🌹चारोळी🌹 चांदण्यांचा मळा आकाशात फुलून आला आगमन होता रविचे आकाशात विरून गेला. ✍©श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे हदगाव(नांदेड ) 🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 💥 जन्म :- १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स  💥 मृत्यू :-  १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे १९९७: स्वरराज छोटा गंधर्व *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अहमदपूर (जि. लातूर) : येथील साहित्य संगीत कला अकादमीतर्फे दिला जाणारा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१७’ ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी (मुंबई) यांना जाहीर* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्लीमधील आनंद पारबत परिसरात केमिकल फॅक्टरीमध्ये आहे, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल.* ----------------------------------------------------- 3⃣ *जम्मू काश्मीर - लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी राजौरी सेक्टरवर जाऊन घेतला सुरक्षेचा आढावा.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - एमआरटीपी अंतर्गत कमला मिल मालक रमेश गोवानी, मोजोस आणि वन अबोव्ह संचालक विरुद्ध गुन्हा दाखल, पालिकेकडून तक्रार दाखल.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त.* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशालता करलगीकर यांचे निधन, त्यांना 'आंध्रलता' म्हणून ओळखले जात असे.* ----------------------------------------------------- 7⃣ *२०१७ वर्ष क्रिकेटसाठी अत्यंत शानदार ठरले. अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन करताना हे वर्ष गाजवले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सौदागर नागनाथ गोरे* सौदागर नागनाथ गोरे, ऊर्फ छोटा गंधर्व, (१० मार्च, इ.स. १९१८ - ३१ डिसेंबर, इ.स. १९९७) हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावात १० मार्च, इ.स. १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत इ.स. १९४३मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्‍या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्याअध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत* 👉 रामनाथ कोविंद *२) प्रख्यात लेखिका तस्लीमा नसरीन कोणत्या देशाच्या आहेत?* 👉 बांग्लादेश *३) भारताचे २०वे सरन्यायाधीश कोण होते?* 👉 सब्यसाची मुखर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा 👤 ताहेर पठाण, धर्माबाद 👤 किरण अबुलकोड, समराळा 👤 अमोल बुरुंगुले 👤 शशांक पुलकंठवार 👤 सचिन चव्हाण *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *काळ* काळा सोबत चला तो कोणासाठी थांबत नसतो काळ कोणासाठी का कुठे सांगा तुम्ही लांबत असतो काळा सोबत चालतो त्याचा काळ चांगला जातो काळ वेळ न पाळणारा वर्षानुवर्षे ओरडत रहातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= पहायला आणि विचार करायला गेलो तर काळ आणि वेळ कुणासाठी कुणाच्या म्हणण्यानुसार थांबत नाही आणि थांबणारही नाही..मग एवढे असतानाही आपण उगीच म्हणत असतो की,आता हे वर्ष संपून नवे वर्ष लागत आहे.हे वर्ष केव्हा संपले काही कळलेच नाही. कळेल तरी कसे ? कारण आपण आपल्या धुंदीत होतो ना ! आपणास आपल्या कामामध्ये कुणाच्याही जीवनाकडे पहायला वेळही मिळाला नाही.जे काही आपण संकल्प केले होते ते पूर्ण झाले की नाही याचाही आपण विचार केला नाही. तुम्ही तुमच्या जीवनात संकल्प करा अथवा करु नका परंतु येणारा प्रत्येक दिवस,वार,महिना आणि वर्ष हे तुमच्यासाठी,तुमच्या जगण्यासाठी आव्हानात्मकच आहे. तुमच्यासाठी रोज काही ना काही प्रश्न घेऊन येणारच आहे.त्या प्रश्नांना किंवा येणा-या काळाला,वेळेला नि येणा-या नवीन वर्षाला रोजच्यासारखेच समजून जेवढे तुम्ही नव्या जोमाने काम करता तेवढ्याच पद्धतीने येणा-या वर्षाततही कामाला लागा निश्चितच तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी होईल. आपण समाधानी झालो तर इतरांनाही आपण काहीतरी करण्याची इच्छा प्राप्त होईल आणि तुम्ही आपोआपच सहज ते करु शकाल यासाठी संकल्प करायची गरजच नाही.चला तर मग नेहमीप्रमाणे आपण आपली कामे रोजच्यासारखीच करायला सज्ज रहा म्हणजे तुम्ही न ठरवताही तुमचे संकल्प पुर्णत्वाकडे जातील. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *वार काढा तोंडी* दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत १) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस, २) ३० तारिख ओलांडताना २ दिवस, ३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस, ४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल. उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१६ रोजी कोणता वार असेल? उत्तर:- ३१ मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल. तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घार व कबुतरे* एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्‍या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य - एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्‍या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/12/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह. १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला. १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर. १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार. २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार. 💥 जन्म :- १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म. १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी. १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक. 💥 मृत्यू :-  १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ. १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी. १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर. २००१ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : शिक्षण क्षेत्रात परिवर्तन व्हायला हवे. यामध्ये शाळांचे आणि शिक्षणाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आता बदल करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करा, दिल्लीतील नागरिकांना पोलिसांचे आवाहन.* ----------------------------------------------------- 3⃣ *अंदमान - निकोबारमध्ये भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी मोजण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज 2 जानेवारी 2018 पर्यंत तहकूब करण्यात आले.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - कमला मिल आग : निष्काळजीप्रकरणी पालिकेच्या पाच अधिका-यांवर निलंबनाची कारवाई, आयुक्त अजोय मेहता यांची माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आजपासून दोन दिवस विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा. जळगाव, धुळे व नंदुरबारमधील विद्यार्थी होणार सहभागी, विज्ञान भारतीचे सचिव जयंतराव सहस्रबुद्धे यांचीही उपस्थिती.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा : संघर्ष* आज सुनंदाच्‍या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते.  तिचा एकूलता एक मुलगा सुनील नौकरीसाठी मुंबईला चालला होता.  अतिशय कठीण परिस्थितीत सुनीलने आपले कॉम्‍प्‍युटर इंलिनिअरींग कोर्स पूर्ण केला होता.  कॅम्‍पस इंटरव्‍ह्यू मधूनच त्‍याला टाटा कंपनीने नौकरीसाठी कॉल पाठविला होता.  देवगिरी ...... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विक्रम साराभाई* भारतीय शास्त्रज्ञ विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म  अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते  ब्रिटनमधील  केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी  भरतनाट्यम,  कुचिपुडी  या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई  यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात. ~ वपु काळे | काही खरं काही खोटं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले गाव कोणते?* 👉 पंडरी *२) युनिसेफची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *३) वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये चीनचा कधी प्रवेश झाला?* 👉 २००१ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *आसनं अन् दिसनं* सारखं दिसतं म्हणून सारखं असत नाही एकच गोष्ट प्रत्येकाच्या डोक्यात बसतं नाही आसनं अन् दिसनं यात खूप फरक असतो प्रत्येक घटने मागे एक विशिष्ट कारक असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एके दिवशी कुणीतरी आपल्यावर दया करुन दिलेल्या एका भाकरीपेक्षा कष्टाने आणि स्वाभिमानाने मिळवलेली अर्धी भाकरी अधिक सुखाची असते.ती लाचारी कधीच स्वीकारत नाही तर आपला स्वाभिमान जागृत करुन जगासमोर जगायला शिकवते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.* हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . *उदा.*-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सिंह व जंगलातील प्राणी* 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो* एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *तात्पर्य* : - *आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल. २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी. 💥 जन्म :- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील. १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक. १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक. १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते. 💥 मृत्यू :-  १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ. १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, तापमानात घट.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- कमला मिल कंपाऊंडमधील भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू, 12हून अधिक जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *ऐतिहासिक दिवस ! तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर* ----------------------------------------------------- 4⃣ *दर महिन्याला घरगुती गॅसचे दर वाढवण्याचा निर्णय मागे, आता दर महिन्याला घरगुती गॅसचे दर वाढवणार नाहीत.* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताने सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेने तामिळनाडूच्या 69 मच्छीमारांची सुटका केली.* ----------------------------------------------------- 7⃣ *मेलबोर्न : अ‍ॅलिस्टर कूकच्या विक्रमी द्विशतकी खेळीमुळे इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या अ‍ॅशेस कसोटीच्या तिस-या दिवशी पहिल्या डावात १६४ धावांच्या आघाडीसह सामन्यावर वर्चस्व मिळविले आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरी संपत्ती* अमित हा बँकेत कारकून.  त्‍याची पत्‍नी नयना प्राथमिक शाळेत शिक्षिका. दोघांनाही चांगला पगार होता. त्‍यांचं कुटुंब सुखी व समाधानी होतं, अमन व पूजा नावाची दोन गोंडस मुलं देवाने त्‍यांच्‍या पदरात दिली होती.  त्‍यांच्‍या जीवनात कोणत्‍याच गोष्‍टीची वाणवा नव्‍हती ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_37.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राजेश खन्ना* भारतीय चित्रपट अभिनेते राजेश खन्ना (जन्म: 29, 1942 - मृत्यू: 18 जुलै 2012) हे एक भारतीय बॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती केली तसेच राजकारणात प्रवेश केला. ते 1991 ते 1996 दरम्यान पाच वर्षांसाठी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून  कॉंग्रेसचे खासदार होते . त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त झाले. त्यांना काका या नावाने ओळखले जात असे. आनंद या चित्रपटातील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. 180 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे आणि 128 चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे आणि दुहेरी भूमिकांशिवाय 22 लघुपटांमध्ये 22 लघुचित्रपटही केले आहेत 1969 -71 मध्ये तीन वर्षांत, 15 एकटय़ा हिटमध्ये अभिनय करणे हा बॉलीवूड सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले.  त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आणि 14 वेळा नामांकन करण्यात आले. बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशनने हिंदी फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता पुरस्कार देखील चार वेळा सर्वाधिक नामांकीत केले आहे आणि 25 वेळा ते नामांकन करण्यात आले होते.  2005 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड मिळाले.राजेश खन्ना हिंदी सिनेमाच्या पहिले सुपरस्टार होते. त्यांनी 1966-1991 मध्ये 74 सुवर्ण जयंती चित्रपटांची निर्मिती केली. (गोल्डन ज्युबली हिट).  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुफान प्रेम करणारी जितकी माणसं जोडाल, तेवढी घरं तुमची झाली. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) केंद्राने २२ भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?* 👉 भारतवाणी *२) अ. भा. म. सा. संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?* 👉 लक्ष्मीकांत देशमुख *३) इराकमधून कोणाचा नायनाट करण्यात आला आहे?* 👉 आयसीस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष हणमंतराव कंदेवार उपायुक्त, मनपा, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *उंटावरून* बरं वाटतं कोणालाही उंटावरून शेळ्या हकायला कसं कळलं नेमकं कोणाचं काय लागलंय दुखायला उंचावरून शेळ्या हाकुन काम व्यवस्थित होत नाही कोणी कितीही मोठा केलेला संकल्प तडिस जात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाभारतात 'सोनेरी मुंगूस' ही कथा आहे. महायुद्ध संपल्यावर पांडवांनी राजसूय यज्ञ केला. अन्नदान केले, आनंदोत्सव केला. इतक्यात भटारखान्यातून काही बल्लवाचार्य श्रीकृष्ण आणि पांडवाच्या तंबूत आले. दानासाठी जिथे अन्न शिजविले त्या निखा-यांमध्ये कुठूनतरी एक मुंगूस येऊन लोळू लागले. सर्वांगाला राख फासून घेऊ लागले. काही वेळाने निराश होऊन ते बाहेर आले. त्याची एक बाजू सोनेरी असून चमकत होती. पांडवांनी छेडताच ते म्हणाले... एका दुष्काळात एक ब्राम्हण कुटुंब उपासमारीने दिवस काढीत होते. एके दिवशी ब्राम्हणाला चार पोळ्या मिळाल्या. प्रत्येकाला एकेक पोळी मिळणार इतक्यात अतिथी आला. प्रथम ब्राम्हणाने, नंतर मुलाने, मग ब्राम्हणाच्या पत्नीने त्याला आपला वाटा दिला. तरीही अतिथी याचक वृत्तीने पहात राहिला.* *शेवटी ब्राम्हणाच्या गरोदर सुनेने आपला भाग दिला. तेथे काही अन्नकण पडले होते. ते मुंगूस अन्नासाठी तिथे फिरले. त्याची जी बाजू त्या कणांना लागली ती सुवर्णासारखी तेजस्वी झाली. ब्राम्हण कुटुंब 'अतिथी देवो भव' वृत्तीने संतोष पावले..पण भुकेने मरण पावले. ही गोष्ट सांगून मुंगूस म्हणाले,'तुम्ही यज्ञ करून पुण्यसंचय केलात, अन्नयाग करून कृतार्थ झालात. हे ऐकूण इथे माझे सर्वांग सोनेरी होईल या आशेने मी आलो. पण कसले काय! युद्धात तुम्ही असंख्य योद्धे मारलेत, कित्येक सुहासिनी विधवा झाल्या. कित्येक गावे निर्मनुष्य झाली आणि हे सारे अहंकार सुखविण्यासाठी केलेत. तुमचा जय निर्मळ, नितळ आणि निष्कलंक नाही. हे ऐकून पांडव खजिल झाले. गरीब ब्राम्हण कुटुंबाने स्वत:चा विचार न करता 'दातृत्व' हे मूल्य मानले. उलट पांडवांच्या दातृत्वात विजयाची नशा होती. श्रीकृष्णाला हे जाणवले, तेव्हा तो हसला. यांचा 'अहम' यांना वेळीच दाखवायला हवा होता, असे त्याला वाटले. सोनेरी मुंगसाने ते काम अचूक केले..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल. अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे. तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *कविता करणे* *कृती -* 1) शब्दाच्या शेवटी ळा हे अक्षर येणारे शब्द लिहा उदा. शाळा 2) प्रत्येक शब्द शेवटी असेल असे वाक्य तयार करा. उदा. ही माझी सुंदर शाळा. 3) चार वाक्य एकाच विषयी संबंधित असेल असे वाक्य एकत्र करा 4) अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी वाक्यात थोडा बदल करू या मात्र शेवटचा शब्दाचा शेवटी ळा असावा म्हणजे कविता पूर्ण होईल. 5) पाहू आत्ता शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यानी कविता कशी तयार केली ? ही माझी सुंदर शाळा तेथे मुले झाली गोळा शाळेत आहे मोठा फळा त्याचा रंग आहे काळा अजुन भरपूर कविता मुले करू शकतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुई आणि वाघ* एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, 'सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?' सुई म्हणते, 'हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. 'सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ? विंचवाला सुई म्हणते... 'हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते. 'सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का? सुई म्हणते 'हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल. सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात. थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो. शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बाॅक्समधून सर्व नाणी काढुन फ्राॅकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली. ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही. केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता. त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली. केमिस्ट तिच्याकडे आला , कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..? " मला चमत्कार पाहिजे " केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ? ती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे .. केमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही... ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल ! केमिस्टने विचारले , बेटा तुला हे कोणी सांगितले?.... तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली.. माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत, जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत... त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला , ( त्याला गुजराती भाषा येत होती. ) व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी ? तिने आपली छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते. तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला , बेटा, तु चमत्कार विकत घेतलास.... चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल.. तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन "डाॅ. जाॅर्ज अॅडरसन " होता. त्या सर्जनने मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला. सर्जरी झाल्यानंतर हाॅस्पीटल मधुन बाहेर पडताना डाॅ.जाॅर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला ...... बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही ? जरुर मिळतो...जरुर मिळतो.. ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती. 💐 निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली.💐 👍जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो.👍 😊हाच आस्थेचा चमत्कार आहे. 😊 जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल, आणि तुम्हालाही इतरांसाठी समर्पण भावना असेल, तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच.. 🤝आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ ✌ निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे.✌

*कृतज्ञतेचा निर्देशांक* असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; "Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!". *(कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!).* मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं. लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा; *१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :* म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं, या बद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल. *२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे :* आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही. *३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे :* म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरून असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चालल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्टीत सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? *४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :* मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दलजाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का? विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यु" म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात "थँक यु" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख(ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो. या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं "थँक यु" आपोआपच पोहोचतं ... 🙏🏻🙏🏻

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार. १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :-  १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *हिमाचल प्रदेशमध्ये नवीन सरकारचा शपथविधी सोहळासंपन्न, जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री.* ----------------------------------------------------- 2⃣ *समृद्धी महामार्गावर टोल लागणारच. 'समृद्धी हा विषेश महामार्ग, टोल असणारच', सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *बीड : माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजा आनंदगावकर विजयी.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : लघुबचत योजनांच्या व्याज दरात 0.2 टक्कांची कपात करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूरः राज्यातील वातावरण बदलांमुळे विदर्भात थंडीची लाट. नागपूरमध्ये सर्वात कमी तापमान ७.८ अंश सेल्सिअस.* ----------------------------------------------------- 6⃣ *डोंबिवलीत २८ जानेवारी रोजी सायकल मित्र संमेलन :नाट्यगृहाने अखेर दिली तारिख* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरुदक्षिणा* मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धीरूभाई अंबानी* धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी (गुजराती: ધીરુભાઈ અંબાણી ) (डिसेंबर २८, इ.स. १९३२ - जुलै ६ इ.स. २००२) हे गुजराती व भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. धीरूभाई यांचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी डिसेंबर २८, इ.स. १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य. धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्‍या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एसबीआयने किती शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत?* 👉 १२०० *२) स्टेट बॅंकेचे प्रबंच निदेशक कोण आहेत?* 👉 प्रवीण गुप्ता *३) सध्या कोणती महाराष्ट्रीयन महिला पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे?* 👉 कश्मिरा पवार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साई पाटील, धर्माबाद श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस 👤 वृषाली वानखडे, अमरावती सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक 👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद 👤 अजय तुम्मे 👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती 👤 नंदकिशोर सोवनी, पुणे 👤 ओमसाई सितावार, येवती 👤 ओमकार ईबीतवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *नैतिकता* स्वहिता पुढे नैतिकता सहज विसरली जाते सुसंस्कृत माणसाची जीभ घसरली जाते छोट्याशा गोष्टीसाठी नैतिकता सोडतात लोक वागतात जसे की ते आहेतच बीन डोक शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========   जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण*            *टिचकी  मारूनी जावे.*   *कृती—* 🔶प्रथम दहा दहा मुलांचे दोन गट करून समोरासमोर तोंड करून रांगेत बसवावे. त्यांच्या हातात शब्दाचे फलक द्यावे. *गटप्रमुखाने* रांगेतील एका मुलाचे डोळे झाकून पुढील वाक्य म्हणावे. *बदक ने यावे टिचकी मारूनी जावे.* 🔶ज्या मुलाजवळ ते शब्द फलक असेल तो मुलगा येऊन टिचकी मारून जाईल नंतर डोळे उघडल्यावर *बदक* शब्द फलक कोणाजवळ आहे त्याला ओळखेल. अचूक शब्द ओळखल्यास त्या मुलाला शाबासकी द्यावी. अशा प्रकारे आपण *अनेक कार्ड* हातात देऊन खेळ घेता येतो. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वासघात*  एका धनगराचा आपल्या कुत्र्यावर फार विश्‍वास होता. जेव्हा त्याला कोठे तरी बाहेर जायचे असे, तेव्हा आपली मेंढरे तो कुत्र्याच्या स्वाधीन करत असे. कुत्र्याने आपली चाकरी इमानाने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला लोणी-भाकरी खाऊ घालत असे, पण त्याचा कुत्रा इतक्या विश्‍वासास पात्र नव्हता. त्याचा मालक त्याला इतक्या चांगल्यारीतीने वागवीत असूनही केव्हा तरी एखादी मेंढी खाण्यास तो कमी करत नसे. ही त्याची लबाडी एके दिवशी धनगराने पाहिली तेव्हा तो त्याला ठार मारू लागला, त्यावेळी कुत्रा त्याला म्हणाला, 'साहेब, माझ्याकडून चुकून एक वेळ अपराध घडला, तेवढय़ासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका. मला मारण्यापेक्षा जो लांडगा तुमच्या मेंढय़ा मारून खातो, त्याचा जीव तुम्ही का घेत नाही?' धनगर त्यावर म्हणाला, 'अरे लबाडा, लांडग्यापेक्षा तुझा दुष्टपणा अधिक भयंकर आहे. कारण लांडगा हा माझा शत्रूच आहे. त्याच्यापासून मला अपकार व्हायचाच, हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे त्याच्यासंबंधीने योग्य ती खबरदारी मी ठेवत असतोच, परंतु तू माझा विश्‍वासू नोकर असताना अन् मी तुला इतक्या चांगल्यारीतीने वागवत असताना तू ज्या अर्थी असा कृतघ्नपणा करायला प्रवृत्त झालास त्याअर्धी तू क्षमेला मुळीच पात्र नाहीस.' इतके बोलून त्याने त्याला एका जवळच्या झाडाला टांगून मारून टाकले. तात्पर्य :- विश्‍वासघातकी माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही व एकदा त्याचा विश्‍वासघातकीपणा उघडकीस आल्यावर लोकांनी जर त्याला यथायोग्य शासन केले, तर ते योग्यच झाले, असे म्हटले पाहिजे.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

माता म्हणा मदर म्हणा आई शब्दात जीव आहे .... पिता म्हणा पप्पा म्हणा बाबा शब्दात जाणीव आहे सिस्टर म्हणा दीदी म्हणा ताई शब्दात मान आहे .... ब्रो म्हणा भाई म्हणा दादा शब्दात वचक आहे.... फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा मित्र शब्दात शान आहे .... एन्ड म्हणा फिनिश म्हणा अंत शब्दात खंत आहे ..... दिवार म्हणा वॉल म्हणा भिंत शब्द जिवंत आहे रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा नातं शब्दात गोडवा आहे एनेमी म्हणा दुश्मन म्हणा वैर शब्द जास्त कडवा आहे.. हाय म्हणा हॅलो म्हणा हात जोडणे संस्कार आहे सर म्हणा मॅडम म्हणा गुरु शब्दात अर्थ आहे ग्रँड पा ग्रँड माँ शब्दात काही मजा नाही आजोबा आजी सारखे सुंदर नाते जगात नाही.. गोष्टी सर्व सारख्या पण फरक फार अनमोल आहे अ ते ज्ञ शब्दात ज्ञानाचे भांडार आहे म्हणुनच इंग्रजी पेक्षा आपल्या मराठीत जास्त आदर आहे.

संकलित

*एकच ध्यास,वाचन विकास।।* ••••••••••••••••••••••••••• *वाचणार रे वाचणार १००% वाचणार* 📚📚👍👍📚📚 *📚 १००% विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास कार्यक्रम-२०१७-१८* 〰〰अंतर्गत〰〰 👇 *🔰तालुका स्तरीय शिक्षक प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा* *🌅(दिनांकः २७ ते २९ डिसेंबर-२०१७)* टप्पा क्रमांक(३) (दिवस पहिला.) 🖼स्थळः- आर्य समाज मंदिर हदगाव जि.नांदेड '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' *प्रेरणा*💐💐 👇 *मा.नंदकुमार साहेब(प्रधान सचिव)* 〰〰〰〰〰〰 ---------------------------------- प्रशिक्षणास उपस्थित व भेट (अधिकारी वर्ग) प.समितीचे ग.शि.अ. मा.श्री .ससाणे साहेब, मा.श्री उत्तरवार सर , शि.वि.अ.मा.श्री पाटील साहेब, मा.श्री जाधव साहेब,मा.श्री पावणे साहेब केंद्रप्रमुख मा.श्री अंभोरे साहेब,मा.श्री वारकड साहेब, मा.श्री कदम साहेब 🙏🙏 *तालुका प्रशिक्षण सुलभक* 👇 *1⃣श्री एस.डी.शिंदे सर* *2⃣श्री संदेश चोंढेकर सर* *3⃣ श्री श्रीपाद देवमाने सर* *4⃣श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मँडम* ____________________ व (सर्व सहाय्यक सुलभक) *🔖प्रशिक्षणाचे उदिष्टे*🔖 👇 1⃣वाचन शिकण्याचे टप्पे व त्यासाठीची शिक्षकांची सुलभकाची भुमिका याबाबतचा शिक्षकांच्या संकल्पना स्पष्ट करणे. 2⃣प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास करण्यासाठी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करण्यासाठी शिक्षकाची क्षमता विकसीत करणे. ________________________ Rte-act-०९ च्या प्रभावी अंमलबजावणी करीता 🅿💲Ⓜ राज्यात कार्यान्वित आहे.प्रत्येक मुल शिकले पाहिजे. हेच कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. ________________________ *✴प्रशिक्षणाची गरज✴* शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या *वाचनाच्या व लेखनाच्या क्षमता विकसित* झालेल्या असणे ही प्रत्येक मुल *शिकण्यासाठीची प्राथमिक अट* आहे. काही वर्ष शाळेत राहुन मुलाला काही येत नसेल तर मुले शाळा सोडुन देतात.त्यांना शिकण्यात गोडी वाटत नाही.ही मुले अभ्यासात मागे राहतात.हीच परिस्थिती कायम राहिली तर मुले शाळा सोडुन देतात.हे जगभरातील झालेल्या संशोधनातुन सिद्ध झाले. *मुलांना १००% शिकते करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांचे पायाभुत वाचन कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे.* 〰〰〰〰〰 *वाचन व मूलभूत वाचन Ppt, नंतर पूर्व उत्तरचाचणी. 👇 *📚"वाचन म्हणजे लिहलेला किंवा छापलेल्या मजकुराची अर्थ शोधण्याची प्रक्रिया." .* 📚पायाभुत वाचन म्हणजे लिहलेले शब्द ओळखणे आणि महत्वाची विरामचिन्हे लक्षात घेऊन उच्चारणे.लिहलेला मजकुर काही एक अर्थ व्यक्त करण्यासाठी असतो हे समजणे अपेक्षित आहे. 🌼🌼🌼🌼🌼🌼 वैशिष्टेपुर्ण बाबी. *समता* समता व समानता यातील फरक जाणणे. *समता म्हणजे ज्याला जेवढी गरज आहे तेवढ देणं."* ही संकल्पना अनेक उदा.सह स्पष्ट करणे. 👉 *बहुभाषीक तासीका* यावर विविध प्रश्नावर गटचर्चा .. *👉आनंददायी गीत* 💃💃💃💃💃💃💃 👭👭👭👭👭👭 👉 *शिक्षणपूरक कृती* कृतीः १) कागद फाडणे २)शेंगा फोडणे ३)बाटलीचे झाकण लावणे,पाणी ओतणे..... ४)काचेची कलाकृती ५) सागरगोट्या व ह्याला अनुसरून विविध समांतर कृती ...... ●●●●●●●●●●●●●●● ____________________ *१००% मुलांना वाचता आलं पाहिजे,माझा हक्क काय?माझी उपयोगीता कोणती?इत्यादी बाबींवर सुलभकांकडुन चर्चा करण्यात आली.* ➖➖➖➖➖➖ *संकलन / सुलभक* *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (हदगाव) जिल्हा नांदेड* 🙏🙏🙏🙏🙏🙏

शब्द वाढवित नेणे. 💥शेजारची ठमी शाळेला आली. 💥💥शेजारची ठमी, ठमीचे दप्तर शाळेला आले. 💥💥💥 शेजारची ठमी.ठमीचे दप्तर, दप्तरातील पुस्तक शाळेला आले. 💥💥💥💥 शेजारची ठमी, ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक शाळेला आले. 💥💥💥💥💥 शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक,पुस्तकातील पाने शाळेला आली. 💥💥💥💥💥💥 शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक ,पुस्तकातील पाने,पानावरच्या ओळी शाळेला आले. 💥💥💥💥💥💥💥 शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक,पुस्तकातील पाने,पानावरच्या ओळी,ओळीतले शब्द शाळेला आले. 💥💥💥💥💥💥💥💥शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक ,पुस्तकातील पाने,पानातील ओळी,ओळीतले शब्द ,शब्दातील अक्षरे शाळेला आली. संकलित

🙏25 निकष🙏* *🙏25 निकष🙏* ➖➖➖➖➖➖➖➖ *1)निकष क्रमांक 01➖आपल्या शाळेत कोणत्याही वर्गातील मुले 100%पट व उपस्थिती टिकवने.* *2)निकष क्रमांक 02➖शाळा बाह्य बालके ,प्रत्यक्ष प्रवेशित बालके.* *3)निकष क्रमांक 03➖परिसर स्वच्छता* *4)निकष क्रमांक 04➖रचनावादी साहित्य प्रत्येक विषयासाठी किमान दहाघटकांच्या अध्यापनासाठी साहित्य असल्यास ➖(20प्रकारचे शिक्षकांनी स्वयंनिर्मिती साहित्य असल्यास)* *5)निकष क्रमांक 05➖कोणत्याही* *वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास किमान*पाच गणितीय संख्या अचूक* *लिहिता येणॆ* *इयत्ता १ली,२री साठी एक व दोन* *अंकी संख्या अचूक लिहीता -वाचता येणॆ* *इयत्ता ३री साठी तीन अंका पर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन* *इयत्ता ४थी साठी पाच संख्या वाचन लेखन* *इयत्ता ५तें ८साठी सात अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन लेखन करता येणॆ* *6)निकष क्रमांक 06➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान इयत्ता नुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून पाच बेरीजेची उदाहरणे सोडविता येणॆ*. *7)निकष क्रमांक 07➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान ईयत्तानुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून  पाच वजाबाकीची उदाहरणे सोडविता येणॆ.* *8)निकष क्रमांक 08➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास किमान ईयत्तानुरुप शैक्षणिक साहित्याच्या सहाय्य्याने किमान एक गुणाकार अचूक करता येणॆ*. *9)निकष क्रमांक 09➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने अचुक भागाकार करता येणॆ* *10)निकष क्रमांक 10➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वजन ,मापे.आकारमान ,लांबी ,वेळ सांगता आली आणि त्यावर आधारित गणिताची शाब्दिक उदाहरणे सोडवता येणॆ* *11)निकष क्रमांक 11➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकुल आशयातील पाच वाक्ये वाचन करता येणॆ.* *12)निकष क्रमांक 12➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकूल आशयातील पाच वाक्ये श्रुतलेखन लिहिता येणॆ*. *13)निकष क्रमांक 13➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकूल आशयाच्या आकलनावर आधारित विचारलेल्या 5प्रश्नांची उत्तरे देता येणॆ* *14)निकष क्रमांक 14➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होत जाणारे आणखी एक एक असे पाठ्यपुस्तकाबाहेरिल पाच शब्द तयार करता येणॆ* *15)निकष क्रमांक 15➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता वैयक्तिक साभिनयासह करता येणॆ* *16)निकष क्रमांक 16➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास आशयाला अनुसरून चित्रवाचन करता येणॆ* *17)निकष क्रमांक 17➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यस कोणतेही तीन शब्द देऊनत्यावर पाच वाक्ये तयार करता येणॆ* *18)निकष क्रमांक 18➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर बोलण्यात ,उत्तरे देण्यात ,प्रतिसाद आणि वर्तनात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो* *19)निकष क्रमांक 19➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास कोणतेही तीन शब्द देऊन त्यावर गोष्ट तयार करता येणॆ* *20)निकष क्रमांक 20➖कोणत्याही वर्गात कोणत्याही विध्यार्थ्यास नाटिका 3ते 5मिनीट सादर करता येणॆ* *21)निकष क्रमांक 21➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास घड्याळातील काटे फिरवून अचूक वेळ दाखवता येणॆ.* *22)निकष क्रमांक 22➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास कोणतेही 3शब्द देऊन त्यावर कविता तयार करता येणॆ* *23)निकष क्रमांक 23➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास त्या वर्गातील आशयानुसार सामान्य ज्ञानावार आधारित इंग्रजीत विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे देता येणॆ.* *24)निकष क्रमांक 24➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही वि ध्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणॆ.* *25)निकष क्रमांक 25➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास उभे राहून वर्गानुकूल दिलेल्या विषयावर 4तें 5 वाक्यात विचार मांडता आले.* ➖➖➖➖➖➖➖➖

