तू किती आनंदाने करत होती.बाबा माझ्यासाठी किती खाऊ आणीत होते. हे सर्व आठवले की मी बालविश्वात हरवून जाते ग आई! असो आई बाबा तुम्ही प्रेमाचा सागर आहात. आपल्या लाडक्‍या लेकीच्या मायेचा पाझर आहात. तुमच्या आठवणी हृदयात मी जपणार, घायाळ त्या मनावर पत्र लिहून फुंकर मी मारणार. *आईबाबा* *"राहून मी तुमच्या दूर सुद्धा*, *सदैव तुमच्यासोबत आहे,* *सासरमाहेर माझे एकच* *समजून मी खूप सुखी व आनंदात आहे."* कळावे तुमचीच लाडकी सोनु प्रमिलाताई सेनकुडे ता. हदगाव जि.नांदेड.

No comments:

Post a Comment