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले. १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार. 💥 जन्म :- १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग  १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर १९४८: डॉ. प्रकाश आमटे 💥 मृत्यू :-  १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आज गुजरातमध्ये होणार भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा.* ----------------------------------------------------- 2⃣ *कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीचं पाकिस्तानकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग, इंटरकॉमच्या सहाय्याने 40 मिनिटं साधला संवाद.* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : रेल्वे विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत 623 विनातिकीट प्रवास्यांवर कारवाई. एका दिवसात 2 लाखाचा दंड वसूल.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : मराठा समाजाचे राज्य शासनाला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास १९ फेब्रुवारीपासून उग्र आंदोलनाचा इशारा.* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भव्य शोभायात्रा. तरुणांचे जोरदार शक्तिप्रदर्शन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक : नाशिककर गारठले, तापमानाचा किमान पारा ९.४ अंशावर पोहचला.* ----------------------------------------------------- 7⃣ *हैदराबादमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणा-या 4 जणांना अटक. एक लॅपटॉप, 6 मोबाईल फोन आणि 10 लाख रूपये रोख हस्तगत.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी - नांदेड जिल्हा परिषदेकडून आज प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आत्मकथा *मी एक शेतकरी बोलतोय.......* नमस्कार ....! मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा .......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबा आमटे* मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे ( डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या  हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर माजासे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात. ~ वपु काळे | गुलमोहर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दूरदर्शन न्यूजच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?* 👉 इरा जोशी *२) "योजना अवकाश" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कधी राबविण्यात गेल्या?* 👉 १९६६-६९ *३) मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्याने उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात?* 👉 ॲस्टीग्माटीसम *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नरसिंग जिड्डेवार, सहशिक्षक, भोकर 👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद 👤 कपिल जोंधळे 👤 अशोक लंघे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *हवा* कोणत्याच माणसाने हवेत रहायला नको हवेत राहून दुस-याला पाण्यात पहायला नको हवेत रहाणाराचा फुगा कधी तरी फुटत असतो हवेतल वर्तन आठवून अपराधीपना वाटत असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना आशेचे पंख आहेत ते नक्कीच सुखी जीवनाचा मार्ग शोधून जीवन जगण्यासाठी तत्पर असतात. त्यांची महत्वकांक्षाही जबरदस्त असते.ते आपल्या जीवनातही निश्चितपणे यशस्वी होतात.परंतु ज्यांची कोणतीच इच्छा नसेल तर ते सुखाने जीवन जगण्याचे स्वप्न पाहत असतील तर ते कधीच सुखाने जगू शकत नाहीत.या जगात प्रयत्नाशिवाय कुणालाही काही प्राप्त झालेले नाही. प्रयत्नही आशारुपी ठेवून त्या मार्गाने सातत्याने मार्गक्रमण केल्यास नक्कीच जीवन सुखावह होईल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* विद्यार्थ्याना इंग्रजीतून दिलेल्या सूचना समजत नाही. कृती करताना चुकतात, त्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे हा उपक्रम राबवावासा वाटला. *🌀Leader says🌀* हा उपक्रम राबविताना सर्वप्रथम शिक्षकांनी इंग्रजीतील इ.१लीते४थी पर्यंतच्या सूचनांची यादी बनवली. त्यातील सर्व सूचनांच्या पट्ट्या बनवल्या. शिक्षकांनी प्रथम कृती करून दाखविली व सराव घेतला. जे विद्यार्थी निरीक्षणातून योग्यप्रकारे सूचना पालन करून कृती करतात. विसरत नाही. (stand up,sit down,go back,come forward) इ.सर्व सूचना लक्षात ठेवतात. त्यांना leader बनण्याची संधी दिली. त्यामुळे मुले आनंदाने खेळत सहभागी होतात,कृती करतात लक्षात ठेवतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *👉🏽कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ* एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संतांनी त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाले ,तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे का ? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो. एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संतांनी आपल्‍या झोळीतून एक सुरा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाले ,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा सुरा घ्या व याने माझ्या देहाचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले व म्हनाले महाराज तुंमचा देह हा आमच्याही काही कामाचा नाही व ईश्वराच्याही ; त्या मुळे हे पाप आम्ही कशासाठी करु, त्यावर संत महाराज हासले " व म्हनाले जसे हे तुंमच्या कामाचे नाही म्हनुन तुंम्ही ते करण्यास नाकार दिलात तसेच दुसर्यांचे लुबाडलेले धन ईश्वराच्या काय कामी येणार, संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून ते दोघेही म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून आपल्या नव जिवनाच्या वाटेवर निघून गेले. *👉🏽तात्‍पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली. १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला. १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली. १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी. 💥 जन्म :- ६६६ - गुरूगोविंदसिंघ, शिख दहावे धर्मगुरू. १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ. १९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :-  १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष. १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर - शिर्डी विमानतळाला श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा प्रस्ताव विधानाभेत एकमताने मंजूर, प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यस्थान सरकारने गुज्जर समाजाला व चार इतर मागासवर्गीयांना एक टक्टे आरक्षण देण्याच्या निर्णयाला दिली मंजूरी* ----------------------------------------------------- 3⃣ *शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाच्या टिजर लॉन्चला उद्धव ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुरुवात* ----------------------------------------------------- 4⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा वेळीच निकाली काढण्याचा कोर्टानं राज्य सरकारला दिला आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरून 60 करणार. नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकुमार बडोले यांचं आश्वासन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सर्व आरोपी दोषमुक्त, ए. राजा आणि कनिमोळीसह सर्व दोषमुक्त* ----------------------------------------------------- 7⃣ *विदर्भाने रचला इतिहास, पहिल्यांदाच पोहोचला रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांच्या 'बोलावे ते आम्ही' काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, तर प्रसिद्ध अनुवादक सुजाता देशमुख यांच्या 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *अवयवदानाचे संकल्प* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरुगोविंद सिंह* गुरुगोविंद सिंह (डिसेंबर 22, इ.स. 1666 जन्म, 7 ऑक्टोबर, 1708 मरण) शीखाचे  दहावा गुरू होते. 11 नोव्हेंबर 1675 रोजी , त्यांचे गुरु , गुरु तेग बहादूर यांच्या मृत्यूनंतर ते गुरू झाले. ते एक महान योद्धा, एक कवी, एक भक्त आणि आध्यात्मिक नेते होते.1699 मध्ये, बेसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली जी शिखांच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. नांदेड येथे त्यांची समाधी असून गुरुद्वारा असे म्हटले जाते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)आंतरराष्ट्रीय वाररेषा ही कोणाच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात आली?* 👉 अमेरिकन प्राध्यापक डेव्हिडसन *२) आंतरराष्ट्रीय वाररेषा कधी निश्चित करण्यात आली?* 👉 १८८४ मध्ये *३) हवाई दलाने सुखोई-३० प्रकारच्या कोणती क्षेपणास्त्रे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे?* 👉 ब्रम्होस क्रूझ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सौ. राजश्री गैनवार-भुसेवार 👤 अनिल कोटीवले 👤 अनिल यादव 👤 दिलीप धुम्पलवर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अंतरीक झगडा* आतलं जग अन् बाहेरचं जग डोक्यात खुप झगडा आहे अंतरीक झगडा सोडवायला माणूस खुप तगडा आहे अंतरीक झगडा सुटेल बाहेरचा सोडता येत नाही कोण कुठे कसा वागेल कोणाला जोडता येत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणे हे ध्येय उराशी ठेऊन आपले सारे आयुष्य समर्पित करणारे,विद्यार्थ्यांच्या अंगी स्वाभिमान, स्वावलंबन, आई-वडील आणि मोठ्यां विषयी आदराची भावना, दीनदुखितांची सेवा, समाजाप्रती आदर , राष्ट्राविषयी अभिमान व प्रेम तसेच आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ? १) शाळेत नवीन धडा शिकवण्यापूर्वी मुलांना वाचायला सांगा. २) धडा शिकवून झाल्यावर शिक्षकांना प्रश्न विचारून शंकेचे निरसन करणं गरजेचं आहे. याबद्दल मुलांशी बोला. ३) घरी पुन्हा धडा वाचायला सांगा. ४) त्यानंतर महत्त्वाच्या मुद्यांच्या नोटस् तयार करायला सांगा. ५) परीक्षेच्या वेळी स्वतच्या नोटस् वाचण्याकडे मुलांचा कल हवा. ६) प्रश्न-उत्तराचा सराव करताना लिहून काढायला सांगा. ७) लिहिलेले दीर्घकाळ स्मरणात राहते. अभ्यास करताना पिक्चर ज्या आवडीनं पाहतो, त्या आवडीनं झोकून देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. हे स्वानुभवाचे बोल आहेत. माझ्या मुलांनीअभ्यासक्रमासाठी ही पद्धत अनुसरली होती. त्यामुळे नोकरीला लागल्यावर शालेय पाठय़पुस्तकातील अभ्यास त्याच्या मनात ताजा आहे. अभ्यास करताना पालकांनी टीव्ही बंद करून पाल्याजवळ बसलं म्हणजे त्यांची एकाग्रता साधली जाते. बराच वेळ आई-वडील आपला अभ्यास घेतात. ही भावनिक सुरक्षितता पाल्यासाठी यशदायी ठरते                         *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वडिलांना मदत* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. 💥 जन्म :- १९५९: फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत १९०३: प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे १९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती  💥 मृत्यू :-  १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी १९९७: भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम १९९७: सनईवादक पं. प्रभाशंकर गायकवाड *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन यापुढे डिसेंबर ऐवजी जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर गांभिर्याने विचार केला जात आहे. संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपूर येथे दिली माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - ओबीसी आयोगाचा कार्यकाळ 12 महिन्यांनी वाढविण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर - २०११ पर्यंतच्या झोपड्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर दिले जाईल - मुख्यमंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *देशातील पहिल्या रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठाच्या स्थापनेस कॅबिनेटची मंजुरी, गुजरातमधील बडोदा येथे स्थापन होणार विद्यापीठ* ----------------------------------------------------- 5⃣ *कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला पाकिस्तानने आज जारी केला व्हिसा* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ : शासकीय कृषी महाविद्यालयाची यवतमाळची मागणी पूर्ण होणार. शासनाला महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात येतील. - राज्यपाल* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका पहिला टी-20 सामन्यात भारताचा लंकेवर 93 धावांनी विजय, यजुवेंद्र चहलने या सामन्यात चार विकेट घेत अफगाणिस्तानच्या रशिदचा विक्रम मोडला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *हरवलेले डोळे* शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्‍या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं.  गावापासून जवळपास पन्‍नास कि.मी. वर जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्‍वेस्‍थानक असल्‍यामुळे रोज रेल्‍वेचा प्रवास ठरलेलाच.  रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्‍याचा नित्‍यक्रम.  त्‍यामुळे रेल्‍वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्‍या डब्‍यापुरते.  मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्‍यामुळे खुप अभ्‍यास ........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4578780729835520 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *के श्रीकांत* कृष्णम्माचारी श्रीकांत हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आहेत. ते 21 डिसेंबर 1959 रोजी मद्रास , चेन्नई येथे जन्मले होते . त्याचा मुलगा अनिरुद्ध श्रीकांत एक क्रिकेटपटू आहे जो चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद साठी खेळतो. श्रीकांतही भारताचे कर्णधार होते. ते चिका या नावाने ओळखले जात असे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ७८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीट्ग ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले?* 👉 सायली वाघमारे *२) आयपीएल लीगमधील 'किंग्ज इलेव्हन पंजाब'च्या प्रशिक्षणपदी कोणाची नियुक्ती झाली?* 👉 ब्रॅड हॉज *३) राष्ट्रमाता जिजाऊचे जन्मस्थान कोणते?* 👉 सिंदखेडराजा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मन्मथ खंकरे 👤 श्रीमती माणिक नागावे 👤 गजानन गायकवाड 👤 संभाजी तोटेवाड 👤 जयश्री सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *ऊर्मी* संकटावर मात करण्याची ज्याची त्याच्यात गुर्मी असते प्रत्येक जीवात जगण्याची एक सुप्त ऊर्मी असते जगण्याची ती ऊर्मी फक्त टिकवता आली पाहिजे तापलेली कांबी हवी तशी वाकवता आली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते.* *'तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमची वाणी स्पष्ट,चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चढता उतरता क्रमाची लगोरी* कृती - लगोरीमध्ये दहा ठोकळे असावेत.सर्वात लहान ठोकळ्यावर बाजुने गोलाकार वेगवेगळ्या रंगात  १०,२०,३०,४०,५०....अशाप्रकारे १०० पर्यत अंक लिहावेत.त्यानंतरच्या ठोकळ्यावर त्याच रंगाच्या क्रमाने  ९,१९,२९३९,.....९९ व अशा प्रकारे सर्वात मोठया ठोकळ्यावर १,११,२१,३१,.....९१ असे अंक येतील. नियम - १)  लगोरी लावतांना सर्वात मोठा ठोकळा हा सर्वात खाली रचला जातो.त्यानंतर लहान लहान ठोकळे रचले जातात. २) त्यामुळे सहाजीकच अंकाचा क्रम वर चढता येतो. ३) ठोकळे रचतांना १,२,३...अश्या चढत्या क्रमानेच रचणे आवश्यक असतील. ४) एकदा लगोरी लागल्यानंतर पुढे त्याच ठोकळ्यावरिल १,११,२१,हे क्रमांक एकावर एक येतील असे रचावे लागतील. ५) अशाप्रकारे जश्या जश्या लगो-या लागतील. लगोरीच्या वरिल क्रमांक पुढे पुढे वाढत जातील. ६) लगोरी पूर्ण न लागताच बाद झाल्यास त्याच क्रमांकानुसार परत लगोरी लावावी लागणार *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वभाव* एक शेतकरी नेहमी शेजार्‍याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे. त्यामुळे तो कोणालाही आवडेनासा झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला मुंगीचे स्वरूप दिले. त्यामुळे त्याचे रूप बदलले, परंतु दुसर्‍याचे धान्य चोरून नेऊन साठा करण्याची त्याची सवय मात्र बदलली नाही. तात्पर्य - कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*एकच ध्यास,वाचन विकास।।* ••••••••••••••••••••••••••• *वाचणार रे वाचणार १००% वाचणार* 📚📚👍👍📚📚 *📚 १००% विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास कार्यक्रम-२०१७-१८* 〰〰अंतर्गत〰〰 👇 *🔰तालुका स्तरीय शिक्षक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा* *🌅(दिनांकः-१९ ते २१ डिसेंबर-२०१७)* 🖼स्थळः- आर्य समाज मंदिर हदगाव ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''""""" 💐💐💐प्रेरणा💐💐💐 👇 *मा.नंदकुमार साहेब(प्रधान सचिव)* 〰〰〰〰〰〰 ---------------------------------- *तालुका प्रशिक्षण सुलभक* 👇 1⃣श्री एस.डी.शिंदे सर 2⃣श्री संदेश चोंढेकर सर 3⃣ श्री श्रीपाद देवमाने सर 4⃣श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मँडम ____________________ व सर्व (सहाय्यक सुलभक) *प्रशिक्षणास उपस्थित* शि.वि.अ.श्री जाधव साहेब,पावणे साहेब,बाच्छे साहेब,पाटील साहेब , श्रीमती आडगावकर मँडम,केंद्रप्रमुख श्री गोडघासे सर,शेख सर. *🔖प्रशिक्षणाचे उदिष्टे*🔖 👇 1⃣वाचन शिकण्याचे टप्पे व त्यासाठीची शिक्षकांची सुलभकाची भुमिका याबाबतचा शिक्षकांच्या संकल्पना स्पष्ट करणे. 2⃣प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास करण्यासाठी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करण्यासाठी शिक्षकाची क्षमता विकसीत करणे. ________________________ Rte-act-०९ च्या प्रभावी अंमलबजावणी करीता 🅿💲Ⓜ राज्यात कार्यान्वित आहे.प्रत्येक मुल शिकले पाहिजे. हेच कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. ________________________ *✴प्रशिक्षणाची गरज✴* शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या *वाचनाच्या व लेखनाच्या क्षमता विकसित* झालेल्या असणे ही प्रत्येक मुल *शिकण्यासाठीची प्राथमिक अट* आहे. काही वर्ष शाळेत राहुन मुलाला काही येत नसेल तर मुले शाळा सोडुन देतात.त्यांना शिकण्यात गोडी वाटत नाही.ही मुले अभ्यासात मागे राहतात.हीच परिस्थिती कायम राहिली तर मुले शाळा सोडुन देतात.हे जगभरातील झालेल्या संशोधनातुन सिद्ध झाले. *मुलांना १००% शिकते करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांचे पायाभुत वाचन कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे.* 〰〰〰〰〰〰〰〰 *🔰प्रशिक्षणाचा दुसरा दिवस.दिनांक:-२०.१२.२०१७.* 👇 *🔲क्षेत्र--(श्रवण)🔲* *📚उदिष्ट्ये* 👇 1⃣लक्षपुर्व ऐकता येणे. 2⃣ध्वनीतील सुक्ष्म भेद ओळखता येणे. 3⃣ध्वनीतील साम्य ओळखता येणे. 4⃣जाणीवपूर्वक ऐकण्याची सवय लावणे. """"""""""""""""""""""""""""""""" *🔖वाचन व मुलभुत वाचन* 👇 *📚वाचन म्हणजे लिहलेला किंवा छापलेला मजकुर .* 📚पायाभुत वाचन म्हणजे लिहलेले शब्द ओळखणे आणि महत्वाची विरामचिन्हे लक्षात घेऊन उच्चारणे.लिहलेला मजकुर काही एक अर्थ व्यक्त करण्यासाठी असतो हे समजणे अपेक्षित आहे. 🌼🌼🌼🌼🌼🌼 वैशिष्टेपुर्ण बाबी. 👇 📚आनंददायी मोकळीका. 📚कृती १)डबीतील विविध वस्तुंचे ध्वनी ऐकविणे व ओळखणे. २)प्राणी,पक्षी,वाहणे इत्यादी आवाज ऐकविणे व ओळखणे. ३)गोष्टी ऐकविणे व ओळखणे. 📚खेळ:-१)कानमंत्र२)राजा म्हणतो.....३)चिमणी भुर्रर---- ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ *सत्र👉2⃣क्षेत्र-भाषण संभाषण* 👇 🛤ओळख:-स्वतःची👉सादरीकरण. 🛤माहिती:-कुटुंब, मित्र,परिसर. 🛤चित्रवर्णन,चित्रगप्पा,चित्रवाचन. 👇 1⃣चित्राचे नाव सांगणे. 2⃣चित्रातील कृती सांगणे. 3⃣चित्रवर्णन. 4⃣चित्रगप्पा. 🛤गप्पा:-१)अनौपचारीक गप्पा(विषय ठरलेला नसतो)२)औपचारीक गप्पा(विषय ठरलेला असतो). ________________________ 🚇घटनाक्रम सांगणे. 🚇गोष्टी:-बोलीभाषेतील चित्रमय गोष्टी. 🚇कृतियुक्त गाणी. ●●●●●●●●●●●●●●●●●● 🏃‍♂खेळ(शब्दभेंड्या,अक्षरभेद,ध्वनीभेद) ________________________ *१००% मुलांना वाचता आलं पाहिजे,माझा हक्क काय?माझी उपयोगीता कोणती?इत्यादी बाबींवर सुलभकांकडुन चर्चा करण्यात आली.* ➖➖➖➖➖➖➖➖ ✍ *लेखन संकलन / सुलभक* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (हदगाव) 🙏🙏🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वातंत्र्य दिन - झांझिबार गोवा मुक्ती दिन 💥 ठळक घडामोडी :-  १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन. २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण. 💥 जन्म :- १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू. १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी. १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९५३ - रॉबर्ट अ‍ड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता. १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीत भाजपाचे निर्विवाद यश* ----------------------------------------------------- 2⃣ *भाजपावर दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल धन्यवाद, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या विकासासाठी पुरेपूर प्रयत्न करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 3⃣ *जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला.* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर : महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या 123 शाळा व कर्मशाळेतील विद्यार्थ्यांना परिपोषण व कर्मचा-यांना त्वरित पदमान्यता देऊन वेतन सुरू करण्यात यावे, कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णींची मागणी.* ----------------------------------------------------- 5⃣ *गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजयासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन* ----------------------------------------------------- 6⃣ *सिंधुदुर्ग : महामार्ग विस्थापितांना योग्य मोबदला द्या, नागपुरात धरणे आंदोलन, शिवसेनेच्या आमदारांची आग्रही मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *हरवलेले डोळे* शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्‍या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं.  गावापासून जवळपास पन्‍नास कि.मी. वर जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्‍वेस्‍थानक असल्‍यामुळे रोज रेल्‍वेचा प्रवास ठरलेलाच.  रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्‍याचा नित्‍यक्रम.  त्‍यामुळे रेल्‍वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्‍या डब्‍यापुरते.  मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्‍यामुळे खुप अभ्‍यास ........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4578780729835520 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *आर के लक्ष्मण* रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण  ( थोडक्यात आर लक्ष्मण , 24 ऑक्टोबर 192l - 26 जानेवारी 2015 ) आघाडीच्या लेखक आणि भारत व्यंगचित्रकार होते. ते कॉमन मॅन त्याच्या निर्मिती आणि म्हणतात टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या दैनंदिन मालिका लिहिण्याची व्यंगचित्रे 1951 मध्ये सुरुवात केली. लक्ष्मण यांचा जन्म 1 9 21 साली म्हैसूर येथे झाला . त्यांचे वडील प्राचार्य होते आणि लक्ष्मण त्यांच्या छोट्या मुलांपैकी सर्वांत लहान होते.  एक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध. लक्ष्मण पेड पापर ऑफ दिल्ली ( दिल्लीच्या चिठ्बुरा मुरलीवाला ) प्रसिद्ध आहे *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)२०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला?* 👉 कराटे *२) सध्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कोण आहेत? 👉 डी. के. शर्मा *३) घटना परिषदेची पहिली बैठक कोठे झाली?* 👉 दिल्ली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर 👤 शंकर जाजेवार, येताळा 👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बाजींदे* जो माणूस शब्द देऊन मोठ्या ऐटीत मिरवतो तोच माणूस पुन्हा सहज आपला शब्द फिरवतो शब्द देऊन फिरवणारे मोठे बाजिंदे असतात चार माणसांत मात्र ते मिंधे होऊन बसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणत्याही गोष्टीचे सखोल चिंतन चांगले काम करण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे जाणिवा तर समृद्ध होतातच; पण समजही वाढत जाते. कळण्याची पातळी उंचावते आणि जगण्यातही आनंद निर्माण होऊ लागतो. आनंद आला की सौंदर्य आले. अशी ही श्रृंखला आहे. त्यात धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावाने अडसर तयार करणे आनंद मिळविण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. त्यामुळे शरीरस्वास्थ्याचा, मन:स्वास्थ्याचा आणि परिणामी समाजस्वास्थ्याचा विचार करताना आकाशासारखा व्यापक गुणधर्म ठेवायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.* *त्यासाठी रोजच्या वेळेतील सकाळची अगदी दहा मिनिटे स्वत:ला द्यावीत. त्यात सुरूवातीची तीन मिनिटे काल काय केले आणि काय राहिले याची उजळणी, पुढची दोन मिनिटे त्यात झालेल्या चुका आणि उरलेली पाच मिनिटे आज काय करायचे याला द्यायला हवीत. त्यात काल ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न होऊ देण्याविषयी स्वत:ला बजावायला हवे. तरच निश्चयाने पाऊल पुढे टाकता येईल. अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या' किंवा 'जन्माला आला.....' या दोन प्रसिद्ध म्हणी आपल्यासाठीच आहेत असे समजायला हरकत नाही.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• 🌱⚜⚜⚜🌱⚜⚜⚜🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना आशेचे पंख आहेत ते नक्कीच सुखी जीवनाचा मार्ग शोधून जीवन जगण्यासाठी तत्पर असतात. त्यांची महत्वकांक्षाही जबरदस्त असते.ते आपल्या जीवनातही निश्चितपणे यशस्वी होतात.परंतु ज्यांची कोणतीच इच्छा नसेल तर ते सुखाने जीवन जगण्याचे स्वप्न पाहत असतील तर ते कधीच सुखाने जगू शकत नाहीत.या जगात प्रयत्नाशिवाय कुणालाही काही प्राप्त झालेले नाही. प्रयत्नही आशारुपी ठेवून त्या मार्गाने सातत्याने मार्गक्रमण केल्यास नक्कीच जीवन सुखावह होईल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे. मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विकल्प* 🐜मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..! 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले. १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान. १९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले. २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन १८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की १९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद १९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती १९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी 💥 मृत्यू :-  १९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट १९५६: डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने १९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट १९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरातमध्ये 25 तारखेला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा सरदार पटेल स्टेडिअमवर पार पडणार अधिकृत सूत्र.* ----------------------------------------------------- 2⃣ *उस्मानाबाद : सचिन तेंडुलकरने सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावातील विकासकामांची पाहणी केली.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - राज्यातील दुकानं आठवडाभर सुरु राहणार, कामगारांना साप्ताहिक सुट्टी अनिवार्य महाराष्ट्र दुकाने-अस्थापना अधिनियम लागू.* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपुरात, मंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *कल्याणमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या ६१ वर्षानिमत्त युवा संमेलन संपन्न* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक- आता जेष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी नाशिकमधील सर्व बँकेमध्ये स्वतंत्र खिडकी, पंधरवाड्यासाठी मोहीम नाशिक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिका जिंकणारा भारतीय संघ आजपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० मालिकेत श्रीलंकेवर वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने उतरणार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *लहानपण देगा देवा* वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpan •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत गाडगेबाबा* गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबरइ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवाकरणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* ========ஜ۩۞۩ஜ========= *१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय बनावटीच्या कोणत्या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले?* 👉 कलवरी *२) राष्ट्रीय हरित लवादचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉 न्या. स्वतंत्र कुमार *३) भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?* 👉 नरींदर बात्रा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली 👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर 👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद 👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गजानन मुडेले, देगलूर 👤 सोपान हेळंबे, उमरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्थितप्रज्ञ* प्रत्येकाचा ठरलेला सुखाचा काळ असतो बरं वाईट घडायलाही विशिष्ट वेळ असतो ब-या वाईट प्रसंगाला संयमाने घ्यावं लागतं स्थितप्रज्ञा सारखं माणसाला रहावं लागलं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे.* *'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत उकार न शिकवता उ आणि ऊ उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करण्याचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावधगिरी* पूर्वी एकदा लांडगे व बोकड यांची फार दिवस लढाई चालली होती. वास्तविक पाहता लांडग्यांनी पहिल्याच दिवशी पराभव करून त्यांचा फन्ना उडविला असता, परंतु बोकडांच्या बाजूस जे कुत्रे होते त्यांच्यापुढे त्यांचे काही चालेना. शेवटी तहाची वाटाघाट होऊन उभयपक्षी असे ठरले की, लांडग्यांनी आपली पोरे बोकडांच्या स्वाधीन करावी व बोकडांनी आपले कुत्रे लांडग्यांच्य ताब्यात द्यावे. मग या अटी अमलात येताच बोकडांकडे गेलेल्या लांडग्यांच्या पोरांनी आपल्या आयांसाठी आरडाओरडा केला. तो ऐकताच लांडगे धावून आले आणि बोकडांस म्हणाले, 'दुष्टांनो, आमच्या पोरांना मारून तुम्ही तह मोडला, तेव्हा लढाईला तयार व्हा.' इतके बोलून ते बोकडांवर तुटून पडले व बोकडांजवळ कुत्रे नसल्यामुळे ते सगळे सहज मारले गेले. तात्पर्य :- शत्रूशी सख्य करताना ज्या वस्तूवर आपली सुरक्षितता अवलंबून असेल अशा वस्तू त्यांना कधीही देऊ नयेत.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/12/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रजासत्ताक दिन - नायजर.* 💥 ठळक घडामोडी :-  २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार. २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या. 💥 जन्म :- १८५६ - सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार. १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू. १८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म 💥 मृत्यू :-  १९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर १९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर २०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी २००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात कुणाचं? मतमोजणी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज.* ----------------------------------------------------- 2⃣ *औरंगाबादः जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण मंगळवारी* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नुकतीच इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली, देशातील पहिली इंपोर्टेड इलेक्ट्रिक कारची नोंदणी* ----------------------------------------------------- 4⃣ *रेल्वेतील प्रत्येक कर्मचा-याची वर्षातून एकदा मेडिकल तपासणी होणार, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.* ----------------------------------------------------- 5⃣ *अमरावती : राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या पल्लवी पवारने १५२ किलो वजन उचलून सूवर्णपदक पटकावले.* ----------------------------------------------------- 6⃣ *विशाखापट्टणम वनडे - शिखर धवनचा शतकी तडाखा, लंकेचा आठ विकेटनं पराभव, मालिकाही खिशात* ----------------------------------------------------- 7⃣ *जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) - कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमार, साक्षी मलिकला सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *मुलांपेक्षा मुलगी बरी.....!* आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4739750601162752 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= विजय हजारे विजय शमूले हजारे ( 11 मार्च, 1 9 15 - डिसेंबर 18, इ.स. 2004 ) हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील भारतीय क्रिकेटपटू होता . 1951 ते 1953 पर्यंत ते भारतीय संघाचे कर्णधार होते. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताला प्रथम यश मिळवून दिले. 1960 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. 18 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) राष्ट्रीय संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?* 👉 ०३मार्च *२) सध्या सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक स्पर्धेत कोणत्या महिलेने सुवर्णपदक मिलवले आहे?* 👉 कांचनमाला पांडे *३) १९वे राष्ट्रीय बंधुत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉 प्रकाश रोकडे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रवी यमेवार, धर्माबाद 👤 विजयकुमार भंडारे, सहशिक्षक 👤 उदयराज कोकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतः बदला* प्रत्येकालाच जग बदलाव वाटत असतं पण त्यासाठी स्वतःला बदलाव हे पटत नसतं जग बदलेल आधी स्वतः बदलावे लागेल आपण चांगले वागलो की जग चांगले वागेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावली ही अंधाराची आई आहे. वृक्ष उन्हाचा दाह पचवून प्राणिमात्रांना सावलीचा सुखद गारवा देतात, शीतलता देतात. मग तीचा एकुलता पुत्र 'अंधार' याचं काय? अंधार हा पापप्रेरक नाही. त्याचा पाप आणि पुण्याशी अंशमात्र संबंध नाही. पृथ्वीवरची अंधारी रात्र आणि माणसाच्या मनातील अंधार यात काय साम्यभेद असावेत? जन्मांधाला अंतर्चक्षूनं जीवनाचा संपूर्णानुभव घेता येतो. संत सूरदास यांचं उदाहरण पुरेसं आहे. पण डोळस लोक प्रसंगी गांधारीची भूमिका का बजावत असतात? धृतराष्ट्र द्रौपदीचं वस्त्रहरण अंध असूनही कसा अनुभवत होता? तर तो मनातल्या मनात वासनेची वासंती घडवून तीला अंतर्चक्षूनं उपभोगत होता. अंतर्मनातला अंधार गडद होत गेला की डोळसाच्याही नेत्रचंद्रावर झापड पदर ताणते. तेव्हा तो गृहस्थ शून्यभावस्थितीच्या अधीन होतो. हा डोळस असून त्या स्थितीत आंधळा तर धृतराष्ट्र अंध असून डोळस.* *प्रकाश हा सुंदर तर अंधार हा विरूप समजला जातो. प्रकाश हा अंधाराचा नाश करतो असंही तत्व विश्वमान्य आहे. परंतु खरंच अंधाराचा नाश होतो काय? तर नाही. ते कसे ते फक्त पहाटेलाच ठाऊक असतं. हा दृष्टांत अनुभवायचा असेल तर पहाट होऊन बघावं. अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. म्हणजेच अंधार हा दु:ख-क्लेशदायक आहे हा त्याचा अर्थ. अंधार कृष्णवर्णी असतो आणि आपण गौरवर्णाला सुंदरतेचं प्रतीक मानत असतो. प्रत्यक्षात चंद्रिका ही कृष्णवर्णीच आहै. ती अंधारकन्या आहे, सूर्यकन्या नाही. अंधार आणि दु:ख दोन्ही शाश्वत तर सुख हे उन्हाचं कवडसं आहे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे घड्याळातील काटे वेळ दाखवत दाखवत काळाला पुढे पुढे घेऊन जातात आणि गेलेला काळ भूतकाळ दाखवतात त्याचप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवासही घड्याळाच्या काट्यावर रहाणे पुढे पुढे सरकत जातो आणि एका वळणावर येऊन थांबतो.जेव्हा थांबतो तेव्हा खरंच कळायला लागतं की,आपण आपल्या आयुष्यात काय केलं ? असा प्रश्नही पडणे अपेक्षितही आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपण कधीही विचार केला नाही.पण तुम्ही नाराज होण्याचे कारण नाही.तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं आहे.सुखदु:खाचे व्यवहार,माणुसकी, मानसन्मान, नातेसंबंध, भेटीगाठी, दानधर्म,प्रेम, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही पुढील पिढीसाठी ठेवून देत आहात.ते तर तुम्ही तेव्हाच तुमच्या जीवनात होऊनही गेल्या.याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नाही. तुम्ही उद्या असाल किंवा नसाल परंतु तुमचा आदर्श नक्कीच येणारी पिढी अनुसरेल अगदी घड्याळातील काट्याप्रमाणे आहे ते जीवन दु:खी होऊन जगण्यापेक्षा सा-यांसोबत आनंदाने व्यतीत करा.यातच तुम्ही खूप काही केल्याचा आनंद शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= टिफिन पूरी तरह पोंछ कर खाने वाले एक बालक के दोस्त उसका मज़ाक उडाते थे... एक ने पूछा,'' तुम रोजाना टिफिन में एक कण भी क्यों नही छोड़ते ? बालक ने बड़ा ही सुन्दर जवाब दिया ... ''यह मेरे पिता के प्रति आदर है जो इसे मेहनत से कमाए रूपयों से खरीद कर लाते हैं और माँ के प्रति आदर है जो सुबह जल्दी उठकर बडे चाव से इसे बनाती हैं । यह आदर उन किसानो के प्रति है जो खेतो में कड़ी मेहनत से इसे पैदा करते हैं।" थाली में झूठा छोड़ना अपनी शान ना समझें *खाओ मन भर , छोडो ना कण भर* , *उतना ही ले थाली में , बाकी ना जाए नाली में* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 💥 जन्म :- १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह  १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम १९७८: अभिनेते रितेश देशमुख 💥 मृत्यू :-  १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर २०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर - राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली, आजपासून राहुलपर्व ला सुरुवात* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - 2009 कोळसा घोटाळा प्रकरण, विशेष सीबीआय न्यायालायने मधू को़डा यांना दिली तीन वर्षांची शिक्षा.* ----------------------------------------------------- 3⃣ *संत्र्याला प्रक्रियेच्या माध्यमातून शाश्वत मार्केट मिळेल, नोगाचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, शासन 49 टक्के भागीदारी करेल - देवेंद्र फडणवीस.* ----------------------------------------------------- 4⃣ *मिझोराम हे अतिरिक्त ऊर्जा असलेले ईशान्य भारतातील तिसरे राज्य ठरले आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 5⃣ *उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन आणि 35 हजार रुपये दिला जाणार आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन ; सिंधूची फायनलमध्ये धडक, चीनच्या चेन युफायचा केला पराभव* ----------------------------------------------------- 7⃣ *पायाला दुखापत झाल्यामुळे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेणार नाही.* ------------------------------------------------------ *विशेष बातमी : काव्यांगण प्रतिष्ठान कडून यवतमाळ मध्ये आज राज्य स्तरीय काव्य महोत्सव, महिलांनी आयोजित केलेले पहिलेच काव्य संमेलन, महाराष्ट्रातील 250 हुन अधिक कवीचा यात समावेश असल्याची माहिती अध्यक्ष प्रीती माडेकर यांनी दिली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा 2000 च्या वर वाचक मित्रांनी वाचलेली लघुकथा *🏍 ... लिफ्ट  ....🛵* सहसा गाडीवार एकटे जाणे कधीच आवडत नाही. त्यामुळे कोणी लिफ्ट मागितली की नक्की त्यांना घेतो. मग गप्पा मारता मारता नियोजित ठिकाणी सहज पोहचता येते. तरी लिफ्ट देताना खुप विचार करावा लागतो, जसे की वयोवृद्ध किंवा ज्याला गाडी वर बसता येत नाही अश्याना लिफ्ट देणे शक्यतो टाळावे कारण करायला जावे चांगले काम आणि व्हावे भलतेच. म्हणून ती काळजी घ्यावी. महिला आणि तेही लेकुरवाळी यांना लिफ्ट........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/6152406281224192 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ======== *यशवंत गोपाळ जोशी* य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) (१७ डिसेंबर, इ.स. १९०१:भिगवण, भारत - ७ नोव्हेंबर, इ.स. १९६३:पुणे). हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या.. प्रसाद प्रकाशाचे कै. मनोहर उपाख्य बापूसाहेब जोशी हे य. गो. जोशी ह्यांचे चिरंजीव. कै. श्रीमती श्यामला (शांता) बेडेकर , श्रीमती.सुमन (स्वाती)पेंडसे,श्रीमती उर्मिला भावे, सौ.अंजली पेंडसे , कै. श्रीमती मंगल नगरकर आणि सौ. अनुराधा (पुष्पा) देसाई ह्या त्यांच्या कन्या . य.गो. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला. हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले. जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेले लोढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती. ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्‍निक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे. य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणार्‍या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मन:स्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?* 👉 विसर्ग संधी *२) लोकसभा सभापतीची निवड कोण करते?* 👉 लोकसभा सदस्य *३) सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?* 👉 कार्ल लिनिअस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुधीर येलमे, संपादक सा. इंद्रधनुष्य टाइम्स 👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद 👤 केशव कदम 👤 नारायण मुळे, धर्माबाद 👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी 👤 दिगंबर बेतीवर, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *उदयास्त* एकाचा उदय तर एकाचा अस्त असतो उदय अन् अस्तचा संबंध रास्त असतो उदय होतो त्याचा कधी तरी अस्त होतो निसर्गाचा फेरा कधीही एकदम रास्त होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावली ही अंधाराची आई आहे. वृक्ष उन्हाचा दाह पचवून प्राणिमात्रांना सावलीचा सुखद गारवा देतात, शीतलता देतात. मग तीचा एकुलता पुत्र 'अंधार' याचं काय? अंधार हा पापप्रेरक नाही. त्याचा पाप आणि पुण्याशी अंशमात्र संबंध नाही. पृथ्वीवरची अंधारी रात्र आणि माणसाच्या मनातील अंधार यात काय साम्यभेद असावेत? जन्मांधाला अंतर्चक्षूनं जीवनाचा संपूर्णानुभव घेता येतो. संत सूरदास यांचं उदाहरण पुरेसं आहे. पण डोळस लोक प्रसंगी गांधारीची भूमिका का बजावत असतात? धृतराष्ट्र द्रौपदीचं वस्त्रहरण अंध असूनही कसा अनुभवत होता? तर तो मनातल्या मनात वासनेची वासंती घडवून तीला अंतर्चक्षूनं उपभोगत होता. अंतर्मनातला अंधार गडद होत गेला की डोळसाच्याही नेत्रचंद्रावर झापड पदर ताणते. तेव्हा तो गृहस्थ शून्यभावस्थितीच्या अधीन होतो. हा डोळस असून त्या स्थितीत आंधळा तर धृतराष्ट्र अंध असून डोळस.* *प्रकाश हा सुंदर तर अंधार हा विरूप समजला जातो. प्रकाश हा अंधाराचा नाश करतो असंही तत्व विश्वमान्य आहे. परंतु खरंच अंधाराचा नाश होतो काय? तर नाही. ते कसे ते फक्त पहाटेलाच ठाऊक असतं. हा दृष्टांत अनुभवायचा असेल तर पहाट होऊन बघावं. अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. म्हणजेच अंधार हा दु:ख-क्लेशदायक आहे हा त्याचा अर्थ. अंधार कृष्णवर्णी असतो आणि आपण गौरवर्णाला सुंदरतेचं प्रतीक मानत असतो. प्रत्यक्षात चंद्रिका ही कृष्णवर्णीच आहै. ती अंधारकन्या आहे, सूर्यकन्या नाही. अंधार आणि दु:ख दोन्ही शाश्वत तर सुख हे उन्हाचं कवडसं आहे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चिंचोक्याचा एकक आणि दशक* मुले चिंचोके खेळतात. याचाच उपयोग करून चिंचोके फोडून त्याचे दोन भाग केले. ➡आपणास दोन बाजु मिळतील एक काळी  व दूसरी पांढरी. ➡आता चिंचोके टाकावे . ➡ *काळी बाजु*असणारे चिंचोके *एकक*व *पांढरी बाजु* असणारे चिंचोके *दशक* समजावे.अशा प्रकारे एक संख्या मिळेल.ती लिहुन घ्यावी. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *पश्चाताप* एक व्यापारी होता. त्याने आपल्या कामासाठी एक घोडा आणि एक गाढव पाळले होते. तो घोड्याचा उपयोग स्वतः च्या सवारीसाठी तर गाढवाचा वापर माल वाहतूक करण्यासाठी करायचा.  गाढवाच्या   पाठीवर माल लादून गावोगावी जायाचा आणि  माल विकायचा. व्यापार्‍याने घोड्याला जादा पैसे देऊन विकत घेतले असल्यामुळे तो त्याची अधिक खातिरदारी करायचा.  काळजी घ्यायचा.  घोड्याच्या  पाठीवर ओझेसुद्धा लादायचा नाही. एक दिवस व्यापारी घोड्यावर बसून आणि गाढवावर ओझे लादून कोठे तरी निघाला होता. गाढवावर क्षमतेपेक्षा अधिकच ओझे लादले गेले होते.  त्यात गाढव खूपच  कृश होते.  रस्ताही  खाच-खळग्यांचा होता.  त्यामुळे त्याला चालताना भलताच त्रास होत होता. तो एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत होता.  त्याला त्याचे स्वतः चे मन एवढे मोठे ओझे वाहून नेण्याविषयी हमी  देत नव्हते. त्याचा आत्मविश्वास आणि पाय गाळटले होते. तो घोड्याला म्हणाला," घोडे दादा, माझ्याच्याने चालवत नाही रे! आता मी इथेच दम तोडतोय की काय असं वाटायला लागलं आहे,  माझा थोडा भार हलका करशील का? तुझे फार उपकार होती."      परंतु, मालकाच्या लाडा-प्रेमाने लाडावलेला,  वाढलेला घोडा मात्र मोठा गर्विष्ठ बनला होता. तो अहंकार भरल्या स्वरात म्हणाला," हे काय बरळतोयस तू? माझी पाठ  ओझे वाहून नेण्यासाठी वाटली की काय तुला?   मी का तुझे ओझे वागवू? खबरदार, पून्हा असा म्हणालास तर...?" बिचारे गाढव काहीच बोलले नाही. ते रडत-खड्त आपले पाय ओढत राहिले आणि शेवटी धापकन पडले. त्याचा एक पाय मोडला. ते पाहून व्यापार्‍याला मोठे वाईट वाटले. त्याची दया आली. लागलीच  त्याने  गाढवावरचे सगळे ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. आणि  गाढवालासुद्धा वर चढवले. आता घोड्याचा सारा अहंकार गळून पडला. आता त्याला पश्चाताप वाटू लागला. मघाशी गाढवाची गोष्ट ऐकली असती आणि   त्याचा  भार थोडा हलका केला असता तर  आता ही कंबरडे मोडणारी आपत्ती ओढवली नसती.  त्याला मदत केली असती तर माझेही भले झाले असते आणि त्याचेही! पण आता नाईलाज होता.  .... घोडा मान खाली घालून निमूटपणे चालू लागला.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/12/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= बहरैन - राष्ट्रीय दिन. बांगलादेश - विजय दिन. कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन. 💥 ठळक घडामोडी :-  १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली. १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली. १९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. 💥 जन्म :- १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा. १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत. १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष. २००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आधार कार्ड लिंक करण्यासाठीची तारीख 31 मार्च करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला मान्य* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत. आता मी निवृत्त होणार. संसद परिसरात केलं वक्तव्य* ----------------------------------------------------- 3⃣ *दिल्ली - ट्रिपल तलाकवरील विधेयकाला मंजुरी. विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पुढील आठवड्यात विधेयक संसदेत मांडणार.* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर- बोंडअळी ग्रस्त पिकाचे पंचनामे 15 दिवसात पूर्ण होतील . बियाणे खरेदी केलेली पावती अर्जाला जोडली तरी अर्ज स्विकारण्यात येतील- सदाभाऊ खोत.* ----------------------------------------------------- 5⃣ *१० हजार कि.मी.च्या नव्या रस्त्यांवर टोल नाही; ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.* ----------------------------------------------------- 6⃣  *पुढील दोन दिवस गारठा कायम राहणार, असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताविरुद्ध २० डिसेंबरपासून प्रारंभ होणा-या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज लसित मलिंगाला श्रीलंका संघात स्थान मिळालेले नाही.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लक्ष्मीकांत बेर्डे* लक्ष्मीकांत बेर्डे ( नोव्हेंबर ३, इ.स. १९५४ - डिसेंबर १६, इ.स. २००४; मुंबई, महाराष्ट्र) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले  धुमधडाका  (इ.स. १९८५),  अशी ही बनवाबनवी  (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन  (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आहे?* 👉 ऋग्वेद *२) राष्ट्रपतीला महाअभियोगाद्वारे पदावरून दूर करणाचा अधिकार कोणाला आहे?* 👉 संसद *३) मंत्रीपरिषदेविरुध्दचा अविश्वासाचा ठराव कोठे मांडला जातो?* 👉 लोकसभेत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी 👤 योगेश गुजराथी, धर्माबाद 👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर 👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम 👤 नरेश पांचाळ, धर्माबाद 👤 श्याम पेरेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी* कापूस पिकावर बोंड अळी आहे प्रत्येक संकटात शेतकरी बळी आहे अस्मानी सुलतानीला शेतकरीच बळी जातो विशिष्ट वर्ग मात्र नेहमी आनंदात रहातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *बहिणाबाईंनी सांगितलयं ,'जगण्या मरण्यात काय तर एका श्वासाचं अंतर ! एकच श्वास, फक्त एकच. पण तो एकच श्वास केवढं मोठ अंतर निर्माण करतो. असण्या-नसण्यातलं अंतर, जन्मा-मरणातलं अंतर, होत्या-नव्हत्यातलं अंतर, जागण्या-झोपण्यातलं अंतर, क्षणांत आहे आणि क्षणांत नाही, ही असामान्य गोष्ट श्वासाच्या अंतराने प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते.* *माणूस जातो, स्मृती उरतात. त्या चांगल्या उराव्यात असं सा-यांनाच वाटतं पण त्यासाठी काही चांगलं करावं लागतं, हे विसरून कसं चालेल ? मृत्यू अनेक गोष्टी शिकवितो, अर्थातच जिवंत असणारांना ! पण मृत्यूची शिकवण तरी किती वेळ स्मरणात राहते ? मृत्यू नावाचे जळजळीत सत्य उत्तम वागण्याचे, जगण्याचे आत्मभान निर्माण करून देते. माणूस गेल्यावर होणारी कालवाकालव, त्याच्या स्मृतींची असंख्य फुलंच म्हणावी लागतील. या फुलांसाठी तरी श्वासात अंतर पडण्यापूर्वी ' जे जे उत्तम ' आहे तेच करावयास हवे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनात येणा-या यशाचे खरे रहस्य जर कोणते असेल तर तुम्ही करत असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात ठेवलेले सातत्य हेच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे. मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समय के पंख* एक बार एक कलाकार ने अपने चित्रों की प्रदर्शनी लगाई। उसे देखने के लिए नगर के सैकड़ों धनी-मानी व्यक्ति भी पहुँचे। एक लड़की भी उस प्रदर्शनी को देखने आई। उसने देखा सब चित्रों के अंत में एक ऐसे मनुष्य का भी चित्र टँगा है जिसके मुँह को बालों से ढक दिया गया है जिसके पैरों पर पंख लगे थे। चित्र के नीचे बड़े अक्षरों से लिखा था-अवसर चित्र कुछ भद्दा सा था इसलिए लोग उस पर उपेक्षित दृष्टि डालते और आगे बढ़ जाते। लड़की का ध्यान प्रारंभ से ही इस चित्र की ओर था। जब वह उसके पास पहुँची तो चुपचाप बैठे कलाकार से पूछ ही लिया-श्रीमान जी यह चित्र किसका है?’’ ‘अवसर का’ कलाकार ने संक्षिप्त सा उत्तर दिया। आपने इसका मुँह क्यों ढक दिया है? लड़की ने दुबारा प्रश्न किया। इस बार कलाकार ने विस्तार से बताया-बच्ची प्रदर्शनी की तरह अवसर हर मनुष्य के जीवन में आता है और उसे आगे बढ़ने की प्रेरणा देता है, किंतु साधारण मनुष्य उसे पहचानते तक नहीं इसलिए वे जहाँ थे वहीं पड़े रह जाते हैं। पर जो अवसर को पहचान लेता है वही जीवन में कुछ काम कर जाता है।’’‘‘और इसके पैरों में पंखों का क्या रहस्य है?’’ लड़की ने उत्सुकता से पूछा। कलाकार बोला-यह जो अवसर आज चला गया वह फिर कल कभी नहीं आता।’’ लड़की इस मर्म को समझ गई और उसी क्षण में अपनी उन्नति के लिए जुट गई। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर. 💥 जन्म :- १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी. १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस. १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका 💥 मृत्यू :-  १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री १९९४ - विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक. २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं मत* ----------------------------------------------------- 2⃣ *वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'मध्ये संत्र्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची क्षमता असल्याचे मत पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त ,केले* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - महापालिका शाळांमध्ये गेल्या 4 वर्षांत तब्बल 90 हजारांची विद्यार्थी संख्येत घट, प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा अहवाल मंगळवारी प्रेस क्लबमध्ये जाहीर* ----------------------------------------------------- 4⃣ *स्टीव्हन स्पिलबर्गच्या 'द पोस्ट' सिनेमाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सहा नामांकने.* ----------------------------------------------------- 5⃣ *आमदार-खासदारांशी संबंधित विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी 12 विशेष न्यायालये स्थापन करणार असल्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - किरकोळ बाजारातील महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात 3.58 टक्क्यांवर होता तर नोव्हेंबरमध्ये वाढून 4.88 टक्क्यांवर पोहोचला* ----------------------------------------------------- 7⃣ *डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विद्याधर गंगाधर पुंडलिक* मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी. पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे. साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ? *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* *१) नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?* 👉 संत्र्यासाठी *२) लिंबामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?* 👉 क जीवनसत्व *३) जायकवाडी धरण कोठे आहे ?* 👉 पैठण औरंगाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद 👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड 👤 राजेश वाघ, बुलढाणा 👤 विनोद राऊलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* आवडीच्या कामात खुप उत्साह असतो त्रास झाला तरीही त्याचा दाह नसतो आवडीच्या कामात कशाचा आला त्रास कठीण काम वाटते उत्साही माणसाला खास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🚩🔻🔻🔻🚩🔻🔻🔻🚩 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्याजवळ खूप काही कला आहेत परंतु त्या कलेला प्रोत्साहन देऊन सादरीकरण करण्याची मनातून संधी द्या. त्यातून नवे काहीतरी करण्याची त्याला चालना द्या. तुमच्यातल्या कलेला बाजूला सारून दुस-याच्या कलेची नक्कल करु नका. ज्यामुळे तुमच्यातील सर्जनशीलतेला दडपून टाकून तुमच्या अस्तित्वाला ठेच पोहण्याची वेळ येईल असे प्रयत्नही करु नका. त्याच एका कारणाने तुमची मानहानी होईल व असे अपमानीत जीवन जगण्यास प्रेरित करेल असेही करु नका. तुमच्यातल्या नव्या अविष्काराला संधी देऊन स्वाभिमानाने आनंदी जीवन जगायला शिका म्हणजे तुम्ही खूप काही केल्याचे आणि जिंकल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.* हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . *उदा.*-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *रामबाण औषध* एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा  करायला जंगलातील  प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली  ती अशी.   लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते .   तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह   म्हणाला . महाराज  या प्राण्यांमध्ये मला  कोल्हा  दिसला नाही .  नाही मी सहज  विचारलं या कोल्ह्याला  महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही ,असे मला  वाटते .नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे  म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे  नंतर काय  ते बोलावे. महाराज  आजपर्यंत एवढे  पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते  औषध  शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे.  सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम  असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल .  त्याच क्षणी लांडगा तेथे मारून पडला.कोल्हा म्हणाला,कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम !  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ. 💥 मृत्यू :-  १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - केंद्र सरकारनं आधार कार्डला बँक खात्याशी जोडण्यासाठी वाढवली मुदत, आत्ता 31 मार्च 2018 पर्यंत करता येणार लिंक* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- मुंबादेवी मंदिरात कायद्यानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था लागू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पंढरपूर मंदिरासह अध्यक्ष नेमण्यासंदर्भातील विधेयक मंजूर.* ----------------------------------------------------- 3⃣ *मूग, उडीद, सोयाबीन यांच्या खरेदीची, काल संपणारी मुदत १ महिन्याने वाढवली, त्याचबरोबर नोंदणीची मुदतही वाढवण्यात आली सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती.* ----------------------------------------------------- 4⃣ *दिल्ली : कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी, दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निकाल.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : नॉन क्रिमीलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ८ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.* ----------------------------------------------------- 6⃣ *दुबई आेपन बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी, चीनच्या ही बिंगजीयाओचे कडवे आव्हान २१-११, १६-२१, २१-१८ असे परतावले.* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार रोहित शर्माची विक्रमी द्विशतकी खेळीमुळे अविस्मरणीय ठरलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 141 धावांनी धुव्वा उडवला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ग.दि. माडगूळकर* माडगूळकर गजानन दिगंबर : (१ ऑक्टोबर १९१९– १४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१). *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रामायण हा ग्रंथ कोणी रचला?* 👉 वाल्मिकी ऋषी *२) महाभारत हा ग्रंथ कोणी रचला?* 👉 महर्षी व्यास *३) अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 कौटिल्य *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सारंग भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *फसवलेले* हा म्हणतो फसवले तो म्हणतो फसवले आज पर्यंत खरं सांगा सामान्याला कोणी हसवले कोणाला ना कोणाला ईथे ज्याने त्याने फसवलेले आहे कशा वरून ना कशा वरून काळीज उसवलेले आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस हा एखाद्या हिमनगासारखा असतो. दिसतो छोटा, असतो मोठा. माणूस जसा नि जितका असतो, त्यापेक्षा कमी दिसतो नि समजतो. मनुष्य संबंधातले सारे ताण-तणाव निर्माण होतात, ते असण्या नि दिसण्याच्या गफलतीतून. माणसाचं असणं...त्याचा शोध-वेध घेऊ पाहाल तर कठिण! माणूस एकच असतो पण समाजजीवनात त्याला संबंधपूर्ततेचा भाग म्हणून वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पुरूष हा मुलगा, बाप, काका, मामा, भाचा, पुतण्या, शिष्य, प्रियकर, नवरा, बाॅस, नेता काहीही असतो. त्यामुळे एक माणूस एकास प्रिय तर त्याचवेळी दुस-या एखाद्या व्यक्तिस अप्रिय ठरतो.* *माहेरची मुलगी सासरी गेली की ती तेथे सून असते. माहेरी ती वळणाची असली तरी सासरच्यांच्या लेखी बिनवळणाची ठरू शकते. हे काय गौडबंगाल आहे माणसाचं? याचा शोध घेता लक्षात येतं की एकच माणूस अनेकांशी भूमिका, नाते, जबाबदारी संबंध लक्षात घेऊन नटासारख्या भूमिका वठवत असतो. त्यामुळे घरी मुलांना अतिशय प्रेमळ वाटणारा बाप कर्मचारी व सहका-यांना खाष्ट, कठोर वाटू शकतो. हे तो दायित्व म्हणून निभावत असतो, त्याच्यासाठी हे सारं अटळ होऊन बसतं. मग प्रश्न असा पडतो की नेमका माणूस कळायचा तरी कसा? ते कळणं महाकठीण गोष्ट आहे खरी! माणसातील ख-याचा शोध 'क्ष किरण' टाकले तरी लागणे अशक्य. पण एवढं नक्की म्हणता येईल..., जो माणूस भूमिका भान म्हणून स्विकारतो, तो आत-बाहेर एक असणं आदर्श असलं तरी कठीण! ते अवघड आहे. आपल्यातला हिंस्त्रपणा त्याने मारला, त्यामुळे खरंच का माणूस अहिंसक झाला?* ‼ *रामकृष्णहरी* ‼ ☀☀☀☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते. तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच. परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते. म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा. तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *वार काढा तोंडी* दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत १) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस, २) ३० तारिख ओलांडताना २ दिवस, ३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस, ४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल. उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१६ रोजी कोणता वार असेल ? उत्तर:- ३१ मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल. तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा वार शुक्रवार मिळेल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ह्रदय परिवर्तन* एक भक्त थे, कोई उनका कपड़ा चुरा ले गया। कुछ दिनों बाद उस भक्त ने वह कपड़ा एक आदमी के हाथ में देखा जो उसे बाज़ार में बेच रहा था। वह दुकानदार उस आदमी से कहता है "यह कपड़ा तुम्हारा है या चोरी का, इसका क्या पता। हाँ कोई सज्जन पहचान कर बता दें कि तुम्हारा ही है तो मैं इसे ख़रीद लूँगा।" वह भक्त पास ही खड़े थे और उनसे दुकानदार का परिचय भी था। उन्होंने उस दुकानदार से कहा मैं इस आदमी को जानता हूँ, तुम इस कपड़े के दाम दे, दो। दुकानदार ने कपड़ा ख़रीदकर कीमत चुका दी। यह सब देखकर भक्त के एक साथी ने उनसे पूछा कि आपने ऐसा क्यों किया? इस पर भक्त बोले कि वह बेचारा बहुत ग़रीब है, ग़रीबी से तंग आकर उसे ऐसा करना पड़ा है। भक्त कहते हैं ग़रीब की तो हर तरह से सहायता ही करनी चाहिये। इस अवस्था में उसको चोर बतलाकर फ़साना अत्यन्त पाप है। भक्त की इस बात का चोर पर बड़ा प्रभाव पड़ा और वह भक्त की कुटिया पर जाकर अपनी ग़लती के लिए रोने लगा। उस दिन से वह चोर भी एक भक्त बन गया। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक. १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता. १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात, ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपुरात होतोय ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’, सलग तीन दिवस दरवळणार संत्रा, रंगारंग कार्यक्रम विविध स्पर्धा अन् पुरस्कारांचा पाऊस* ----------------------------------------------------- 3⃣ *राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, राहुलपर्वला सुरुवात* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधान परिषदेत गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब.* ----------------------------------------------------- 5⃣ *दाट धुक्यामुळे पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर आणि मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस आजपासून तीन दिनांक १२ ते १४ डिसेंबरपर्यंत रद्द* ----------------------------------------------------- 6⃣ *रणजी करंडकमध्ये विदर्भ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत, विदर्भानं केरळचा 412 धावांत उडवला खुर्दा* ----------------------------------------------------- 7⃣ *आशियाई नेमबाजी : भारतीय युवांनी केली २१ पदकांची लयलूट, आगामी युवा आॅलिम्पिकसाठी ‘कोटा’ही मिळवला* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहस कथा* सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं.  अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रजनीकांत* शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  ( डिसेंबर १२, १९५० ) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे.रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत प्रसिद्ध आहेत. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा,  कन्नड,  तेलुगू,  बंगाली  तसेच  इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील ('शिवाजी द बॉस' या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. 'शिवाजी द बॉस' चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. रोबोट हा सर्वात जास्त चाललेला चित्रपट आहे, ज्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) वजनमापांची प्रमाणित पध्दत कोणी सुरू केली?* 👉 नंदराजांनी *२) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली?* 👉 राजगृह *३) नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे काय होते?* 👉 धनानंद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली 👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर 👤 शुभानन गांगल, पुणे 👤 अशोक पाटील कदम 👤 समीर मुल्ला 👤 वतनदार पवनकुमार नारायण 👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 महेश शिवशेट्टी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अपयश* कारणं सांगणारे लोक नेहमी अपयशी होतात अपयशी ठरण्याला नवे नवे कारणं देतात कारणं सांगणाराला यश जवळ येऊ देत नाही यशाची विजय माला गळ्यात घेऊ देत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वत:चं मरण पाहता येत नाही, इतरांच्या मरण्यातूनच हा अनुभव येतो. मृत्यू अटळ आहे, हे कळलेलं असतं. मरण आपल्या जाणिवेत केव्हा प्रवेश करतं ? घरात, शेजारी जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा. प्रत्येकजण या अनुभवातून जातो. मग सुरू होते आपले मरणरंजन. मरणाचे भय वाटत नाही, पण मरावेसे वाटत नाही. इतकी वर्ष जगलो, खूप झाले. तरी अजूनही जगावेसे वाटते. याचे काय उत्तर देणार ? आपले अध्यात्म जन्म-मरणाचा फेरा चुकवायला सांगतं. हा फेरा चुकविणे म्हणजे 'मोक्ष'. हीच 'मुक्ती.'* *निद्रा म्हणजे मरणाची छोटी आवृत्ती असते. आपण निद्रा घेतो म्हणजे नेणिवेच्या प्रांतात सुखनैव संचार करतो. तिथे सुखदु:खाचे भान नसते. निद्रा-जागृतीचा हा खेळ आपण नेहमीच खेळतो. झोपेत स्वप्न पडतात, ती जागेपणी आठवतात. अर्थ इतकाच, की आपण संपूर्णपणे जाणिवेच्या बाहेर गेलेलो नसतो. निद्रा ही विश्रांती आहे म्हणून आपणांस तिचे भय वाटत नाही.* *मरण हीसुद्धा अशीच निद्रा आहे...पण ती अंतिम, चिरनिद्रा आहे. मरण ही वस्तुस्थिती आहे. मरणाची भितीदायक कल्पना दूर सारून मूळस्वरूप न्याहळणे म्हणजे 'मरणसौंदर्य' पाहणे. एखादे ज्ञानेश्वर किंवा तुकारामच हे करू शकतात. मरणातील मरणपण काढायचे तर मरणापाशी समरस झाले पाहिजे.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯. विचारवेध.........‌...✍🏼 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परमेश्वराने मानवास एक सर्वात मोठी देणगी बहाल करुन टाकली आहे.ती ही "मन " या माध्यमातून.पहाना आपण आपल्या सा-या जीवनाची सूत्रे मनाच्याच ताब्यात दिली आहेत.मन करील तीच पूर्व दिशा असे ठरलेले असते.परंतू आपल्या मनाला सशक्त आणि आनंदी ठेवण्याचे काम,त्या मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचे आणि योग्य दिशेने पाऊल टाकण्याचे काम आपल्यावरच परमेश्वराने टाकले आहे.मनाला चांगले वाईट करण्याचा आणि ठेवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे तो कसा ठेवायचा आणि जीवन कशाप्रकारे सुंदर जगायचे हेदेखील तुम्हाला तुमच्याच मनाने ठरवावे लागेल.हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्र्न आहे.परमेश्वराने स्वत:कडे काहीच ठेवले नाही हे मात्र खरे आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *अभिव्यक्ती*   दररोज परीपाठ झाल्यावर वर्गात आल्या आल्या फलकावर एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तीत जास्त वाक्ये लिह्ण्यास सांगावेत. थोड्या दिवसानंतर मुले खूप वाक्ये लिहू शकतील. लेखनाचाही  सराव होईल. अभिव्यक्तीला वाव मिळेल. उदा. *पाऊस- ?* मला पाऊस  आवडतो.     माझी  आई पावसाचे गाणे म्हणते . पाऊस आभाळातुन येतो. आज पण पाऊस आला. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस का शोध* एक दिन गाव की बाहर , नदी किनारे एक व्यक्ती लोहे की संकल गले में लटकाकर नदी की और बढ़ रहा था | किसीने पूछा ,”महाराज , कहाँ जा रहे हो?” उस व्यक्तीने कहाँ, “हमारे गुरदेव ने कहाँ है इस नदी की पत्थारोमे परिस भी मिलते है जिसके स्पर्श से लोहा सुवर्ण में बदल जायेगा | मै उस परिस की खोज करने जा रहा हूँ|” वह लोहे की संकल वाला व्यक्ति नदी की पानी में उतरा | नदिसे एक पत्थर उठाया और संकल को लगया | देखा कुछ परिवर्तन नहीं हुवा | पत्थर नदी में छोड़ दिया |फिर दूसरा पत्थर उठाया लोहे से स्पर्श करा के देखा, पत्त्थर नदी की पानी में छोड़ दिया | दो ,चार ,दस, बीस पत्थर पर वह अजमाते आगे बढ़ रहा था| एक घंटा हुवा , दो- तिन घंटे हुवे लेकिन परिस प्राप्त नहीं हुवा | परन्तु उसने अपना काम छोड़ा नहीं , वह शुरू रखा | शुरू सुरु में वह हर पत्थर को ध्यान से देखता था | लेकिन जैसा समय बढ़ते गया वैसे उसकी मन की एकाग्रता भंग हो गई |हात से पत्थर उठाना - लोहे से स्पर्श कराना - पत्थर पानी में छोड़ना .. यह क्रिया तो चल रही थी लेकिन मन और कुछ सोचने लगा था| 4-5 घंटे हो गए | उसका काम एक छोटा लड़का देखा रहा था | उसे उत्सुकता निर्माण हुई | उसने व्यक्ति के पास जा कर पूछा, “बाबा , क्या कर रहे हो ?” व्यक्तीने कहा , “लोहे को सोना बनाने वाला परिस ढूंड रहा हूँ |” बच्चे ने कहा ,” लोहा है कहाँ? संकल तो सोनेकी ही है?” व्यक्ति की तंद्री खुल गयी | उसके ध्यान में आया की लोहा तो सुवर्ण बन चूका था |लेकिन किस पत्थर से ? इस और उसका ध्यान ही नहीं था | क्रिया करते करते उसका हेतु ही वह भूल गया और बिना भाव के कर्मकांड करने लगा था | उसको अपनी भूल पर बड़ा दुःख हुवा लेकिन करता क्या ? समय निकल चूका था, परिस पानी के पत्थारोमे मिल चूका था | 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/12/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर. १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म 💥 मृत्यू :-  १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : बडोदामध्ये होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा विजय* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर: आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 19 विधेयकं मांडली जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *राहुल गांधी 16 डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 4⃣ *पुण्यात थंडीचा कहर, तापमान कमाल २९.६ तर किमान १६ अंश सेल्सियसवर पोहोचले* ----------------------------------------------------- 5⃣ *महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा अशी मागणी जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना देण्यात आले निवेदन* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड हॉकी लीग 2017 मध्ये जर्मनीचा 2 - 1नं पराभव करत भारतानं जिंकलं कांस्यपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारताचा 7 विकेट्सने केला पराभव, या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा 1581 लोकांनी ही कथा ऑनलाईन वाचन केले आहे. आपण ही वाचावे. *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वनाथन आनंद* विश्वनाथन आनंद हा भारत बुद्धिबळ खेळाडू आहे, इंटरनॅशनल ग्रँडमास्टर आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. विश्वनाथन आनंदचा जन्म 11 डिसेंबर 1 9 6 9 रोजी झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळपटू. आनंदने पाच वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकले आहे आणि एक अविवादित विजेता आहे. विश्वनाथन आनंद 2003 च्या फिडे वर्ल्ड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनले आणि त्याला आपल्या काळातील क्रीडा खेळाडू म्हणून ओळखले जाते. 1988 मध्ये विश्वनाथन आनंद भारताचे ग्रँडमास्टर झाले. त्याला प्रथम राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हा भारताचा सर्वात सन्माननीय क्रीडा पुरस्कार आहे (1991-92). विश्वनाथन आनंद यांना 2007 मध्ये भारताचे दुसरे सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषण प्रदान करण्यात आले होते, ज्यावरून ते या पुरस्कारासाठी भारतीय इतिहासात प्रथम खेळाडू ठरले. आनंदने चेस ऑस्कर जिंकला 6 वेळा (1 997, 1998, 1998, 2003, 2007, 2008). नोव्हेंबर 2010 मध्ये आनंद पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला, परंतु त्याला परत कार्ल्सनला परत करावे लागले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?* 👉. १८८५ *२). राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?* 👉. ॲलन ऑक्टेव्हियन ह्युम *३). पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते?* 👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 इलियास शेख, सर्पमित्र व शिक्षक जि. प. हायस्कुल जारीकोट 👤 प्रा. नितीन दारमोड, समाजभूषण संस्थापक व अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान 👤 दस्तगीर सय्यद शिक्षक व निवेदक 👤 दीपक पाठक, परभणी 👤 आकाश सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *तडजोड* देण्या घेण्याच्या मुद्द्यावर एकमेकांशी जोडले जातात देणी घेणी बिघडली की संबंध तोडले जातात देण्या घेण्या शिवाय ही माणूस म्हणून संपर्क असावा मतलबा पुरता फक्त द्वेष किंवा आदरभाव नसावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* विद्यार्थ्याना इंग्रजीतून दिलेल्या सूचना समजत नाही. कृती करताना चुकतात, त्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे हा उपक्रम राबवावासा वाटला. 🌀Leader says🌀 हा उपक्रम राबविताना सर्वप्रथम शिक्षकांनी इंग्रजीतील इ.१लीते४थी पर्यंतच्या सूचनांची यादी बनवली. त्यातील सर्व सूचनांच्या पट्ट्या बनवल्या. शिक्षकांनी प्रथम कृती करून दाखविली व सराव घेतला. जे विद्यार्थी निरीक्षणातून योग्यप्रकारे सूचना पालन करून कृती करतात. विसरत नाही. (stand up,sit down,go back,come forward) इ.सर्व सूचना लक्षात ठेवतात. त्यांना leader बनण्याची संधी दिली. त्यामुळे मुले आनंदाने खेळत सहभागी होतात,कृती करतात लक्षात ठेवतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यायामाचे महत्त्व* विनित आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने 'हुर्रे' ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी ठीक सात वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करुन आणली होती. साडे आठला गाडीतच सगळयांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले. विनितनेही डब्यात आणलेला शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. अनिकेत मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ''मुलांनो उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोगंर चढायचा आहे." मुलं तर काय तयारच होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना '' हर हर महादेव'' म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते. जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोडया मुलांमध्ये शिल्लक होता अपवाद फक्त विनितचा! तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनितच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर सार्‍यांनी फिरुन डोंगर आणि लेणी पाहिली. संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, ''आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विनित. असं का माहिती आहे का? " मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या. टिचरांनी कारण समजावत सांगितले, "विनित अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकूर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल". "कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना? "मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ=========               *मानवी हक्क दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले. १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला. 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :-  १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान* ----------------------------------------------------- 2⃣ *शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन* ----------------------------------------------------- 3⃣ *गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करणार गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *आगरी यूथ फोरम आयोजित १५ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन शनिवारी डोंबिवली क्रीडा संकुल मैदानात झाले.* ----------------------------------------------------- 5⃣ *बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून पाच झाला, मयतांच्या कुटुंबियाना मिळणार प्रत्येकी सहा लाख रु.* ----------------------------------------------------- 6⃣ *जळगाव : पर्यावरण संस्थेतर्फे जळगावात व्याघ्र परिषदेस प्रारंभ. व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे यांचे मार्गदर्शन. मुक्ताईनगर वनक्षेत्राला अभयारण्य घोषित करा. किशोर रिठे यांची मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल टी-२० क्रिकेटमध्ये ८०० षटकार ठोकणारा पहिला ठरला फलंदाज* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========               *मानवी हक्क दिन* लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *व्यंकटेश बळवंत पेंढारकर* व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉     शेकरू *२)  औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉      ५२ *३)  जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉      २२मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संदीप मस्के, सहशिक्षक 👤 दशरथ एम. शिंदे 👤 अनिल यादव, धर्माबाद 👤 शिवानंद हिंदोले 👤 श्रीकांत म्याकेवार 👤 अमोल पाटील सलगरे 👤 मच्छीन्द्र सपाटे 👤 मिलिंद गायकवाड 👤 स्वप्नील मसाने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अर्ध्या हळकुंडाने* कोणी कोणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात छोट्या यशानेही उतावळे की बावळे होतात छोट्याशा यशात असे उतावळे बावळे होऊ नये अर्ध्या हळकुंडाने कोणी उगीच पिवळे होऊ नये     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?*                ••☆‼ *रामकृष्णहरी*  ‼☆••      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹      *--संजय नलावडे, चांदिवली मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात.त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही.त्यांना  वाटते की,आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो.अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत  नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत.इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *प्रसंग चित्र संभाषण ,लेखन* पाठ्यपुस्तक किंवा स्वतः विद्यार्थी निर्मित चित्र ..उपलब्ध करुन द्यावित.. प्रसंग चित्र पाहून मुल बोलती करण्यासाठी प्रश्न उत्तर स्वरूप आणि निरीक्षण मुलाबरोबर संवाद साधावा.. स्वनिर्मित चित्र मुलांच्या कल्पना आणि त्याची विचार करण्याची अभिव्येक्ती  बाहेर येण्यास मदत होते. भाषा शिकण्यासाठी संभाषण खुप महत्त्वाचे असते .पाठ्यपुस्तकात प्रसंग चित्रे दिलेली असतात पण आपण त्याकडे तेवढे लक्ष देत नाहीत .प्रसंग चित्रे पाहून छोटी छोटी वाक्य लेखन करण्यास मुलांना सांगावे. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                *वीणा का मर्म* मंदिर के पास प्रकोष्ठ में भगवान् सुब्रह्मन्यम की मूर्ति थी, उसी के सामने वाले भाग में एक सुंदर वीणा रखी हुई थी। मंदिर में कई लोग कुछ तो वीणा के दर्शन कर लेते और चले जाते। कुछ उसे बजाने की इच्छा करते पर उसे बजाने की इच्छा करने पर वहाँ बैठा हुआ मंदिर का रक्षक उनसे मना करता और वे वहाँ से चल देते। इस प्रकार सुंदर स्वरों वाली वह वीणा जहाँ थी वहीं रखी रहती थी। उसका कभी कोई उपयोग न होता था। एक दिन एक व्यक्ति आया। उसने वीणा बजाने की इच्छा व्यक्त की, पर उस व्यक्ति ने उसे भी माना कर दिया। वह व्यक्ति वहाँ चुपचाप खड़ा रहा थोड़ी देर में सब लोग मंदिर से निकलकर बाहर चले गए तो उस व्यक्ति ने वीणा उठा ली और उसका लयपूर्वक वादन करने लगा। वीणा का मधुर स्वर लोगों के कानों तक पहुँचा तो लोग पीछे लौटने लगे और उस मधुर संगीत का रसास्वादन करने लगे। वाद्य घंटों चला और लोग मंत्रमुग्ध सुनते रहे। जब वह बंद हुआ तब भी लोग ईश्वरीय आनंद की अनुभूति करते रहे। लोगों ने कहा-आज वीणा सार्थक हो गई।’’ इतनी कथा सुनने के बाद गुरु ने शिष्य से कहा-तात इस कथा का भावार्थ यह है कि भगवान् मनुष्य शरीर सब को देता है पर कुछ लोगों को तो अज्ञान और कुछ लोगों को अहंकार उस महत्त्वपूर्ण यंत्र का उपयोग करने नहीं देता। पर यदि कोई इन दोनों की उपेक्षा करके शरीर रूपी वीणा से मधुर लहरियाँ निकालने लगता है, तो यह शरीर इतना परिपूर्ण है कि न केवल उसे ही वरन् उसके संपर्क के सैकड़ों दूसरे लोग भी उसमें ईश्वरीय आनंद की झलके पाने लगते हैं।’’ 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/12/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन 💥 ठळक घडामोडी :-  १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू. १९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी. १९१९- ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री. १९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १५६५ - पोप पायस चौथा. १६६९ - पोप क्लेमेंट नववा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्याचे मतदान, दक्षिण गुजरातमध्ये काट्याची लढत* ----------------------------------------------------- 2⃣ *छगन भुजबळांच्या जामिनावर 18 डिसेंबरला निर्णय. जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण. 18 डिसेंबरला पीएमएलए कोर्ट देणार निर्णय.* ----------------------------------------------------- 3⃣ *कुलभूषण जाधव यांना परिवाराची भेट घेण्याची परवानगी. आई व पत्नी 25 डिसेंबरला जाणार पाकिस्तानात. पाकिस्तान मीडियाचं वृत्त.* ----------------------------------------------------- 4⃣ *चंद्रपूरमध्ये 26 शाळकरी मुलांना विषबाधा. लालपेठ परिसरातील मनपा शाळेतील घटना. चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा. जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू.* ----------------------------------------------------- 5⃣ *भंडा-याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी दिला खासदारकीचा राजीनामा* ----------------------------------------------------- 6⃣ *सोमवारपासून सुरू होणारे नागपूरच राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 7⃣ *भुवनेश्वर - हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ई. के. नायनार* एरम्पाला कृष्णन नायनार जन्म९ दिसम्बर १९१८ कल्याशेरी, मृत्यु 19 मई २००४, एक भारतीय राजनीतिक और भारत की कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) के एक प्रमुख नेता थे । केरल के मुख्यमंत्री थे । *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे आहे?* 👉 प्रवरानगर जि. अहमदनगर *२) महाराष्ट्रातील प्रसिद्ध आनंदसागर कोठे आहे?* 👉 शेगाव जि. बुलढाणा *३) ऱाष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे?* 👉 मोझरी जि. अमरावती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अक्षय जाधव पाटील 👤 प्रतीक यम्मलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रेमाने प्रेम* द्वेष करून कोणाचा प्रेम मिळवता येत नाही डोक्यातलं ज्ञान जसं कोणाला पळवता येत नाही द्वेषाने द्वेष तर प्रेमाने प्रेम वाढतं असते आपल्या आचरणातून आपली फ्रेम घडतं असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *विकार आणि त्यावरील उपाय याचं सूत्रं स्वत:चं स्वत:ला शोधावं लागतं. एकदा ते सापडलं की मनामधील वैषम्य, मत्सर, तिरस्कार गळून पडायला सुरूवात होते. ही प्रक्रिया मन:शुद्धीकडे घेऊन जाणारी असते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली, की मन गंगेसारखं निर्मळ नि प्रवाही होतं. एका सुंदर व निरामय जीवनानुभूतीकडं ते आपल्याला घेऊन जातं. संत कबीरांनी अतिशय सोप्या शब्दांत ही अवस्था मांडली आहे.* *" बुरा जो देखन मैं चला,* *बुरा न मिलिया कोय,* *जो दिल खोजा आपना,* *मुझसे बुरा न कोय !"* *आपलं मन हरवलं, त्यातील संवेदना संपल्या, तर जगातील सर्वात वाईट मीच आहे, हे चिंतन मनाला वास्तवाची जाणीव करून देणारं असतं. संत कबीर म्हणतात......* *"एकदा मन शुद्ध झालं की जगणं सुंदर होतं नि आम्ही हवेहवेसे वाटायला लागतो."* ••●🌼 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हाला जर कोणी पडत्या काळात साथ दिली तर तुम्ही त्यांना कधी विसरु नका.ते तुमच्या जीवनात एका दृष्टीने देवदूतच म्हणून तुम्हाला मदत करायला आले आहेत असे समजावे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला विसरु नका.त्यांनी तुम्हाला केलेली मदत ही तुमच्या पुढील जीवनासाठी प्रेरणाच दिलेली आहे असे समजून पुढे तुम्ही नव्या जोमाने कामाला सुरुवात करा.त्यांचे नाव नेहमी स्मरणात ठेवा म्हणजे कळत नकळत ते तुमच्या पाठीशी आहेत असे समजून जीवन जगायला शिका.पण असेही करु नका की,त्यांचा विसर होईल आणि पुन्हा त्यांची तुमच्या जीवनात मदतीला धावून येतील आणि मदत करतील अशी पुन्हा अपेक्षा करु नका.कारण असंच जर करत राहिलात तर तुमच्या जीवनात जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही.आयुष्यात अशी माणसे पुन्हा भेटतील असे नाही.परंतू त्यांच्या सोबतची नातीही जपायला शिका.त्यांनीच तर तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले जीवन जगायला शिकवले. हेही तुमच्यासाठी काय कमी आहे ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *विद्यार्थीओळखणे* एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे.अश्या प्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरु की तीन बातें* राजा हरि सिंह बेहद न्यायप्रिय और बुद्धिमान था। वह प्रजा का हर तरह से ध्यान रखता था। लेकिन कुछ दिनों से उसे स्वयं के कार्य से असंतुष्टि हो रही थी। हालांकि वह यह प्रयास करता था कि राजा होने का अभिमान न पाले पर कुछ दिनों से यश व धन की वर्षा ने उसके चंचल मन को हिला दिया था। उसने बहुत प्रयत्न किया कि वह अभिमान से दूर रहे। एक दिन वह अपने राजगुरु प्रखरबुद्धि के पास गया। प्रखरबुद्धि नाम के अनुरूप अत्यंत तीव्र बुद्धि थे। वह राजा का चेहरा देखते ही उसके मन की बात समझ गए। उन्होंने कहा, 'राजन्। मैं ज्यादा कुछ न कहते हुए केवल यह कहूंगा कि यदि तुम मेरी तीन बातों को हर पल याद रखो तो जीवन के पथ में कभी भी नहीं डगमगाओगे।' प्रखरबुद्धि की बात सुनकर राजा बोला, 'कहिए गुरु जी। वे तीन कौन बातें कौन सी हैं? मैं उन्हें हमेशा याद रखूंगा।' प्रखरबुद्धि बोले, 'पहली, रात को मजबूत किले में रहना। दूसरी, स्वादिष्ट भोजन ग्रहण करना और तीसरी, सदा मुलायम बिस्तर पर सोना।' गुरु की अजीबो-गरीब बातें सुनकर राजा बोला, 'गुरु जी, इन बातों को अपनाकर तो मेरे अंदर अभिमान और भी अधिक उत्पन्न होगा।' इस पर प्रखरबुद्धि मुस्करा कर बोले, 'तुम मेरी बातों का अर्थ नहीं समझे। मैं तुम्हें समझाता हूं। पहली बात-सदा अपने गुरु के साथ रहकर चरित्रवान बने रहना। कभी बुरी आदत मत पालना। दूसरी बात, कभी पेट भरकर मत खाना। रुखा-सूखा जो भी मिले उसे प्रेमपूर्वक चबा-चबाकर खाना। खूब स्वादिष्ट लगेगा। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) - बल्गेरिया. मातृ दिन - पनामा. संविधान दिन - रोमेनिया. 💥 ठळक घडामोडी :-  १९१४ - पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध - कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटीश नौदलावर हल्ला चढविला. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले. १९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला. १९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार. 💥 जन्म :- १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान. १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित; पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त वक्तव्य भोवले. काँग्रेसने बजावली कारणे दाखवा नोटीस* ----------------------------------------------------- 2⃣ *विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय, प्रसाद लाड यांना मिळाली 209 मतं* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक- नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जेन या चार ठिकाणी भरणार कुंभमेळा यूनोनोस्कोच्या यादीत समाविष्ट झाला आहे, गेल्या दोन वर्षापासून खासदार हेमंत गोडसे, त्रबकशेअर मंदिर विश्वस्त ललिता शिंदे प्रयत्नशील होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *गडचिरोली- दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण* ----------------------------------------------------- 5⃣ *जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.* ----------------------------------------------------- 6⃣ *एसटी महामंडळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार, शयनयान(स्लीपर) शिवशाही सज्ज, 150 शिवशाही मार्च अखेर एसटी मध्ये दाखल होणार* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद: राष्ट्रीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाने पाच गटांमध्ये अंतिम फेरीत मारली धडक. चंदीगड, तमिळनाडू या राज्यांच्या संघांनी गाठली अंतिम फेरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= कानमंत्र *शाळेने तारला संसार* सर वर्गात आले. हजेरी घेतली. सर्वांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या टेबलावर ठेवल्या. सरांनी सर्व वह्या तपासून कोणाचे काय चुकले हे सांगत वही परत करत होते. नाव घेऊन बोलावत होते आणि वही देत होते. शेवटी गृहपाठाची वही कोण आणले नाही त्यांना उभे राहायला....... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *हेमंत कानिटकर* कानिटकर यांनी दोन कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७४मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या कानिटकर यांनी पदार्पणातच विंडीजसारख्या तगड्या संघाविरुद्ध ६५ धावांची खेळी केली होती. दोन कसोटींत त्यांनी २७.७५च्या सरासरीने एकूण १११ धावा केल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी अमिट ठसा उमटविला. डिसेंबर १९६३ मध्ये सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्याद्वारे कानिटकर यांनी रणजी पदार्पण केले होते. या सामन्यांत त्यांनी नाबाद १५१ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा मान दोन वेळा मिळविला. १९७०-७१च्या मोसमात कानिटकर यांनी प्रथम श्रेणीतील नऊ सामन्यांत ८६.७७च्या सरासरीने ७८१ धावा केल्या होत्या. त्यात रणजीमधील सात सामन्यांत त्यांनी ९८.१४च्या सरासरीने ६८७ धावा केल्या होत्या. त्या जोरावरच महाराष्ट्राने १९७०-७१च्या रणजी मोसमात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. नेहरू स्टेडियममध्ये मार्च १९७१मध्ये झालेल्या राजस्थानविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी २५० धावांची खेळी केली होती. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर १९७१-७२च्या मोसमात ५१.६०च्या सरासरीने ५१६ धावा, १९७२-७३च्या मोसमात ५६.४५च्या सरासरीने ६२१ धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना १९७४मध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. १९६३ ते १९७८ दरम्यानच्या आपल्या प्रथण श्रेणीतील कारकीर्दीत कानिटकर यांनी ८७ सामन्यांत ४२.७८च्या सरासरीने तेरा शतके आणि २३ अर्धशतकांसह ५००६ धावा केल्या. तसेच, यष्टीरक्षक म्हणून ८७ विकेट्स मिळविल्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉 वर्धमान महावीर *२) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉 कुंडलपूर *३) वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉 इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विजय सूर्यवंशी, चिखलहोळ पत्रकार - फोटोग्राफर 👤 अनिल सुत्रावे, सहशिक्षक हु. पानसरे हायस्कुल, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसतं तसं नसतं* मूल्य संस्कारावर जे भरभरून बोलतात मंचावरून बोलणारे खरंच किती पाळतात बोलण्यात अन् वागणं कुठेच ताळमेळ नसतो दिसतं तसं कुठं नसतं हाच खरा घोळ असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खेड्यात आठवड्याचा एखादा दिवस देवाचा समजून पाळण्याची प्रथा आहे. त्या दिवशी शेतातील सर्व कामे बंद असतात. तो मोडणा-याला दंड बसतो. नडीचे काम निघाले तर देवाला नारळ ठेवून व पंचांना पूर्वकल्पना देऊन औत, गाडी वगैरे जोडायची मुभा असते. त्याला 'पाळीक दिवस' असे म्हणतात. युरोप-अमेरिकेत आठवड्याचा शेवटचा दिवस (विकेंड) मौजमजा करण्यासाठी असतो. ज्याला जे वाटेल, पटेल ते करायला, पार्ट्या, पिकनिक किंवा मुशाफिरी करता येते.* *वर्षभरात मातृ, पितृ, शिक्षक, रोझ, एड्स, व्हॅलेटीन असे वेगवेगळे 'डे' साजरे केले जातात. अशा परिस्थितीत 'नो घटस्फोट डे' असा दिवस साजरा करायचे एखाद्या देशाने ठरविले तर..? त्या दिवशी कुणाचीही सोडचिठ्ठी-घटस्फोटाचा अर्जच घ्यायचा नाही. असा एक पाळीक दिवस 8 जुलै रशियातील नोव्हगोरोद प्रदेशात आहे. 'व्हॅलेंनटीन डे' च्या तोडीचा हा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. लग्नगाठ बांधायला महत्व दिले जाते. शुभमंगल विवाह करणे भाग्याचे समजले जाते.* *कुणाच्या तरी डोक्यातून आफलातून आयडिया निघते, समाज ती स्विकारतो. त्यामुळे घटस्फोट फार कमी होतील असे नाही... पण काडीमोडांच्या प्रकारावर किमान एक दिवस विचार करायला मिळेल. काही डोकी थोडीतरी थंडावतील. लग्नाचे आयुष्य एक दिवसाने वाढेल... तडजोड झालीच तर आनंदच आहे..!* •••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●••• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्या गडावर चढतांना जेवढे शारीरिक कष्ट लागतात त्यापेक्षा गडावरुन खाली उतरताना लागत नाही. त्याचप्रमाणे एखादा हाती घेतलेला नवीन उपक्रम असेल तर तो सुरवातीला अवघड वाटतो.कारण त्यात असलेले तंत्र,हाताळत असताना येणा-या अडचणी, त्याबद्दलची शास्त्रशुध्द माहिती प्रात्यक्षिक करत असताना सुरवातीला अवघड जाते.अशावेळी जणू काही आपण गड चढतच आहोत असेच वाटते.पण नंतर जसजसा सराव होत जाईल तसतसा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सहज आणि सुलभ होत जातो.ज्याप्रमाणे आपण जसा गड सहजरित्या उतरतो आहोत असेच वाटायला लागते.त्याप्रमाणेच कोणत्याही कामात यश प्राप्त करायचे असेल तर पहिल्यांदा मनाची तयारी करायची, आत्मविश्वास वाढवून काम संपेपर्यंत तसाच ठेवायचा,त्यानंतर कामात एकाग्रता ठेवायची आणि काम पूर्ण करायचे. अशी कृती जर सातत्याने करीत राहिली तर आयुष्यातले कोणतेही अवघड कामाचे गड सहजपणे चढून यशस्वीपणे जिंकता येतील यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *शब्दात लपलेले शरीराच्या भागांची नावे शोधणे* वेगवेगळ्या नावाच्या शब्दपट्टया तयार करुन घ्या दुकान, हकनाक, पाठवनी, सगळा, कानस, पायरी, पाठक, मुंगळा,उपाय,नाकतोडा, गालबोट, पाठपोट, नखरा,कानाडोळा,कपाळकरंटा,तोंड -पाठ,पायपोस्,तोंडसुख,मानव, समान, डोकेबाज,भटजी ईत्यादी शब्द मुलांना गटात किंवा प्रत्येकाला देवून त्यातीलशरीराच्या भागांची नावे शोधण्याची कृती मुलांकडून करुन घ्यावी .  *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मां की सीख* इंग्लैंड में एक मरणासन्न मां ने अपने पुत्र से कहा - मुझे इस बात का अफसोस है बेटा कि मं तुझे पढ़ा न सकी और अब तो मेरे पास ज्यादा समय भी नहीं है। तेरे लिए कुछ नहीं कर सकती। यह समझ ले कि अब तेरे लिए सारा संसार ही पाठशाला है। तुझे जहां से जो मिल सके, वहां से सीखना, वही तेरे काम आएगा। उसी से तुझे रोशनी मिलेगी। यह कहकर मां ने हमेशा के लिए आंखें मूंद लीं। बेटा देखता रह गया। अपने भीतर उमड़ रहे आंसू को उसने रोका। उसने मां की सीख गांठ बांध ली। अपने दादा जी को पत्थर तोड़ते देख वह पत्थर तोड़ने का काम करने लगा। इस संबंध में जब उसका ज्ञान एक खास स्तर तक पहुंच गया तो वह गोताखोरी करने लगा और उसने समुद्री चट्टानों के विषय में पर्याप्त जानकारी हासिल कर ली। इसके बाद उसने संगतराश के घर नौकरी कर ली और पत्थरों के गुणों का अध्ययन करने लगा। धीरे-धीरे लाल पत्थर के बारे में उसका ज्ञान एक ऊंचाई तक पहुंच गया। वह उसका विशेषज्ञ माना जाने लगा। तब उसने अपने अनुभवों को लिखना शुरू किया। रात-दिन एक कर लिखता रहा। फिर वह अपने अनुभव लोगों से बांटने लगा। उसकी बातें सुन लोग आश्चर्यचकित रह जाते थे। धीरे-धीरे उसकी ख्याति फैलने लगी। पहले अपने देश में फिर उसके बाहर भी उसे लोग जानने लगे। वह समूचे विश्व में चर्चित हो गया। यह बालक और कोई नहीं ह्यू मिलर था, जो अपनी मां की सीख के कारण विश्वप्रसिद्ध भूगर्भशास्त्री बना। उसने साबित किया कि किताबी ज्ञान से कहीं ज्यादा महत्वपूर्ण है जीवन के अनुभवों से अर्जित ज्ञान। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महापरिनिर्वाण दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले. १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार. २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 💥 जन्म :- १८६१: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक  १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा. १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ. २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, मुंबईवरील धोका टळला* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी मुंबई- बँक ऑफ बडोदा दरोड्याप्रकरणी 11 आरोपी अटक, 3 कोटी 43 लाखांच्या दागिन्यांपैकी 1कोटी 38 लाखांचे दागिने हस्तगत* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील वत्सलाबाई जोशी पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना जाहीर* ----------------------------------------------------- 5⃣ *राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या नव्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. या प्रोत्साहनापोटी राज्य शासन ६४८ कोटी रुपये खर्च करणार आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *खुल्या प्रवर्गातील पदोन्नती सुरू करण्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. त्या बाबत विभागाने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली कसोटी - भारत विजयापासून सात पावले दूर, चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 3 बाद 31 धावा, भारताने श्रीलंकेला विजयासाठी 410 धावांचे दिले लक्ष्य* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• *शिका संघटित व्हा संघर्ष करा* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/dr-babasaheb-ambedkar.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक* नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे दि. ६ डिसेंबर, इ.स. १८६१ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभूत असल्याची समजूत झाली. मुळात ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते. वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. नागपूर येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना बायबल वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. १० फेब्रुवारी इ.स. १८९५ या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. इ.स. १८९५ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत. दि. ९ मे इ.स. १९१९ रोजी टिळकांचे निधन झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते............ *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 ६ डिसेंबर *२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले?* 👉 ६ डिसेंबर १९५६ *३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली?* 👉 १४ ऑक्टोबर १९५६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 डी. आर. भोसके, येवती 👤 अशोक हिंगणे 👤 शंकर बोंबले 👤 कैलास सोनकांबळे 👤 बालाजी गैनवार, चिकना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *घोळ* कोण चोर कोण साव सगळाच येथे घोळ आहे सावां पेक्षा ईथे सारा चोरांचाच मेळ आहे प्रथम दर्शनी कोणीही कोणाला थोर वाटतात ईथे सावां पेक्षा जास्त कोणालाही चोर भेटतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* •••●🔆‼ *रामकृष्णहरी* ‼🔆●••• *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सर्व काही मिळवता येते,परंतु दुस-याचा विश्वास मिळवता येते कठीण आहे. त्यासाठी पहिल्यांदा दुस-याच्या विश्वासासाठी आपण आपल्या विश्वासावर प्रामाणिक असणे आवश्यक आहे.त्यामध्ये खोट असू नये. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *ओंजळीने ग्लास भरणे* मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १०–१२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्येनुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणीओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेऊन  त्यांना आपला ग्लास भरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक अपंग दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ : ओखी चक्रीवादळाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची केंद्र सरकारकडे मागणी* ----------------------------------------------------- 2⃣ *'ओखी’मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन, मुंबईत आकाश ढगाळ राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत या शाळा स्थलांतरित होत असल्याने, या शाळांमधील शिक्षकांच्या नोक-यांवर व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार नाही, असे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांची राज्याचे नेत्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून याबाबतची घोषणा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात केली.* ----------------------------------------------------- 5⃣ *हॉकी वर्ल्ड लीग फायनल 2017 - भारताचा 2-3 ने इंग्लंडकडून पराभव.* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुस-या शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर लंकेविरुद्ध ४ बाद ३७१ धावा उभारल्या.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद  बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. राजेंद्र प्रसाद *२) घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर *३) घटना समितीची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" विचाराने "* कोणी कोणाच्या मागे तर कोणी सोबत आहे तू त्याच्या सोबत कसा कोणाची काय बाबत आहे सोबत असो की नसो ते विचाराने रहातात सगळं काही विचाराने वाटून वाटून खातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जमीवरुन सरपटणारा कोणताही साप कधीही सरळ चालत नाही तो वाकडातिकडा चालत ( सरपटत) असतो.त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली काही दुष्टप्रवृत्तीची माणसे वावरत असतात.त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगा ते कधीच तुमचे ऐकून घेत नाहीत.ते आपलेच खरे मानतात.आम्ही जे काही करतो ते चांगलेच करतो असे समजून सामान्य लोकांना त्रास देतात.तर अशा लोकांपासून दूर राहणे केव्हाही चांगलेच.अशांची मैत्री कधीही करू नये.कारण यांची जातच सापासारखीच असते ते केव्हाही उलटू शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे चटकन शिकणे* वर्गातील मुलांना नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे जसे प्र,ऋ,ष्ट्र,ट्र यांसारखे इतर अक्षरे अवघड वाटतात. किंवा लक्षात राहत नाही. म्हणून शाळा सुटते वेळी मुले जेव्हा अभ्यासातून बाहेर पडतात. तेव्हा दररोज फळ्यावर एक एक अक्षर लिहून देणे त्याचे वाचन घेणे. व घरी जाईपर्यंत लक्षात ठेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा तो लिहून वाचन करण्यास सांगणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणीवपूर्वक ते अक्षर विचारून, लिहून घेणे. दैनंदिन अभ्यासात मार्गदर्शन करून मूल्यमापन करावे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते. नवीन अक्षर शिकल्यानंतर आनंदी होतात. वाचण्याचा प्रयत्न करतात. कामात गुंतून राहतात. हा उपक्रम दररोज चालू ठेवा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शर्यत* एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ. सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची. माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते. लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल. पण बेडूक काही ऐकत नाहीत. स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’ तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात. टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल. एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात. एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो. वर जाऊन पाहतो. ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो. लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात. हे घडलं कसं? तो बेडूक खाली उतरतो. सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी? तरी तू डबकं कसं काय सोडलंस? तो बेडूक काहीच बोलत नाही. तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही. सगळे गप्प होतात.. त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, *टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.* इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल? यातून जमेल तर काहीतरी शिका..........प्रगती करताना लोकांच्या म्हणन्याकडे लक्ष देऊ नका. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त " शक्ती " असून चालत नाही , तर त्याला " सहनशक्तीचीही जोड असावी लागते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ=========         *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :-  १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अमरावती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अधिवेशन व शिक्षण परिषद 26 ते 30 डिसेंबरदरम्यान सिंधुदुर्गमधील ओरोस येथे आयोजित केले आहे. शिक्षणाचे खासगीकरण थांबवा प्राथमिक शाळेतच सर्व शैक्षणिक सुविधा द्या, हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर लागली आग; घटनास्थळी 4 बंब दाखल. अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - 15 व्या वित्त आयोगाच्या सदस्यांनी घेतली वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट* ----------------------------------------------------- 4⃣ *ओखी चक्रीवादळ दक्षिण गुजरातच्या दिशेने, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- बॉलिवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते शशी कपूर यांचं निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली कसोटी - तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 9 बाद 356 धावा, पाहुणा संघ अद्याप 180 धावांनी पिछाडीवर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *मुलांपेक्षा मुलगी बरी.....!* आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4739750601162752 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========             *शशि कपूर* शशि कपूर ( जन्म: 18 मार्च, 1938, निधन : 04 दिसम्बर 2017 ) हिन्दी फ़िल्मों के एक अभिनेता थे। शशि कपूर हिन्दी फ़िल्मों में लोकप्रिय कपूर परिवार के सदस्य थे। वर्ष २०११ में उनको भारत सरकार ने पद्म भूषण पुरस्कार से सम्मानित किया। वर्ष २०१५ में उनको २०१४ के दादासाहेब फाल्के पुरस्कार से सम्मानित किया।इस तरह से वे अपने पिता पृथ्वीराज कपूर और बड़े भाई राजकपूर के बाद यह सम्मान पाने वाले कपूर परिवार के तीसरे सदस्य बन गये। शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. शशी कपूर यांनी आतापर्यंत 160 चित्रपटांत काम केलंय. त्यात 148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकातामध्ये झाला होता. 60 आणि 70 च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. मेरे पास माँ है । हे त्याचे डॉयलॉग जनता विसरू शकणार नाही. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ======== *१). सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे?* 👉      चादरीसाठी *२). गाजरामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?* 👉.     अ जीवनसत्व *३). महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?* 👉      गंगापूर धरण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विकास गणवीर, नागपूर 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤 सूर्यकांत स्वामी 👤 राज डाकोरे 👤 संतोष रामराव शिंदे 👤 अशोक चिंचलोड, येवती, 👤 राजेश गटालावार 👤 राजू अलमोड 👤 योगेश पडोळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ=========      *भेव* कोणावर ठेवावी श्रद्धा कोणाला मानावे देव सभ्य माणसांचही आता वाटू लागलंय भेव सभ्य माणसांनी तरी का आपली सभ्यता सोडावी आपण का म्हणून किती कोणापुढे हातं जोडावी    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ?  कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....* *माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...* *काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!* *"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"*    ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●••     🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून शांतपणे किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याचं किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला हर्षोल्हासित करतात. अशाच पध्दतीने मानवी मनाचेही तसेच आहे. काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चांगल्या चालत असलेल्या जीवनाला नुकसानच करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासार विचार पूर्वक निर्णय घेतले तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल. असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवन सुखावह जगले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *शब्दांचा डोंगर 📖*          या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम एक शब्द दिला जातो. नंतर त्या शब्दास अनुसरन खालील प्रत्येक ओळीत एकेक शब्द / शब्दसमुह क्रमाने वाढवण्यास सांगणे. यावेळी विद्यार्थ्यांकडून खुप मोठ्या शब्दडोंगराची अपेक्षा करु नका. सुरुवातीला 3 ते 4 ओळींचा झाला तरी चालेल. मात्र हळूहळू तो वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.   उदाहरणार्थ ✅आंबा ✅आंबा खातो.  ✅रमेश आंबा खातो. ✅ रमेश गोड आंबा खातो. रमेश  हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.  ✅रमेश दररोज हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. ✅रमेश दररोज सकाळी हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========     *नक्कल नाही ;अनुकरण करावे* सातवीतला तनिष हा नक्कला चांगल्या करायचा .मित्रांच्या बोलण्याच्या लकबी,शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे.शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय,पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षक दिनादिवशी सगळी मूल वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते.तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठीगेला.त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या . फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवतानात्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ,याचा विचारच त्याने केला नव्हता .सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली. त्यावेळी तनिषच्या मनात एक गोष्ट पक्की रुजली की सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते .कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो .अन्यथा आपण केवळ एखाद्या व्यक्तीची नक्कल करू शकतो .पण त्या व्यक्तीसारखे श्रेष्ठ बनू शकणार नाही. तेव्हापासून तनिष चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यावर भर देऊ लागला .  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🙏 *नमस्काराचे महत्व* 🙏 महाभारताचे युद्ध सुरु होते. दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की, "मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन" त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, "माझ्या सोबत चल". द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की, आत जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच, "अखंड सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की, "वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस?" "माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत" असे द्रोपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म म्हणाले, "माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करु शकतात" शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रोपदीला म्हणाले की, "बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले, हे तुझ्या लक्षात आले का?" जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर हि युद्धाची वेळच आली नसती" अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती! तात्पर्य, वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की, कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. 🙏 कारण - नमस्कारात प्रेम आहे नमस्कारात विनय आहे नमस्कारात अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कारात शीतलता आहे नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो नमस्कार आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे 🙏🙏🙏 🙏 सर्वांना सादर प्रणाम 🙏 (संकलीत व अनुवादित)

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक अपंग दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ : ओखी चक्रीवादळाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची केंद्र सरकारकडे मागणी* ----------------------------------------------------- 2⃣ *'ओखी’मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन, मुंबईत आकाश ढगाळ राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत या शाळा स्थलांतरित होत असल्याने, या शाळांमधील शिक्षकांच्या नोक-यांवर व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार नाही, असे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांची राज्याचे नेत्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून याबाबतची घोषणा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात केली.* ----------------------------------------------------- 5⃣ *हॉकी वर्ल्ड लीग फायनल 2017 - भारताचा 2-3 ने इंग्लंडकडून पराभव.* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुस-या शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर लंकेविरुद्ध ४ बाद ३७१ धावा उभारल्या.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद  बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. राजेंद्र प्रसाद *२) घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर *३) घटना समितीची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" विचाराने "* कोणी कोणाच्या मागे तर कोणी सोबत आहे तू त्याच्या सोबत कसा कोणाची काय बाबत आहे सोबत असो की नसो ते विचाराने रहातात सगळं काही विचाराने वाटून वाटून खातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जमीवरुन सरपटणारा कोणताही साप कधीही सरळ चालत नाही तो वाकडातिकडा चालत ( सरपटत) असतो.त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली काही दुष्टप्रवृत्तीची माणसे वावरत असतात.त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगा ते कधीच तुमचे ऐकून घेत नाहीत.ते आपलेच खरे मानतात.आम्ही जे काही करतो ते चांगलेच करतो असे समजून सामान्य लोकांना त्रास देतात.तर अशा लोकांपासून दूर राहणे केव्हाही चांगलेच.अशांची मैत्री कधीही करू नये.कारण यांची जातच सापासारखीच असते ते केव्हाही उलटू शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे चटकन शिकणे* वर्गातील मुलांना नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे जसे प्र,ऋ,ष्ट्र,ट्र यांसारखे इतर अक्षरे अवघड वाटतात. किंवा लक्षात राहत नाही. म्हणून शाळा सुटते वेळी मुले जेव्हा अभ्यासातून बाहेर पडतात. तेव्हा दररोज फळ्यावर एक एक अक्षर लिहून देणे त्याचे वाचन घेणे. व घरी जाईपर्यंत लक्षात ठेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा तो लिहून वाचन करण्यास सांगणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणीवपूर्वक ते अक्षर विचारून, लिहून घेणे. दैनंदिन अभ्यासात मार्गदर्शन करून मूल्यमापन करावे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते. नवीन अक्षर शिकल्यानंतर आनंदी होतात. वाचण्याचा प्रयत्न करतात. कामात गुंतून राहतात. हा उपक्रम दररोज चालू ठेवा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शर्यत* एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ. सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची. माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते. लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल. पण बेडूक काही ऐकत नाहीत. स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’ तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात. टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल. एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात. एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो. वर जाऊन पाहतो. ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो. लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात. हे घडलं कसं? तो बेडूक खाली उतरतो. सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी? तरी तू डबकं कसं काय सोडलंस? तो बेडूक काहीच बोलत नाही. तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही. सगळे गप्प होतात.. त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, *टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.* इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल? यातून जमेल तर काहीतरी शिका..........प्रगती करताना लोकांच्या म्हणन्याकडे लक्ष देऊ नका. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त " शक्ती " असून चालत नाही , तर त्याला " सहनशक्तीचीही जोड असावी लागते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक एड्स निर्मूलन दिवस* *लोकशिक्षण दिन (भारत)* 💥 ठळक घडामोडी :-  १८३५ - हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित. १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले. १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना. १९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली. 💥 जन्म :- १८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. १९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा. १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दिल्ली- रस्ते अपघात रोखण्यासाठी समिती गठन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्या जाणा-या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी यलो फेम गौरी गाडगीळची निवड करण्यात आली* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि जोरदार वा-यासोबत तामिळनाडू आणि केरळ धडक मारणा-या ‘ओखी’ चक्रीवादळात 8 जणांचा मृत्यू, शाळा, महाविद्यालये बंद* ----------------------------------------------------- 4⃣ *पंजाब- लुधियाना- संगरुर भागाला आज संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का* ----------------------------------------------------- 5⃣ *पिंपरी चिंचवड : जागतिक एड्स दिनानिमित्त नॅशनल एड्स रिसर्च सेंटर भोसरी येथे विविध संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून एड्स विरोधी जनजागृती केली* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : शिवाजी सावंत लिखित पुस्तकाच्या मराठी प्रकाशनाचे सर्व अधिकार कॉंटिनेंटलकडे कायम, साडेपाच वर्षांनंतर लवाद मंडळाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपः भारताच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त प्रासंगिक लेख           *खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय* संपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळले की अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते.पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे................ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/a-i-d-s.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाळ सीताराम मर्ढेकर* बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. सौंदर्य आणि साहित्य'साठी इ.स. १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जागतिक एडस दिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १ डिसेंबर *२) एडस हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?* 👉 एच आय व्ही *३) भारतात एडसचा पहिला रुग्ण कधी सापडला?* 👉 १९८६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्यामसुंदर दरबस्तेवार, सहशिक्षक 👤 हेमंत बेंडे, सहशिक्षक, रातोळी 👤 मारुती गिरगावकर, सहशिक्षक 👤 विठ्ठलराव मुजळगे, सहशिक्षक 👤 राजकुमार दाचावर, सहशिक्षक 👤 श्याम नरवाडे 👤 योगेश पाटील जायशेट, धर्माबाद 👤 शिवाजी पुरी 👤 मारोती दिंडे 👤 सुभाष सोनटक्के 👤 श्रीकांत लाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अक्कल* नक्कल करायलाही अक्कल असावी लागते नकलेतूनही काही हुशारी दिसावी लागते अंगात हुशारी असेल तर नक्कल करता येते नक्कल करून कोणालाही नकलाकार ठरता येते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणत्याही परिस्थितीत आपण धीर सोडू नये. आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या किंवा अडथळे आले तरी आपण खचून जाऊ नये. कारण परमेश्वर नेहमीच आपल्याबरोबर असतो. सुभक्तिचे जीवन जगणे म्हणजे परमेश्वराबरोबरचे आपले नाते काय आहे हे ओळखून असणे. ज्या गोष्टींना जगात मान्यता मिळते, त्या सगळ्या आपणही केल्या पाहिजेत असे नाही. आपल्या भोवतीचे लोक ज्या मार्गाने चालले आहेत तोच मार्ग आपणही निवडला पाहिजे असे नाही.* *आपले विकल्प, आपले विचार निराळे असू शकतात. आपले आचरण वेगळे असू शकते. सुभक्तिशील जीवनात समाधान प्राप्त होते. बंधुप्रेमाचा अर्थ हा की, यशाचे ध्येय गाठण्यासाठी आपण स्वार्थी होऊ नये. आपल्या सामाजिक, कौटुंबिक जबाबदा-या आपण विसरू नयेत. व्यक्तिमत्वाचा विकास पूर्ण होतो तो प्रीतीमध्ये. प्रीतीशिवाय आपण काहीच नाही, म्हणून असे म्हटले आहे की, शेवटी प्रीती ही सर्वश्रेष्ठ ठरते.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे मधमाश्या प्रत्येक फुलातील एक एक मध जमा करून मधाचे पोळे तयार करते. त्यामागे त्यांची शोधनवृत्ती आणि चिकाटी हा गुण अत्यंत महत्त्वाचा घेण्यासारखा आहे हे विसरुन चालणार नाही. माणसाने सुद्धा कितीही जीवनात खडतर प्रवास असलातरी न घाबरता जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास आपल्यापासून यश दूर जात नाही असे समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चित्रांचा वापर करुन खेळ घेणे.* सलग तीन दिवस मुलांना चित्र शब्द कार्ड वाचन घ्यावे. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्यावे. सर्वांस शब्दकार्ड वाटावे व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवावे. चित्र शब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्यावे. अशीच सर्व चित्र शब्द कार्ड शोधण्याचा सराव घ्यावा. शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे असा खेळ घ्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची* एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले. समोर हजारो लोक बसलेले होते. तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्यासाठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली. जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त वीस लोक असतांना का दिली ? तथागतांनी खुप छान उत्तर दिले, "ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसापर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले. परन्तु जे मला फक्त बघण्यासाठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले. मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आणणारे अनुयायी हवेत. म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला." *बोध : जो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही. किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमद्भगवत गीता जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. १९३५ - आनंद यादव, मराठी लेखक. 💥 मृत्यू :-  २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोपर्डी प्रकरणातील तिन्हीही दोषींना फाशीची शिक्षा. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे सह भवाळ, भैलुमेला फाशीची शिक्षा.* ----------------------------------------------------- 2⃣ *कोपर्डीच्या निकालानंतर पीडितेला न्याय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. उज्ज्वल निकम यांचं केलं अभिनंदन.* ----------------------------------------------------- 3⃣ *शिर्डीच्या साई संस्थानासाठी दोन महिन्यात नवे विश्वस्त मंडळ स्थापन करा - न्यायालय* ----------------------------------------------------- 4⃣ *राज्यात थंडीचा कडाका वाढला. निफाडला आत्तापर्यंत सर्वात कमी 9.6 तापमानाची नोंद. तर नाशिकमध्ये 10.8, मालेगावात 13.6 आणि वर्ध्यात 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद* ----------------------------------------------------- 5⃣ *मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत 24 आणि 25 डिसेंबर ला भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती* ----------------------------------------------------- 6⃣ *ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी महसूल विभागाने पालघर येथे पार पडलेल्या कोकण विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक* ----------------------------------------------------- 7⃣ *बीसीसीआयने अनौपचारिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची 10 नंबरची जर्सीची केली निवृत्ती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. जगदीशचंद्र बोस* पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २०२० साली होणारे ऑलिंपिक कोणते देशामध्ये होणार आहेत?* 👉 जपान *२) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?* 👉 झेलम *३) हेमाडपंत या मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?* 👉 यादवांचा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली 👤 राजेश्वर येवतीकर, येवती 👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा 👤 रवी बुगावार, धर्माबाद 👤 देविराज पिंगलवार, भोकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *भाषा* कधी रागाची कधी लोभाची भाषा आहे लोभाची भाषा बोलली म्हणजे आशा आहे आशा असली म्हणजे बरोबर बदलते भाषा भाषा बदल करते ती मानवी मनाची आशा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नव्वदीनंतर जन्माला आलेली आजची तरूण पिढी प्रामुख्याने घरातील विभक्त कुटुंबपद्धतीत वाढली. एकुलतं एक मूल असणं आणि आई-वडिल दोघांचीही नोकरी या विशिष्ट रचनेमुळे पालकांच्या सर्व आशा आणि प्रयत्न त्या एकट्या मुलावर केंद्रित झाले. ज्याचा मोठा परिणाम त्या लहान मुलाच्या मानसिकतेवर, किंबहुना व्यक्तिमत्वावर झाला. परिक्षेतील यशामुळे झालेल्या कोडकौतुकानं त्या मुलाला जसं प्रोत्साहित केलं; तसंच काही प्रमाणात कधीतरी किंवा बरेच वेळा अपयशाला सामोरं जावं लागल्यास होणारा अस्विकार किंवा त्रास लहान वयातच खच्चीकरण करणारा ठरला. नकाराचा स्विकारही ही पिढी सकारात्मकतेने करते का ? हे सुद्धा महत्वाचे आहे.* *यश मिळविल्यानंतर कोडकौतुकाला सातत्यानं सामोरी गेलेली एकुलती एक मुलगी वैवाहिक आयुष्यात तेच यश चाखेल असं नाही. तिच्या सतत 'परफेक्ट' बनण्याच्या धडपडीत ती जास्त आग्रही किंवा दुराग्राहीसुद्धा होऊ शकेल. आजची पंचविशीत असलेली पिढी खरंच स्वत:ला, स्वत:च्या भावना आणि दृष्टीकोन यांना ओळखते का ? बरेचदा भौतिक सुखाच्या मागे लागून माझा पगार, माझं कुटुंब आणि मी यातच त्यांच जीवन गुरफटताना दिसतं त्यांच करिअर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर अतिक्रमण तर करत नाही ना ? आजच्या जमान्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा 'व्हर्च्युअल डायलाॅग' आधिक वाढतोय. पण तो खराखुरा संवाद आहे की वेगळंच काही ? हे स्वत:शी तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात यश आणि अपयश हे आपल्या कर्मानुसार अथवा कृतीनुसार मिळत असते.जर तुम्ही तुमच्या निवडलेल्या कामात मन लावले आणि एकाग्रता ठेवली तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडले जाऊ शकते. त्याबरोबरच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.जर का तुम्ही कामात कामचुकारपणा केला की,नक्की समजून घ्या तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे. म्हणून यश अपयश मिळवणे हे आपल्या करणा-या ब-यावाईट कर्मानुसार मिळत असते.मग आपणच ठरवावे की,आपण जीवनात यशस्वी व्हायचे की अयशस्वी ..! *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *वात्सल्याचा कणा* (८क्षरी) आई माहेराची शक्ती देई जगण्याला बळं.. लेख सुखात नांदावी तिच्या आसवांची गळं.. माझ्या सुखाचा विसावा तिचा फाटका पदरं... डोळे भरून निरोप, मनी दगडाचा भारं... हक्क आईचा जेवढा देते वटीच भरून... माझ्या संसाराची चिंता आई सारते दुरून. . लेख हसावी ,रूसावी सौख्य भरून दिसावी.. भोग सासरी सोसत कूसं उजळून यावी.. डोळे भरले पाहून तिचा हात तोंडावर... नको रडू सातीसांजी पाणी कुंकू वाटावर... जीव लाव लेकरांना सांगे ममतेचा पान्हा... माय लेकीच्या नात्याने जगी वात्सल्याचा कणा... (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या *शेतीमाती* संग्रहातून..) ✍🏻 अशोक क. गायकवाड पारळकर, वैजापूर, औरंगाबाद 8390795676 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

➰〰➿〰➰ *'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!* आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे! *'ळ' अक्षर नसेल तर* पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी तीळगूळ कसा खाणार ? टाळे कसे लावणार ? बाळाला वाळे कसे घालणार खुळखुळा कसा देणार घड्याळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार ? घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार वेळ पाळणार कशी ? मने जुळणार कशी ? खिळे कोण ठोकणार ? तळे भरणार कसे ? नदी सागरला मिळणार कशी ? मनातली जखम भळाभळा वाहणार कशी हिवाळा,उन्हाळा, पावसाळा नाही उन्हाच्या झळा नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा ! कळी कशी खुलणार ? गालाला खळी कशी पडणार ? फळा, शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा सगळे सारखे, कोण निराळा? दिवाळी, होळी सणाचे काय ? कडबोळी,पुरणपोळी ओवाळणी पण नाही ? तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ? भोळा सांब , सावळा श्याम जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ? मातीची ढेकळे नांगरणार कोण? ढवळे पवळे बैल जोततील कोण? पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ? निळे आकाश, पिवळा चाफा माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा ! नारळ, केळ, जांभूळ, आवळा, नवर्‍याला बावळट बोलणार कसे काळा कावळा, पांढरा बगळा ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा अळी मिळी गुपचिळी, बसेल कशी दांतखिळी? नाही भेळ, नाही मिसळ नाही जळजळ नाही मळमळ नाही तारुण्याची सळसळ पोळ्या लाटल्या जाणार नाहीत टाळ्या आता वाजणार नाहीत ! जुळी तीळी होणार नाहीत ! बाळंतविडे बनणार नाहीत ! तळमळ कळकळ वाटणार नाही ! काळजी कसलीच उरणार नाही ! पाठबळ कुणाचे मिळणार नाही सगळेच बळ निघून जाईल, काळ आला होता पण वेळ आली नव्हती *पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !* ळ अक्षराची महती सांगणारा लेख .संकलित

संकलन

81) forth - पुढे, बाहेर fourth - चौथा 82) ear - कान , धान्याचे कणीस year - वर्ष 83) air - हवा heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी 84) yes - होय ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात 85) red - लाल read - वाचले ( read चे भूतकाळी रूप) raid - अचानक केलेला हल्ला 86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे 87) ball - चेंडू bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे 88) team - संघ teem - मुसळधार पाऊस कोसळणे 89) check - तपासणे, ताबा, अडथळा cheque - धनादेश, चेक 90) pen - लेखणी , खुराडे pain - दु:ख, वेदना pane - काचेचे तावदान 91) not - नाही knot - गाठ 92) naughty - खोडकर knotty - अवघड, गहन 93) miner - खाणकामगार minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा 94) vacation - सुट्टी vocation - व्यवसाय 95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख plain - मैदान, सपाट पृष्ठभाग 96) date - तारीख , खजूर debt - (डेट) - कर्ज,ॠण 97) wine - दारू, मद्य vine - द्राक्षांचे वेल 98) site - खुली जागा, स्थळ sight - दृष्टी 99)mill - चक्की, गिरणी meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण 100 ) well - विहीर wail - आक्रोश wale - चाबकाचा, छडीचा वळ 101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त दिलेली मेजवाणी, विवाहोत्सव bridle - ब्राईडल - घोड्याचा लगाम 102) price - प्राईस - किंमत prize - प्राईझ - बक्षिस 103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या टोकाचा भाग tow - टो - साखळीने ओढणे 104)rest - रेस्ट - आराम wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे 105)men - मेन - माणसे main - मेन - मुख्य mane - मेन - आयाळ, मानेवरील केस 106) desert - वाळवंट, ओसाड प्रदेश dessert - जेवणानंतरचा फलाहार, मिष्टान्न 107) counsel - उपदेश, सल्ला council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ 108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका coarse - जाडेभरडे 109) duel - द्वंद्वयुद्ध dual - दुहेरी, संयुक्त 110) bell - बेल, घंटा belle - सुंदर तरूणी bale - गठ्ठा bail - जामीन, क्रिकेट खेळातील स्टंपवरील बेल 111) grin - दात काढून हसणे, दात विचकणे green - हिरवा 112) shed - छप्पर shade - सावली, छाया 113) illegible - वाचण्यास अवघड eligible - पात्र, लायक 114) canon - चर्चने केलेला कायदा cannon - तोफ (जुन्या प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे 115) corps - लष्करी तुकडी corpse - प्रेत 116) hart - हार्ट - हरण( नर) heart - हार्ट - हृदय hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा 117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा कारखान्यातील कर्मचारी वर्ग 118) fever - फिव्हर - ताप, ज्वर favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव 119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान 120)physic - फिझिक - औषध physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी 121)umpire - अम्पायर - पंच empire - एम्पायर - साम्राज्य 122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी 123) am - आहे yam - रताळे 124) don - सभ्य गृहस्थ dawn - पहाट 125) role - रोल - भूमिका roll - रोल - गुंडाळणे 126) pip - पिप - संत्री मौसंबी सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची ठिपका, फाशांवरील ठिपका peep - पीप - डोकावून पाहणे 127) nice - नाईस - छान niece - नीस - भाची , पुतणी 128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील केस fir - फर - देवदार वृक्ष 129) hill - हिल - टेकडी heel - हील - टाच heal - हील - जखम भरून आणणे, रोगमुक्त करणे 130) be - बी - असणे , होणे, घडणे bee - बी - मधमाशी 131) eight - एट - आठ ate - एट- खाल्ले ( eat चे भूतकाळी रूप) yet - येट - अद्यापपर्यंत 132) each - ईच - प्रत्येक itch - इच - खाज, खरूज etch - एच - कोरणे 133) fist - फिस्ट - मूठ feast - फीस्ट - मेजवाणी 134) pull - पुल - ओढणे, खेचणे pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह 135) sick - सिक - आजारी seek - सीक - शोधणे, सापडविणे 136) which - विच - कोणता? कोणती? कोणते? witch - विच - चेटकीण, जादुगारीण 137) met - मेट - भेटला mate - मेट - मित्र, सोबती, मात करणे 138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे.

*English उच्चारसाधर्म्य शब्द •●--- Homophones* 1) fair - यात्रा, गोरा, fare - भाडे 2) week - आठवडा, wick - बत्ती , काकडा , weak - अशक्त 3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी sell - विकणे sail - तरंगत जाणे 4) celler - तळघर seller -विक्रेता 5) once - एकदा one's - एखाद्याचा 6) sit - बसणे seat - आसन 7) wet - ओला weight - वजन wait - वाट पाहणे 8) test - चाचणी taste - चव 9) roe - मृगी , हरिणी ( मादी) row - रांग , ओळ।, वल्हवणे raw - कच्चा 10) feet - पाऊले fit - योग्य feat - पराक्रम , योग्यता 11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप) throne - सिंहासन 12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप) hailed - जयजयकार केला 13) career - व्यवसाय carrier - वाहून नेणे 14) our - आमचा, आमची , आमचे hour ( अवर) तास 15) bare - उघडा bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट bear - अस्वल , सहन करणे 16) road - रस्ता rod - गज, दांडा rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ) 17)meat - मटण meet - भेटणे 18)leave - सोडणे live - राहणे 19)piece - तुकडा peace - शांतता 20)hail - गारा, अभिवादन hale - तगडा, स्वस्थ hell - नरक 21) principle - तत्त्व principal - प्राचार्य 22) manager - व्यवस्थापक manger - गव्हाण , गोठा 23) letter - पत्र, अक्षर later - नंतर 24) dip -बुडविणे, बुडणे deep - खोल 25) quite - अगदी, जोरदार quiet - शांत quiot - लोखंडी कडी 26) deed - कृत्य did - केले 27) expect - अपेक्षा करणे aspect - पैलू, स्वरूप 28) feel - वाटणे, स्पर्श करणे fill - भरणे 29) floor - जमीन flour- पीठ flower - फूल 30)waste - रद्दी, वाया गेलेले waist - कमर , कंबर west - पश्चिम vest - बनियन 31) fell - पडणे fail - नापास 32) story - गोष्ट storey- मजला 33) slip - घसरणे sleep - झोपणे 34)in - आत, मध्ये inn - खानावळ yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे 35) whole - संपूर्ण hole - छिद्र vole - उंदराच्या जातीचा प्राणी 36)hit - टोला मारणे heat - उष्णता 37) of - चा, ची चे off - बंद करणे 38) self - स्वत:चा shelf - मांडणी , फडताळ 39) sheep - मेंढी ship - जहाज sheaf - गवताची पेंढी 40) beat - मारणे , पराभूत होणे bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप) beet - चुकंदर a bit - थोडेसे 41) wander - भटकणे wonder - आश्चर्य 42) rich - श्रीमंत reach - पोहचणे 43) deed - कृत्य did - केले 44) so - म्हणून, इतका, तर, sow - पेरणे saw - पाहिला, करवत 45) rain - पाऊस reign - शासन , राज्य rein - लगाम wren - रेन पक्षी ( युरोप) 46) lives - राहतो leaves - पाने, सोडून जातो 47) liver - यकृत lever - तरफ 48) tent - तंबू taint - कलंक , दोष 49) wedge - पाचर, wage -पगार, वेतन, खंड 50 ) neat - व्यवस्थित nit - लीख knit - विणणे 51) list - यादी least - कमीत कमी, किमान 52) horde - भटकी जमात hoard - साठा करणे , 53) jealous - मत्सरी zealous - उत्साही 54) metal - धातू , रूळ mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती 55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने too - सुद्धा two- दोन 56) lip - ओठ leap - उडी मारणे 57) sun - सूर्य son - पुत्र, मुलगा 58) pray - प्रार्थना prey - भक्ष्य 59) dear - आदरणीय, प्रिय deer - हरिण 60) root - मूळ route - मार्ग 61)full - पूर्ण भरलेला fool - मूर्ख 62) sum - रक्कम , बेरीज some - काही , थोडे 63) lesson - धडा , पाठ lessen - कमी करणे 64) night - रात्र knight - सरदार 65) sin - पाप seen - पाहीले scene - दृश्य, देखावा 66) gate - फाटक get - मिळणे, मिळवणे gait - चाल ( चालण्याची पद्धत) 67) male - पुरूष mail - टपाल, कवच 68) higher - अधिक उंच hire - हप्ता , भाड्याने घेणे 69) let - परवानगी देणे late - उशीर 70) tell - सांगणे tale - गोष्ट tail - शेपूट 71) new - नवा knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप) 72) bore - छिद्र करणे boar - रानडुक्कर 73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष voice - आवाज , प्रयोग 74) thirst - तहान thrust - खुपसणे 75) steel - पोलाद steal - चोरणे still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध 76) addition - वाढ, बेरीज edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप 77) chick - पक्ष्याचे पिल्लू cheek - गाल 78) it - तो, ती ते eat - खाणे 79) stationery - लेखन साहित्य stationary - स्थिर , न हलणारा 80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक, घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत teak - सागवाणी लाकूड, साग tic - स्नायू आखडणे

81) forth - पुढे, बाहेर fourth - चौथा 82) ear - कान , धान्याचे कणीस year - वर्ष 83) air - हवा heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी 84) yes - होय ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात 85) red - लाल read - वाचले ( read चे भूतकाळी रूप) raid - अचानक केलेला हल्ला 86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे 87) ball - चेंडू bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे 88) team - संघ teem - मुसळधार पाऊस कोसळणे 89) check - तपासणे, ताबा, अडथळा cheque - धनादेश, चेक 90) pen - लेखणी , खुराडे pain - दु:ख, वेदना pane - काचेचे तावदान 91) not - नाही knot - गाठ 92) naughty - खोडकर knotty - अवघड, गहन 93) miner - खाणकामगार minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा 94) vacation - सुट्टी vocation - व्यवसाय 95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख plain - मैदान, सपाट पृष्ठभाग 96) date - तारीख , खजूर debt - (डेट) - कर्ज,ॠण 97) wine - दारू, मद्य vine - द्राक्षांचे वेल 98) site - खुली जागा, स्थळ sight - दृष्टी 99)mill - चक्की, गिरणी meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण 100 ) well - विहीर wail - आक्रोश wale - चाबकाचा, छडीचा वळ 101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त दिलेली मेजवाणी, विवाहोत्सव bridle - ब्राईडल - घोड्याचा लगाम 102) price - प्राईस - किंमत prize - प्राईझ - बक्षिस 103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या टोकाचा भाग tow - टो - साखळीने ओढणे 104)rest - रेस्ट - आराम wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे 105)men - मेन - माणसे main - मेन - मुख्य mane - मेन - आयाळ, मानेवरील केस 106) desert - वाळवंट, ओसाड प्रदेश dessert - जेवणानंतरचा फलाहार, मिष्टान्न 107) counsel - उपदेश, सल्ला council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ 108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका coarse - जाडेभरडे 109) duel - द्वंद्वयुद्ध dual - दुहेरी, संयुक्त 110) bell - बेल, घंटा belle - सुंदर तरूणी bale - गठ्ठा bail - जामीन, क्रिकेट खेळातील स्टंपवरील बेल 111) grin - दात काढून हसणे, दात विचकणे green - हिरवा 112) shed - छप्पर shade - सावली, छाया 113) illegible - वाचण्यास अवघड eligible - पात्र, लायक 114) canon - चर्चने केलेला कायदा cannon - तोफ (जुन्या प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे 115) corps - लष्करी तुकडी corpse - प्रेत 116) hart - हार्ट - हरण( नर) heart - हार्ट - हृदय hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा 117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा कारखान्यातील कर्मचारी वर्ग 118) fever - फिव्हर - ताप, ज्वर favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव 119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान 120)physic - फिझिक - औषध physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी 121)umpire - अम्पायर - पंच empire - एम्पायर - साम्राज्य 122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी 123) am - आहे yam - रताळे 124) don - सभ्य गृहस्थ dawn - पहाट 125) role - रोल - भूमिका roll - रोल - गुंडाळणे 126) pip - पिप - संत्री मौसंबी सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची ठिपका, फाशांवरील ठिपका peep - पीप - डोकावून पाहणे 127) nice - नाईस - छान niece - नीस - भाची , पुतणी 128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील केस fir - फर - देवदार वृक्ष 129) hill - हिल - टेकडी heel - हील - टाच heal - हील - जखम भरून आणणे, रोगमुक्त करणे 130) be - बी - असणे , होणे, घडणे bee - बी - मधमाशी 131) eight - एट - आठ ate - एट- खाल्ले ( eat चे भूतकाळी रूप) yet - येट - अद्यापपर्यंत 132) each - ईच - प्रत्येक itch - इच - खाज, खरूज etch - एच - कोरणे 133) fist - फिस्ट - मूठ feast - फीस्ट - मेजवाणी 134) pull - पुल - ओढणे, खेचणे pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह 135) sick - सिक - आजारी seek - सीक - शोधणे, सापडविणे 136) which - विच - कोणता? कोणती? कोणते? witch - विच - चेटकीण, जादुगारीण 137) met - मेट - भेटला mate - मेट - मित्र, सोबती, मात करणे 138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर. २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर. २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म.  १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.  २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *विकासासाठी महिला सशक्तीकरण आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नाह्युल पेरेझ बिस्कियार्ट याला मिळाला बेस्ट एक्टरचा इफ्फी पुरस्कार, 120 बीपीएम सिनेमातल्या अभिनयासाठी मिळाला पुरस्कार* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे नवे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक* ----------------------------------------------------- 4⃣ *समाजसेवक अण्णा हजारे 23 मार्चपासून मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार सुरु* ----------------------------------------------------- 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते झालं हैदराबाद मेट्रोचं उद्धाटन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा दुसऱ्या स्थानी तर कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========            *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *गोपीनाथ गणेश तळवलकर* गोपीनाथ गणेश तळवलकर  (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्‍या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  पिनकोडचे विस्तारीत रूप काय आहे?* 👉      postal Index Number *२)  पिनकोडमध्ये किती अंक असतात?* 👉      ६ *३)  भारतात पिनकोड कधीपासून सुरू झाला?* 👉      १५ ऑगस्ट १९७२ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईनाथ बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *डोक्यातला किडा* कोणा कोणाच्या डोक्यात वळवळता किडा असतो सर्वांच्या विचारा पेक्षा त्याचा विचार बडा असतो घाई गडबडीत तो त्याचा निर्णय घेतो घाईत निर्णय घेऊन तो परेशान होतो   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात!  नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.*             ‼ *रामकृष्णहरी* ‼    🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸🌸      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची  जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.*    संवाद..९४२१८३९५९०/              ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= ☀☀ सर्व श्रेष्ठ बळी ☀☀ सर्व श्रेष्ठ आहे जगी बळराजाचा हा मान । चाढ्यावर मूठ सदा काढी मातीतून सोन।।      कष्ट हे आयुष्य भर      समीकरण हेत्याचे ।      राब राबून शिवारी      जगन्याला वेचायचे ।। कीरती बळीराजाची आहे जगात चौफेर  । जगने फक्त जनासाठी प्रामाणिक तो विचार  ।।       चढ ऊतार हे जीवनी       येतात हे कधी कधी  ।       मात्र बळी राजाचीअसते       हमेशा मंदीत गाधी  ।। विचाराचे ते वादळ घोंगावत राही सदा । बळी फक्त सोशीतसे कधी सँल होईल ?मूद्दा ।।       आसा माझा बळी त्याला       राजा म्हणतात सगळे  ।       मासा नाही गावला तर       ऊडून जातात हे बगळे ।। ✍ सुभाष पांचाळ, परभणी...       9822431457 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                      *वात्सल्य* एकदा देवांनी जाहीर केले की, सा-या पशूंमध्ये ज्याचे मूल सर्वात सुंदर दिसेल त्याला एक मोठे बक्षिस मिळेल. ही सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपापल्या मुलांना घेऊन प्रतियोगितेंच्या ठिकाणी हजर झाले. त्यातच एक माकडीण होती. तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू झुलवत होती. नकटया, चपटया नाकाचे, अंगावर केस असलेले ते पिलू मजेशीर दिसत होते. डोक्याचा कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशु खदखदा हसू लागले. माकडिणीला जाणवत होते की तिची टर उडवित आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले आणि ती म्हणाली, 'सुंदरपणाचे बक्षिस देवांनी हवे त्याला द्यावे. पण मला मात्र माझे मूलच सर्वात सुंदर दिसते आणि तेच माझे सर्वात मोठे बक्षिस आहे...' तात्पर्य -  आपले मूल कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून टाकते.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले. १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर. 💥 जन्म :- १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :-  १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. १९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबईच्या प्रवाशांसाठी नाताळचे गिफ्ट, 25 डिसेंबरपासून सुरु होणा एसी लोकल - रेल्वेमंत्री पीयूष गोयल* ----------------------------------------------------- 3⃣ *जालना शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम. शहरातील १०९ ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम.* ----------------------------------------------------- 4⃣ *गडचिरोली - घनदाट जंगलात फसलेल्या 60 जवानांना बाहेर काढण्यात सी-60 कमांडोंना यश.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण. आज कांद्याला जास्तीत जास्त 3380 रूपये भाव.* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स यंदाची मिस युनिव्हर्स.* ----------------------------------------------------- 7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर एक डाव 239 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत भारताची 1-0 आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले* भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सेनापती बापट* पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ.स. १८८० - नोव्हेंबर २८, इ.स. १९६७) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक  होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी.ए. पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. अहमदनगरला मॅटिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना बी.ए. परीक्षेत इ.स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून त इंग्लंडला गेले एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे मूळ गाव हे  अहमदनगर  जिल्ह्यातील  पारनेर हे आहे.  पारनेर  तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत . या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे या मार्गाची सध्या पडझड झाली आहे त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली?* 👉 १५ ऑगस्ट १९६९ *२) इस्त्रोचे मुख्य कार्यालय कुठे आहे?* 👉 बंगळूरू *३) यासाठी कुठे अवकाशतळ कार्यान्वित केले?* 👉 श्रीहरीकोटा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राम चव्हाण, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *खेळी* कोणा कोणाची कुटील खेळी असते त्या खेळीचा कोणी उगीच बळी असते कुटील खेळीत अशा जावो ना कोणी बळी कधी कोणी खेळू नये असली कुटील खेळी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मृत्यू' ही कल्पना अस्वस्थ करणारी असली, तरी अटळ आहे. " जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात" असे गीत रामायणात म्हटले आहे. माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या मृत्यूचाही जन्म होत असतो, हे अटळ सत्य कुणाला दु:ख देणारे, कुणाला भयभीत करणारे, कुणाला अंतर्मुख करणारे असते. मृत्यू अटळ असेलच तरी तो कसा यावा, त्यासाठी आपण काय करावे, कोणते संचित जमा करावे आणि जन्माचे सार्थक करावे याचा विचार मात्र माणूस करू शकतो.* *खुनी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते आणि क्रांतीकारकांनाही फाशीची शिक्षा होते. दोघांचाही फाशीनेच मृत्यू होतो. पण क्रांतीकाराच्या मृत्यूने लाखो अंत:करणे विदीर्ण होतात आणि खुन्याच्या फाशीने विषण्णता आली तरी अनेकांना हायसे वाटते. याबाबतीत दोन पोपटांची गोष्ट बोलकी आहे. पहिला पोपट अपचन होऊन पोट फुगून मरण पावला, तर दुसरा पोपट मोकळा श्वास घेण्यासाठी उपाशीपोटी लढत राहिला अन् तोही मरण पावला. एकाच्या मृत्यूने विषाद निर्माण केला तर दुस-याच्या मृत्यूने बघणा-यांच्या मनात निषादस्वर उमटले. " विषाद आणि निषाद यातला कोणता मृत्यू चांगला ?"* ••●🛡‼ *रामकृष्णहरी* ‼🛡●•• ❤❤❤❤❤❤ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते. तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही. अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहो भाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *।।सुविचार।।* अल्पसंतूष्ट सदा सुखी हाव करी तो होई दु:खी। जे मिळाले गोड मानावे पळत्या पाठी न धावावे। कुणाशी न करावी तुलना स्वत:चीच होते अवहेलना। जन्मास आलो मी दिगंबर परमार्थास नका देऊ अंतर। व्यर्थ हव्यास करू नये तो नशीबास दोष देवू नये तो। जे मिळाले ते दिले रामाने अर्पिले रामास सारे प्रेमाने। वडिलधाऱ्यांची करू सेवा प्रपंचात करू नये हेवा। हाच असे मंत्र जगण्याचा ठेवा जपून साठा सुविचारांचा। सौ.मनिषा वाणी, सुरत ०९४२६८१०१०९. =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📚📚📚📚📚📚📚 *✍आज दि.२७/११/२०१७* रोजी जि.प.प्राथ. शाळा वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 📚📚📚📚📚📚📚 यानिमित्ताने प्रथमतः डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.मु.अ.श्री चव्हाण सर , 🔸 विद्यार्थी व शिक्षक यांनी केले. 💐💐💐💐 त्यानंतर स.शि.श्री चव्हाण सरांनी ,श्री रामटेके सरांनी संविधानाविषयी माहिती सांगितली. 🔸श्रीमती सेनकुडे मँडम यांनी संविधान दिनाचा घोषणा, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विशद केला व वैशिष्ट्ये सांगितले. 🔸श्रीमती लोने ,काकडे मँडम , यांनी संविधान याबाबत मार्गदर्शन केले. 📚📚📚📚📚 *सर्व विद्यार्थी ,शिक्षक,अंगणवाडीताई यांनी एकञितपणे संविधानाचे वाचन केले.* ➖➖➖➖➖➖➖ *✍शब्दांकन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 🙏🙏🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला. 💥 जन्म :- १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म. १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आता शेतक-यांनाही समजलं आहे की पिकाची चिंता करायची असल्यास धरतीमातेची काळजी घ्यावी लागेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *आर्थिकदृष्टया सक्षम असतानाही आरक्षण मागणे ही माझ्या मते लाचारी आहे- सुशीलकुमार शिंदे* ----------------------------------------------------- 3⃣ *भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, देशातील बँकिंग सेवा सर्वांसाठी आहे. इस्लामिक बँक आणण्याचा कोणताही प्लान नाही- मुख्यात अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अभूतपूर्व गोंधळ* ----------------------------------------------------- 5⃣ *जकार्ता : इंडोनेशियामधील बाली बेटावरील एगंग पर्वतामधील ज्वालामुखीच्या हालचाली तीव्र वाढल्या असून, केव्हाही उद्रेकाची शक्यता रविवारी वर्तविण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणेः मेट्रो रेल्वे स्टेशनच्या उभारण्यासाठी शिवाजीनगर येथील धान्य गोदामे आणि पुरवठा विभागाची पाच कार्यालये येत्या आठ दिवसांत हलवण्यात येणार* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर कसोटी - तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची धावसंख्या एक बाद 21, भारताकडे 384 धावांची आघाडी,  रोहत शर्माचे दमदार शतक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - सुंदर* त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं.  परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे.  कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गणेश वासुदेव मावळणकर* गणेश वासुदेव मावळणकर (जन्म २७ नोव्हेंबर १८८८ रोजी बडोदा येथे झाला असून मृत्यू २७ फेब्रुवारी १९५६ रोजी ) अहमदाबादहे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधूनलोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटीश भारतातील मुंबईप्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे वैमानिक कोण?* 👉 अमोल यादव *२) देशात ४८वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे पार पडणार आहे?* 👉 दिल्ली *३) मृत्यूंजय कादंबरीचे लेखक कोण आहेत?* 👉 शिवाजी सावंत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गायत्री सोनाजे, साहित्यिक 👤 राहुल कुमार 👤 पंकज सेठिया 👤 ओंकार बच्चुवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वाभिमान* लाथ मारून काही स्वतःहून चूकतात ज्याच्या पुढे नाही त्याच्या पुढे झुकतात लाथ लागू दिली नाही तर झुकायची गरज काय स्वाभिमानाने जगायचे तर जपून टाकावा पाय शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एप्रिल महिन्याच्या मध्यातून सूर्याच्या तापण्याला गती प्राप्त होते नि बघता बघता वैशाखात तो रौद्र रूप धारण करतो. मानवी जीवनच नाही तर प्राणी, पक्षी एकूणच सर्व जीवसृष्टी त्याच्या प्रखरतेने कासावीस होते. होरपळून निघणा-या वसुंधरेला मृगधारांचा ध्यास लागतो. सागाची गळलेली पानं, करपलेली धरा, वाळलेली झुडपं....मनाला एक प्रकारची विषण्णता देऊन जातात. दाहीदिशांनी अंगावर येणारा हा आगडोंब झेलीत जीवसृष्टी आपलं अस्तित्व वाचविण्याचा प्रयास करीत असते.* *भाजून निघालेली वनश्री एखाद्या पावसाच्या शिडकाव्यानं शांत होत नाही तोच अचानक पेटलेला वणवा तिला कवेत घेतो. तो विझवताना मानवी सामर्थ्य किती दुबळं आहे याची प्रचीती येते. वातावरणातील दाहकतेपेक्षाही प्रखर अनुभूतीचा हा वैशाखवणवा मनामध्ये चेतवून काळाच्या उदरात संदर्भहीन झालेल्या अनेक गोष्टींचं अस्तित्व भस्मसात होतं, परंतु त्याची आचही आपल्याला लागत नाही न दिसतो पेटलेला वणवा.* *' बुझा सका है भला* *कौन वक्त के शोले* *ये ऐसी आग है जिसमें* *धुंआ नही मिलता...'* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========    जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर, नांदेड*   संवाद.८०८७९१७०६३/९४२१८३९५९०. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= 🌺🌺प्रशंसा🌺🌺 प्रशंसा आवडे ना ऐसा व्यक्ती कोण हो जगात प्रशंसा केल्याविना देव पावतो का हो आम्हास देवादिकाची अभिलाषा तया प्रशंशेची ही आशा आमची जात माणसाची नको वाटे कधी निराशा एक प्रशंसाच खेळ करी नव्या बदलाचा बसे मेळ कधी चांगले कधी वाईट परिणामाची होईच भेळ प्रशंसा करता माणसाची तया आनंद मनी कितीक सारे काही जोशात करतो होई पक्के कामाचे बेशीक करावी प्रशंसा योग्यतेची नको दुराचारी दुष्कर्मची होईल बदल चांगला मग कास धरता सदा सत्याची पांचाळ आर. सी. हिंगोली 8180858079 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *उज्ज्वल भवितव्यासाठी* एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली. त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्‍या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्‍या मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला पैसा फुकट द्यायला !  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/11/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला. १९४९: भारताची घटना मंजूर झाली. १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म.  💥 मृत्यू :-  १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन.  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध, या हल्ल्यात 235 नागरिकांचा झाला मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं मुंबई विमानतळावर करण्यात आलं जल्लोषात स्वागत* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद ः मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी, एम. जी. एम. रुग्णालयात झाले प्रत्यारोपण. शनिवारी शहरात आणखी एक अवयवदान. यकृत, मूत्रपिंड आणि नेत्र दान यशस्वी. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयाच्या टीमने पार पाडली महत्वपूर्ण भूमिका.* ----------------------------------------------------- 4⃣ *भ्रष्टाचार निर्मूलनासाठी भगवत गीतेची शिकवण आवश्यक. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं वक्तव्य.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागनाथआण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १६ कोटी देणार - देवेंद्र फडणवीस.* ----------------------------------------------------- 6⃣ *हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन, भारताच्या पी.व्ही.सिंधू अंतिम फेरीत प्रवेश.* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर- भारत विरूद्ध श्रीलंका दुसरी कसोटी. दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 312 धावा. पहिल्या डावात भारत 107 धावांनी आघाडीवर. मुरली विजय, चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भारतीय संविधान दिवस* देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हर्गीस कुरियन* डॉ. वर्गीस कुरियन (लेखनभेद : व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ ; रोमन लिपी: Verghese Kurien) (नोव्हेंबर २६, इ.स. १९२१; कोळ्हिकोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत - सप्टेंबर ९, इ.स. २०१२; नडियाद, गुजरात, भारत) हे भारतीय अभियंते, उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण(इ.स. १९९९), जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील(वर्तमान भारताच्या  केरळ  राज्यातील) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात नोव्हेंबर २६, इ.स. १९२१ रोजी झाला. वर्गीज कुरियन इ.स. १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्‌सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे !!!* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो?* 👉. २६ नोव्हेंबर *२). भारतीय संविधान अंमलात कधीपासून आले?* 👉. २६ जानेवारी १९५० *३). भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते?* 👉 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन 👤 अर्जुन यनगंटीवार 👤 मुरलीधर हंबर्डे पाटील 👤 संजय बोंटावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलके* हल्लीचे लोक तर फार बोलके आहेत खुप छान बोलतात जसे ढोलके आहेत दोन्ही बाजूने वाजते ते म्हणजे ढोलके शब्द न पाळणारे काय कामाचे बोलके शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही कृती करण्यापूर्वी तुमच्या मनात नकारात्मक विचार कधीही येऊ देऊ नका कारण नकारात्मक विचार हेच तुमच्या चांगल्या करणा-या कृतीमध्ये बाधा आणतात. तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार जागृत करा आणि मन एकाग्रतेने करुन सातत्याने काम करत रहा आणि मग पहा तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते का नाही ते.आपणच आपल्या मनाची तयारी आणि आत्मविश्वास जागृत ठेवला तर कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकते हे निश्चित. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *इटुकला ससा* इटुकला ससा सांगतो कसा रडणे सोडा खुदुखुदु हसा... हास्याचे मोती अनमोल फार हळूहळू खातो गाजर चार... सर्वांना सांगतो हसा पोटभर हास्याचा प्याला प्यावा घोटभर... दुडुदुडु धावतो मोकळ्या रानी हास्यमंत्र सांगे साऱ्यांच्या कानी... प्यारा न्यारा गुबरा ससा सर्वांना देतो हास्याचा वसा... गंभीर होते जंगल सारे सश्याने भरले हसरे वारे... मनिषा कुलकर्णी आष्टीकर परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🙏मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा.*🙏 एक प्रसिद्ध संत होते. त्‍यांच्‍याकडे शिक्षण घेण्‍यासाठी दूरदूरवरून शिष्‍यगण येत असत. त्‍यांच्‍या शिष्‍य परिवारातील दोन शिष्‍य त्‍यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्‍नान करून पूजापाठ करण्‍यात मग्‍न होते. चार तासांच्‍या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा-या रूग्‍णांची सेवा करण्‍यास ते गुरुला मदत करत. त्‍या संतमहात्‍म्‍याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्‍यामुळे स्‍वत: पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना नि:शुल्‍क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्‍त्र, निवारा उपलब्‍ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्‍यांच्‍या उपचारांची व्यवस्‍था करत असत. एकेदिवशी त्‍यांचे दोन्‍ही शिष्‍य त्‍यांच्‍या दीर्घपूजेत व्‍यग्र होते. त्‍याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्‍यादिवशी आश्रमात रुग्‍णांची संख्‍या जास्‍त होती. परंतु दोन्‍ही शिष्‍य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्‍हा निरोप धाडला. त्‍यावर त्‍या दोघांनी नाराजी व्‍यक्‍त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घालू लागले. तेव्‍हा गुरुजींनी त्‍यांना पुढील शब्‍दात मार्गदर्शन केले,''वत्‍सांनो, मी तर व्‍यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्‍यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्‍या बरोबरीची असते. कारण ती नि:स्‍वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्‍या दोन्‍ही शिष्‍यांचे डोळे उघडले. तात्‍पर्य :- ईश्‍वराची जिवंत कलाकृती म्‍हणजे माणूस त्‍याची सेवा म्‍हणजे साक्षात ईश्‍वराची पूजा असते व त्‍या सेवेपेक्षा अन्‍य कोणतीही पूजा ही मोठी नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार 💥 मृत्यू :-  १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिकृत सुत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *इम्मर्सन म्नांगवा होणार झिम्बाब्वेचे नवे राष्ट्रपती, शुक्रवारी घेणार शपथ* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - प्लास्टिक बाटल्या परत घेण्याची व्यवस्था करा, अन्यथा सरसकट बंदी घालणार, राज्य सरकारचा प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आदेश* ----------------------------------------------------- 4⃣ *कर्नाटक विधानसभेने मंजूर केले अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. रमजाण मुलानी यांची निवड.* ----------------------------------------------------- 6⃣ *सोलापूर : विठ्ठल- रूक्मिणी मूर्तीची पुरातत्व विभागाकडून पाहणी केल्यानंतर वज्रलेप करण्याचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *डोंबिवलीत भरणार फुलपाखरांच्या छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन : ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखरे, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html जरूर वाचावे आणि आपले अभिप्राय द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जगदीशचंद्र बोस* पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला.  स्नायू,  मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= काळजी केल्याने उद्याचे दुख: कमी होत नाही , तर आजच्या दिवसाची ताकत कमी होते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन कोणते?* 👉. ॲनिमोमीटर *२). भारतातील कोणते राज्य पर्वताचे राज्य म्हणून ओळखल्या जाते?* 👉. सिक्कीम *३). भारताची उद्यानगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखल्या जाते?* 👉 बंगलोर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जुगलकिशोर बोरकर 👤 सुनील बंडेवार, धर्माबाद 👤 जगन्नाथ भगत 👤 आदित्य खांडरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " शाहू " चोर ते चोर वर शिरजोर आहेत सारं काही करून बिनघोर आहेत चोरी करून ते आम्ही तसे नाही म्हणतात शाहू असल्या सारखे राजरोस बाता हाणतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वप्न पहायला परिश्रम,वेळ आणि पैसा कधीच लागत नाही परंतु पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी वेळ, परिश्रम आणि पैसा हा लागतोच तेव्हा कुठे स्वप्न पूर्ण होतात.केवळ स्वप्नांना कल्पनेत न ठेवता ती प्रत्यक्षात उतरावयाची असतील तर हे तुम्हाला करावेच लागेल.अन्यथा स्वप्न स्वप्नच राहतील. *व्यंकटेश काटकर नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *।। राष्ट्रीय प्रतिके ।।* मोर आपला राष्ट्रीय पक्षी त्याचे पंख किती नक्षीदार पावसाळ्यात नाचतो छान पिसारा फुलवितो डौलदार ।। कमळ आपले राष्ट्रीय फुल चिखल जेथे तिथे उगवतो कुठे पांढरा कुठे रंगीन असा हा प्रत्येकाला फार आवडतो ।। वाघ आहे आपला राष्ट्रीय पशू त्याला बघून होते सर्वांची थरकाप अंगावर आडव्या काळ्या पट्टया डोळ्यात दिसतो त्याच्या संताप ।। राष्ट्रीय फळ आहे आंबा त्याची चवच आहे न्यारी पाहुणे रावळे आले घरी  सरबराई करायला लई भारी ।। तिरंगा आपला राष्ट्रध्वज केसरी, पांढरा आणि हिरवा विविध रंगाचे आकर्षण प्रत्येकाना वाटतो हवाहवा ।। - नागोराव सा. येवतीकर प्राथमिक शिक्षक जि. प.प्रा. शाळा चिरली ता. बिलोली जि. नांदेड 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========  . *यशाचे गमक* महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले. न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/11/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही. १९७६ - तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८७७ - कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर. १९५५ - इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६१ - अरुंधती रॉय, भारतीय लेखक. १९७८ - कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री. 💥 मृत्यू :-  १९६३ - मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री १९६५ - अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह, कुवैतचा अमीर १९९१ - फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार २००९ - समाक सुंदरावेज, थायलंडचा पंतप्रधान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - चेकबुक बंद करण्याचा कोणताही विचार नाही : अर्थ मंत्रालय* ----------------------------------------------------- 2⃣ *सरकारने माजी केंद्रीय अर्थसचिव विजय केळकर यांची समिती नेमावी. या समितीने जीएसटी समितीशी संवाद साधून कररचनेत बदल करावेतः यशवंत सिन्हा* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे : गुतंवणूकदारांचे पैसे परत करण्याची डी. एस. कुलकर्णी यांना एका आठवड्याची मुदत.* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबादः सरकारी कार्यालयात प्लास्टिक बंद करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांचे आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन दिले आदेश.* ----------------------------------------------------- 5⃣ *गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी, राष्ट्रवादी 8 ते 9 जागा लढवणार* ----------------------------------------------------- 6⃣ *पद्मावती 1 डिसेंबरला यूकेमध्ये होणार प्रदर्शित, ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनचा पद्मावती चित्रपटाला हिरवा कंदिल.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताची युवा टेनिसपटू अंकिता रैनाने मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुंधती रॉय* अरुंधती रॉय ( जन्म: २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात ) या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे. अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, मेघालययेथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत. दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?* 👉 राजा राममोहन रॉय *२) तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली?* 👉 देवेंद्रनाथ टागोर *३) परमहंस सभेची स्थापना कोणी केली?* 👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 खंडू मोरे, सहशिक्षक, नाशिक 👤 विक्रम कदम 👤 पंडित नालावडे 👤 व्ही. के. पाटील 👤 चरण इंदूर 👤 नागेश सब्बनवार, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" ताठा "* ताठा असलेले लोक कधीच वाकतं नाहीत स्वतः च काम असलं तरी ही झुकतं नाहीत ताठरपणाने त्यांची होत असते तणतण तणतण करून त्यांच नसते समाधानी मन शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस जाणतो की तो स्वार्थधुंदीत असत्याचा प्रयोग करीत आहे; पण सुखकर जगण्याच्या नादात त्याला अंतर्मनाविरूद्ध व्यवहार करावे लागतात. म्हणूनच आजही आपण पहातोच की जो 'नंबर दोन'चे धंदे करतो त्याच्याकडे संपत्ती-सुखे नांदताना दिसतात. आणि जो सत्य घेऊन बसला तो जागोजागी निराश, हताश होत दु:ख भोगताना दिसतो. कालपरवापर्यंत सामान्य जीवन जगणारा माणूस राजकारणात सत्तापदी पोहचताच पाहता-पाहता तो संपत्तीच्या राशीवर लोळताना दिसतो. मग 'सत्यमेव जयते'चे काय? सत्याचाच विजय होतो हे माणूस जाणत असूनही तो असत्याचा कैवारी का होतो? का होतोच नव्हे, तर होत आला, होत आहे आणि होत राहील.* *माणूस असा का वागतो? चोरी, भ्रष्टाचार ही पापकृत्य माहित असूनही तो का अंगीकारतो? त्याचे बाह्यमन अंतर्मनापासून अंतर ठेवून वागत असते तेव्हा ते बेडर आणि बेपर्वा झालेले असते. तेव्हा माणूस अपकृत्यात यशस्वी होणे ही अक्कलहुशारी समजून असत्याच्या नरकातील राज्यपद भोगत जातो. पण एक क्षण केव्हातरी त्याच्या जीवनात असा येतो की तो आपली असत्य कार्ये आपल्या अंतर्मनाजवळ मान्य करतो. कबुलीजबाब देतो. पश्चातापदग्ध होतो. परंतु काही लोक मरेपर्यंत अंतर्मनाशी संवाद करू शकत नाहीत. अशांना त्यांच्या पापकृत्यांची तमा नसेल तर त्यांचे अंतर्मनही मुक्ती मिळू देत नाही. कारण मुक्तीचा मार्ग हा अंतर्मनातून जातो.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे,चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चार अर्थपूर्ण वाक्य एकत्र आली की,सुंदर अर्थपूर्ण रचना किंवा परिच्छेद तयार होतो.अर्थात एक वाक्य दुस-यावर आधारीत असते त्यामुळेच एकमेकांचा एकमेकांशी सुसंगत अर्थ जुळतो. त्याचप्रमाणे चार माणसे एकत्र आली आणि एखाद्या चांगल्या आणि विधायक विषयावर चर्चा घडवून आणली तर एकमेकांचा जीवनव्यवहारही व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतो.म्हणून माणसाने एकत्र येऊन विचार विनिमय केल्यास जीवनविषयक असणारे प्रश्नही सहज सुलभतेने सोडविण्यासाठी मदत होईल.त्यासाठी माणसाने एकत्रीत येण्याची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्ह्याची बंडी...* एकदा काय झालं कोल्ह्याला भरली थंडी करकोच्यास तो म्हणाला शिवून दे बंडी कपडा काप करकर पाय हलव झरझर कर हिशोबही लगेच पैसे देतो भरभर बिचारा तो करकोचा शिवली त्याने बंडी मऊमऊ मस्त होती पळाली कोल्ह्याची थंडी शिलाई कधी देता सांगा हो कोल्हेभाऊ किती दिवस टिकते आधी ते पाहू दिवसामागे दिवस गेले शिलाई मिळाली नाही करकोचा मात्र आशेने उगीच वाट पाही फाटकी बंडी घेऊन कोल्हा आला घरी म्हणाला मोठ्या दिमाखात बंडीपेक्षा थंडीच बरी... मनिषा कुलकर्णी आष्टीकर परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार. 💥 जन्म :- १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता. १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार. १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी. 💥 मृत्यू :-  १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस. १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्लस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावर 5 लाख रुपयांचे बक्षीस देणार - पर्यावरण मंत्री रामदास कदम* ----------------------------------------------------- 2⃣ *इजिप्तमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याचे वृत्त असून या हल्ल्यात 75 जण जखमी झाले आहेत* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेत नव्याने १००६ शेतक-यांचा समावेश, यापूर्वी ४१५८ शेतक-यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणेः पुढील दोन दिवस थंडी वाढणारः हवामान खात्याचा अंदाज.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - पेट्रोलचे दर थोडे कमी करा - केन्द्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचे गिरीश बापट यांना आवाहन.* ----------------------------------------------------- 6⃣ *सावंतवाडी : केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष मंत्रालय देशात शंभर योग सेंटर उभारणार. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार - केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती.* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात श्रीलंकेच्या सर्वबाद 205 धावा. अश्विनचे चार बळी तर भारत 1 बाद 8 धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशवंतराव चव्हाण* यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे  संरक्षणमंत्री सुध्दा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. पंचायत राजची सुरुवात त्यांनी केली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल - कर्मवीर भाऊराव पाटील *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सिध्देश्वर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 पूर्णा नदी *२) येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 येलदरी *३) इसापूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 पैनगंगा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी सर्व शिक्षा अभियान, नांदेड 👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद 👤 शिवाजी पाटील कदम 👤 अंकुश बल्लेवार 👤 नरसिंग येनद्रालवार 👤 शिवलिंग गंटोड 👤 महेश मुधोळकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " अडथळे " आपल्याच माणसां कडून कामात अडथळे असतात आपूलकी मिळवण्यासाठी पुन्हा तेच गळे काढतात लक्षात येत नाही नेमकं अडथळा आणतं कोण चालू माणसांना असतात गाडूळां सारखे तोंड दोन शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानी राहून अंध:कारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन प्रकाशमय जीवन जगणे हे केव्हाही चांगलेच आहे. शिक्षणामुळे जीवनाला जगण्याची नवी दिशा मिळते.आपल्यातला अज्ञानपणा, मनातली भीती नष्ट होऊन नव्या उमेदीने, नवचैतन्याने आपले जीवन योग्य दिशेने जगता येते. तसेच आपल्या मनातल्या आकांक्षांना योग्य आकार देण्यासाठी शिक्षणासारखे आश्रय दुसरे माध्यम नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अक्षरप्रकाश* उदार अंतकरणाने टाकावी पुस्तक कचराकुंडीत अन् लेखण्या भाजीमंडईत कचरा गोळा करणारे शिकावेत म्हणुन -- ज्ञानाची ज्योत घेवून जाव झोपडपट्टीत फुल्यांची सावित्री बनुन ज्ञानाचा झरा मिळाल्याचा आनंद , सर्वांच्या डोळ्यातुन सांडावा-- मानेवरचं जोखड फेकुन मानवी हक्कासाठी भांडावा -- मातीनं घ्यावा जातीचा सुड रुजलेली गुलामगिरी संपावी ओढावेत शब्दाचे आसुड-- अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या पावलांनी प्रकाशाकडे अन् विकासाकडे करावी वाटचाल-- पाझराव्या लेखण्या,अन् कोरे कागद व्हावे मालामालं ! स्वाती बंगाळे 8855908074 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एकीचे बळ* एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

गरूडभरारी म्हणजे काय ? (अतिशय सुंदर विचार) गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं. पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर. त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात. आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो. स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते. ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे. परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे. 🎭 *"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .

संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन. १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. 💥 जन्म :- १९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म. १९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म. १९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *संयुक्त राष्ट्रात भारताचा मोठा विजय, दलवीर भंडारींना मिळाली 183 मतं.आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड* ----------------------------------------------------- 2⃣ *झिम्बाव्बेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांनी दिला राजीनामा.* ----------------------------------------------------- 3⃣ *डोंबिवली - आगरी कोळी महोत्सवाला रिंगण सोहळ्याने सुरुवात, डोंबिवलीला प्राप्त झाले प्रति पंढरपूरचे स्वरूप, डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचे रिंगण.* ----------------------------------------------------- 4⃣ *जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे लक्ष्मण पाटील विजयी. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटाचे उमेदवार प्रभाकर पवार यांचा पराभव.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुण्यात कंत्राटी बसचालकाचा संप, पीएमपीएमएलच्या 200 बसेस बंद.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : नवोदित शरीरसौष्ठवपटूंचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेचा थरार २४ नोव्हेंबरला लालबागमधील गणेशगल्ली येथे रंगणार, सुमारे २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत नोंदवला सहभाग*  ----------------------------------------------------- 7⃣ *चेन्नई : प्रदीर्घ कालावधीपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघत होतो, पण भारतीय कसोटी संघात स्थान मिळणे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरने व्यक्त केली* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर .................. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बोरिस बेकर* बोरीस बेकर 1990 के दशक के एक प्रमुख टेनिस खिलाड़ी थे। जर्मनी में जन्मे बेकर ने टेनिस जगत की चार सबसे बड़ी सालाना स्पर्धाओं (ग्रैंड स्लेम) में कुल 6 विजय प्राप्त की और अपने करिअर में कुल 49 प्रतियोगिताओं का फाइनल जीता। बेकर ने अपना पहला विंबलडन ख़िताब 1985 में 17 वर्ष की उम्र में जीता और इस तरह ये ख़िताब जीतने वाले वे सबसे युवा खिलाड़ी बने। बेकर का जन्म जर्मनी के लीमेन नमक गाँव में हुआ था। उसका माता का नाम लेिदय और उसका पिता का नाम रोबर्ट आंद्रेज मायेर है. वह उनके एकलौता पुत्र था। उसके मां और बाप कैथोलिक थे और उसे बी कैथोलिक धर्म के रूप से पाला था। उनके पिता एक आर्किटेक्ट थे और उसके पिता ने बलं-वेइस टेंनिस्कलुब टेनिस सेंटर बनाया था जहा पे बेकेर ने टेनिस खेल क़ो सीखा था।उन्होंने आठ वर्ष के उम्र से खेलना शुरू किया था। उन्होंने अपनी पढ़ाई दसवी कक्षा तक करके छोड़ दिया और वेस्ट जर्मन टेनिस फेडरेशन मै प्रशिक्षण लिया .  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा व्यक्ती शोधत असाल, तर स्वतःला आरशापुढे उभे करा तुम्हाला व्यक्ती शोधण्याची गरजच पडणार नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली?* 👉 २४ आक्टोबर १९४५ *२) संयुक्त राष्ट्र संघाचे किती सदस्य देश आहेत?* 👉 १९३ *३) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे?* 👉 न्यूयॉर्क(अमेरिका) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरुण पवार, सहशिक्षक 👤 पांडुरंग पुठ्ठेवाड, संपादक 👤 श्रीकृष्ण निहाळ, सहशिक्षक 👤 साईप्रसाद यनगंदेवार, सहशिक्षक 👤 मधू कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ======== *" शहाणे "* कधी कधी मुद्दाम वाद निर्माण करतात वाद निर्माण करून स्वतःचा गल्ला भरतात अशा पध्दतीनेही काही स्वतःचे गल्ले भरतात गल्ले भरणारेच आज इथे शहाणे ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं, हास्यविनोद करणं, भांडण करणं, रडणं, ओरडणं या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते, पण कधी कधी शब्दांपेक्षा शरीरभाषा तुलनेने आधिक प्रभावी ठरत असते. त्यातून 'शब्दांविण संवादु' या उक्तीप्रमाणे 'ये ह्रदयीचे ते ह्रदयी' भाव पोचवणं सहज साध्य होत असतं. या 'देहबोली'वरून समोरच्याच्या मनातील भावना समजून घेता येतात.* *अबोलपणे व्यक्त होणा-या देहबोलीत अनेक संकेत व संदेश दडलेले असतात. देहबोलीवरून समजून घेणं म्हणजे 'मनकवडा' असणं. समोरच्याची देहबोली ओळखून कोणाशी संबंध वाढवायचे व कोणाशी मर्यादित ठेवायचे हे ठरवता येते, सावध होता येते. ही देहबोली आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद साधता यायला हवा, निरीक्षण वाढवायला हवं. अनुभवाच्या आणि सरावाच्या कसोटीवर आपण समोरच्याची 'देहबोली' नक्कीच ऐकू व समजू शकू.* ~~‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼~~ ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते.ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही.उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही.जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधानी वृत्ती* एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी आजी राहते. त्या आजीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.' दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व आजीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' आजीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी आजीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.  थोडक्यात समाधानी वृत्ती ठेवून माणसाने आपले जीवन आनंदाने जगावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹👭सहल👭🌹* *〰〰〰〰〰〰〰* http://pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *आज दि.२१/११/२०१७ रोजी माझा जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. येथील शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट* 👉 ( *केदारनाथ* ) येथे आयोजित केली होती. 🍀🍀🌼🍀🍀🌼🌼🍀🍀 निसर्गाच्या सानिध्यात मुलांनी मनमोकळेपणाने आनंद घेतला.नाचले बागडले खूप खूप मज्जाच मज्जा केली.भोजनात वेग वेगळे पदार्थ आणि सोबतच जिलेबी व चिवडा याचीही भर.सर्व आटोपलेकी मग आम्ही तळेगावचे तळे याचीही पाहणी केली त्यानंतर धावती क्षेत्रभेट सहकारी साखर कारखाना सूर्यनगर हदगावची ही भेट घेतली. 👉त्यानंतर सर्वजण आनंदाने व तेवढ्याच उत्साहाने घरी परतले. सहलीसाठी मा.शि.वि.अ.जाधव साहेब,शा.व्य.स.अध्यक्ष मा.दिलिपराव जाधव साहेब,शाळेचे मु.अ. मा.चव्हाण सर यांनी दिलेल्या शुभेच्छासह 💐💐आम्ही शाळेतील 👉स.शि.श्री चव्हाण सर,श्री रामटेके सर,श्रीमती झाडे ,श्रीमती सेनकुडे ,श्रीमती लोने मँडम सहभागी झाले होते. 👭💃👬💃👭👬💃👭👬💃 *🌹प्रेरणादायी चारोळी*🌹 *"रोज रोज तेच तेच काहीतरी चेंज पाहिजे , मुलांसाठी नवोपक्रम अरेंज केले पाहिजे,उत्साहाने सर्वांनी राहिले पाहिजे ".*〰〰〰〰〰〰〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *✍वृत्तलेखन* 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका)🙏 जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव. 💥 जन्म :- १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी. १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा. १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय. १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष. १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहांना भेटणार, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा* ----------------------------------------------------- 2⃣ *अहमदनगर: एसटी संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील चार हजार कामगारांच्या पगारातून २४ लाख रुपये एसटीने केले वसूल* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई: शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ कायम; आयटी मुख्य सचिवांच्या उचलबांगडीची शक्यता - सुत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : अखेरीस नाशिकच्या विमान सेवेला 15 डिसेंबरचा मुहूर्त, मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणार, केंद्र सरकारचे पत्र* ----------------------------------------------------- 5⃣ *सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना विमा संरक्षण द्या, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकीत ठराव मंजूर.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : ग्रंथालय कर्मचा-यांचे प्रश्न सोडवन्यासाठी राज्यात लवकरच होणार आंदोलन, विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या राज्य ग्रंथालय महासंघातील निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णीत, अपु-या प्रकाशामुळे भारताचा विजय हुकला, सामना थांबवला तेव्हा श्रीलंकेच्या सात बाद 75 धावा.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= पुस्तक - परिचय *' लखलखणारी शाळा '* लेखिका अनिता जावळे - वाघमारे वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_20.html प्रत्येक शिक्षकांनी हे पुस्तक वाचायलाच हवे एवढेच नाही तर एक वेळ या शाळेला प्रत्यक्षात भेट ही देण्याचा प्रयत्न करावा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*   9423625769 °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शंकर नारायण नवरे* शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना (जन्म : २१ नोव्हेंबर, १९२७ - २५ सप्टेंबर, इ.स. २०१३) हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. डोंबिवलीत झालेल्या २००३सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. ते डोंबिवलीत रहात. त्यांच्या पत्नीचे नाव अंजली, मुलाचे अरुण, सुनेचे जान्हवी. मुलगी राधिका, नातू शंतनू आणि पणतू ओम. वयाच्या ८६व्या वर्षी शं.ना. नवरे यांचे निधन झाले. अरुण आणि जान्हवी हे दोघेही ॲडव्होकेट आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे  लागते..*    *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो?* 👉.     ८मार्च *२). जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला  जातो?* 👉.    ८मे *३). जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो?* 👉       ८ सप्टेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रशांत शास्त्री, बँक अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद 👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद 👤 इलियास बावानी, पत्रकार, माहूर 👤 विठ्ठल शिंदे 👤 शुभम सुर्या पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " मुकी  वेदना " प्रत्येकाचीच एक मुकी वेदना असते मुकी वेदना जपणे हिही साधना असते प्रत्येक वेदना कधीच बोलकी होत नाही बोलकी झाल्याशिवाय ती हलकी होत नाही    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.*    ••●🌷‼ *रामकृष्णहरी* ‼🌷●••            🌴🌴🌴🌴🌴🌴      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*           📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= पलिकडचा किनारा कधीच अलिकडच्या किना-याला भेटू शकत नाही.त्याचप्रमाणे जीवनात जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती कधीच भेटत नाही अशा गोष्टींबाबत आशा करणेही योग्य नाही.अशावेळी मनावर ताण आणून नैराश्यमय जीवन जगणे चुकीचेच आहे. आपल्याजवळ असलेल्या सुखाला दूर करुन दु:खाला आमंत्रण दिल्यासारखेच आहे.अशी जेव्हा जीवनात परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण दूर्लक्षच केलेले केव्हाही बरे.आशा करुन निराशा पदरी घेऊन जगणे हे चुकीचे आहे.जे आपणास शक्य आहे त्याचाच विचार करावा आणि त्याच मार्गाने मार्गक्रमण करावे म्हणजे जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद...९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *चंदन* चंदन आस चंदनाचा सुवास वेड्या मनास अंगीचा ताप होतो क्षणात लोप चंदन लेप चंदन शांती देतसे सर्व अंगा प्रिय ते जगा वेडावे जीव् चंदनाचे अंगणा विसावा मना फिरती जीव चंदनाचे भोवती असता भीती सांगवी किती चंदनाची महती सर्व जगात देह चंदन दरवळे सुवास कष्टाचा खास ध्येय सहाण झिजविता हे खोड सार्थ जीवन होऊ जगती चंदनाचे सांगाती देण्या सुवास -एकनाथ डुमने सावरगाव ता.मुखेड =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                  *सरळ रस्ता* एकदा एका अरब व्यापार्‍याने वाळवंटातून प्रवास करण्याकरिता आपल्या उंटावर बरेच सामान लादले. ते नीट घट्ट बांधून उंटाला जागेवरून उठवले. उंट मोठ्या कष्टाने उभा राहिला. व्यापार्‍याने उंटाचे तोंड गोंजारले आणि प्रेमाने विचारले: ''बोल मित्रा, आपण कोणत्या वाटेने जाऊया? टेकडीकडे चढण असलेल्या रस्त्याने की, टेकडीवरून उतार असलेल्या रस्त्याने?'' उंट मालकाच्या कानाला लागून म्हणाला: ''मालक आपण न्याल त्या रस्त्याने मला यायलाच हवे. परंतु आपण प्रेमानेच विचारता आहात म्हणून सांगतो. आपण आपले सरळ मार्गानेच जाऊया. सरळ मार्ग लांबचा असतो. परंतु त्या मार्गावर धोके कमी असतात.'' उंटाचे बोलणे खरोखरच शहाणपणाचे होते. अरब व्यापार्‍याने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे मान्य करून तो उंटासोबत चालू लागला.  *तात्पर्यः जो सरळ मार्गाने साधेपणाने चालतो तिथे धोके कमी असतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🌹जीवन विचार*🌹 *〰〰〰〰〰〰〰* http://pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *मानसाची खरी विद्या तिच आहे की जिच्यामुळे आपण आपल्या अंतरात्म्यास स्वतः स,ईश्वरास आणि सत्यास ओळखू शकतो.काळाच्या गतीप्रमाणे चालणारे जग फार मोठे (अफाट) आहे.जगाच्या या ज्ञानसागरात सर्वत्र सभोवताली ज्ञान अफाट पसरलेले आहे.ज्ञानामुळ का जगाव आणि कसं जगाव हे जस कळत तसच मनुष्य निखळ ज्ञानातुन निर्भय होतो.*smt.pramilatai senkude. *ज्ञानाची उपासना आयुष्यभर जरी केली तरी सागरातील थेंबाप्रमाणे होईल.खिन्न मनावर ज्याप्रमाणे नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा* *आपल्याला पुस्तकातील वाचन केलेल्या ज्ञानामुळे मिळते.त्याचप्रमाणे दुःखाचा संकटाचा प्रसंगी सुद्धा ह्या ज्ञानाचा आपल्याला आधार होतो. मदत होते.* *पण त्यासाठी आपल्याला आपले कान व डोळे सदैव खुले ठेवावे लागते.आपली जीवन ज्योत सतत तळपत तेवत ठेवायची असेल तर आपल्याला ज्ञानाचा* *स्नेहाची नितांत गरज असते.ज्ञान अनंत असते ,ज्ञानाला समुद्राची सखोलता असते,* *आकाशाची अफाटता असते.सूर्याच तेज असते.* *जग हे माहितीचे ,ज्ञानाचे व अनुभवाचे ज्ञानसागर असून हे ज्ञान मिळवणारे प्राप्त करणारे ज्ञानोपासक म्हणजेच ज्ञानसागरात पोहणारे राजहंस होत.* 〰〰〰〰〰〰〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका)🙏 जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺* 📚✍🏻📕📗🗞📖🗃 *०१) ययाती* = वि. स. खांडेकर *०२) वळीव* = शंकर पाटील *०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर *०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती *०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात *०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे *०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर *०८) तीन मुले* = साने गुरुजी *०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे. *१०) आय डेअर* = किरण बेदी *११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत *१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे *१४) जागर* - *१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी *१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर *१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू *१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल *२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान *२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले *२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स *२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी *२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे *२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम *२७) लज्जा* - तसलीमा नसरीन *२८) दैनंदिन पर्यावरण* - दिलीप कुलकर्णी *२९) रणांगण* = विश्राम बेडेकर *३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे *३१) श्यामची आई* = साने गुरुजी *३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे *३३) बि-हाड* - अशोक पवार *३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे *३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर *३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड *३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर *३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर *३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर *४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर *४१) झोंबी* = आनंद यादव *४२) इल्लम* = शंकर पाटील *४३) ऊन* = शंकर पाटील *४४) झाडाझडती* = विश्वास पाटील *४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर *४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट *४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात *४८) इस्त्राइलची शेती*- *४९) बहाद्दुर थापा* - संतोष पवार *५०) सेकंड सेक्स* - सिमोन *५१) आई* = मोकझिम गार्की *५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी *५३) बलुत* = दया पवार *५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर *५५) स्वामी* = रणजीत देसाई *५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे *५७) पांगिरा* = विश्वास पाटील *५८) पानिपत* = विश्वास पाटील *५९) युंगंधर* = शिवाजी सावंत *६०) छावा* = शिवाजी सावंत *६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई *६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले *६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले *६४) वावटळ*- व्यंकटेश माडगुळकर *६५) ग्रेटभेट* - निखिल वागळे *६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू *६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती *६८) वाईज अंड आदर वाईज* *६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे *७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे *७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा *७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव *७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे *७४) गांधीनंतरचा भारत*- रामचंद्र गुहा *७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा *७६) नापास मुलांची गोष्ट* = अरुण शेवते *७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे *७८) महानायक* = विश्वास पाटील *७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर *८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली *८१) मिरासदार*- द. मा. मिरासदार *८२) सुरेश भट यांचे* सर्व कविता संग्रह *८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *८४) स्पर्धा काळाशी*- अरुण टिकेकर, अभय टिळक *८५) बदलता भारत*- भानु काळे *८६) कोल्हाटयाचं पोरं*- किशोर काळॆ *८७) साता उत्तराची कहानी*- ग. प्र. प्रधान *८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*- मा. म. देशमुख *८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी *९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई *९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*- चांगदेव खैरमोडे *९२) समग्र महात्मा फुले*- राज्य सरकार *९३) झोत*- रावसाहेब कसबे *९४) ओबामा* - संजय आवटे *९५) एकेक पान गळावया*- गौरी देशपाडे *९६) आई समजुन घेताना*- उत्तम कांबळे *९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार *९८) अमृतवेल*- वि. स. खांडेकर *९९) महात्म्याची अखेर*-जगन फडणीस *१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/11/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण. १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू. 💥 जन्म :- १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई. १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोपर्डी निकाल - कोर्टाच्या निकालानंतर पीडितेला न्याय, कोर्टाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी, शिक्षेनंतर कुणीही अत्याचाराला धजावणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *समृद्धी मार्ग करुन वेगळं राज्य निर्माण करणार असल तर समृद्धी मार्ग मध्येच तोडून टाकेल - राज ठाकरे* ----------------------------------------------------- 3⃣ *राज्यातील 734 ग्रामपंचायती साठी 26 डिसेंबरला होणार मतदान* ----------------------------------------------------- 4⃣ *भारताची मनुषी छिल्लर ठरली 'मिस वर्ल्ड-2017 ; तब्बल 17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमान* ----------------------------------------------------- 5⃣ *लातूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची 35 पथकांकडून शोध मोहीम.* ----------------------------------------------------- 6⃣ *बांदीपोरा हाजिन भागात चकमकीमध्ये सुरक्षा पथकाकडून पाच दहशतवादी ठार.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका पहिली कसोटी, श्रीलंकेच्या तिस-या दिवसअखेर 4 बाद 165 धावा तर भारताच्या पहिल्या डावात 172 धावा.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- शिक्षणाची वारीचा आज लातूर विभागात शेवटचा दिवस, रविवार असल्यामुळे शिक्षकांची गर्दी राहण्याची शक्यता* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख *मोबाईल महत्वाचे की शौचालय* जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत बांग्लादेश आणि व्हिएतनाम सारख्या अनेक देशानी समाधान कारक प्रगती केली आहे. सबसहारन आफ्रिकेतील 26 देशानीही याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे ....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_49.html *स्वच्छ भारत ; समृद्ध भारत* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमती इंदिरा गांधी* इंदिरा गांधी ( नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४ ) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) आपल्या देशात विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ७ नोव्हेंबर *२) आपल्या देशात शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ११ नोव्हेंबर *३) आपल्या देशात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १४ नोव्हेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कैलाश पाटील खरबाळे 👤 श्वेता नरसुडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" पिकते तिथे "* पिकते तिथे विकत नाही विकते तिथे पिकत नाही पिकते तिथे विकले पाहिजे विकेल तिथे पिकले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' म्हणजेच पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू! ही जन्म-मरणाची वारंवार होणारी फेरी संपविणे म्हणजेच 'मुक्ती!' याचा अर्थ मुक्तीच्या आधी जन्म-मरणाचा फेरा आणि पुनर्जन्म आहे हे मान्य करावे लागेल. महाभारताच्या युद्धानंतर पांडव स्वर्गाच्या द्वाराकडे वाटचाल करू लागले ते कशासाठी? महायोद्धा रावण अखेरीस रामरायांना हात जोडून विनविता झाला कशासाठी? हे सारे प्रश्न 'मुक्तीसाठी' या एकमेव उत्तराकडे घेऊन जातात. आम्हाला पुन्हा जन्म नको, म्हणजे मग शिल्लक काहीही उरणार नाही. प्राप्त होईल ती केवळ 'मुक्ती आणि मुक्तीच!'* *'ज्ञानेश्वरी' लिहून ज्ञानेश्वरांनी अवतारकार्य संपविले, लोकांना उपदेशामृत पाजून तुकोबा वैकुंठाला गेले, नामदेवादि संतानीही हेच केले. पूर्वीच्या जन्माचे पडसाद म्हणून हा जन्म प्राप्त झाला. परंतु आता मात्र हे पुन्हा नको, हे या द्रष्ट्या पुरूषांनी निश्चित केले आणि प्राप्तही करून घेतले. सर्वसामान्य माणसाला या महामार्गावर एक-एक पाऊल पुढे सरकता आले तर निश्चितपणे मुक्तीचे लक्ष्य प्राप्त होईल.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काळ हा कधीच कुणासाठी थांबत नाही.त्याचा प्रवास हा निरंतर चालत राहतो. काळाप्रमाणे आपणही चालायला शिकले पाहिजे. आपण जर नाही शिकलो तर आपल्या जीवनाचा चालणारा प्रवास कुठेतरी खंडित होऊन जगणे अवघड करून टाकतो. काळाला तोंड देण्याचा आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवन जगणे सुसह्य होईल आणि आपल्या जीवनात सातत्यपूर्ण,चांगले जीवन जगण्याचे मनोधैर्यही वाढेल. काळ असाही आला तरी काळाला भ्यायचे नाही तर त्याला टक्कर कशी द्यायची हे त्याच्याकडूनच शिकले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *|| निखारा ||* झाकून ठेव निखारा राखेसह दाखवू नको कोणास कैक येतील फुंकर मारायला क्षणभर घेतील उबारा अन निघूनही जातील काही क्षण धगधगेल निखारा कदाचित पेट घेईल वाऱ्यावर उडेल राख धूर डोळ्यात खुपेल अन झुंजावे लागेल निखाऱ्यास स्वःअस्तित्वासाठी पुन्हा पुन्हा पण होईल भ्रमनिरास न पाळणार कोणीच त्या पेटत्या निखाऱ्यास..!! सुनिल पवार, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जिद्द* मंजूच्या बोटांना जन्मापासूनच आपल्या सारखी पेरं नव्हती. त्यामुळे तिला वस्तू धरतांना, लिहीतांना, बटण लावतांना अशी रोजची कामे करतांना खूपच त्रास व्हायचा. पण मंजू जिद्दीने स्वतःची कामे कोणाचीही मदत न घेता पूर्ण करायची. मंजूला चित्रकलेची खूपच आवड होती. चित्र काढतांना तिला वेळेचे भान राहत नसे. एका रविवारी सकाळी तीन तास बसून बागेचे सुंदर चित्र रंगवले. चित्र पाहताच आईने आनंदाने मंजूला जवळ घेत म्हटले,"मंजू, तुझ्या हातात कला आहे. त्याला अधिकाधिक वाढवायचा प्रयत्न कर". आईच्या बोलण्याचा मंजूवर खोलवर परिणाम झाला. त्या रात्री आईबाबांचे बोलणे मंजूच्या कानावर पडले. आई म्हणत होती,"अहो, आता शाळेत स्पर्धा आहेत. आपण मंजूला नवीन रंग आणि काही कागद घेऊन देऊ या का?". त्यावर बाबा वैतागलेल्या सुरात म्हणाले," अगं, महागई किती वाढलेली आहे. शिक्षणाच्या भविष्याच्या द्रुष्टीने कितीतरी पैसा साठवायचा आहे. रंगाचे पैसे खर्च करणे आपल्याला शक्य नाही. तसे ही हातामुळे मंजूला फार काळ चित्रकला करता येईल असे मला वाटत नाही." वडीलांचे हे शब्द ऐकून मंजूला रडूच कोसळले. सकाळी काढलेले चित्र तिने फाडून टाकले. दुसर्‍या दिवशी उठल्यावर मंजू आईला स्वयंपाकात मदत करायला आली. आईने आश्चर्याने तिला त्याबद्दल विचारले. मंजूने कालचे संभाषण ऐकल्याचे सांगितले. आईच्या डोळयात पाणी आले. तिने मंजूला कुशीत घेत म्हटले," मंजू आपल्या अपंगावर आपणच मात करायला शिकले पाहिजे. तुला माहिती आहे विल्मा रुडाल्फ ही अमेरिकन खेळाडू पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंग होती. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने ऑलिंपिक स्पर्धेत तीन सुवर्ण पदके मिळवून जागतिक विक्रम केला होता. मंजू तुझी स्थिती तर ह्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. तुझ्या ह्या वाटचालीत तुला अनेक अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करायला शिक." आईच्या बोलण्याने मंजूला खूपच हुरुप आला. आईला घटट मिठी मारत मंजू म्हणाली " हो आई, जर विल्मा करु शकते तर मी का नाही."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म. १९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला. १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली. १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले. 💥 जन्म :- १९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. १९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन. १९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *बकिंघमशायर : आयल्सबरी जवळील वाडेसडोन टेकड्यावर एका विमानाची हेलिकॉप्टरसोबत हवेत टक्कर झाल्याने अनेक जण ठार* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर : अयोध्या प्रकरणात सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास आहे, मी सकारात्मक दृष्टीने बघतो - श्री श्री रविशंकर* ----------------------------------------------------- 3⃣ *बीड : आॅनलाइन नोंदणी व इतर जाचक अटींमुळे शेतक-यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे फिरवली पाठ, १७ दिवसांत झाली केवळ २९९० क्विंटल खरेदी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : मागण्या मान्य न झाल्यास इंटकच्या नेतृत्वातील एसटी कामगार संघटना २६ डिसेंबर रोजी संपाची नोटीस देणार; १४ जानेवारीपासून पुन्हा संपाची हाक.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर - राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या, रामचंद्र शिंदे सोलापूरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीच्या बांधकामासाठी दिली सशर्त परवानगी* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात पुजाराचा एकाकी संघर्ष, भारताच्या ५ बाद ७४ धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मरावे परी अवयवरूपी उरावे* जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्ही. शांताराम* शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे झाला. हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली. दो आँखे बारा हात, झनक झनक पायल बाजे, डॉक्टर कोटनिस की अमर कहानी, गीत गाया पत्थरोने, नवरंग, पिंजरा, शेजारी ही त्यांची काही गाजलेली प्रमुख चित्रपट आहेत. व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने 'शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा' या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. या सूचीत १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची नावे आहेत. त्या सूचीत 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ======== *१). महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?* 👉. देवेंद्र फडणवीस *२). महाराष्ट्राच शालेय शिक्षणेमंत्री कोण आहेत?* 👉. विनोद तावडे *३) महाराष्ट्रा चे गृहराज्यमंत्री कोण आहेत?* 👉 दीपक केसरकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरविंद काळे, सहशिक्षक पीपल्स हायस्कूल, नांदेड 👤 नितीन रायपुरे, अकोला 👤 पिराजी भूमन्ना, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= "मऊ लागलं की " मऊ लागलं की लोक कोपराने खणतात जिथे नाही तिथे ते टोला हाणतात लाचारी वाटेल असा मऊपणा ही नसावा बोलण्यात अन् वागण्यात स्वाभिमान असावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ======== *गर्भाशयाच्या अंधार विवरातूनच मनुष्यप्राण्याचा जन्म होतो आणि अंधाराच्याच अथांग अवकाशात तो अखेर विलीन होतो. तरीही अंधार हा अप्रिय आणि अमंगल ठरतो, असे का? अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. आपण सहज बोलून जातो 'तो कसला सुखी? त्याच्या जीवनात नुसता अंधार आहे अंधार !' अंधाराचा सर्वच धिक्कार का करतात? समजा जगातून संपूर्ण अंधार नष्ट झाला तर...? तर विश्वनिद्रेचा नाश होईल, उजेडाचा वणवा दिसेल, जीवसृष्टीचे जीवप्राण कंठाशी येतील. पृथ्वीचा थरकंप वाढेल आणि अखेर प्रलय होईल.* *म्हणून अंधाराला समजून घेणं फार जरूरीचं आहे. तसा अंधार हा गरीब-श्रीमंत असा भेद पाळत नाही. पण उजेड पाळतो. म्हणूनच गरीबाचा मिणमिणता दिवा आणि श्रीमंताकडे दिव्यांचा झगमगाट! परंतु अंधार सर्वत्र सारखा असतो. अंधारच शाश्वत आहे, प्रकाश नाही. ब्रम्हांडाचा 90% भाग हा गर्द अंधार कणांनी भरलेला आहे. असं असूनही अंधार मानवी दुनियेत बदनाम आहे. अंधार निंदा थांबता थांबत नाही.* *'उजेडात होते पुण्य, अंधारात पाप'* *असं पाप-पुण्याच्या मार्केटिंगमध्ये बिंबवलं जातं. पाप-पुण्य या दोन्ही बाबी ब-याच प्रमाणात समाज, प्रदेश आणि धर्मसापेक्ष आहेत. एका समाजात प्राणीहत्या पाप, तर दुस-या समाजात ते धर्माचरण. असत्य पाप आहे तर, पुण्यशिल सत्याला सुळावर चढविले जाते.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्या कणखर दगडावर टाकीचे घाव घालून त्याला एखाद्या देवाचे रुप देऊन देव मानून नतमस्तक होतो. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन एखादी सुंदर मूर्ती बनवून कलेचा आस्वाद घेतो. तेवढेच अंत:करणातून प्रयत्न केले तर माणसातल्या माणुसकीला जागे करुन त्यांच्यातील मनुष्यत्व जागृत करुन त्यास आदर्श माणूस घडवून निर्माण केले आणि माणुसकीचे नाते जोडलेे गेले तर तुमच्या इतके सुखाने, समाधानाने व आपुलकीचे नाते जोडण्यासाठी अधिक मदत होईल.त्यांच्याशी नाते जोडले म्हणजे परमेश्वराशी नाते जोडल्यासारखेच होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....९४२१८३९५९०. 🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता- अबोल प्रित* तिला मी जाताना सहजच पाहिले हरिणीची डोळे तिचे ह्रदयात कोरले... वाटेवर तिच्या रोज डोळे माझे खिळे बघता क्षणी तिला मन माझे डोले ... रोज त्या वाटेवर काम नव्हते काही फक्त तिला पाहण्याचा बहाणा मात्र राही... रोज असे वाटे काही जाऊन तिला भेटावे मनातील गूज तिच्या कानी हळू सांगावे... असे करता करता अनेक दिवस गेली अबोल प्रीत माझी कधी बोलकी नाही झाली मनातील भाव माझे कधीच सांगता तिला नाही आले एके दिवशी जोडीदारसह पाहताच तिला डोळे माझे पाणावले... अशी राहीली माझी अबोल प्रित समजली नाही मला प्रेमाची रित गात बसलो विरह गीत मिळाला ना माझा मीत... *सौ. सुचिता नाईक, किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चाणक्य कौटिल्य* आचार्य चाणक्याकडे म्हणे कोणीतरी एक चिनी प्रवासी आला होता. ज्यावेळी तो भेटायला आला त्यावेळी हा विष्णुगुप्त (चाणक्य कौटिल्य) लिहित बसलेला होता. त्याकाळी मोठे दिवे नव्हते, वीज नव्हती, आपल्याला ज्ञात आहे. तेलाचे दिवे लावलेले असत. त्या तेलाच्या दिव्यामध्ये विष्णुगुप्त लिहित बसलेला होता. संध्याकाळचा समय होऊन गेलेला होता. काही महत्वाची कागदपत्रे लिहित होता. लिहित असताना तो चिनी आला, त्याचेआचार्य चाणक्यानेस्वागत केले, त्याला बसवले, आणि मग आपल्या हातातले लेखन कार्य विष्णुगुप्ताने पूर्ण केले. पूर्ण केल्यानंतर त्याने काय केले? त्याच्यासमोर दोन दिवे होते. एक प्रज्वलित झालेला होता व एक तसाच होता. चाणक्याने प्रथम आपल्या समोरचा दिवा विझवला आणि दुसरा दिवा प्रज्वलित केला. त्यावेळी तो चिनी प्रवासी कुतुहलाने पाहू लागला. हे असे कशासाठी करतो आहे चाणक्य? त्याला असे वाटले की बहुधा भारतातील ही प्रथा असावी. पाहुणा आला की बहुधा असे करत असावेत. मग कुतुहलाने त्याने प्रश्न विचारला चाणक्याला, 'आपल्याकडे प्रथा आहे का की पाहुणा आला की असे करावे?' एक दिवा विझवायचा आणि दुसरा लावायचा?. तेव्हा चाणक्य म्हणाला, 'असे नाही. मी ज्या दिव्याच्या प्रकाशात आत्ता काम करत होतो ते माझ्या राज्याचे काम होते, माझ्या राष्ट्राचे काम होते आणि त्या दिव्यामध्ये जे तेल भरलेले होते ते राष्ट्राच्या पैशातून भरलेले आहे. आता मी तुमच्याशी संवाद करणार हा माझा व्यक्तिगत संवाद असेल. हा संवाद राष्ट्राचा नाही! ते राष्ट्राचे तेल वाया जाऊ नये म्हणून मी तो दिवा विझवला, आणि दुसऱ्यात माझ्या स्वकष्टाचे तेल घातले आहे. म्हणून तो दुसरा दिवा पेटविला.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/11/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ=========      *आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.* 💥 ठळक घडामोडी :-  १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर. १९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला. 💥 जन्म :- १९२५ - रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता. १९२८ - कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९३८ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार. १९५६ - स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन.  १९६१: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. २०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.  २०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पुणे: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यातील पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे व राज्यातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंच्या संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.* ----------------------------------------------------- 2⃣ *कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत वीज खंडित होणार नाही.* ----------------------------------------------------- 3⃣ *पुण्यात तापमानाचा पारा घसरला; किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सरकार एक हजार मोहल्ला क्लिनिक सुरू करणार* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे येथील गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस उमराणी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदावर नियुक्ती* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - पुणे प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार, वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान येणार, हायपर लूप वन आणि राज्य सरकार यांच्यात करार.* ----------------------------------------------------- 7⃣ *पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हाफिजची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळली; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हाफिजचे निलंबन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालविवाह कसे रोखता येतील ?* विवाहासाठी आता वयाचा दाखला अनिवार्य करत असल्या बाबतचे वृत्त वाचून आनंद वाटला. याबाबतीत एनसीपीसीआर'चे सदस्य यशवंत जैन म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर अंमलबजावणी न होणे ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे विवाह करताना वयाचा दाखला आता अत्यावश्यक करण्यात..... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========      *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी  पुणे येथे झाला असुन मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबई येथे झाले आहे. हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. २३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. बाळासाहेबांनी 19 जून 1966  रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *फक्त कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा*.. *प्रोत्साहित करणारी एक अशी व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?* 👉     नरेंद्र मोदी *२)  भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?* 👉     सुषमा स्वराज *३)  भारताचे सरंक्षणमंत्री कोण आहेत?* 👉      निर्मला सितारमण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनंत कदम, गीतकार, नांदेड 👤 गोविंद बैस 👤 संतोष भाले, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " पिचले आहेत " कोणी कशात तर कोणी कशात पिचले आहेत जे पिचले नाहीत असे कोणी वाचले आहेत आज प्रत्येक माणूस कशात तरी पिचला आहे देव जाणे नेमका कोणता माणूस यात वाचला आहे    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.*     ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••              🔹🔹🔹🔹🔹🔹       *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*             📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते.ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही.उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही.जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता -परिभाषा त्यागाची* लहानपणी शिकवले जातात तूला ती परिभाषा त्यागाची हातातील खेळणे घेऊनी तूला म्हणतात बहिण आहेस त्या भावाची... घरातील सण-सभारंभ असो किंवा असोत उत्साह साजरा तूम्ही मागे रहा माझ्या ताईनों आणि म्हणे ठेवा चेहरा सदा हसरा... जेव्हा तू एक स्त्री होते मूलीची माप उलटूनी जाता सख्याच्या घरी प्रथमच तूझी ओळख करुन दिली जाते परिभाषा त्यागाची तूझ्या स्त्रीत्वाच्या अस्तित्वाची पत्नी आई आणि लक्ष्मी बनते दिलेल्या त्या घराची जन्म घेतलेले माहेरास विसरण्यास शिकतेस परिभाषा त्यागाची ... स्वःताच्या ना उरल्या आवडी निवडी ना छंद उरला तूला तूझ्या त्या साधनेची उसंत ना तूला घडीभरची नाते जपूनी परिभाषा त्यागाची का तूझीच अशी परिक्षा पर्वा ना कोणा तूझ्या त्या जीवाची मर्यादा ओलांडून सहनशक्तीची तू ही जपतेस परिभाषा त्यागाची... *सौ.सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= 👉 _*तुमच्या आत दडलेल्या सिंहाला जागे करा!*_ जर जंगलाचा विचार केला तर... 1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे? उत्तर - हत्ती 2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे? उत्तर - जिराफ 3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे? उत्तर - कोल्हा 4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे? उत्तर - चित्ता असं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं? सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो. आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही. मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता. *प्रेरणात्मक*🦁 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक सहनशीलता दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली. १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या. १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ. १९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड. 💥 जन्म :- १९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म. १९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. १९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. १९६३: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म. १९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म. १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा. २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक : आयकर कार्यालयाचे उद्घाटन. आयकर विभागातील सर्व अधिका-यांनी आपल्या भावी पिढीला सक्षम आणि चांगले भविष्य देण्यासाठी स्वतः त्याग करण्याची तयारी ठेवावी - प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी शुक्ल* ----------------------------------------------------- 2⃣ *ठाणे : लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह रविवार 26 नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवीदान सोहळ्यात विविध विद्याशाखेत गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 74 सुवर्णपदके प्रदान करण्यात आले असून 22 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी - १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील खड्डे बुजविले नाही तर आंदोलन करणार, एक जरी खड्डा दिसला तरी मंञ्यांना राज्यात फिरू देणार नाही, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर- शेगावचं ऊसदर आंदोलन स्थगित, उसाला पहिली उचल 2525 रुपयांवर सहमती* ----------------------------------------------------- 6⃣ *योगाला खेळाचा दर्जा देण्याचा सौदी अरेबियाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा आगामी भारत वि. श्रीलंका कसोटीचे करणार समालोचन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - वेळ नाही मला* मोहन आणि त्याची पत्नी कमला शेतात मोलमजुरी करून आपल्या चार लेकराला शिक्षण दिले. आमच्यासारखे खडतर जीवन लेकरांच्या नशिबी येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःच्या दोन एकर जमीन मध्ये कष्ट केलेच त्याशिवाय वेळप्रसंगी इतरांच्या शेतात जाऊन मोलमजूरी केली. मुलगा हवाच बायकोच्या या हट्टापायी ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पुल्लेला गोपीचंद* पी. गोपीचंद यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1973 रोजी नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांचे प्रशिक्षक देखील आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वाणी आणि पाणी जपून वापरा कारण वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ आणि पाणीमुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एकपेशीय कवकांना काय म्हणतात?* 👉 किण्व *२) एल. पी. जी. (LPG) मध्ये कोणते घटक असतात?* 👉 ब्युटेन आणि आयसोब्युटेन *३) कोणत्या शहरात वायुगळतीमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले?* 👉 भोपाळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष पेटेकर, प्राथमिक शिक्षक 👤 छोटू पाटील, बाभळी 👤 मोहन कानगुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " विषय " पुन्हा पुन्हा तोच विषय कोणालाच नको वाटतो धुमसता विषय सांगा कोणाला कशाचा पटतो कोणत्याही विषयाचे एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे जेंव्हाचे तेंव्हाच विषय हाता वेगळे केले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कलाकाराच्या जीवनात कितीही सुखदु:खाचे चढ उतार असलेतरी तो प्रेक्षकांना निखळ आनंद देतो.तो आपले दु:ख कधीच सांगत नाही.तो इतरांच्या जीवनात असलेले थोडेबहुत दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करण्याचे काम करतो.ही देखील एक सेवाच आहे. आपणही त्याचपद्धतीने आपापल्या परीने इतरांच्या जीवनातले दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केल्यासआपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. काही तरी आपल्या जीवनात एक चांगले काम केल्याचे समाधान वाटेल.आपणही आपल्या जीवनाचे कलाकार आहोत.फक्त कोणती कला कुठे आणि कशी उपयोगात आणावी यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.आपले दु:ख सांगण्यापेक्षा इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.ही देखील एक सेवाच आहे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🍁🍃🌹🍃🍁🍃🌹🍃🍁🍃🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - झोपडी* आज त्या माऊलीला मी कुढताना पाहिलं झोपडीच दार लावून हंभरडा फोडताना पाहिलं... वाट पाहीत बसते रोज कोवळ्या त्या कळीची आस खोटी मनी बाळगूनी दुःख दूर सारण्याची... बघती रोज स्वप्न ती झोपडीच्या अंगणात जगणे पार विसरुनिया गेली भान नाही अजिबात .... कोणाचेही दिसते पोर म्हणते ती आहे माझी म्हणते चल माझ्या लेकरा वाट पाहते आहे झोपडी तूझी... कस काय समजावे कळत नाही त्या माऊलीला पोर तिची गेली बळी ना परतणाऱ्या मार्गाला... गेली तिची आसव वाळून डोळ्यांना पडल्या तिच्या खाचा झोपडीच्या दारात बसते गूमसूम बंदच झाली तिची वाचा... *सौ. सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐 विचार करा 💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 💥 जन्म :- १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८२ - आचार्य विनोबा भावे महाराष्ट्र, भारत *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत अद्याप निर्णय नाही, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याची सूत्रांची महिती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील; रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : सांगली आणि नाशिक येथे ड्राय पोर्टला मान्यता, या भागातला शेतीमाल निर्यात करण्याची होणार सोय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत घोषणा* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : बेस्टच्या भाडेवाढीविषयक सुधारणांना पालिकेत मंजुरी मिळाल्यास ४ किमीनंतर १ ते १२ रुपयांपर्यंत भाडेवाडीची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : जिल्हा बॅंकेच्या ३५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अारबीअायने परत घेतल्या, बारा कोटी घेण्यास नकार* ----------------------------------------------------- 6⃣ *जालना : जिल्ह्यात ३६ कषी सेवाकेंद्राचे परवाने निलंबित. कषी विभागाने केली कारवाई.* ----------------------------------------------------- 7⃣ *६० वर्षात पहिल्यांदाच नामुष्की, चारवेळेचा चॅम्पियन इटली विश्वचषकाबाहेर, प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध सामना अनिर्णीत* ----------------------------------------------------- *विशेष बातमी - सोलापूरचे मधुकर माळी निर्मित शाळा अॅपचे काल झाले ऑनलाइन उद्घाटन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हेडफोनपासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विनायक नरहरी भावे* विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे) (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केलाव गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समता ही आजची हाक आहे. ती आपणास आवडो वा नाआवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. - विनोबा भावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा संलग्न आहेत?* 👉 आठ *२) महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा "मध्यप्रदेश" या राज्याशी संलग्न आहेत?* 👉 आठ *३) महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी "महाराष्ट्र एक्सप्रेस" किती जिल्ह्यातून प्रवास करते?* 👉 चौदा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती 👤 सुनील शिंदे, पांगरी 👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर 👤 भगवान भूमे, देगलुर 👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद 👤 दिनेश येवतीकर, येवती 👤 कमलेश परब 👤 मारोती कानगुलवार, येवती 👤 गंगाधर मरकंठवाड, येवती 👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " सुगंध " सुगंध वाटणाराचा हातही सुगंधी होतो तो वाटतांना जगण्याची नवी नवी धुंदी देतो माणूस नित्य नव्या धुंदीत जगला पाहिजे स्वतःसह दुस-याला आनंद मिळेल असा वागला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= •••●⚜‼ *विचार धन* ‼⚜●••• *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध...........✍🏼 +++++++++++++++++++++ जीवनात तुम्हाला चांगले जगायचे तर येणा-या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.कारण कोणतीही परिस्थिती चांगली असतेच असे नाही.कधी कधी वाईट आणि बिकट परिस्थितीतून ही मार्ग काढून सुखी जीवन जगण्यासाठी एखादा आशेचा किरण सापडत असतो.पण आता आपल्याला आपल्या जीवनात दु:खच आहे आणि दुःखच भोगावे लागणार त्याच्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही असे जर म्हटले तर मग जीवनात दु:खाशिवाय दुसरे काहीच भोगायला मिळणार नाही. उलट जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल आणि सुखाने जीवन जगायचे असेल तर हातपाय तर हलवावेच लागतील. मेहनत करावी लागेल, काहीतरी काम शोधावे लागेल,आपले निराशावादी मन आशेकडे न्यावे लागेल, नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे न्यावे लागेल तर तुम्हाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग सापडेल. अन्यथा मग आपल्या जीवनाच्या जीवनशैलीला आहे तसेच स्वीकारुन जीवनभर यातना,दु:ख यांना जवळ करावे लागेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - बालगीत* माझे नाव चिंटू ईटूकूला पिंटू अभ्यासाचा येतो त्रास मला खूप परंतु... अक्षरांचे खेळ सारे इकडून तिकडे जाई वारे गणिताचे पाढे करतात माझी चाढे... इतिहासाची तासिका इतिहास जमा करते मला भूगोलातील पृथ्वीअभ्यास घोर लावी माझ्या जीवाला... विज्ञानाच्या पाठामध्ये अनेक पडतात रसायन मला मात्र तेव्हा आठवते शारीरिक शिक्षणातील शवासन... कधी तरी बाई मला स्वछंदी खेळूद्या दप्तराचे ओझे माझ्या पाठीवरचे उतरु द्या... प्रगत अप्रगत चा फेरा तूम्हास नाही चूकणार आवडीचे खेळ आमचे अभ्यासाने मूकणार... *सौ. सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *तेनालीराम की चतुराई* एक बार राज दरबार में नीलकेतु नाम का यात्री राजा कृष्णदेव राय से मिलने आया। पहरेदारों ने राजा को उसके आने की सूचना दी। राजा ने नीलकेतु को मिलने की अनुमति दे दी। यात्री एकदम दुबला-पतला था। वह राजा के सामने आया और बोला- महाराज, मैं नीलदेश का नीलकेतु हूं और इस समय मैं विश्व भ्रमण की यात्रा पर निकला हूं। सभी जगहों का भ्रमण करने के पश्चात आपके दरबार में पहुंचा हूं। राजा ने उसका स्वागत करते हुए उसे शाही अतिथि घोषित किया। राजा से मिले सम्‍मान से खुश होकर वह बोला- महाराज! मैं उस जगह को जानता हूं, जहां पर खूब सुंदर-सुंदर परियां रहती हैं। मैं अपनी जादुई शक्ति से उन्हें यहां बुला सकता हूं।  नीलकेतु की बात सुन राजा खुश होकर बोले - इसके लिए मुझे क्‍या करना चाहिए? उसने राजा कृष्‍णदेव को रा‍त्रि में तालाब के पास आने के लिए कहा और बोला कि उस जगह मैं परियों को नृत्‍य के लिए बुला भी सकता हूं। नीलकेतु की बात मान कर राजा रात्रि में घोड़े पर बैठकर तालाब की ओर निकल गए। तालाब के किनारे पहुंचने पर पुराने किले के पास नीलकेतु ने राजा कृष्‍णदेव का स्‍वागत किया और बोला- महाराज! मैंने सारी व्‍यवस्‍था कर दी है। वह सब परियां किले के अंदर हैं। राजा अपने घोड़े से उतर नीलकेतु के साथ अंदर जाने लगे। उसी समय राजा को शोर सुनाई दिया। देखा तो राजा की सेना ने नीलकेतु को पकड़ कर बांध दिया था।  यह सब देख राजा ने पूछा- यह क्‍या हो रहा है?  तभी किले के अंदर से तेनालीराम बाहर निकलते हुए बोले - महाराज! मैं आपको बताता हूं?  तेनालीराम ने राजा को बताया- यह नीलकेतु एक रक्षा मंत्री है और महाराज...., किले के अंदर कुछ भी नहीं है। यह नीलकेतु तो आपको जान से मारने की तैयारी कर रहा है।  राजा ने तेनालीराम को अपनी रक्षा के लिए धन्यवाद दिया और कहा- तेनालीराम यह बताओं, तुम्हें यह सब पता कैसे चला ? तेनालीराम ने राजा को सच्‍चाई बताते हुए कहा- महाराज आपके दरबार में जब नीलकेतु आया था, तभी मैं समझ गया था। फिर मैंने अपने साथियों से इसका पीछा करने को कहा था, जहां पर नीलकेतु आपको मारने की योजना बना रहा था। तेनालीराम की समझदारी पर राजा कृष्‍णदेव ने खुश होकर उन्हें धन्‍यवाद दिया। *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹👭बालदिन👭🌹* 〰〰〰〰〰〰〰 *आज दिनांक १४नोव्हेंबर २०१७ जि.प.प्रा. शा. वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली.व त्यानिमित्याने बालसभेचेही आयोजन करण्यात आले.* 👭 👬 👭 👭 🌹🌹🌹🌹🌹🌹 *या कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.मु.अ.श्री चव्हाण सर* *प्रमुख पाहुणे.मा.शि.वि.अ.श्री जाधव साहेब,श्री चव्हाण सर*🌹 *प्रतिमा पूजन सर्व विद्यार्थी,शिक्षक ,पाहुणे यांनी केले.त्यानंतर* *सदरिल कार्यक्रमात इयत्ता १ ते ७ वी तील विद्यार्थ्यानी सुंदर भाषणे केली. व गीतांचे सादरीकरण केले.* 🌹🌹🌹🌹🌹🌹 *मा.शि.वि.अ.श्री पी.वाय.जाधव साहेब यांना विविध पुरस्काराने सन्माननीत केले असल्याने त्यांचे आमच्या शाळेच्या वतीने अभिनंदनीय स्वागत करण्यात आले.* *तसेच त्यांनी बालक दिनाचे महत्वही विद्यार्थ्यांना पटवून दिले.शाळेतील श्री चव्हाण सर,रामटेके सर,श्रीमती झाडे मँडम,सेनकुडे मँडम,लोने मँडम यांच्या उपस्थितीत व सहकार्याने आजचा हा बालदिनाचा कार्यक्रम गोड खाऊ वाटप करून आनंदाने पार पडला.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन : वर्ग ५,६, ७ वी तील कु.विजया,कोमल,तर आभार प्रदर्शन कु.शिवानी हिने मानले.* *➖➖➖➖➖➖➖* *✍🏻श🔶ब्दांकन* *🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* 🙏 *(सह.शिक्षिका*) 〰〰〰〰〰〰〰 *काही क्षणचिञे* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *बालदिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले. १९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला. 💥 जन्म :- १८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान १९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. १९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. 💥 मृत्यू :- १९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार. १९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣*भारतात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत घेत आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 2⃣ *चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कोर्धा जि. प. शाळेतील 26 विद्यार्थ्यांना चंद्रजोतीच्या विषारी बिया खाल्ल्याने विषबाधा. विद्यार्थ्यांना प्रा.आ.केंद्र नवेगांव पांडव येथे उपचार सुरू.* ----------------------------------------------------- 3⃣*मुंबई : मराठी, इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट वेळेवर सादर न केल्याने अनुकंपावरील अनेकांना सेवा समाप्तीचे आदेश केले रद्द, संचालक मंडळाचा सदरच्या लिपिकांना नोकरीत घेण्याचा निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - हिवाळी अधिवेशानापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर कोर कमिटीची बैठक, पंकाजा मुंडे, विनोद तावडे, खडसे यांची उपस्थिती* ----------------------------------------------------- 5⃣ *लंडन : संसदेत नवा कायदा केल्यासच युनायटेड किंग्डमला युरोपीयन युनियनमधून बाहेर पडता येईल: ब्रेक्झीट सचिव डेव्हिड डेव्हिस* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-काश्मीर - हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोधमोहीम सुरू* ----------------------------------------------------- 7⃣*औरंगाबाद: सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाची दुसऱ्या डावात नऊ बाद १८७ अशी स्थिती; पंजाबची विजयाकडे वाटचाल* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू* http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.html वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. _चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_ _शब्दांकन :- नासा येवतीकर, धर्माबाद_ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आराम हराम है *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). जागतिक बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉. २० नोव्हेंबर *२) भारतात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉. १४ नोव्हेंबर *३). भारतात कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केल्या जातो?* 👉. पंडित जवाहरलाल नेहरू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुहास चटने 👤 सुभाष चंदने 👤 शीतल चौगुले 👤 खंडू सोळंखे 👤 योगेश पाटील बादलगावकर 👤 विनोद पांचाळ 👤 मोहन लंगडापुरे 👤 भारत शेळके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " सत्य " चूकीच दिसूनही त्याच्यावर बोलता येत नाही सत्याच्या मार्गाने सहज कोणाला चालता येत नाही सत्याच्या मार्गा वरून माणूस कसातरी चालतो काही सत्य टाळतो अन् काही काहीच बोलतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ? हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,* *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।* *बळेविण शक्ती। बोलू नये॥* *या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.* *संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!* ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाच्या जीवनात कितीही सुख असले तरी तो सुखी नाही.कारण जास्तीच्या सुखाच्या मोहापायी आहे ते सुख सोडून त्यांच्या मागे धावण्याची जणू काही स्पर्धाच करत आहे.त्या मोहापायी आपण काय करत आहोत याचे भानही राहिलेले नाही.अशा वृत्तीने जर जीवनात जगण्याचा प्रयत्न केला तर सुखापेक्षा दु:खच अधिक भोगावे लागेल हे निश्चित. सुखासाठी आपले मन हे समाधानी असेल आणि अपेक्षा मर्यादित असतील तर आहे त्या सुखाचा आनंद जीवनात समाधानाने घेता येतो. * व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता -अ चे गाणे* अरे अरे अक्षरे अशी कुठ जाती अ चा अर्धा गोल अलगद खाली येशी अथक तूझ्या प्रयत्नाने अचूकता आली अविरत तूझ्या कार्याने अमूल्य अक्षरे वाचता आली अमूर्ताकडून मूर्ताकडे अशी तूझी वाटचाल असाध्य ते साध्य होई अतूल्य यश जीवनात येई *सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्ञानाचा दिवा तेवत ठेवा* द्रोण जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोण स्वतः परम गुरु होते. मात्र त्या एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरहि अर्जुन भोजन करत राहिला अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही." तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा।। एखादा आलाप असा खुलावा सारा आसमंत उजळून जावा।। एखादी तान अशी बरसावी सारी तृष्णा मिटून जावी।। एखादी सरगम अशी लहरावी वा-यालाही भूल पडावी।। एखादी लय अशी जुळावी सारी जाणीव विरुन जावी।। एखादा ताल असा भरावा अंतापर्यंत तोल रहावा।। एखादी सम अशी पडावी जिवाशिवाची गाठ व्हावी।। एखादा राग असा फुलावा अनंताला जाऊन भिडावा।। एखादा ख्याल असा मांडावा यमुनातीरी ताज बनावा।। एखादी ठुमरी अशी रंगावी इंद्रधनूची कमान व्हावी।। एखादं गीत असं छेडावं शब्दांपलिकडे बोलकं व्हावं।। एखादं भजन असं गावं निर्गुणाचं कोडं सुटावं।। एखादा श्रोता असा मिळावा अद्वैताचा स्पर्श घडावा।। एखादा संवाद असा जुळावा गंगेवरती चंद्र झुलावा।। एखादी मैफिल अशी जमावी गाभा-यागत पुनीत व्हावी।। .......प्रभा अत्रे

*एक बच्चे को आम का पेड़ बहुत पसंद था।* *जब भी फुर्सत मिलती वो आम के पेड के पास पहुच जाता।* *पेड के उपर चढ़ता,आम खाता,खेलता और थक जाने पर उसी की छाया मे सो जाता।* *उस बच्चे और आम के पेड के बीच एक अनोखा रिश्ता बन गया।* *बच्चा जैसे-जैसे बडा होता गया वैसे-वैसे उसने पेड के पास आना कम कर दिया।* *कुछ समय बाद तो बिल्कुल ही बंद हो गया।* *आम का पेड उस बालक को याद करके अकेला रोता।* *एक दिन अचानक पेड ने उस बच्चे को अपनी तरफ आते देखा और पास आने पर कहा,* *"तू कहां चला गया था? मै रोज तुम्हे याद किया करता था। चलो आज फिर से दोनो खेलते है।"* *बच्चे ने आम के पेड से कहा,* *"अब मेरी खेलने की उम्र नही है* *मुझे पढना है,लेकिन मेरे पास फीस भरने के पैसे नही है।"* *पेड ने कहा,* *"तू मेरे आम लेकर बाजार मे बेच दे,* *इससे जो पैसे मिले अपनी फीस भर देना।"* *उस बच्चे ने आम के पेड से सारे आम तोड़ लिए और उन सब आमो को लेकर वहा से चला गया।* *उसके बाद फिर कभी दिखाई नही दिया।* *आम का पेड उसकी राह देखता रहता।* *एक दिन वो फिर आया और कहने लगा,* *"अब मुझे नौकरी मिल गई है,* *मेरी शादी हो चुकी है,* *मुझे मेरा अपना घर बनाना है,इसके लिए मेरे पास अब पैसे नही है।"* *आम के पेड ने कहा,* *"तू मेरी सभी डाली को काट कर ले जा,उससे अपना घर बना ले।"* *उस जवान ने पेड की सभी डाली काट ली और ले के चला गया।* *आम के पेड के पास अब कुछ नहीं था वो अब बिल्कुल बंजर हो गया था।* *कोई उसे देखता भी नहीं था।* *पेड ने भी अब वो बालक/जवान उसके पास फिर आयेगा यह उम्मीद छोड दी थी।* *फिर एक दिन अचानक वहाँ एक बुढा आदमी आया। उसने आम के पेड से कहा,* *"शायद आपने मुझे नही पहचाना,* *मैं वही बालक हूं जो बार-बार आपके पास आता और आप हमेशा अपने टुकड़े काटकर भी मेरी मदद करते थे।"* *आम के पेड ने दु:ख के साथ कहा,* *"पर बेटा मेरे पास अब ऐसा कुछ भी नही जो मै तुम्हे दे सकु।"* *वृद्ध ने आंखो मे आंसु लिए कहा,* *"आज मै आपसे कुछ लेने नही आया हूं बल्कि आज तो मुझे आपके साथ जी भरके खेलना है,* *आपकी गोद मे सर रखकर सो जाना है।"* *इतना कहकर वो आम के पेड से लिपट गया और आम के पेड की सुखी हुई डाली फिर से अंकुरित हो उठी।* *वो आम का पेड़ कोई और नही हमारे माता-पिता हैं दोस्तों ।* *जब छोटे थे उनके साथ खेलना अच्छा लगता था।* *जैसे-जैसे बडे होते चले गये उनसे दुर होते गये।* *पास भी तब आये जब कोई जरूरत पडी,* *कोई समस्या खडी हुई।* *आज कई माँ बाप उस बंजर पेड की तरह अपने बच्चों की राह देख रहे है।* *जाकर उनसे लिपटे,* *उनके गले लग जाये* *फिर देखना वृद्धावस्था में उनका जीवन फिर से अंकुरित हो उठेगा।* आप से प्रार्थना करता हूँ यदि ये कहानी अच्छी लगी हो तो कृपया ज्यादा से ज्यादा लोगों को भेजे ताकि किसी की औलाद सही रास्ते पर आकर अपने माता पिता को गले लगा सके !

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार. 💥 जन्म :- १८५५ : गोविंद बल्लाळ देवल, प्रसिद्ध मराठी नाटककार. १८७३ : बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९१७ : वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. १९५४ : स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी. 💥 मृत्यू :- १२४० : रझिया सुलतान, गुलाम घराण्यातील कर्तबगार राजकर्ती. १७७० : जॉर्ड ग्रेनव्हिल,युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८६७ : पोप निकोलस पहिला. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक, आगीत जवळपास ७० ते ८० लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपीन्सच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी झाले रवाना* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : तांत्रिक कामांसाठी मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक. सकाळी १० ते ४.४५ दरम्यान वेगवेगळ्या लाईन्सवर करणार काम.* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : महिलांना स्वातंत्र्य द्या, महिला अत्याचार रोखण्यासाठी सांस्कृतिक परिवर्तन हवे. त्यासाठी गीता समजून घ्या. - खासदार सुब्रमण्यम स्वामी* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक : जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीच्या धडकेत समाधान वसंत वाघ (27) या शिक्षकाचा मृत्यू. जि.प.सदस्य गणेश अहिरे यांना अटक. सटाणा येथील घटना.* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक गारठले : राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका, नाशिकचा पारा घसरला, कालचे किमान तापमान १०.४* ----------------------------------------------------- 7⃣ *बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्‍या ज्युनियर पुरूष हॉकी  राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची करण्यात आली घोषणा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिण्याला पर्याय नाही* कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचे आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वसंतदादा पाटील* महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *_आपली चांगली वेळ जगाला सांगते की,_* *_आपण काय आहोत._* *_परंतु_* *_आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की,_* *_जग काय आहे..._* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते* 👉 काळा रंग *२) समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतो?* 👉 आयस्टर *३) भारतात विवाहाला मुलींसाठी किमान वय किती आहे?* 👉 १८वर्षे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 दिनेश तोटावाड 👤 सागर सतिश मक्कम 👤 महेश बी. शेटकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" वाईट "* कधी कधी रक्षक भक्षक बनतात असे झाले की लोक वाईट म्हणतात वाईट म्हणून घ्यायची कोणावर वेळ येऊ नये रक्षक कधीच कुठला कधीच भक्षक होऊ नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *असताना कोणीही दान करील, नसतानाही दान करता आले पाहिजे. स्वत: भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दु:खं आपलं वाटणं म्हणजे संवेदनशिलता. ती उसनी नाही घेता येत, ती असायला हवी नि असते. ती जाणिवेतून येते. 'चमडी देगा लेकिन दमडी नही,' म्हणणारी माणसं नुसती कंजुष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वत:च्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो मग त्याची परिणतीही हिंसक होते. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे 'स्वविसर्जन' खरे उच्चकोटीचे दान.* *निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात' घेण्याची कल्पना ही जगातली सर्वोत्तम कल्पना म्हणायला हवी. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहित असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपुर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगाना दान चांगलेच पण.. त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु बनविणे लाख मोलाचे. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं,'त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.*      ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●••               📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतेही काम हाती घ्यावे आणि प्रामाणिकपणे ते पार पाडावे त्यामध्ये यश मिळणारच हा काम करणा-यांचा सर्वसाधारण नियम आहे आणि तेही बरोबरच आहे. काम करत असताना जर काही कामात कुचराई केली तर केलेल्या कामात यश कसे मिळेल याची अपेक्षाही करणे चुकीचे आहे.काम पुर्ण न होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काढावे.काम करत असताना मनात कोणतेही चलबिचल करुन टाकणारे विचार आणू नये. त्यामुळे कामात व्यत्यय निर्माण होतो. पण ते काम आळस झटकून,जीव ओतून व ईमान इतबारे केले तर ते चांगल्या दर्जाचे व आत्मिक समाधान देणारे ठरेल.ह्या सा-या गोष्टीला तिलांजली दिली नाही तर काम तरी कसे होणार ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= होईन आई मी लेक तुझी लडिवाळ ! होऊन कुमाता नकोस तोडू नाळ... घेऊ दे मज नारी रूप तुझ्यासम अगं,जन्मू दे मज मी आता कळीसम... घेऊन जन्म मी फेडीन सारे पांग हे समजावूनी तू मूढ जनांना सांग... का नकोशी ? मी तुम्हांसी सांगा काही मी तर आहे या सृजनाची निर्माती... मजभोवती फिरती नात्यांचे हे बंध तरी पुत्र मोह का करतो तुजसी अंध... किती कपूत जन्मले सांग तुझ्या उदरात जे सोडून गेले तुजला वार्धक्यात... मजसाठी जागु दे तुझिया ठायी ममत्व मजविन कोठे या सृजनाला पूर्णत्व... घे समजून हे तू नकोस तोडू नाळ होईन आई मी लेक तुझी लडिवाळ... सौ प्रीती गोगटे 940437179 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुंदर बोधकथा* एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे. परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग. माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे. लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली. काही दिवसानंतर _ धाकटीसून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या . जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला. त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू. त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं. संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही. *तातपर्य* :- भांडण आणि इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं. ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते... *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌸💐✍💐🌸 *🌹ध्येय🌹* शाळेच्या बाहेर पाऊस पडत होता. वर्गामध्ये शिक्षकांचा तास चालू होता. तेव्हा शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न केला,"जर मी तुम्हाला प्रत्येकी १००-१००रु देऊ केले तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल?" त्यावर कुणी म्हटले की आम्ही विडीव्हो गेम घेऊ. कुणी सांगितले की क्रिकेट बॅट घेऊ. काही मुलींनी सांगितले की आम्ही बाहुल्या घेऊ. कुणी सांगितले की आम्ही चाॅकलेट घेऊ. असं असताना एक मुलगा काही तरी विचार करताना आढळला त्याला त्यानीं विचारले," तू काय करणार आहेस या १००रु चे ?" त्या वर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या आईला थोडं कमी दिसतं म्हणून माझ्या आईला मी या पैश्याचा नवीन चष्मा घेऊन देईन." सरांनी त्याला विचारले," तुझे बाबा नाहीत का ? तू चष्मा घेऊन देत आहेस ? वडील आईला चष्मा घेऊन देतील की ! तू का बरं तुझ्यासाठी काही नाही घेतं या पैश्याचं ?" त्यावर त्या मुलाने खिन्न स्वरात उत्तर दिले.ते उत्तर ऐकून शिक्षक जागीच स्तब्ध झाले. त्यांचे मन त्याचे हे उत्तर ऐकून भरुन आले.तो बोलला," सर, माझे वडील आता या जगात नाहीत.माझी आई लोंकांचे कपडे शिवून मला शिकवते आणि आता हळुहळु तिला कमी दिसायला लागले आहे. तिला आता कपडे शिवताना डोळ्यांचा ञास सहन करावा लागत आहे.ती कपडे बरोबर शिऊ शकत नाही. म्हणून मला तिला चष्मा घेऊन द्यायचा आहे कारण मी चांगला शिकू शकेन आणि मोठा माणूस बनून माझ्या आईला कायम सुखात ठेवु शकेन." त्यावर सर खुश होऊन बोलले," मला तुझे विचार अमुल्य वाटले." त्यावर त्यांनी त्याला आपल्या जवळचे १०० रु दिले आणि म्हणाले,"हे माझ्या वचनानुसार १०० आणि हे आणखी १००रु उधारी. जेव्हा तू स्वतः कधी कमवून आणशील तेव्हा मला परत कर. माझी ईच्छा आहे की तू खूप मोठा माणूस बन. त्या वेळी तुझ्या डोक्यावरुन माझाहात फिरु दे. मग मी धन्य झालो...." गेल्या १५ते १६ वर्षा नंतर बाहेर असाच पाऊस पडत होता. वर्गात तास चालु होता.आणि अचानक शाळेसमोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येऊन थांबते.शाळेतील सर्व स्टाफ सावधान होतो. शाळेत सगळीकडे शांतता पसरते. आणि.... एक दृष्य पाहून सर्वच थक्क होतात. एक जिल्हाधिकारी एका वृध्द शिक्षकापुढे वाकून पायावर डोके ठेवतोे आणि विचारतो," ओळखलंत का सर मला, मी तुमचा विद्यार्थी. तुमचे घेतलेले उधार१००रु परत करायला आलो आहे." शाळेचा स्टाफ स्तब्ध होऊन पाहत होता.त्या सरानीं वाकलेल्या नवजवान अधिकाऱ्याला उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन भरभरून रडू लागले. तो अधिकारीसुद्धा गळ्यात गळा घालून रडू लागला आणि डोऴे पुसत म्हणाला .. *"सर,आम्ही तुमच्या दिलेल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या पाठावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं आणि आमचं भाग्य फळाला आलं. सर असेच् आशिर्वाद असु द्या..!!"

📚📚📚📚📚📚📚 *माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ *📚राष्ट्रीय शिक्षणदिन📚* *आज दि.११/११/२०१७ रोजी जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड* *येथे भारताचे पहिले शिक्षणमंञी प्रमुख राजकीय पुढारी मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती ''राष्ट्रीय शिक्षण दिन" म्हणून साजरी करण्यात आली.*त्यांचे मुळ नाव मोहीउद्दीन अहमद असे होते.अबुलकलाम ही वाचस्पती पदवी त्यांची ही पदवी होती. आझाद हे टोपणनावाची उपाधी त्यांना मिळाली होती. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 👉 कार्यक्रमात प्रथम प्रतिमा पुजन शाळेचे मु.अ.मा.श्री चव्हाण सरांनी केले.त्यानंतर सर्वांनी पूजन करून घेतले. इयत्ता ५,६,७चाविद्यार्थींनी कु.सानिका,प्रांजली,कोमल,श्रद्धा यांनी मौलाना अबुल कलाम यांच्याविषयी माहिती सर्वांना सांगितली. 👉त्यानंतर शिक्षणा विषयी माहिती व महत्त्व थोडक्यात मी स्वतः सांगून आजचा हा जयंती सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला. *संदेशः मानवी जीवनसंस्कृती राखण्यासाठी शिक्षणाची गरज असते.शिक्षणाचे अंतीम ध्येय सेवामय माणसं निर्माण करणं हेच असतं.*" ➖➖➖➖➖➖➖ *✍वृत्तलेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 📚📚📚📚📚📚📚

*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏 हदगाव (नांदेड) 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय शिक्षण दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना. १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. 💥 जन्म :- १८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६७ सोहेल फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६९ मायकेल ओवेन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - लिओनार्डो डिकॅप्रियो, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९१८ - जॉर्ज लॉरेंस प्राइस, पहिल्या महायुद्धाचा शेवटचा बळी. २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *177 वस्तूंवरील जीएसटी 28 वरुन 18 टक्क्यांवर, जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय.* ----------------------------------------------------- 2⃣ *लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषक समृद्धी आयोगाची केली घोषणा* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे मारण्यास पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेडने दर्शवली सहमती, सूत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *कल्याण : शामसुंदर जोशी यांना मराठी भाषा संवर्धनसाठी याज्ञवल्क्य पुरस्कार, स्मिता कापसे यांना संशोधन व लेखनासाठी सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार प्रदान; शाल, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रोख रक्कम पुरस्कारचे स्वरुप.* ----------------------------------------------------- 5⃣ *फाईव्ह स्टार हॉटेल वगळता सर्व हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के लागणार जीएसटी.* ----------------------------------------------------- 6⃣ *धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अटेंभे प्र. वार्सा ग्रामपंचायत अंतर्गत १३ जि.प. शाळा राज्यात प्रथमच सौर शाळा करण्यात आल्या.* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली- शिक्षण बदलीविरोधातील याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टाने दोन शिक्षकांची याचिका फेटाळली. शिक्षण बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच - सुप्रीम कोर्ट.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आज स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती. संपूर्ण भारतात त्यांची जयंती " शिक्षणदिन " म्हणून साजरा केल्या जातो. त्यानिमित्त प्राथमिक शिक्षणाविषयी लेखप्रपंच.......              *प्राथमिक शिक्षणाचे महत्व* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मौलाना अबुल कलाम आझाद* मौलाना अबुल कलाम आझाद : ( ११ नोव्हेंबर १८८८–२३ फेब्रुवारी १९५८ ). भारताचे एक प्रमुख राजकीय पुढारी. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची प्रतिमा बनवायला वेळ लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधिशाची नेमणूक कोण करते?* 👉 राज्यपाल *२) कोणत्या कायदान्वये भारतात निवडणुकांचा पाया घातला गेला?* 👉 भारतीय परीषद कायदा १८९२ *३) भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्यपणे अंदाजपत्रक हा शब्द कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे?* 👉 कलम २६६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 ऋषिकेश बेळकोणीकर, धर्माबाद 👤 शिवकुमार इबितवार, पदवीधर शिक्षक 👤 शेषराव पाटील 👤 बालाजी पांडागळे, नांदेड 👤 रणजित लोखंडे, नांदेड 👤 संतोष पेटेकर, प्राथमिक शिक्षक 👤 सूर्यकांत राखोंडे, धर्माबाद 👤 माधव तनमुदले, येवती 👤 हरीश देसाई 👤 दिवाकर आष्टेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" राग "* गरीब असो वा श्रीमंत राग येत असतो सहनशीलतेचा ही कधी अंत होत असतो गरीब असो वा श्रीमंत राग आला पाहिजे कधी राग ही प्रगतीचा भाग झाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●🏝‼ *रामकृष्णहरी* ‼🏝●• 🏝🏝🏝🏝🏝🏝 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही माणसांचा स्वभाव वरवर एवढा चांगला असतो की,आपल्याला वाटते तो आपलाच आहे.आपण त्यांच्याशी खूप मैत्री करावी आणि आपल्या मनातले सारे जे काही असेल ते सांगून मन मोकळे करावे.पण असे करण्यापूर्वी थोडा विचार करा.ही माणसं तुम्ही समजता तशी तेवढी सरळ नसतात.मनात एक आणि ओठात एक असते.एवढेच नाही तर ती स्वार्थी, जळावूवृत्तीची व आपमतलबीअसतात, आपल्या मनातले काढून घेऊन तुमचा फायदा घेतात आणि तुमचीच तुमच्यामागे तुमच्या नावाचा दिंडोरा वाजवून तुमची बदनामी करतात.अशा माणसांना सहजासहजी आपले समजू नका. नाही तर तुमचे नुकसानच होणार आहे.अशा माणसांपासून थोडे दूरच रहायला शिका.अशी माणसे जोडण्यापेक्षा दूर ठेवलेलीच बरी हे केव्हाही लक्षात ठेवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालगीत* उठा माझ्या बालगोपालानों धरा सुर्य किरणांनी न्हाली उठा पटकन आळस झटका बघा शाळेची आता वेळ झाली शौचालयाचा करा आधी वापर निरोगी राहण्याचा एकच जागर साबण लावूनीया धूवा निर्मळ हात स्वच्छ आपुले घासा दात करुनी घ्या अंघोळ व्हा ताजेतवाने धूतलेलेच घाला कपडे प्रसन्न व्हा अंतरमनाने नाश्ता करुनी घ्या दूध पोळी काजू बेदाणे लागा पळायला आता शाळेत मोठ्या जोमाने दडपण नसते कधी शाळेत आता लिहूनी शिकूनी वाचा यशाची गाथा *सौ.सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दृढनिश्‍चय* श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्‍पक वृत्‍तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्‍य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. *तात्‍पर्य :-* दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही काही वेळेला दृढनिश्चय हेच इंगीत ठरते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*खरा कवी जाणणे* *एका राजाला त्याच्या खऱ्या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पिटवली. दवंडी ऐकताच राज्यभरातून हौशे-नौशे कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला. त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक गहन प्रश्न होता. थोडावेळ विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानाला आज्ञा केली कि या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा. राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तेथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली,"या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा."* *तरीही दहा वीस उरलेच. त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली कि या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका. राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तेथून पसार झाले. उरलेला कवी मात्र त्याच्या काव्यलेखनात मग्न होता. तो इतका रममाण झाला होता कि त्याला या आज्ञाच मुळी ऐकू गेल्या नाहीत. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यावर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला,"महाराज ! राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेंव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेंव्हा दरबारातून निसर्गाच्या सान्निध्यात निघून जाईन. माझी ही अट मंजूर असेल तरच मी राजकवी होतो नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो." राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या व खुश होवून त्याच्या मर्जीनुसार सगळे मान्य करून त्याला 'राजकवी' म्हणून घोषित केले.* *तात्पर्य- खरा कलाकार हा कुणाच्या मर्जीचा गुलाम नसतो.*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९३७ : जपानने शांघाय शहर जिंकले. १९४७ : जुनागढ भारतात विलीन झाले. १९९४ : डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध. २०१३ : सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८७७ : मोहम्मद इक्बाल, भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी. 💥 मृत्यू :-  २००३ - बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि. १९६२ : धोंडो केशव कर्वे, मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते.१९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रपरिषदेत केली.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमिला पार्कर यांचे भारतात आगमन* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : वीमा काढण्यासाठीही आता आधार कार्डची सक्ती, वीमा प्राधिकरणाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद चिघळला, सोमवारी सोलापूर बंदची हाक; सिद्धेश्वर भक्तांच्या बैठकीत धर्मराज काडादी यांची घोषणा* ----------------------------------------------------- 6⃣ *आशियाई महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने जिंकले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सायना नेहवालला महिला एकेरीचे विजेतेपद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परावलंबी जीवन* समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. परावलंबी जीवनात कसल्याही प्रकारची प्रगती होत नाही. व्यक्ती आळशी बनतो, त्याला काही करावे असे मुळीच वाटत नाही. म्हणून स्वावलंबी जीवन जगण्याचा नेहमी........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धोंडो केशव कर्वे* धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२) महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी  महाराष्ट्रात  पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते . *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?* 👉 जन गण मन *२) हे राष्ट्रगीत कोणी रचले आहे?* 👉 रवींद्रनाथ टागोर *३) या गीतास राष्ट्रगीत म्हणून कधी मान्यता मिळाली?* 👉 २४ जानेवारी १९५० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीपाद पटेल राउतवार, साहित्यिक मदनुर जि. निजामाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= "भूमिका " त्यांना भूमिका असू शकते आम्हाला नसू शकते का? त्यांची भूमिका दिसते तशी आमची दिसू शकते का? त्यांची भूमिका स्पष्ट दिसते तशी आमची दिसली पाहिजे प्रत्येकाची भूमिका शेवटी एकदम स्पष्टच असली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्यातील पहिल्या पंधरा, सोळा वर्षाचा कालावधी कमालीचा संवेदनशील असतो. या कालावधीत मुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असतात. शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आणि मानसिक विकासासाठी हा कालावधी महत्वाचा असतो. या दरम्यान मुलांसाठी सकारात्मक वातावरणाची पूर्तता करणे, ही पालकांची आणि समाजाचीही जबाबदारी असते. काही पालक त्यांच्या मुलांशी संवाद साधण्यात कमी पडतात. ए वन शाळा, काॅलेजात व क्लासमध्ये प्रवेश मिळवून देणे, आर्थिक बाबींची पूर्तता करणे, एवढीच जबाबदारी असल्यासारखे वागतात. स्वत: पैसे मिळविण्यासाठी धावत राहतात आणि मुलांवर आपल्या आपेक्षा लादून त्यांनाही आयुष्याच्या स्पर्धेत ढकलून मोकळे होतात.* *कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती किंवा दैनंदिन वाईट सवयी युवकांच्या नैराश्याला कारणीभूत ठरतात. नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षिले जाऊन वाईट सवयींचे शिकार बनतात. परिणामी सहका-यांशी, आई-वडिलांशी वाद होतात, त्याचे रूपांतर एकाकीपणात होते. एकाकीपण नैराश्याला निमंत्रित करते. नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची उत्सुकता विकसित करायला हवा. निसर्गाशी संवाद साधता यायला हवा. जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेऊन ती कृतीत उतरविणे जीवनात गरजेचे असते. विचार आणि आचार यांच्यात सुसंगती ठेवायला हवी. त्या त्या वयात सकारात्मक गोष्टी केल्याने व्यक्तिमत्व विकसित होते, आत्मविश्वास वाढतो, विवेकबुद्धी वाढते, निर्णयशक्ती वाढीस लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात..मन प्रसन्न करू..मोकळेपणाने बोलू आणि सकारात्मक होऊ.!* ••● 🍁 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍁 ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सुख आणि दुःख हे बरोबरच असतात.पण सुखासोबत दिवस कधी संपून जातात ते समजत नाही किंवा त्याचा कधी हिशोब ठेवणे नाही.पण नेमके दु:खालच्या बाबतीत तसे होत नाही.थोडे जरी दु:खूप झाले तरी त्याचा हिशोब आरडाओरडा करत लोकांना सांगत आणि स्वत: वेडेवाकडे तोंड करत सहन करत असतो.दु:खाचा जणू जगासमोर बाजारच मांडतो. सुखाचे तसे करत नाही.ते सहज कुणाला न सांगता एकटाच भोगत असतो.पण काही जरी असले तरी ते दोघेही जीवनात बरोबरीनेच राहतात हे विसरुन चालणार नाही.दोघांनाही जीवनात समानतेचा दर्जा आहे. कुणालाही कमी लेखू नये. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *माझी शाळा* मनापासूनी आवडते मला माझी शाळा कारण माझ्या शाळेत असते खडू आणि फळा... माझ्या शाळेत आहे हिरवी हिरवी बाग सुंदर अशा बागेत पक्षी गातात अनेक राग... माझ्या शाळेतील वर्गात आहे रंगरंगोटी छान तंत्रज्ञानाची धरुनी कास घेतो आम्ही नव नविन ज्ञान... दररोज नवोपक्रम उपक्रमात ज्ञानरचनावाद फरशीवरती करुनी रेखाटन शिक्षक देतात नवीन ज्ञान... कसली भिती ना अभ्यासाची चिंता हसत खेळत गिरवतो कित्ता रोज थोडे ज्ञानकण करुनी गोळा भयमुक्त आम्ही गाऊ यशाची गाथा... लिहा रे वाचा रे आता झाले कालबाह्य आपण सगळे मिळून शिकूया गाठूया आपले ध्येय ... उठावाच्या नकाशात दिसतात किल्ले क्षेत्रिय भेटीत दिसतात आपले जिल्हे परीपाठात नैतिक मूल्य जिल्हा परिषद माझी शाळा आहे अमूल्य... *सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक कवी व श्रीमंत माणूस* एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही. मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २०१६ - ५०० व १००० रूपयांच्या नोटावार बंदी 💥 जन्म :- १८५४ - योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १६६६ - हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती १९१९ - पु.ल. देशपांडे, मराठी साहित्यिक. १९२३ - जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता. 💥 मृत्यू :-  १९६० : सुब्रतो मुखर्जी, भारताचे हवाई दलप्रमुख. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणेः राज्यातील वाढत्या पार्किंग समस्येचा आढावा घेऊन नव्या पार्किंग धोरणासाठी राज्य सरकारने नेमली चार सदस्यीय समिती* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे- जिल्हा परिषदेची निवडणूक 13 डिसेंबरला, 14 डिसेंबरला होणार मतमोजणी* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर - कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला पावणेदोन कोटींचे उत्पन्न* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी आठ नोव्हेंबर काळा दिवस - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,* ----------------------------------------------------- 6⃣ *शेतक-यांना ३१ कोटी ५० लाखांचा फटका, भाताला क्विंटलमागे १२० रुपये कमी, रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव केला जाहीर* ----------------------------------------------------- 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक टी-20 सामन्यात भारताचा सहा धावांनी शानदार विजय, भारताचा जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर, तर न्यूझीलंडचा ईश सोढी मालिकावीर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परीक्षा गुरुजींची* आज सदा पायमोडे गुरूजी फारच चिंताग्रस्‍त दिसत होते. त्‍यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, काय करावे त्‍यांना कळतच नव्‍हते. कारण ही तसेच होते. आज शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्‍ट्र कार्यक्रम अंतर्गत सहामाहीची परीक्षा सुरू झाली आणि वर्गातील अर्धे मूले अनुपस्थित होते.  ज्‍यांना काहीच येत नाही ते नेमके......... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_69.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पु. ल. देशपांडे* पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठीलेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विचारांच्या जोरावर अन् ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?* 👉 मराठी *२) केरळची राज्यभाषा कोणती?* 👉 मल्याळी *३) मध्यप्रदेशची राज्यभाषा कोणती?* 👉 हिंदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागभूषण दुर्गम, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " बोलायचे एक " बोलायचे एक अन् करायचे एक आहे लोकांना वाटते यांचा व्यवहार नेक आहे वरवर दिसतं तसं खरंच सगळं नसतं वरवर दिसतं त्यापेक्षा खुप सारं वेगळं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675   =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सर्वसाधारणपणे प्रत्येक केलेल्या कामातून काही ना काही कोणतीतरी अपेक्षा ठेवतो आणि त्यापध्दतीने काम करतो. परंतु प्रत्येक कामातून फळांची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.एखाद्या कामातून मोबदला मिळाला नाही म्हणून दु:की व्हायचे नाही किंवा आता आपल्याला काहीच मिळत नाही म्हणून पुढे करणारे कामही थांबवायचे नाही.तर याही पुढे जाऊन आपण सातत्याने आपण आपले मन प्रसन्न व शांत ठेवून चांगले काम कसे होईल याकडे लक्ष देऊन जर का आपण जीवन जगलो तर आपण पुन्हा प्रत्येकवेळी फळांची अपेक्षा ही करणार नाही आणि आपले मनही त्या अपेक्षेने धावणार नाही.जीवनात सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असे नाही. त्यापध्दतीने जीवनात रहायला शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - विद्यादान* गुरुंना मिळाला ऐसा मान करण्या आपुले ज्ञानदान जगात नाही ऐसा काम महान विद्यादान आहे श्रेष्ठ दान... अशी आहे एकच गोष्ट कितीही वाटली तरी संपेना आत्मसात केली कितीही तरी ज्ञानाचा बिंदू गाठेना... एकट्या पूरते जो ठेवी ज्ञान बूद्धी त्याची गंजेल पार जो करी सदा विद्यादान बुध्दी होई त्याची तल्लख छान... विद्यार्थ्यांस देऊनी ज्ञान देऊया ऐसा कानमंत्र करुया सगळे विद्यादान शिकवूया सुसंस्काराचे तंत्र... *सौ. सुचिता नाईक किनवट* 9767513499 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वेळेचे महत्त्व* क्रांतिकारकांच्या मालिकेत चाफेकर बंधूचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तीनही भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरिता हंसत हंसत फासावर चढले. त्या दिवशी दामोदार चाफेकर यांना सरवरा जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. दामोदरांनी त्या दिवशी प्रसन्न व आनंदी होते. त्यांच्या हातात गीतेचे पुस्तक होते. ते गीतेचे वाचन करता करता शिक्षेकरता तयार झाले होते. फासीची वेळ होत होती पण इंग्रज अधिकारी सुस्त होते. इंग्रज अधिकारी दामोदरजींना फाशी देण्याच्या ठरल्या वेळेपेक्षा पाच सात मिनिटे उशीरांनी त्यांच्याजवळ आले. इंग्रज सरकारची ही बेपर्वाई दामोदरजींना खूपच खटकली. त्यांनी सहज शब्दांत त्यांची निर्भत्सना करत म्हटले, मी तर समजत होतो की इंग्रज सरकार वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. पण माझी ही समजूत आज चुकीची सिद्ध झाली. फाशीच्या दिवसाची प्रतीक्षा करणार्‍या व्यक्तीला ठरल्या वेळेनंतरही वाट पहावी लागणेयाची इंग्रज सरकारला लाज वाटली पाहिजे. तो दिवस आता पार दूर नक्कीच नाही की ज्या दिवशी भारतीयांच्या हाती शासनाचा कारभार येईल. तेंव्हा इंग्रजी अधिकारी त्यांना स्पष्टीकरण देण्याचा खूप प्रयत्न केला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९४१ : दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला १९४३ : दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली १९६५ : क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले १९८५ : कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले २००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली 💥 जन्म :- १८७६ : अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १८९७ : जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १९१५ : दिनकर द. पाटील, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक. १९४६ : सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री 💥 मृत्यू :-  १९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अमेरिकेतील टेक्सास चर्चमध्ये गोळीबार, 27 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली घोषणा* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे : संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर व ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती निर्मला गोगटे यांना जाहीर* ----------------------------------------------------- 4⃣ *मॉस्को - रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात आंदोलन केल्याने पोलिसांनी 380 जणांना केली अटक* ----------------------------------------------------- 5⃣ *उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन  (आरकॉम)  कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून 'व्हाइस कॉल सर्व्हिस' बंद करणार आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक, अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत केली चीनवर मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========                  *स्कुल चले हम* दिवाळीच्या सुट्या संपल्या आणि शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रास आज प्रारंभ होत आहे. काही जिल्ह्यात महिन्याच्या एक तारखेपासून शाळा सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या सुट्यामुळे गेली 15-20 दिवस शाळा आणि त्याच्या परिसरात सुनसान होते. परंतु शाळा सुरु झाल्या आणि परत एकदा मुलांचा किलबिलाट सुरु झालेला आहे. दिवाळीच्या सुट्यात........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_5.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========               *भालबा केळकर* प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (जन्म 23 सप्टेंबर 1920 - मृत्यू 06 नोव्हेंबर 1987 ) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्ये आणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले . पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रगतीचा मार्ग चुकांच्या काटयाकुटयातून जातो  जो या काट्या-कुटयांना भितो त्याची प्रगती कधीच होत  नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  भारत व पाकिस्तान  यांच्यामधील सीमारेषेचे नाव काय आहे?* 👉     रॅंडक्लिफ रेषा *२)  ही रेषा कोणी निश्चित केली होती?* 👉     सर रॅंडक्लिफ *३)  ही रेषा कधी निश्चित करण्यात आली?* 👉    १९४७ मध्ये *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुलभा कुलकर्णी, मुंबई 👤 सुनंदा पाटील 👤 शैलेंद्र मनसबदार 👤 योगी वैद्य 👤 दीपक माली 👤 महेश बल्फेवाड 👤 पवन नानी, म्हैसा 👤 श्रीकृष्ण सोप्पारी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " माॅर्निंग वाॅक " आता गुलाबी थंडी पडू लागली आहे वाॅकिंग वाल्यांची संख्या वाढू लागली आहे गुलाबी थंडी आहे तोपर्यंत संख्या वाढते कडाक्याची पडली की मग अंथरूणात पडते    शरद ठाकर सेलू जि परभणी 📱 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *"जीवनसंगीत ऐका" असे अनेक विचारवंतानी सांगितले आहे. आपल्या ह्रदयाच्या गर्भगृहात होणारा महन्मंगल घंटानाद कुणाला ऐकू येत नाही. त्यामुळे इतरांच्या भावना-संवेदनांची बूज राखण्याचा भाग तर कोसो मैल दूर.* *पहाटेची मनरम्य प्रसन्नता आपल्या जगण्यात उतरली पाहिजे. रात्रीच्या वेळी ध्यानस्थ बसलेल्या आकाशस्थ चांदण्या म्हणजे मौनयोगाची सर्वोच्च घटना होय. तो 'मौनयोग' आपला 'जीवनयोग' होणे याचाच अर्थ 'जीवनसंगीत' ऐकणे. त्यासाठी गरज असते प्रामाणिक जीवनव्यवहाराची.* *आपल्याला आपल्या आत जाता आले पाहिजे, मग कुणाच्याही अंतर्मनात प्रवेश करणे शक्य होते. 'दु:ख हे फळ आहे' हे ज्याला कळले त्याचेच ह्रदय 'जीवनसंगीत' ऐकू शकते. त्याचीच स्पंदनवीणा जीवनझंकार निर्माण करते.*               •••●‼ *रामकृष्णहरी*‼●•••            🌴🌴🌴🌴🌴🌴     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चित्रांमध्ये जेव्हा अनेक रेषा,आकार आणि रंगछटा एकत्रीत आल्यानंतर जेव्हा एक सुंदर चित्र तयार होते तेव्हा त्याचा आनंद एकट्या चित्रकारालाच होतो असे नाही तर इतरांनाही कलेचा आनंद आणि आस्वाद घेता येतो.त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातल्या स्वत:च्या आनंदाबरोबर इतरांनाही सामावून घेतले तर तुमच्या आनंदात अधिक भर पडेल आणि अधिकची माणसेही आपल्यामध्ये जोडण्यासाठी मदतही ठरेल.आपला आनंद इतरांनाही द्या म्हणजे त्यांच्या जीवनात असलेल्या दु:खाचा विसर होण्यास मदत होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९० 🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालगीत* गेली दिवाळी संपल्या सुट्या फस्त केल्या लाडू कंरज्या... चला रे माझ्या मित्रा दोस्ता शाळेत करुया आत्ता नवी मज्जा... कोणी मामा कोणी काका कोणी गेले आजोळी बाई मात्र आत्ता म्हणतील लिहा अनूभव चार ओळी... सगळ्यांच्या ऐकूनी रंजक गोष्टी गाली हसू येईल खूदकूनी वर्गातील हसऱ्या वातावरणाने आंनद दाटेल मनोमनी... चित्रे रंगवा कोडी सोडवा आपल्या घरचा आकाश कंदील बनवा दिवाळीच्या त्या प्रकाशाने आमचा वर्ग आज सजला... *सौ. सुचिता नाईक किनवट* 📱 9767513499 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                   *भगवान* एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌸🌸 आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले, "‘रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी..""मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत... त्यावर मुक्तानं विचारलं, "‘‘दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?"" तुम्ही म्हणता, ‘"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा..’" तसं इतर लोकांना का वाटत नाही...? त्यावर ज्ञानोबा म्हणाले, ‘"‘मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."" अगं मुक्ता ,""पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..."" म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...तुला सांगतो, ""सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."’’हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात, ‘"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."" हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते... तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, ‘"आनंदाचे डोही आनंद तरंग.."" नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, ‘"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’" संत अमृतराय म्हणतात, ‘"अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."’ संत सेना महाराज... म्हणतात, ‘"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची...’" आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो....असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, ‘"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे...""संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "‘काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती....""

*शिक्षकांनी शिक्षकांसाठी केलेली फ्रेश मॉर्निंग बुलेटिनची सेवा* सोशल मीडिया मध्ये फेसबुकच्या नंतर व्हाट्सएप्पचा वापर खुप वाढला. परंतु लोक याचा चांगला वापर करण्याऐवजी रोज सकाळी सुप्रभात आणि संध्याकाळी शुभ रात्रीच्या पोस्ट टाकून परेशान करतात, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. ग्रुपमध्ये तर सांगायला सोय नाही काही महत्वाचे तर काही खुपच तकलादु पोस्ट पाहण्यास मिळतात. त्यामुळे सर्व सदस्य मंडळी कंटाळून जातात. ग्रुप सोडता ही येत नाही आणि संदेश स्वीकार केल्याशिवाय पर्याय नसतो. अश्या या विपरीत परिस्थितीत "नासा ग्रुप धर्माबाद" चे एडमिन असलेले प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक ना. सा. येवतीकर यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनी  *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* पोस्ट करण्यास सुरुवात केली. ज्यास नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले असून आज तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहेत. शाळेतील शिक्षक आणि मुलांना उपयोगी पडेल अशी सेवा ते रोज सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत मोबाईलवर अविरतपणे पोस्ट करीत आहेत. *कशी चालू झाली ही बुलेटिन* याबाबत माहिती जाणुन घेतली असता मिळालेली माहिती अशी शाळेत परिपाठाच्या वेळी काही माहिती एकत्रित मिळत नाही तेंव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांची खुप धावपळ होते. ती धावपळ कशी कमी करता येईल या उद्देश्याने ह्या बुलेटिनचा जन्म झाला. सुरुवातीला फक्त एका ग्रुपच्या मर्यादेत असलेली ही पोस्ट काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. आज राज्यातील जवळपास 95 टक्के शिक्षकांच्या मोबाईलवर ही पोस्ट बघायला मिळते. या बुलेटिनचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ना. सा. येवतीकर आपल्या खास निवेदन शैलीत बुलेटिनची ऑडियो क्लिप तयार करतात आणि जणू आपण आकाशवाणी वरील सकाळच्या बातम्या ऐकत आहोत असा भास होतो. यामुळे प्रत्येकजण या बुलेटिनची सकाळी सकाळी आतुरतेने वाट पाहत असतात. या बुलेटिनमधून गोंदियाचे संतोष रहांगडाले ( दिनविशेष ), कुंडलवाडीचे कुणाल पवारे ( ठळक बातम्या ), रायगडचे सौ. भारती कुंभार ( सुविचार ), धर्माबादचे सर्पमित्र क्रांती बुध्देवार ( विशेष माहिती ),वसमतच्या साहित्यिका सौ. संगीता देशमुख ( प्रश्नमंजुषा ), नागोराव सा. येवतीकर ( माझा वाढदिवस ), सेलूचे कवी शरद ठाकर ( गुगली ), मुंबईचे संजय नलावडे ( विचारधन ), नांदेडचे व्यकंटेश काटकर (विचारवेध ), किनवटच्या कवयित्री सुचिता नाईक (काव्यसरिता ) आणि हदगावच्या श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( बोधकथा ) याशिवाय गुगलयान असे अनेक उपक्रम या टीमकडून रोज राबविले जातात. तसेच या टीममधील सर्व सदस्य व्यवसायाने शिक्षक आहेत हे ही एक विशेष बाब आहे. म्हणजे सर्व शिक्षकांनी मिळून आपल्या शिक्षकांसाठी आवश्यक असलेली माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा ते प्रयत्न करतात. महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांचे ब्लॉग खुप सूंदर आणि माहितीपूर्ण आहेत त्यांची सर्व शिक्षक मंडळीना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या ब्लॉगची लिंकसुद्धा या बुलेटिनमध्ये जोडण्यात येते. *बुलेटिन ऑनलाइन रेडियोवर* नाशिकच्या गुरुकुल रेडियोच्या शेखर ठाकुर यांच्याशी संपर्क करून सदरील बुलेटिनची ऑडियो गुरुकुल रेडियोवर प्रसारित करून संपूर्ण महाराष्ट्रात ही बुलेटिन पोहोचली. तसेच या बुलेटिनची शैक्षणिक बाबीसाठी महत्वपूर्ण अशी नोंद प्रसिध्द शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दैनिक लोकमतच्या मंथन पुरवणीत " मोबाईल मुलांचा अभ्यासु दोस्त " या त्यांच्या लेखात घेतली हे विशेष.  आपल्या शाळेच्या अध्यापन कार्यानंतर राहिलेल्या वेळाचा सदुपयोग करताना त्यांनी छंद म्हणून सुरु केलेली सेवा आज अत्यावश्यक झाली आहे. काही कारणास्तव एखाद्या दिवशी बुलेटिन पोस्ट झाली नाही तर लगेच अनेक वाचक " आज बुलेटिन का आले नाही " असे प्रश्न विचारून त्यांना भंडावुन सोडतात. शब्दांकन : कुणाल पवारे, सहशिक्षक जि. नांदेड

💦🍀💦🍀💦🍀💦*स्वच्छतेची घेऊया आण*सख्यासोबत्यांनो या हो यास्वच्छता करूया मिळूनियास्वच्छ भारत सुंदर भारत अभियान राबवू या.सुंदर स्वच्छ गाव बनऊयाअभिमान गावाचा वाढवूयाया हो या हो बालजवानांनोसुंदर भारत स्वच्छ भारत करुया.स्वच्छतेचे दूत आपण आरोग्याचे धडे देऊयारोगराईला पळववून लावूनीनिरोगी गाव करुया.घरी बांधूनीया शौचालय वापर त्याचा करुया अभिमान बाळगूनी गावाचास्वाभिमानाने जीवन जगूया.कचरा कचरा वेचूया विल्हेवाट त्याची लावूयाजाणूनी घेऊया पर्यावरणाचे संवर्धन प्रदूषणाला आळा घालूया.या हो या हो सख्यासोबत्यांनोया हो या हो बाल जवानांनो सारेच सारे या हो याहोदूत स्वच्छतेचे बनूयाआण आपण घेऊयास्वच्छ भारत करुया.🍀🌱🍀🌿🍀🌿🍀 *स्वरचित काव्य*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.)जि.प.प्रा.शाळा वाटेगावता.हदगाव जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *👭बालसभा👬* *वर्ग: तिसरी* *अध्यक्षः कु.तन्वी जाधव**मार्गदर्शकः कु.ज्योती , ईश्वरी जाधव**प्रमुख अतिथीः साईनाथ तलवारे,गणेश, पंजाब,दुर्गा,जाधव वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी, दिनेश...**विषयः पाण्याचे महत्त्व*.💧💦🌍🌳🍀🌴🌱🌿💦💧💦💧*आज माझा वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित करून प्रथमतः प्रतिमा पुजन केले.*💐💐💐💐*व त्यानंतर सर्वांचे स्वागत करून झाल्यावर पुढील कार्यक्रमास सुरूवात केली.**पाण्याचे महत्त्व ह्या विषयावर माहिती सांगितली.पाण्याचे उपयोग , स्तोञ,वापर इत्यादी ....**कु.सृष्टी, दुर्गा हिने स्वरचित कविता म्हणून दाखविली.**उद्देशः मुलांना खूप उत्साह आनंद वाटला.आनंददायी वातावरणात मनोरंजकता निर्माण झाली.*🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹*💎 *उपक्रमाचे नाव:**१) गौरीगणपतीचा उत्सव* *🌻गौरीचापुजनास ठेवलेले पदार्थ(गोड,तिखट), फळे, समोर ठेवलेला साज (प्राणी , पक्षी, धान्य राशी,शोभेचा वस्तू इतर साहीत्य इत्यादी ...*💎 *वर्ग: तिसरी* दि.२९-०८-२०१७ रोजी माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गौरीपुजनाचा सण तुमच्या घरी कसा साजरा करतात ते तुमच्या शब्दात लिहून आणा असे सूचविले होते.ज्यांचेकडे तो सण घरी साजरा करत नाही पण शेजारील घरी ,नातेवाईक यांच्याकडे जाऊन साजरा करत आहे त्यांनी लिहा किंवा तोंडी माहिती सांगा.🌻🌻🌻🌻🌻🌻त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व तद्वतच ह्या सणाविषयी माहिती सांगितले . मुलांनी अतिशय छान माहिती लिहून आणली.अशा आनंदरुपी वातावरणात गौरीपुजनाचा सण साजरा केला. *🌻उद्देशः*🌻🌹आनंददायी वातावरण🌹ग🌹सर्व साहित्याची माहिती.👉या उपक्रमातुन अशा प्रकारे मुलांचे लेखन झाले. काही क्षणचिञे.👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖🌻🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे 🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *👭बालसभा👬* *वर्ग: तिसरी* *अध्यक्षः कु.तन्वी जाधव**मार्गदर्शकः कु.ज्योती , ईश्वरी जाधव**प्रमुख अतिथीः साईनाथ तलवारे,गणेश, पंजाब,दुर्गा,जाधव वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी, दिनेश...**विषयः पाण्याचे महत्त्व*.💧💦🌍🌳🍀🌴🌱🌿💦💧💦💧*आज माझा वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित करून प्रथमतः प्रतिमा पुजन केले.*💐💐💐💐*व त्यानंतर सर्वांचे स्वागत करून झाल्यावर पुढील कार्यक्रमास सुरूवात केली.**पाण्याचे महत्त्व ह्या विषयावर माहिती सांगितली.पाण्याचे उपयोग , स्तोञ,वापर इत्यादी ....**कु.सृष्टी, दुर्गा हिने स्वरचित कविता म्हणून दाखविली.**उद्देशः मुलांना खूप उत्साह आनंद वाटला.आनंददायी वातावरणात मनोरंजकता निर्माण झाली.*🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹*📚 *उपक्रमाचे नाव:**१)चिठ्ठी उचला माहिती तोंडी सांगा व त्यानुसार कमीतकमी पाच प्रश्न विचारा व लिहा.* 〰〰〰〰〰〰〰भाजीवाली मावशी,फळेवाले,टेलर,काका कंड्याक्टर,पोस्टमन,अंगणवाडीताई,फुगेवालामामा,गँरेजवाले चाचा,शेतकरीदादा,फोटोग्राफर,डाँक्टर,अँटोवाले,सुतारमामा,खिचडीवालेमामा,ट्र्ँफीकवालेमामा,ईस्ञीवालेमामा(प्रेस),किराणादुकानदार,लोहारमामा,मदतनीसमावशी,इलेक्ट्रिक वस्तू विक्रेता.*🌻*💎 *वर्ग: तिसरी* दि.२०/०९/२०१७ आज माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गोल बसवूनवरील दिलेल्याप्रमाणे विस चिठ्ठ्या पटसंख्येप्रमाणे तयार केल्या व विद्यार्थ्यांनी एक एक उचलून चिठ्ठी वाचली.व त्याप्रमाणे थोडक्यात माहिती पण सांगितले.ज्यांना ज्या नावाची जी चिठ्ठी आली त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारले व लेखनही केले. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻*🌻उद्देशः*🌻वेगवेगळ्या कामाविषयी माहिती मिळते प्रश्न निर्मिती कौशल्य निर्माण होणे. तसेच जे विद्यार्थी ह्या कौशल्यात मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न व सराव होतो.*विद्यार्थ्यांची आनंदीवृत्तीची जोपासना करणे.नाविण्यता निर्माण करून आपल्या निकषाकडे वळणे.*👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖🌻🌻🌻🌻🌻🌻🌻✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

*🌹जीवन विचार🌹*〰〰〰〰〰〰〰http://www.pramilasenkude.blogspot.in〰〰〰〰〰〰〰*जीवनात स्वच्छता, आचार-विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.*ज्या भांड्यात पाणी ठेवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे लागते.त्याप्रमाणे जीवनाची उभारणी जिच्यावर करायची ती श्रद्धा निर्मळ असली पाहिजे.म्हणजे आपल्याकडून कोणाचेही वाईट होणार नाही चांगलीच कर्म घडतील.आपली बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट असेल तरच आपण नेमका निर्णय घेऊ शकतो.माणसाने भोगलालसा आणि सत्ताभिलाषा यांचे आवरण काढून आपली बुद्धी स्वच्छ व सात्त्विक ठेवली पाहिजे.🌻🌻🌻🌻🌻🌻🌻*〰〰〰〰〰〰〰**✍शब्दांकन/ संकलन*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगावता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

📙📚 *गाणे मुळाक्षरांचे*📚📙🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷कमळातील क पाण्यातच राहिलाख चा खटारा आम्ही नाही पाहिला ग च्या गळ्यात घालायची माळ घ च्या घरात रांगते बाळच च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊछ ची छत्री घेऊन पावसात जाऊ ज च्या जहाजात बसू कधीतरी झ च्या झबल्यात दिसेल न मी परीट चे टरबूज गोल गोल फिरतेठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते ड चा डमरू वाजे किती छान ढ चे ढग वाटे कापसाचे रानन च्या नळावर पाणी पिऊ चलाण चा बाण कसा आभालात गेला त च्या हातामध्ये मोठी तलवार थ चा मोठा थवा जाई दूर फारद च्या दरवाजात आहे कोण उभाध च्या धरणात पाणी किती बघा प चा पतंग ऊंच ऊंच फिरे फ च्या फणसात गोड गोड गरेब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मानभ चे भडंग लागते छान म म मगर ही पाण्यातच राही य यमक कवितेत येईर च्या रथाला चार चार घोडेल चे लसून भाजीत टाकू थोडे व च्या वजनाचे आकारच वेगळे श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळेष च्या षटकोनाला बाजू कोन सहास च्या सशाचे मोठे कान पहा ह चे हरिण चाले तुरू तुरू ळ च्या बाळाला नका कोणी मारूक्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीरज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे.

*📚सहशालेय उपक्रम📚* *👭बालसभा👬* *वर्ग: १ ली ते ७वी**विषयः स्वच्छतेचे महत्त्व*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *अध्यक्षः वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी तलवारे**प्रमुख अतिथीः वर्ग तिसरीतील ईश्वरी जाधव वर्ग पाचवीतील सानिका जाधव ...**मार्गदर्शन व सुञसंचलन* *वर्ग सातवीतील कु.विजया कदम, कु.कोमल मानेगोविंदवाड*.💧💦🌍🌳🍀🌴🌱*आज दि. २३/०९/२०१७ रोजी वर्ग पहिली ते सातवी पर्यंतचा सर्व विद्यार्थ्यांची सामुहीक बालसभा आयोजित केली होती.*💐💐💐💐💐💐स्वच्छतेचे महत्त्व ह्या विषयावर बालसभेतील सहभागी मान्यवर विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.तसेच काही विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, स्वरचित स्वच्छतेवरील कविता, शौचालयाचा वापर, परिसर स्वच्छता ह्यावर सविस्तर चर्चा व महत्त्व सांगितले *उद्देशः स्वच्छतेचे महत्त्व जाणणे, बालसभेत मुलांना खूप उत्साह आनंद वाटणे.*💐💐💐💐💐💐💐*वैशिष्ट्यपूर्ण*मु.अ.श्री चव्हाण सर, स.शि.श्री एस.बी.चव्हाण सर तसेच शाळेतील आम्ही सर्व सहकारी यांनी परिपाठातील सहभागी उत्कृष्ट ,उत्साही, गुणवंत विद्यार्थी यांचा पेन देऊन अभिनंदनपर सत्कार केला.🌻🌻🌻🌻🌻🌻〰〰〰〰〰〰〰✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)🙏🏻*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड

*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹*उपक्रमाचे नावः*📚माझा शब्दसंग्रह*📚विषयः मराठी〰〰〰〰〰〰〰आज दि.०५/१०/२०१७रोजी माझा तिसरीचा वर्गातील विद्यार्थ्यांना 'माझा शब्दसंग्रह' ह्या उपक्रमांतर्गत बाराखडीप्रमाणे बालभारती या पुस्तकातील शब्द प्रत्येकाने शोधून लिहात्यानंतर जोडाक्षर/जोडशब्द प्रत्येकी एकएकलिहावयास लावले.मूलांनी शब्द मन लावून शोधून काढले आणि लेखन केले.〰〰〰〰〰〰〰उद्दिष्टः 👉शोधून शब्द काढल्यामुळे बाराखडीचा नियमाने लेखन व वाचन झाले.👉 शब्दसंपत्तीत वाढ 〰〰〰〰〰〰〰*संदेशः 📚"शिक्षणाच्या उदात्त हेतूत केवळ ज्ञान अपेक्षित नसून कृतीदेखील अपेक्षित असते."*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀➖➖➖➖➖➖➖✍ संकल्पना लेखन वर्गशिक्षिकाश्रीमती प्रमिलाताई सेनकुडेजि.प.प्रा.शा.वाटेगावता.हदगाव जि.नांदेड.

*माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹* उपक्रमाचे नावः *📚माझा शब्दसंग्रह*📚 विषयः मराठी 〰〰〰〰〰〰〰 आज दि.०५/१०/२०१७ रोजी माझा तिसरीचा वर्गातील विद्यार्थ्यांना 'माझा शब्दसंग्रह' ह्या उपक्रमांतर्गत बाराखडीप्रमाणे बालभारती या पुस्तकातील शब्द प्रत्येकाने शोधून लिहा त्यानंतर जोडाक्षर/जोडशब्द प्रत्येकी एकएक लिहावयास लावले.मूलांनी शब्द मन लावून शोधून काढले आणि लेखन केले. 〰〰〰〰〰〰〰 उद्दिष्टः 👉शोधून शब्द काढल्यामुळे बाराखडीचा नियमाने लेखन व वाचन झाले. 👉 शब्दसंपत्तीत वाढ 〰〰〰〰〰〰〰 *संदेशः 📚"शिक्षणाच्या उदात्त हेतूत केवळ ज्ञान अपेक्षित नसून कृतीदेखील अपेक्षित असते."* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ➖➖➖➖➖➖➖ ✍ संकल्पना लेखन वर्गशिक्षिका श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰*🌷🌷जीवन विचार*🌷🌷〰〰〰〰〰〰〰*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)**〰〰〰〰〰〰〰*मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही.सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात.पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते.मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण दिली...*संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"*माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.नावेतील पाण्याने जसा धोका होतो तसा घरातील धन वाढल्याने धोका होतो.〰〰〰〰〰〰〰*'आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.'*〰〰〰〰〰〰〰🌺🌸🌺🌸🌺🌸🌺*🙏शब्दांकन/संकलन*🙏*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*जि.प.प्रा.शा.वाटेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in


*आईवडिलच जीवनाचा आधारस्तंभ* "पंखे, लाईट बंद न करता बाहेर का निघून जाता?" "टीव्ही चालू आहे आणि त्याच्यासमोर कुणीच नाही. तो पाहिला बंद करा" "पेन स्टँड वर ठेवा, नाहीतर खाली पडेल" मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणासाठी अशा सूचना अजिबात आवडत नसतात. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे. प्रत्येक मध्यमवर्गीय घरात थोड्या फार फरकाने हीच गोष्ट असते. काल जोपर्यंत तो वडिलांबरोबर या घरात रहात होता तोपर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं. पण आज त्याला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचं होतं. "मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्की सोडणार". वडिलांची बोलणी असह्य झालीत. असं त्याला वाटत होतं. तो मुलाखतीसाठी निघाला. "कुठलंही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे, आणि उत्तर आलं जरी नाही तरी ठोकून दे" असं सांगून वडिलांनी त्याला लागणार होते त्यापेक्षा जास्त पैसे दिले. मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचला. तिथे प्रवेशद्वारावर कुणीच सुरक्षा कर्मचारी नव्हता. दरवाजा पण उघडाच होता. दरवाजाचं ल्याच व्यवस्थित बसवलं नव्हतं. त्यामुळे दरवाजा सारखा आपटत होता. त्याने ते दरवाजा आपटायचा बंद केला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. आत गेल्यावर दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. बागकाम करणाऱ्या माणसानं बागेतील नळ उघडाच ठेवला होता. पाणी वाहत होतं आणि तो कर्मचारी कुठं दिसत नव्हता. याने वाहणारा नळ बंद केला आणि पाईप व्यवस्थित करून ठेवली. स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं. "पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील" असं सूचना फलकावर लिहिलं होतं. तो हळूच जिना चढू लागला. काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी १० वाजून गेले तरी तसेच होते. त्याला वडिलांचे शब्द आठवले "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला. त्या विचारातच त्याने दिवे बंद केले. वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पहात बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला. त्याने भीतीयुक्त उत्सुकतेने हॉलमध्ये प्रवेश केला. दरवाजाजवळ "सुस्वागतम" लिहिलेली चटई होती. त्याच्या लक्षात आले की ती चटई दुमडली होती. कुणाच्या तरी पायात अडकायची शक्यता होती. त्याने चिडूनच ती चटई सरळ केली. त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांच्या ओळींमध्ये त्यांच्या बोलावण्याच्या प्रतीक्षेत अनेक लोक बसले होते, तर मागील काही ओळी रिक्त होत्या, परंतु त्या ओळींवरचे अनेक पंखे विनाकारण चालू होते. त्याने पुन्हा आपल्या वडिलांची वाणी ऐकली, "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" त्या तिडिकी सरशी त्यांने गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या. अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसर्ऱ्या दरवाजातून बाहेर पडतांना दिसत होते. त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. तो आत गेला आणि न घाबरता मुलाखती साठी उभा राहिला. मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले, "तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता?" त्यांला समजेना की, "हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे, किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली?" तो गोंधळून गेला. "आपण काय विचार करीत आहात?" बॉसने विचारले. "आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही. काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याहीच्या कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही. म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवली. "आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने रबरी नळी, स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत. आपण असे फक्त एकच उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे", बॉस म्हणाले. आपल्या वडिलांच्या शिस्त व सुचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे. आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे. या प्रसंगामुळे त्याच्या वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे विसर्जित झाला. त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि सुखाने परत आपल्या घरी जायला निघाला. आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे! दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात. आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे. तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात. आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते. पण वडीलांचं तसं नसतं. ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहु शकत नाहीत. आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो; परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते. आई जेंव्हा म्हातारी होते, तेंव्हा ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते; परंतु पित्याला ते करता येत नाही. तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो. म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही. 〰〰〰〰〰〰〰〰

आज परत एकदा *नकळत* *मुंगी* तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं *पान* आणि *कबुतराची* वाट पाहू लागली. मीच का सतत हिला वाचवावे ..? हा कबुतराचा *अहंकार* आड आला. झाडावरच बसून *असहाय्* मुंगीला मरताना पाहू लागले... कबुतराने *मदत* करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली...तरी कबुतर आपल्याच विचारात मश्गुल होते. मुंगी असहाय्तेमुळे *गतप्राण* झाली... कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं... *पारधी* येणार हेच विसरून गेलं... पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला....! कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. *झाड* मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी,कबुतर मेल्याचं दुःख होतंच ..... पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं !* *अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते !

आत्मसात केलेले ज्ञान एका महात्म्याचे दोन शिष्य होते. दोघेही शिकलेले कथाकार होते. जेव्हा महात्म्याचा मृत्यूजवळ आला, तेव्हा ‘वारस कोणाला करावे ? कुणाला गादी द्यावी’, हा विचार महात्म्याला पडला. मग त्याने दोन फळे घेतली. त्या शिष्यांना एक-एक फळ दिले आणि सांगितले, ‘‘ही फळे अशा जागी जाऊन खा की, तिथे तुम्हाला पहाणारा कुणीच नसेल.’’ एका शिष्याने खोली बंद केली आणि फळ खाल्ले. दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला; पण कुणी नाही, असे स्थानच त्याला सापडले नाही; कारण देव सर्वत्र आहे. त्या शिष्याने केवळ शब्दज्ञान न घेता ज्ञान आत्मसात केले होते. अर्थातच गुरूंनी त्याला उत्तराधिकारी केले. 〰 संकलित

मो-:मोहून टाकले जगाला तुम्ही अहिंसेच्या तत्त्वाने ह-:हक्क मिळवून दिले सत्याने न-:न जातपात मानली तुम्ही खरा मानवधर्म जगाला दिला दा-:दाही दिशात उभी केली चळवळी स-:सत्त्याचा आग्रह धरला कायम तुम्ही क-:कधी कधी तुम्ही तुरूंगवासही भोगला र-:रणरणत्या उन्हातही काढली दांडीयात्रा म-:महानता किती सांगू तुमची शब्द अपूरे पडे चं-: चंपारण्य असो वा असहकार असो पुढाकार नेहमी घेतला द-:दरवळले गोरगरीबात तुम्ही पुन्हा परतून याल का गां-:गांधी हे सत्त्याचे खरे उपासक सत्य हे ईश्वर आणि ईश्वर हेच सत्य धी-:धीटपणा वाढला जगामध्ये तुमच्या त्या आचार विचाराने सांगा पुन्हा परतून तूम्ही याल का? जागतिक अहिंसा दिन संकलित

खुपच सुरेख रचना आहे *मन*... *मन*...एक अवयव.... ....डोळ्यांना न दिसणारा..! *मन*...एक विचार.... ....आपले आचार ठरवणारा..! *मन*...एक भावना.... ....सर्वांना जाणवणारी..! *मन*...एक व्याख्या.... ....लिहिता न येणारी..! *मन*...एक फुल.... ....आनंदात डूलणारं..! *मन*...एक वज्र.... ....संकटांशी लढणारं..! *मन*...एक अस्तित्व.... ....नाकारता न येणारं..! *मन*...एक फुलपाखरू.... ....हाती न येता नुसतच रंगवून जाणारं..! *मन*...एक वाहन.... ....क्षणात विश्वाची सफर करणारं..! *मन*...एक यंत्र.... ....कधी भूतकाळ तर कधी भविष्यात नेणारं..! *मन*...एक पुस्तक.... ....सहज वाचनात येणारं..! *मन*...एक व्यक्तिमत्व.... ....माणूस घडवणारं..!

*हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता* ‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा त्यांच्या पाठीवर मारला. त्या वेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव केला नाही.’

*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *जीवनात स्वच्छता, आचार-विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.* ज्या भांड्यात पाणी ठेवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे लागते.त्याप्रमाणे जीवनाची उभारणी जिच्यावर करायची ती श्रद्धा निर्मळ असली पाहिजे.म्हणजे आपल्याकडून कोणाचेही वाईट होणार नाही चांगलीच कर्म घडतील. आपली बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट असेल तरच आपण नेमका निर्णय घेऊ शकतो.आणि असा घेतलेला निर्णय कोणाचेही नुकसान करीत नसतो. माणसाने भोगलालसा आणि सत्ताभिलाषा यांचे आवरण काढून टाकले पाहिजे आणि आपली बुद्धी स्वच्छ व सात्त्विक ठेवली पाहिजे.मगच सर्वांचे कल्याण होईल. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी "खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते." पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…! पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं.. आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही. सत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो -पु. ल. देशपांडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *2020 पर्यंत भारतात 5 जी मोबाईल नेटवर्कसाठी चाचपणी, रोडमॅप निश्चित करण्यासाठी केंद्राकडून समिती स्थापन.* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे - थेट सरपंच निवड प्रक्रियेतुन जिल्ह्यातील पहिला सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग - मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा, ३ ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश अन्यथा अंगणवाडी कर्मचारी बडतर्फ होणार,* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - जिल्ह्यातील मान्यता नसलेल्या 54 शाळांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *एसटी कर्मचारी वैद्यकीय दृष्टया अपात्र ठरल्यास त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेता येणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मंदीत नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका, सरकारला घरचा आहेर.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामना, व्हाईट वॉश देण्याचा भारतीय संघाचा इरादा* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उद्याची सुंदर पहाट........!* आर्थिक स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. बातमी वाचून अनेक युवकांना धक्का बसला असेल कारण गेल्या दहा वर्षापासून सरकार........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BrokuXN1pSN आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यास जी ने बनाया बासर का सरस्वती मंदिर* वाग्देवी, मां वीणापाणि, शारदा, विद्यादायिनी आदि नामों से स्मरण की जाने वाली मां वाणी अर्थात् सरस्वती जी के भारत में दो ही प्राचीन देवस्थल माने जाते हैं – पहला आंध्र प्रदेश में जो ऋषि वेद व्यास द्वारा बनाया गया था। आंध्र प्रदेश के इस बासर स्थित वैदिककालीन देवस्थल के बारे में कहा जाता है कि कुरुक्षेत्र युद्ध से निराश और उदास होकर ऋषि व्यास, उनके पुत्र शुकदेव जी एवं अन्य अनुयायी दक्षिण की ओर तीर्थयात्रा पर चल पड़े और गोदावरी के तट पर तप के लिए डेरा डाल दिया। उनके निवास के कारण वह स्थान व्यासर कहा जाने लगा जो कालांतर में बासर हो गया। ऋषि व्यास नित्यप्रति जब स्नान करके आते तो गोदावरी की 3 मुट्ठी बालू लाते थे और 3 ढेर बना देते थे। बालू में हल्दी का भी घोल मिलाया गया और फिर धीरे-धीरे ये ढेर आकार लेते गये और इन्होंने तीन देवियों लक्ष्मी, शारदा एवं गौरी का रूप ले लिया। स्थानीय विश्वास के अनुसार यहीं वाल्मीकि ऋषि ने रामायण लेखन प्रारंभ करने से पूर्व मां सरस्वती जी को प्रतिष्ठिïत कर उनका आशीर्वाद प्राप्त किया था। इस मंदिर के निकट ही वाल्मीकि जी की संगमरमर की  समाधि बनी है। बासर का यह मंदिर दक्षिण स्थापत्य कला का सुन्दर उदाहरण है। गर्भगृह, गोपुरम, परिक्रमा मार्ग आदि इसकी निर्माण योजना का हिस्सा हैं। मंदिर में केंद्रीय प्रतिमा सरस्वती जी की है साथ ही लक्ष्मी जी भी विराजित हैं। सरस्वती जी की प्रतिमा पद्मासन मुद्रा में 4 फुट ऊंची है। मंदिर में एक ग्रेनाइट का स्तम्भ भी है जिसमें अलग-अलग स्थान से संगीत के सातों स्वर सुने जा सकते हैं। मंदिर के प्रांगण में अयूडम्बरा वृक्ष भी है जिस पर दत्तात्रेय जी के पवित्र खड़ाऊं प्रतिष्ठित हैं। इनके स्पर्श से बांझ स्त्री के पुत्र प्राप्ति की कथा बासर में सर्वप्रचलित है। यहां की विशिष्ट धार्मिक रीति अक्षरधना कहलाती है। इसमें बच्चों को विद्या अध्ययन प्रारंभ कराने से पूर्व अक्षराभिषेकम् हेतु यहां लाकर प्रसादस्वरूप हल्दी का पेस्ट चटाया जाता है। विश्वास है कि इससे उनके कंठ के सारे रोग समाप्त हो जाते हैं और स्वर स्पष्ट होता है। मंदिर के पूर्व में निकट ही महाकाली मंदिर है और लगभग एक सौ मीटर दूर एक गुफा है जहां नरहरि मालुका ने तप किया था। यहीं एक अनगढ़ सी चट्टान भी है जिसे वेदावथी कहा जाता है। कहते हैं कि इसके नीचे सीता जी के आभूषण रखे हैं। इसमें से भी प्रहार करने पर अलग-अलग स्थान से भिन्न-भिन्न स्वर निकलते हैं। बासर गांव में 8 ताल हैं जिन्हें वाल्मीकि तीर्थ, विष्णु तीर्थ, गणेश तीर्थ, पुथ्रा तीर्थ एवं शिव तीर्थ कहा जाता है। देवी नवरात्रि, दत्तात्रेय जयंती एवं वसंत पंचमी पर यहां विशाल उत्सव आयोजित होते हैं। बागों से घिरा यह सुन्दर स्थल हैदराबाद से सड़क मार्ग से 220 कि.मी. एवं रेल मार्ग से 190 कि.मी. दूर है। यह अदिलावाद के मुथोल तालुका में निजामाबाद से 30 कि.मी. दूर स्थित है। माना जाता है कि छठी शताब्दी तक यह स्थल हिंदू तीर्थ बन चुका था। वर्तमान मंदिर चालुक्य राजाओं द्वारा बनवाया गया। मुगल आक्रांताओं द्वारा ध्वस्त हो जाने पर 17 वीं शताब्दी में नंदागिरी के सरदार द्वारा इसका पुनर्निर्माण कराया गया। वसन्त पंचमी पर यहां लाखों की भीड़ होती है और देश के कोने-कोने से श्रद्धालु विद्या की देवी का आशीर्वाद लेने आते हैं। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अपयशातून धडा घेता आला, तर अपयशाला यशात बदलता येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पंजाबची राजधानी कोणती?* 👉 चंदिगढ *२) छत्तीसगढची राजधानी कोणती?* 👉 रायपूर *३) उत्तराखंडची राजधानी कोणती?* 👉 डेहराडून *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 साईनाथ कानगुलवार 👤 सचिन बावणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" संसार "* पाण्यात राहून माश्यासी मन कसं रमतं नाही रोज सोबत राहून सांगा कसं जमतं नाही ज्याच्या सोबत रहायचं त्याच्याशी जमलं पाहिजे संसार करायचाच गोडीने तर मन रमलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.* *आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *श्री. संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल'9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये अविचाराने घर केलेले असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सदैव अस्थिरता सामावलेली असते.त्यामुळे इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.स्वत:चे तर कधीच चांगले होत नाही.जर स्वत:चे जरी चांगले असले तरी त्या अविवेकी विचाराने वाईट होऊन जाते तेही त्यांना समजत नाही.अशावेळी अविवेकी माणसांनी थोडा शांत मनाने आणि एकांतामध्ये गांभीर्याने विचार केला तर जीवनात स्वत:चे व इतरांचे होणारे नुकसान काही प्रमाणात हळूहळू कमी होऊ शकेल व सद्विविवेक बुद्धीचा मनामध्ये चांगला बदल होऊन चांगले जीवन समृद्ध करता येईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🌻☘🌻☘🌻☘🌻☘🌻☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *।। जरी अनेक ।।* ग्रह-तारे जरी अनेक आकाशास शोभा देती । चांद नाही त्या रात्री अंबरा काळीमा येती ।।१।। नदी-डोंगरे जरी अनेक माता धरणीस रूप देती । वृक्षवेली नाही त्या किनारी मही ओसाड दिसती ।।२।। धन-दौलत जरी अनेक जीवन आनंदी करती । दया प्रेम समता न ठायी व्यर्थ जगणे त्याचे अंती ।।३।। नाती-गोती जरी अनेक माणसास भेट देती । आई बापास न मान जेथे प्रेम वात्सल्यांची त्यास खंती ।।४।। नाव-प्रसिद्धी जरी अनेक अहंकार त्यांच्या भोवती । कान्हा म्हणे जो आत्मारामी गातो रोज त्यांची आरती ।।५।। कवी संजय कान्हव (कान्हा) नाशिक, 9850907498 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *युक्ती* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. *तात्पर्य :-* युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* http:/www.pramilasenkude blogspot.in. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी*, *आपली नाती ह्या *वाऱ्यासारखी असावी*, *जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी*, *शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी*, *कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी*, *आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी* ।

व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा !! 1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !! 3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !! कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !! 8) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो , बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो .... !! 9) घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते .... !! 10) माणूस अपयशाला भीत नाही .अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ....? याची त्याला भीती वाटते .... !! 11) बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण .... !! 12) कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे . ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे . 13) पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते .... !! 14) वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं . ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात !! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा .... !! 15) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही , पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .... !! 16) आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो . त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो . 17) समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो . पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .... !! 18) संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला .... !! 19) ''अंत " आणि '' एकांत " ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो .... !! 20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं .... !! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस .... !! 21) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते . सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते .... !! 22) सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो .... !! 23) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस .... !! 24) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते .... !! 25) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं .... !! 26) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले .... !! 27) अत्यंत महागडी , न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे " आयुष्य " ..... !! 28) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती ,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती .... !! 29) आपण किती पैसा मिळवला यापेक्षा , तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले , हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो .... !! ..... !!संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *2020 पर्यंत भारतात 5 जी मोबाईल नेटवर्कसाठी चाचपणी, रोडमॅप निश्चित करण्यासाठी केंद्राकडून समिती स्थापन.* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे - थेट सरपंच निवड प्रक्रियेतुन जिल्ह्यातील पहिला सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग - मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा, ३ ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश अन्यथा अंगणवाडी कर्मचारी बडतर्फ होणार,* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - जिल्ह्यातील मान्यता नसलेल्या 54 शाळांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *एसटी कर्मचारी वैद्यकीय दृष्टया अपात्र ठरल्यास त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेता येणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मंदीत नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका, सरकारला घरचा आहेर.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामना, व्हाईट वॉश देण्याचा भारतीय संघाचा इरादा* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उद्याची सुंदर पहाट........!* आर्थिक स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. बातमी वाचून अनेक युवकांना धक्का बसला असेल कारण गेल्या दहा वर्षापासून सरकार........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BrokuXN1pSN आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यास जी ने बनाया बासर का सरस्वती मंदिर* वाग्देवी, मां वीणापाणि, शारदा, विद्यादायिनी आदि नामों से स्मरण की जाने वाली मां वाणी अर्थात् सरस्वती जी के भारत में दो ही प्राचीन देवस्थल माने जाते हैं – पहला आंध्र प्रदेश में जो ऋषि वेद व्यास द्वारा बनाया गया था। आंध्र प्रदेश के इस बासर स्थित वैदिककालीन देवस्थल के बारे में कहा जाता है कि कुरुक्षेत्र युद्ध से निराश और उदास होकर ऋषि व्यास, उनके पुत्र शुकदेव जी एवं अन्य अनुयायी दक्षिण की ओर तीर्थयात्रा पर चल पड़े और गोदावरी के तट पर तप के लिए डेरा डाल दिया। उनके निवास के कारण वह स्थान व्यासर कहा जाने लगा जो कालांतर में बासर हो गया। ऋषि व्यास नित्यप्रति जब स्नान करके आते तो गोदावरी की 3 मुट्ठी बालू लाते थे और 3 ढेर बना देते थे। बालू में हल्दी का भी घोल मिलाया गया और फिर धीरे-धीरे ये ढेर आकार लेते गये और इन्होंने तीन देवियों लक्ष्मी, शारदा एवं गौरी का रूप ले लिया। स्थानीय विश्वास के अनुसार यहीं वाल्मीकि ऋषि ने रामायण लेखन प्रारंभ करने से पूर्व मां सरस्वती जी को प्रतिष्ठिïत कर उनका आशीर्वाद प्राप्त किया था। इस मंदिर के निकट ही वाल्मीकि जी की संगमरमर की  समाधि बनी है। बासर का यह मंदिर दक्षिण स्थापत्य कला का सुन्दर उदाहरण है। गर्भगृह, गोपुरम, परिक्रमा मार्ग आदि इसकी निर्माण योजना का हिस्सा हैं। मंदिर में केंद्रीय प्रतिमा सरस्वती जी की है साथ ही लक्ष्मी जी भी विराजित हैं। सरस्वती जी की प्रतिमा पद्मासन मुद्रा में 4 फुट ऊंची है। मंदिर में एक ग्रेनाइट का स्तम्भ भी है जिसमें अलग-अलग स्थान से संगीत के सातों स्वर सुने जा सकते हैं। मंदिर के प्रांगण में अयूडम्बरा वृक्ष भी है जिस पर दत्तात्रेय जी के पवित्र खड़ाऊं प्रतिष्ठित हैं। इनके स्पर्श से बांझ स्त्री के पुत्र प्राप्ति की कथा बासर में सर्वप्रचलित है। यहां की विशिष्ट धार्मिक रीति अक्षरधना कहलाती है। इसमें बच्चों को विद्या अध्ययन प्रारंभ कराने से पूर्व अक्षराभिषेकम् हेतु यहां लाकर प्रसादस्वरूप हल्दी का पेस्ट चटाया जाता है। विश्वास है कि इससे उनके कंठ के सारे रोग समाप्त हो जाते हैं और स्वर स्पष्ट होता है। मंदिर के पूर्व में निकट ही महाकाली मंदिर है और लगभग एक सौ मीटर दूर एक गुफा है जहां नरहरि मालुका ने तप किया था। यहीं एक अनगढ़ सी चट्टान भी है जिसे वेदावथी कहा जाता है। कहते हैं कि इसके नीचे सीता जी के आभूषण रखे हैं। इसमें से भी प्रहार करने पर अलग-अलग स्थान से भिन्न-भिन्न स्वर निकलते हैं। बासर गांव में 8 ताल हैं जिन्हें वाल्मीकि तीर्थ, विष्णु तीर्थ, गणेश तीर्थ, पुथ्रा तीर्थ एवं शिव तीर्थ कहा जाता है। देवी नवरात्रि, दत्तात्रेय जयंती एवं वसंत पंचमी पर यहां विशाल उत्सव आयोजित होते हैं। बागों से घिरा यह सुन्दर स्थल हैदराबाद से सड़क मार्ग से 220 कि.मी. एवं रेल मार्ग से 190 कि.मी. दूर है। यह अदिलावाद के मुथोल तालुका में निजामाबाद से 30 कि.मी. दूर स्थित है। माना जाता है कि छठी शताब्दी तक यह स्थल हिंदू तीर्थ बन चुका था। वर्तमान मंदिर चालुक्य राजाओं द्वारा बनवाया गया। मुगल आक्रांताओं द्वारा ध्वस्त हो जाने पर 17 वीं शताब्दी में नंदागिरी के सरदार द्वारा इसका पुनर्निर्माण कराया गया। वसन्त पंचमी पर यहां लाखों की भीड़ होती है और देश के कोने-कोने से श्रद्धालु विद्या की देवी का आशीर्वाद लेने आते हैं। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अपयशातून धडा घेता आला, तर अपयशाला यशात बदलता येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पंजाबची राजधानी कोणती?* 👉 चंदिगढ *२) छत्तीसगढची राजधानी कोणती?* 👉 रायपूर *३) उत्तराखंडची राजधानी कोणती?* 👉 डेहराडून *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 साईनाथ कानगुलवार 👤 सचिन बावणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" संसार "* पाण्यात राहून माश्यासी मन कसं रमतं नाही रोज सोबत राहून सांगा कसं जमतं नाही ज्याच्या सोबत रहायचं त्याच्याशी जमलं पाहिजे संसार करायचाच गोडीने तर मन रमलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.* *आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *श्री. संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल'9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये अविचाराने घर केलेले असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सदैव अस्थिरता सामावलेली असते.त्यामुळे इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.स्वत:चे तर कधीच चांगले होत नाही.जर स्वत:चे जरी चांगले असले तरी त्या अविवेकी विचाराने वाईट होऊन जाते तेही त्यांना समजत नाही.अशावेळी अविवेकी माणसांनी थोडा शांत मनाने आणि एकांतामध्ये गांभीर्याने विचार केला तर जीवनात स्वत:चे व इतरांचे होणारे नुकसान काही प्रमाणात हळूहळू कमी होऊ शकेल व सद्विविवेक बुद्धीचा मनामध्ये चांगला बदल होऊन चांगले जीवन समृद्ध करता येईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🌻☘🌻☘🌻☘🌻☘🌻☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *।। जरी अनेक ।।* ग्रह-तारे जरी अनेक आकाशास शोभा देती । चांद नाही त्या रात्री अंबरा काळीमा येती ।।१।। नदी-डोंगरे जरी अनेक माता धरणीस रूप देती । वृक्षवेली नाही त्या किनारी मही ओसाड दिसती ।।२।। धन-दौलत जरी अनेक जीवन आनंदी करती । दया प्रेम समता न ठायी व्यर्थ जगणे त्याचे अंती ।।३।। नाती-गोती जरी अनेक माणसास भेट देती । आई बापास न मान जेथे प्रेम वात्सल्यांची त्यास खंती ।।४।। नाव-प्रसिद्धी जरी अनेक अहंकार त्यांच्या भोवती । कान्हा म्हणे जो आत्मारामी गातो रोज त्यांची आरती ।।५।। कवी संजय कान्हव (कान्हा) नाशिक, 9850907498 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *युक्ती* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. *तात्पर्य :-* युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* http:/www.pramilasenkude blogspot.in. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/09/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जागतिक हृदय दिन आणि जागतिक फार्मासिस्ट दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली. 💥 जन्म :- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार. १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी. १९४६ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य १९६२ - राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *लोकांनी खादीच्या वस्तू देण्यास सुरुवात केली, खादी अभियान व्यापक होण्याची गरज, दिवाळीत खादीच्या भेटवस्तू द्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *एक्झिट पोलनुसार जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल चौथ्यांदा निवडणूक जिंकण्याचा अंदाज*  ----------------------------------------------------- 3⃣ *31 ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक- राज्य सरकार विरुद्ध 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन, जयंत पाटील यांची बैठकीत माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे- जिल्ह्यातून शेतकरी कर्जमाफीसाठी 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत* ----------------------------------------------------- 6⃣ *भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे- भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मिळविले नंबर एकचे स्थान* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पर्यटकांनी जबाबदारीने वागावे* आपल्या भारतीय परंपरेला एक इतिहास आहे. आणि हा सर्व इतिहास आपणास गड आणि किल्ल्याच्या शिल्लक असलेल्या अवशेषावरुन लक्षात येते. अनेक इतिहासतज्ञ या पुरातन वस्तूवरुन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/Y3JzBf5ntVj आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬  *अंबादेवी (अमरावती )* महाराष्ट्रातील अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीपासून असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे.या मंदिराचा संबंध रुक्मिणीहरणाशी  जोडला जातो. मोगलांनी १५०० च्या कालखंडात वर्‍हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदूमंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यांत अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन/ स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने व काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीत योगदान दिले. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळुका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने चढवले जातात. मुखवटासुद्धा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगड्या आदींचा साज चढतो. दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल. - रवींद्रनाथ टागोर  *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण?* 👉 मदर तेरेसा *२) रॅमन मॅगसेसे पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण?* 👉 कमलादेवी चटोपाध्याय *३) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण?* 👉 आरती सहा(गुप्ता) *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रा. तसनीम पटेल, साहित्यिक, नांदेड 👤 सुयश पेटेकर, करखेली 👤 श्यामसुंदर मोकमोड, सहाशिक्षक, येताळा 👤 योगेश धनेवार 👤 शिवशंकर नर्तावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "तमाशा " हल्ली पातळी सोडून यांची टीका आहे तमाशाही यांच्या पुढे एकदम फिका आहे तमाशा पेक्षा ही यांची खालची भाषा आहे यांच्या कडून चांगल्याची मग काय आशा आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?*' *त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ, शोभीवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.* *"मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये."* ••✹✹‼ *रामकृष्णहरी* ‼✹✹•• 🌲🌲🌲🌲🌲🌲 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपणास जर असे वाटत असेल की,आपण आपल्या जीवनात आपल्या शिवाय इतरांना कधीच काही दिले नाही किंवा काहीच केले नाही त्यामुळे आपल्या जीवनाला आता काहीच अर्थ राहिला नाही.असं म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे महत्व कमी करत आहात.अजुनही तुमच्या हातून बरेच काही चांगले घडू शकते.तुम्ही आतापर्यंत काही केले नाही याची तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुमचे मन तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा देत आहे असे समजावे. अजुनही तुम्ही इतरांसाठी खूप काही करु शकता.फक्त तुम्ही आणि तुमची मानसिकता बदलून टाका तेवढ्याच जोमाने काम करण्यासाठी पुढे व्हा आणि थोडा तुमच्या मनालाच विचारा की,आपण आपल्या व्यतिरिक्त दुस-या साठी काही केले का ? नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी करत आहात मग तुम्ही नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करायला लागलात हे निश्चित कळेल..तुम्ही काहीतरी करत असल्याचे आणि जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९० 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ही आमुची शिदोरी* या गोड नातवांचा आधार या मनाला अस्सा सुरेख देती आकार जीवनाला आहे अपूर्व भारी ही आमुची शिदोरी जगणे सवेसवे तर उपचार ते कशाला ? नांदे घरात शांती दाटे उरी निवांती येतो परीस भेटी हुंकार द्यावयाला वाढे कणाकणाने सुख हे मणामणाने हा कल्पवृक्ष आहे हळुवार या जिवाला चैतन्य या घराचे ये नेहाळ भावनेचे चिंता फिरून जाई माघार घ्यावयाला डाॅ. शरयू शहा, मुंबई. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *दुष्टाचा स्वभाव* *एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे* पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले. याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई. पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी. धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले. *तात्पर्य* : - *वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.*. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* http:/www pramilasenkude blogspot.in. 📞9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

*📚सहशालेय उपक्रम📚* *👭बालसभा👬* *वर्ग: १ ली ते ७वी* *विषयः स्वच्छतेचे महत्त्व* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *अध्यक्षः वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी तलवारे* *प्रमुख अतिथीः वर्ग तिसरीतील ईश्वरी जाधव वर्ग पाचवीतील सानिका जाधव ...* *मार्गदर्शन व सुञसंचलन* *वर्ग सातवीतील कु.विजया कदम, कु.कोमल मानेगोविंदवाड*.💧💦🌍🌳🍀🌴🌱 *आज दि. २३/०९/२०१७ रोजी वर्ग पहिली ते सातवी पर्यंतचा सर्व विद्यार्थ्यांची सामुहीक बालसभा आयोजित केली होती.* 💐💐💐💐💐💐 स्वच्छतेचे महत्त्व ह्या विषयावर बालसभेतील सहभागी मान्यवर विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.तसेच काही विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, स्वरचित स्वच्छतेवरील कविता, शौचालयाचा वापर, परिसर स्वच्छता (भित्तीपञक साहित्य) ह्यावर सविस्तर चर्चा व महत्त्व सांगितले *उद्देशः स्वच्छतेचे महत्त्व जाणणे, बालसभेत मुलांना खूप उत्साह आनंद वाटणे.* 💐💐💐💐💐💐💐 *वैशिष्ट्यपूर्ण* मु.अ.श्री चव्हाण सर, स.शि.श्री एस.बी.चव्हाण सर तसेच शाळेतील आम्ही सर्व सहकारी यांनी परिपाठातील सहभागी उत्कृष्ट ,उत्साही, गुणवंत विद्यार्थी यांचा पेन देऊन अभिनंदनपर सत्कार केला. 🌻🌻🌻🌻🌻🌻 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰

🌸💐✍💐🌸 *🌹ध्येय🌹* शाळेच्या बाहेर पाऊस पडत होता. वर्गामध्ये शिक्षकांचा तास चालू होता. तेव्हा शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न केला,"जर मी तुम्हाला प्रत्येकी १००-१००रु देऊ केले तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल?" त्यावर कुणी म्हटले की आम्ही विडीव्हो गेम घेऊ. कुणी सांगितले की क्रिकेट बॅट घेऊ. काही मुलींनी सांगितले की आम्ही बाहुल्या घेऊ. कुणी सांगितले की आम्ही चाॅकलेट घेऊ. असं असताना एक मुलगा काही तरी विचार करताना आढळला त्याला त्यानीं विचारले," तू काय करणार आहेस या १००रु चे ?" त्या वर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या आईला थोडं कमी दिसतं म्हणून माझ्या आईला मी या पैश्याचा नवीन चष्मा घेऊन देईन." सरांनी त्याला विचारले," तुझे बाबा नाहीत का ? तू चष्मा घेऊन देत आहेस ? वडील आईला चष्मा घेऊन देतील की ! तू का बरं तुझ्यासाठी काही नाही घेतं या पैश्याचं ?" त्यावर त्या मुलाने खिन्न स्वरात उत्तर दिले.ते उत्तर ऐकून शिक्षक जागीच स्तब्ध झाले. त्यांचे मन त्याचे हे उत्तर ऐकून भरुन आले.तो बोलला," सर, माझे वडील आता या जगात नाहीत.माझी आई लोंकांचे कपडे शिवून मला शिकवते आणि आता हळुहळु तिला कमी दिसायला लागले आहे. तिला आता कपडे शिवताना डोळ्यांचा ञास सहन करावा लागत आहे.ती कपडे बरोबर शिऊ शकत नाही. म्हणून मला तिला चष्मा घेऊन द्यायचा आहे कारण मी चांगला शिकू शकेन आणि मोठा माणूस बनून माझ्या आईला कायम सुखात ठेवु शकेन." त्यावर सर खुश होऊन बोलले," मला तुझे विचार अमुल्य वाटले." त्यावर त्यांनी त्याला आपल्या जवळचे १०० रु दिले आणि म्हणाले,"हे माझ्या वचनानुसार १०० आणि हे आणखी १००रु उधारी. जेव्हा तू स्वतः कधी कमवून आणशील तेव्हा मला परत कर. माझी ईच्छा आहे की तू खूप मोठा माणूस बन. त्या वेळी तुझ्या डोक्यावरुन माझाहात फिरु दे. मग मी धन्य झालो...." गेल्या १५ते १६ वर्षा नंतर बाहेर असाच पाऊस पडत होता. वर्गात तास चालु होता.आणि अचानक शाळेसमोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येऊन थांबते.शाळेतील सर्व स्टाफ सावधान होतो. शाळेत सगळीकडे शांतता पसरते. आणि.... एक दृष्य पाहून सर्वच थक्क होतात. एक जिल्हाधिकारी एका वृध्द शिक्षकापुढे वाकून पायावर डोके ठेवतोे आणि विचारतो," ओळखलंत का सर मला, मी तुमचा विद्यार्थी. तुमचे घेतलेले उधार१००रु परत करायला आलो आहे." शाळेचा स्टाफ स्तब्ध होऊन पाहत होता.त्या सरानीं वाकलेल्या नवजवान अधिकाऱ्याला उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन भरभरून रडू लागले. तो अधिकारीसुद्धा गळ्यात गळा घालून रडू लागला आणि डोऴे पुसत म्हणाला .. *"सर,आम्ही तुमच्या दिलेल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या पाठावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं आणि आमचं भाग्य फळाला आलं. सर असेच् आशिर्वाद असु द्या..!!"* *धन्य ते शिक्षक व धन्य तो विद्यार्थी !*

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹* 📚 *उपक्रमाचे नाव:* *१)चिठ्ठी उचला माहिती तोंडी सांगा व त्यानुसार कमीतकमी पाच प्रश्न विचारा व लिहा.* 〰〰〰〰〰〰〰 भाजीवाली मावशी,फळेवाले,टेलर,काका कंड्याक्टर,पोस्टमन,अंगणवाडीताई,फुगेवालामामा,गँरेजवाले चाचा,शेतकरीदादा,फोटोग्राफर,डाँक्टर,अँटोवाले,सुतारमामा,खिचडीवालेमामा,ट्र्ँफीकवालेमामा,ईस्ञीवालेमामा(प्रेस),किराणादुकानदार,लोहारमामा,मदतनीसमावशी,इलेक्ट्रिक वस्तू विक्रेता. *🌻* 💎 *वर्ग: तिसरी* दि.२०/०९/२०१७ आज माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गोल बसवून वरील दिलेल्याप्रमाणे विस चिठ्ठ्या पटसंख्येप्रमाणे तयार केल्या व विद्यार्थ्यांनी एक एक उचलून चिठ्ठी वाचली.व त्याप्रमाणे थोडक्यात माहिती पण सांगितले.ज्यांना ज्या नावाची जी चिठ्ठी आली त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारले व लेखनही केले. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *🌻उद्देशः*🌻 वेगवेगळ्या कामाविषयी माहिती मिळते प्रश्न निर्मिती कौशल्य निर्माण होणे. तसेच जे विद्यार्थी ह्या कौशल्यात मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न व सराव होतो. *विद्यार्थ्यांची आनंदीवृत्तीची जोपासना करणे.नाविण्यता निर्माण करून आपल्या निकषाकडे वळणे.* 👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖ 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००३ -नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले. 💥 जन्म :- १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक. १९१५ - अनंत माने, चित्रपट दिग्दर्शक. १९२३ - रामकृष्ण बजाज, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती. 💥 मृत्यू :-  १५३९ - गुरू नानक. १९९१ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. १९९४ - जी. एन. जोशी, जुन्या पिढीतील भावगीत गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा ही 78 दिवसांच्या पगाराएवढी रक्कम बोनस म्हणून देण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी* ----------------------------------------------------- 2⃣ *मेधा खोले यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने 25 सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित - समन्वय समिती चा निर्णय*  ----------------------------------------------------- 3⃣ *नारायण राणे यांनी आमदारकीच्या पदासह दिला कॉंग्रेस पक्षाचाही राजीनामा* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी : श्रीकृष्ण पाटीलबाबावर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा मठ कायमस्वरुपी बंद करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी, दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ. ६ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसह १६ लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ.* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९८.०४% च्या पुढे गेल्यानंतर पाणी सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय. सध्या पाणीपातळी ९३% वर असून आवक सातत्याने घटत आहे.*  ----------------------------------------------------- 7⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 50 धावांनी विजय. चायनामैन कुलदीप यादवनं घेतले हैट्रिक.* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *गुरुजींना शिकवू द्या ......!* प्रत्येक बाबतीत समाजात आज प्रगती दिसून येत आहे. डिजिटलच्या तंत्रज्ञान युगात सर्व काही ऑनलाइन चालू आहे. प्रत्येक जण जे काही बोलत आहे ते सर्व ऑनलाइनच्याच भाषेत बोलत आहे. बाजारात एखादी चक्कर मारली तर लक्षात येते की येथे सुध्दा सारेच जण ऑनलाइन वरच काम............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/HwhHcUcvnn4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर * कोल्हापूर चे महालक्ष्मी मंदीर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा  शिलाहार  राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.. कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.कांहीच्या मते महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ असत्य दुबळे असते. स्वत:च्या आस्तित्वासाठी त्याला सत्याची मदत घ्यावी लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*             9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  व्हॉलीबॉलच्या मैदानाची लांबीरुंदी किती असते?* 👉     १८× ९ मीटर *२)  खो-खो च्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉     २७× १६ मीटर *३)  फूटबॉलच्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉     १२०×९० मीटर *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाधर चिटमलवार 👤 सागर गडमोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     " गाजर " गाजर दाखवले की काही सहज भाळतात एकदा माणूस भाळला की संधी न देता टाळतात गाजर पाहून कोणी कशाला भाळायचं गाजर दाखवणाराला आपणच टाळायचं    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.*   ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••             🌸🌸🌸🌸🌸🌸      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तुमच्यापैकी किंवा तुमच्यातलीच एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप काही चांगले काम करत असेल तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा म्हणजे ते अधिक जोमाने काम करतील आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात अधिक, अद्वितीय कामगिरी करुन ते स्वत:चे आणि तुमचेही नावलौकिक करतील. तुमची प्रेरणा हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य असेल. पण तुम्ही असे करु नका की, तो आपल्यापुढे चालला आहे त्याचा आपल्याला काय फायदा ?असं म्हणून त्यांचे पाय मागे खेचू नका किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळा ही आणू नका.कारण त्यांच्या होणा-या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचे कारण तुम्ही बनू नका.असे न करता केव्हाही जर कोणी चांगले काम करत असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून  थोड्यातरी तुमच्या अंत:करणातून शुभेच्छा द्या म्हणजे त्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी मूठभर मांस चढेल हे निश्चित. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*    संवाद...९४२१८३९५९०. 🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *💡 बचत विजेची 💡* बचत विजेची लाख मोलाची ती तर गरज आहे देशाची. जेव्हा हवे असले तेव्हा दिवे लावा. पाहायाच नसेल तर टिव्ही बंद ठेवा. विजेची शेगडी आणि गिझर कमी करा यांचा वापर. रात्रभर पंखा फिरतो गरागरा पहाटे पहाटे तरी बंद करा. वीज वाचवली तर देशाची भरभराट होईल. विकासाच्या मार्गावर देश पुढे पुढे जाईल.             🌹 *कवी* 🌹     *✍नागेश नारायण अमृते*          *वर्ग 6  वा* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव ,जि.नांदेड.* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                *संकटाशी सामना* बनारसमध्ये असतांना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात. इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. `पळू नका ! त्यांना सामोरे जा !', असे तो त्यांना सांगत होता. त्याच्या सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे राहिले. आणि काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवावरून विवेकानंदांनी सर्वांना सांगितले की, संकटांना घाबरून पळू नका. त्यांना धैर्याने तोंड द्या. *तात्पर्य :-* संकटांना कधीही घाबरू नये. त्यांना धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलन -नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/09/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय. 💥 जन्म :- १९११ - राप्पल संगमेश्‍वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते. १९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९५० - डॉ. अभय बंग. १९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक. 💥 मृत्यू :-  १९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार. १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नागपूरमध्ये देशाच्या विकासाचे केंद्र बनण्याची क्षमता : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - आयकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामीसह तीन जणाना अटके, आयकर भवनमध्ये तीन कोटींची लाच घेताना कारवाई.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापुरात स्मार्ट सिटी कामांचा झाला शुभारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली : राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची निवड. येत्या 13 आणि 14 ऑक्टोबरला गडचिरोलीत संमेलनाचे आयोजन.* ----------------------------------------------------- 6⃣ *भारताकडून न्यूटन सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत, राजकुमार राव यांच्या न्यूटनचं ऑस्करसाठी नामांकन.* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणातून 10 हजार क्युसेक पाणी सोडलं, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडीचे दरवाजे उघडले* ----------------------------------------------------- 8⃣ *मध्य प्रदेश : भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या वन डे स्पर्धेसाठी इंदुरला पोहोचली* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *लोकसहभागातून शाळेची प्रगती* गावातील शाळा ही सर्वासाठी एक आधार असते. प्रत्येक शाळेला ही गावाचा आधार खुप महत्वाचा असतो. जेथे हे दोन एकमेकाच्या हातात हात घालून चालतात तेथे शाळेची आणि गावाची प्रगती लक्षणीय असते, यात शंका.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/9L8DEuAG2Nu आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नवरात्र विशेष - तुळजाभवानी*          उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवताहोय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंतीआहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) वैदिक वाड;मयाची भाषा कोणती आहे?* 👉 संस्कृत *२) वेद किती आहेत?* 👉 चार *३) हे चार वेद कोणते?* 👉 ऋग्वेद,अथर्ववेद,सामवेद,यजुर्वेद *संकलन : - संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 डॉ. सुरेश सायन्ना येवतीकर आय टी व्यवस्थापक MGB मुख्य शाखा औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " खळं" माहिती असतांना कोणी खळं लुटू देत नाही स्वतः कष्ट करून खळं दुस-याला वाटू देत नाही हे शेतकरी थोडे आहेत खळं वाटून खायला सारं रान कमी आहे यांना चाटून खायला शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* ••●🍀‼ *रामकृष्णहरी*‼🍀●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, चांदिवरी, मुंबई* *मोबाईल -पाप 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला राग येतो तो काही काळापुरता आणि काही काळानंतर तो शांत होतो.राग येण्याची काही कारणे असू शकतात.एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली किंवा होत नसली तरी राग येतो.परंतु राग संपला की,तो विचार करायला लागतो आणि आपण उगीच रागाच्या भरात काही बोलून गेलो यांचा पश्चात्ताप ही व्हायला लागतो. अशावेळी तो आपण काहीतरी केले आहे ते यापुढे करणार नाही याची जाणीव होऊन समोरच्याची जेव्हा माफी मागायला लागतो तेव्हा समोरच्याने सुद्धा मोठ्या मनाने माफ करुन त्याला आपलेसे करुन आपल्यात सामावून घेणे हेच खरे माणुसकीचे लक्षण आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *चिऊ-काऊ* चिऊ काऊच जग कित्ती कित्ती छान उडत जातात नभी घेऊन उंच "उडाण". चिव काव करीत टिपतात अंगणी दाणे भेटलं नाही खायला तरी उडती आनंदाने. चिऊ काऊची जोडी शोभते गोष्टीत जशी प्रत्यक्षात मात्र ती बोलत नाहीत फारशी. चिऊला देतो आपण मेणाच घर छान कावळ्याच्या घराची तुटते सारखी मान. पण देऊन कावळेदादाला घरामध्ये आसरा शिकविते चिऊ आपल्याला भेदभाव सारे विसरा. चिऊ काऊचंच जग कित्ती कित्ती छान आहे त्यांच्या जगात प्रत्येकाला मान समान जाती पंथ धर्मला ते देत नाही थारा जाणुन आहेत ते सर्वांसाठी आहे ऊन, पाऊस,वारा. संगीता वाढोणकर जि.प.कें.प्रा.शा.पाल ता.फुलंब्री जि.औरंगाबाद 9850085155 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद* एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी*पण जेव्हा नाहीसा होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏🏻🙏🏻 ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे.

आईवडिलांचे प्रेम एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मगासपासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कोयती उचलून बागेतून हसत हसत घरात गेला. तात्पर्य :- स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.

प्रेरणा संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते ? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले. त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले. तात्पर्य :- प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹* 📚 *उपक्रमाचे नाव:* *१)चिठ्ठी उचला माहिती तोंडी सांगा व त्यानुसार कमीतकमी पाच प्रश्न विचारा व लिहा.* 〰〰〰〰〰〰〰 भाजीवाली मावशी,फळेवाले,टेलर,काका कंड्याक्टर,पोस्टमन,अंगणवाडीताई,फुगेवालामामा,गँरेजवाले चाचा,शेतकरीदादा,फोटोग्राफर,डाँक्टर,अँटोवाले,सुतारमामा,खिचडीवालेमामा,ट्र्ँफीकवालेमामा,ईस्ञीवालेमामा(प्रेस),किराणादुकानदार,लोहारमामा,मदतनीसमावशी,इलेक्ट्रिक वस्तू विक्रेता. *🌻* 💎 *वर्ग: तिसरी* दि.२०/०९/२०१७ आज माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गोल बसवून वरील दिलेल्याप्रमाणे विस चिठ्ठ्या पटसंख्येप्रमाणे तयार केल्या व विद्यार्थ्यांनी एक एक उचलून चिठ्ठी वाचली.व त्याप्रमाणे थोडक्यात माहिती पण सांगितले.ज्यांना ज्या नावाची जी चिठ्ठी आली त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारले व लेखनही केले. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *🌻उद्देशः*🌻 वेगवेगळ्या कामाविषयी माहिती मिळते प्रश्न निर्मिती कौशल्य निर्माण होणे. तसेच जे विद्यार्थी ह्या कौशल्यात मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न व सराव होतो. *विद्यार्थ्यांची आनंदीवृत्तीची जोपासना करणे.नाविण्यता निर्माण करून आपल्या निकषाकडे वळणे.* 👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖ 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰

💦🍀💦🍀💦🍀💦 *स्वच्छतेची घेऊया आण* सख्यासोबत्यांनो या हो या स्वच्छता करूया मिळूनिया सुंदर भारत स्वच्छ भारत अभियान राबवू या. सुंदर स्वच्छ गाव बनऊया अभिमान गावाचा वाढवूया या रे या रे बालजवानांनो सुंदर भारत स्वच्छ भारत करुया. स्वच्छतेचे दूत आपण आरोग्याचे धडे देऊया रोगराईला पळववून लावूनी आरोग्यमुक्त गाव करुया. http://www. pramilasenkude.blogspot.in घरी बांधूनीया शौचालय वापर त्याचा करुया अभिमान बाळगूनी गावाचा स्वाभिमानाने जीवन जगूया. कचरा कचरा वेचूया विल्हेवाट त्याची लावूया जाणूनी घेऊया पर्यावरणाचे संवर्धन प्रदूषणाला आळा घालूया. या रे या रे सख्यासोबत्यांनो या रे या रे बाल जवानांनो सारेच सारे या रे या रे दूत स्वच्छतेचे बनूया आण आपण घेऊया स्वच्छ भारत करुया. 🍀🌱🍀🌿🍀🌿🍀 *स्वरचित काव्य* ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.) जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूहप्रशासक.*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/09/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९४८ : हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले 💥 जन्म :- १९५० : नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान 💥 मृत्यू :-  १९९९ : हसरत जयपुरी, गीतकार. २००२ : वसंत बापट, कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषदेचं बालकुमार साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली होणार लोणावळ्यात.* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : 2017 चे रेल्वेचे नवे वेळापत्रक 15 ऑक्टोबरपासून पासून अमलात येणार. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची माहिती.* ----------------------------------------------------- 5⃣ *कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच पुरवठा पूर्ववत होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज जे पी ड्यूमिनी याचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय. मात्र कमी ओव्हर्सचे सामने खेळणार असल्याची माहिती.* ----------------------------------------------------- 7⃣ *दुखापतग्रस्त अक्षर पटेलऐवजी भारताच्या वन डे संघात रविंद्र जाडेजाचा समावेश. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांसाठी निवड.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वच्छता आणि आरोग्याचा संबंध* जो रस्त्यावर कुठेही थुंकतो किंवा जी व्यक्ती स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत त्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणामुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता .......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/28R34BWyB9J *स्वच्छ भारत ; सुंदर भारत* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वामी रामानंद तीर्थ :  एक पावन स्मृती*                                                                                         (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष)         राष्ट्रपुरुषांविषयी अधिकाधिक माहिती असणे म्हणजे प्रेरणेला मिळणारा जिवंत झराच होय.  राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील घटना आपल्या जीवनमार्गाला एक चांगले वळण देतात. जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शब्दबद्ध असलेले स्वातंत्र्यलढ्यातील महान सेनानी तथा स्वामी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ होय.       पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे केवळ हैद्राबाद मुक्ती संग्रामाचेच सेनानी नव्हते तर भारतीय संघराज्य पूर्ण करण्याची एक ऐतिहासिक कामगिरी त्यांनी पार पाडली त्या दृष्टीने युग कर्त्या व्यक्तीत त्यांची गणना व्हायला पाहिजे. त्यांनी भूतपूर्व हैद्राबाद राज्यात इतिहास घडविला व त्या राज्याचा भूगोल ही बदलला. गांधी युगाचा आरंभ झाला होता आणि असहकाराच्या आंदोलनाची चिन्हे दिसायला लागली होती. कलकत्त्यास लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात असहकारितेचा ठराव पास झाला होता सारा देश खडबडून जागा झाला होता बहिष्काराचा चतुसूत्री कार्यक्रम आखण्यात आला. १९२६ च्या एप्रिल महिन्यात मुंबई गिरणी कामगार संघाचा उप संगठक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांनी काम पाहिले. १९२९ मध्य ग्रामीण भारताच्या एका कानाकोपऱ्यात चाललेल्या एक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा हैद्राबाद संथानातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगे या छोट्याशा गावी शिक्षणाची मशाल पेटवली. हैद्राबादच्या स्वातंत्रोदोलनाच्या इतिहासात १९३७ व १९३८ ही वर्ष अत्यंत घडामोडीची मानली जात, कारण याच काळात राजकीय विचारांना स्थैर्य प्राप्त होऊन त्यांना एक विशिष्ठ रऱोप प्राप्त झाले.           हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा विभागासाठी त्या भागातील जागरूक लोकांना एकत्र आणणारी संगठना नव्हती तेव्हा आंध्र व कर्नाटक परिषदांप्रमाणे महाराष्ट्र परिषद सुरू करण्याचा विचार स्वामी रामानंद यांनी केला त्यावेळी त्या परिषदेचे ध्येय स्पष्टपणे राजकीय असावे असे वाटू लागले होते केवळ सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक कार्य हीच तेवढ्या काळाची निकड नव्हती राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्या शिवाय कोणतीही सामाजिक वा साहित्यिक प्रगती साधने शक्य नाही याची पूर्ण जाणीव स्वामीना झाली होती. महाराष्ट्र परिषदचे पहिले आदिवेशन १९३७ च्या उन्हाळ्यात परतुरेत भरण्यात आले होते अध्यक्ष म्हणून गोविंद राव नानल होते परतूरच्या अधिवेशनामुळे मराठवाड्याच्या अंतरंगाचे दर्शन झाले राजकीय संघटनांचा मार्ग खुला झाला. कुठल्याही परिस्थितीत आगेकूच करण्याचा निर्णय झाला. औरंगाबाद येथील सरकारी इंटरमीजीयट कॉलेजातील विधार्थ्यांची मने देश भक्तीने भारावून गेली होती श्री गोविंद भाई श्राफ हे त्या वेळी त्या कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यांनी विध्यार्थ्यांच्या मनावर बी रुजवले होते. त्यावेळी सरकारी शाळातुन आसफजाही घराण्याच्या उत्कर्षासाठी एक प्रार्थना म्हणण्याची पद्धत होती. ब्रिटिशांच्या गॉड सेव द कींग घ्यायची ती प्रार्थना होती वर्गसुरु होण्यापूर्वी संस्थानभर सर्व सरकारी शाळेतून हे गीत मुलांच्या कडून सांघिक स्वरूपात म्हणून घेतले जाई. हे गीत म्हणने म्हणजे आसफजाई घराण्याशी आपण राजनिष्ठ राहू अशी प्रतिज्ञा होती. तरुणांना हे पटले नाही त्या विरूद्ध जोरदार बंड करण्याचा विधार्थ्यांनी प्रयत्न केला व त्याऐवजी वंदे मातरम हे गीत गाऊ इच्छित होते. १४ जानेवारी १९४३ मध्य स्वामी रामानंद तीर्थ यांना हैद्राबादच्या केंद्रीय कारागृहात स्थानबद्ध असताना त्यांनी मानवाला दिलेला संदेश. जगात वावरत असताना जगाचा परिणाम होऊ देऊ नका, आत्मा सर्वव्यापी आहे मग हे हेलकावे व हिंसके का जाणवावेत?   जीवनाचा प्रवाह संथ पणे वाहू द्यावा, त्यावर वादळे उठू देऊ नयेत ही वादळे आसक्तीच्या भावनेतून निर्माण होतात. कुणा विषयी व कशा विषयी आसक्ती बाळगू नका पूर्ण पणे अलिप्त राहा असा संदेश त्यांनी आपण्याला दिला. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम रीतसर शरण आला. अशा रीतीने यथाविधी केलेला संकल्प सिद्धीस गेला.                                                                  शेख युसूफ मौलासाब शिक्षक रामाचातांडा/लोहा मो.९८६०९३८१७४                                                           -सदरील लेखक- शिक्षक,साहित्यिक, विषयतज्ज्ञ आहेत.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी ही संपत नसतो *संकलन : सौ. भारती कुंभार, रायगड* 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  मराठवाडा केव्हा स्वतंत्र झाला?* 👉      १७ सप्टेंबर १९४८ *२)  हैद्राबाद संस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी कोण्या संस्थानिकाच्या ताब्यात होते?* 👉        निजाम *३)    हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली?* 👉        स्वामी रामानंद तीर्थ *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 दयाकर रेड्डी, येताळा 👤 श्रीनिवास वंगल 👤 जितेंद्र टेकाळे, कुपटी, माहूर 👤 ज्ञानेश्वर पाटील हिवराळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   "अच्छे दिन" मच्छर म्हणाला आमचे अच्छे दिन आले बरे झाले कोळशाने काळे तोंड केले कोळसा म्हणे आमचेही अच्छे दिन येतील वाईट दिवस सरले की चांगले दिवस येतील    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'* *ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.* *याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला कर्म आणि कर्तव्य ह्या दोन गोष्टी त्याच्या प्रारब्धाकडे घेऊन जातात, पण प्रारब्ध कधीच कर्म आणि कर्तव्य सोडून बलवत्तर होतं नाही.उगीच प्रारब्धावर विसंबून राहून आपण आपले कर्म आणि कर्तव्य करणे थांबवू नये. आपण आपल्या जीवनात सातत्याने चांगले कर्म आणि घांगले कर्तव्य कसल्याही प्रकारची मनात अपेक्षा न बाळगता निःसंकोचपणे केले तर आपण आपले प्रारब्ध नक्कीच चांगले बनवू शकतो. *व्यंकटेश काटकर, नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *मनीमाऊ* मनीमाऊ मनीमाऊ धसका तुझा किती खाऊ. दुध राहिल बाहेर की लागतेस गटागटा पिऊ. डोळे झाकून दुध पितेस जग सार आंधळच समजतेस . अंग तुझे गं किती मऊमऊ गालीचाच भासतॊ पाठीवर पाहू. घारे घारे तुझे चमकदार डोळे मिशीवरून जिभ फिरवत लोळे. तुला असतात पाठीवर पट्टे तु तरी वाघाची मावशीचीच वाटे. मनीमाऊ किती ग तू धाडसी उंदरांना एका झपाट्यात पकडशी, तुला पाहताच ते पोबारा ठोकतात मधूनचबिळातून डोकावून बघतात. कितीही उंचावरून टाकतेस उडी तरीही पायावर असतेस खडी. तुला नाही कधी मार कसा लागत हाडबिड तुझी  नाहीत कधी तुटत. तुला बाई मोकळी सारीच घरे म्याऊम्याऊ करत घरभर फिरे. सौ.सविता धर्माधिकारी. लातूर मो.न.९४२१३६९७३७ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                      *त्याग* ७०-८० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. विनू नावाचा एक ६-७ वीतला मुलगा होता. तो मोठ्या वाड्यात राहायचा. त्या वाड्याच्या परसात फणसाचे झाड होते. एकदा त्या झाडाला मोठमोठे फणस लागले. विनूच्या आईने पिकलेले फणस झाडावरून काढून त्याचे गरे काढले. मग तिने विनूला पाच द्रोण आणायला सांगितले. त्या पाच द्रोणामध्ये तिने थोडे थोडे फणसाचे गरे घातले. आता विनूला काय वाटले, पहिला द्रोण आई मलाच देणार. आईने सांगितले, 'जा हा द्रोण देवापुढे ठेऊन देवाला नमस्कार करून ये.' विनूने तसे केले. आता आई मलाच देणार तेवढ्यात आई म्हणाली, ''हा द्रोण शेजारच्या काकूंना नेऊन दे.'' नंतर उरलेल्या दोन पैकी एक द्रोण आईने विनूला दिला आणि म्हणाली, ''हा द्रोण गल्लीतील त्या काकूंना देऊन ये.'' शेवटी विनू रागावला आता हा शेवटचा द्रोण कोणासाठी असेल असे त्याला वाटले; पण तेवढ्यात आईने शेवटच्या द्रोणातील एक गरा विनूला भरवला. तेव्हा विनू म्हणाला, ''काय ग आई आपल्या घरचा फणस गावाला आधी आणि मला शेवटी होय, का असे केलेस ?'' तेव्हा आई म्हणाली, ''विनू आपल्याला फणस कोणी दिला ? त्या झाडाने. ते झाड आपल्या दारात कसे वाढले ? देवानेच दिले ना ते आपल्याला ? मग केवळ आपणच त्याची फळे खायची ?'' तेव्हापासून कधीही विनूने मी, मला, माझे असे केले नाही; म्हणूनच तो विनू म्हणजे आचार्य विनोबा भावे देवाचे भक्त बनले. संस्कृतमधील भगवद्गीता त्यांनी मराठीत लिहली. ती म्हणजे गीताई. *तात्पर्य :-* आपल्यालाही देवासारखे व्हायचे आहे ना ! मग आपणही दुसऱ्यांना साहाय्य करायचे, भांडायचे नाही. आपल्याला काही चांगले मिळाले की, इतरांना द्यायचे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *👭बालसभा👬* *वर्ग: तिसरी* *अध्यक्षः कु.तन्वी जाधव* *मार्गदर्शकः कु.ज्योती , ईश्वरी जाधव* *प्रमुख अतिथीः साईनाथ तलवारे,गणेश, पंजाब,दुर्गा,जाधव वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी, दिनेश...* *विषयः पाण्याचे महत्त्व*.💧💦🌍🌳🍀🌴🌱🌿💦💧💦💧 *आज माझा वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित करून प्रथमतः प्रतिमा पुजन केले.* 💐💐💐💐 *व त्यानंतर सर्वांचे स्वागत करून झाल्यावर पुढील कार्यक्रमास सुरूवात केली.* *पाण्याचे महत्त्व ह्या विषयावर माहिती सांगितली.पाण्याचे उपयोग , स्तोञ,वापर इत्यादी ....* *कु.सृष्टी, दुर्गा हिने स्वरचित कविता म्हणून दाखविली.* *उद्देशः मुलांना खूप उत्साह आनंद वाटला.आनंददायी वातावरणात मनोरंजकता निर्माण झाली.* 🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूहप्रशासक*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/09/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी. १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *केंद्र सरकारी कर्मचा-यांचा एक टक्क्याने महागाई भत्ता वाढणार* ----------------------------------------------------- 2⃣ *धम्म चक्र परिवर्तन दिनी राज्यातील 3692 ग्रामपंचायतींचे मतदान होणार नाही, शासनाने काढला अध्यादेश* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर : देशातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यासाठी लढा उभारणार - खा. राजू शेट्टी* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला तर 17 ला मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *बीड- 30 सप्टेंबरला भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतची शिष्टमंडळाची चर्चा फिस्कटली.* ----------------------------------------------------- 7⃣ *धावपटू प्रियंका पवार 8 वर्षांकरीत निलंबित.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- मुंबई : आजचे पेट्रोलचे दर प्रति लिटर- ७९.४८ रुपये, डिझेलचे दर प्रति लिटर -६२,३७ रुपये.* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिक्षक आनंदी तर मुले आनंदी* चिमुकल्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांनी आनंदात राहून ज्ञानदानाचे काम करणे आवश्यक आहे, कारण शिक्षक आनंदी असेल तरच त्यांच्या समोरचे पाच-पन्नास चिमुकले आनंदी होतील. शिक्षकांनी दुःखी होऊन................ लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वीरेन विल्फ्रेड रास्किन्हा* वीरेन विल्फ्रेड रास्किन्हा (१३ सप्टेंबर, इ.स. १९८०:महाराष्ट्र, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा भारतीय राष्ट्रीय संघाचा संघनायक होता.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात ...पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते. रामदास पेंडकर(तानुरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) अ जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 रातआंधळेपणा *२) ब जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 बेरीबेरी *३) ड जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 मुडदूस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 कु. श्रेया रमेश ईटलोड, कुंडलवाडी 👤 कबीरदास गंगासागरे, माध्य.शिक्षक जि. प.हा. करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "धंदा " धंदा करायला आता कावळेही पाळले आहेत तुम्हीच सांगा मित्रांनो कोणते प्राणी टाळले आहेत प्राणी पक्षी ही आम्हाला धंद्याला पुरत नाहीत मानव कुठल्या प्राण्याचा सांगा धंदा करत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* •••●🔆‼ *रामकृष्णहरी* ‼🔆●••• 🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ चांगल्या माणसांनाच जीवनाच्या खडतड प्रवासातूनच चांगले जीवन जगण्याचा मार्ग काढावा लागतो.कारण त्यांना त्यांच्या जीवनात जीवन चांगले जगायचे असते.आपल्या जगण्याबरोबरच इतरांच्या जगण्याचाही विचार ते करत असतात. एवढेच नाही तर आपल्या जगण्याच्या पद्धतीमुळे इतरांना त्रास होऊ नये याचा नेहमी चांगला विचारही करत असतात. अशी माणसे कळत नकळत इतरांना व समाजाला खूप काही प्रेरणा देऊन जातात. अशा माणसांचा समाज नेहमी आदर करत असतात. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 📙🌺📙🌺📙🌺📙🌺📙🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोण आहेस तू ?* शोधू कुठे तुला कोठे आहेस तू ? आई माझ्यासाठी कोण आहेस तू ?.....||१|| माझ्या अंतरीचा श्वास आहेस तू ! माझ्या जगण्याचा ध्यास आहेस तू !.....||२|| माझ्या जीवनाचा रंग आहेस तू ! माझ्या स्वप्नामध्ये दंग आहेस तू !.......||३|| माझ्या पाठीवरी थाप आहेस तू ! आई असूनही बाप आहेस तू !......||४|| मूल्ये संस्कारांची ठेव आहेस तू ! आई माझ्यासाठी देव आहेस तू !......||५|| -- श्री. संजय रुस्तुम घोगरे औरंगाबाद.9923463899 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तीन माशांची गोष्ट* स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला. *तात्पर्य* - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/09/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९४८ - आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली जीनाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले. २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. 💥 जन्म :- १५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक. १९१३ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू. 💥 मृत्यू :-  १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *आपण स्त्रियांचा आदर करतो का? जे महिलांचा आदर करतात त्यांना मी नमन करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *सीमेजवळ राहणारे लोक कुठल्याही देशाची सर्वात मोठी रणनितीक संपत्ती असते - राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री.* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग : येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सतर्कतेचे आदेश.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : मानधनात वाढ करावा या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा* ----------------------------------------------------- 5⃣ *९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरुन वाद, हिवरा आश्रमात साहित्य संमेलनाला अंनिसचा विरोध.* ----------------------------------------------------- 6⃣ *रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार जाहीर* ----------------------------------------------------- 7⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बंदुकाच्या गोळ्याने विचार मरत नाहीत* लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला ओळखले जाते ते म्हणजे प्रसारमाध्यम. ज्यात सर्व प्रकार आले जसे की वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या आणि इंटरनेट वरील ब्लॉग या सर्व माध्यमातून माणसे आपले विचार व्यक्त करू शकतात. ......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/FisSeGxJ5JD आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर*          हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.  बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. *ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक* व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्चदर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते आणि त्यांना कसा वाव देते तसेच मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्यांधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत.  किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गायक/गायिका तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहेत. यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरवितात. सवाई गंधर्व तथा रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचे पुण्यात १२ सप्टेंबर १९५२ ला निधन. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे, नाहीतर तो भविष्य नष्ट करेल. उद्या आयुष्य काय संधी देईल त्यासाठी जागा, न कि काय होऊन गेलंय आपल्या आयुष्यात. सौ. भारती कुंभार 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) मोटारसायकलचा शोध कोणी लावला?* 👉 जी. डेम्लर *२) छपाई मशीनचा शोध कोणी लावला?* 👉 जॉन गुटेनबर्ग *३) तापमापकाचा शोध कोणी लावला?* 👉 फॅरनहाइट *संकलन : संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शरद भोर 👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड 👤 पुंडलिक बिरगले 👤 शिवा शिवशेट्टे 👤 पोशट्टी सायन्ना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "साधी यादी" नकली भोंदूबाबांची ही आता यादी आहे ही फायनल नाही सध्या तरी साधी आहे गुन्हे जसे सिद्ध होतील तशी ती वाढत जाईल नवी नवी यादी पुन्हा प्रकाशक काढत जाईल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जीवनाचा खरा प्रवास जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंतच असतो. त्यानंतरचा प्रवास कुणीही पाहिलेला नाही.कारण जीवनाच्या नंतरचा प्रवास हा कल्पनेच्या प्रवास आहे.पण जो प्रवास आपण आज करत आहोत किंवा करणार आहोत ते कल्पनेत नसून वास्तव जीवनात .अशा जीवनात सुखाचा,सत्याचा, धैर्य आणि संयमतेचा, चांगल्या नि वाईट अनुभवांचा,दानधर्माचा या आणि इतर गोष्टींना सत्य मानून इतरांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले सहप्रवासी म्हणून जीवन परिपूर्ण जंगले तर आपल्या जीवनाचा खरा प्रवास पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. नंतरच्या कल्पित प्रवासाची अपेक्षा करणे अयोग्यच आहे. *व्यंकटेश काटकर नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कुठे आहे ?* कुठे आहे वैचारिक स्वातंत्र्य ? जिथे वाजते बिगूल परिवर्तनाचे तिथेच विचारवंताना संपविते 'त्या' बंदूकीची गोळी... कुठे आहेत बुध्दीजीवी माणसं ?  जिथे आहेत मानवतेचे विचार तिथेच खेळली जाते क्रूर निर्दयी रक्ताची होळी... कुठे आहे सुशिक्षित समाज ? जिथे मांडलाय धर्माचा बाजार तिथेच भरली जाते ढोंगी साधू संतांची झोळी... कुठे आहेत पुरोगामी विचार ? जिथे स्वप्नं पाहिले सुधारणेचे तिथेच चालते आजही समाजात  जातींची खेळी... - धनराज अवधुतवार, प्राथमिक शिक्षक भोकर ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिष्याची परीक्षा* रामानुजाचार्य शठकोप स्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोप स्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ‘‘माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?’’ रामानुज नम्रपणे म्हणाले, ‘‘गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.’’ शठकोप स्वामींनी विचारले, ‘‘हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?’’ यावर रामानुज म्हणाले, ‘‘वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.’’ ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/09/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली. 💥 जन्म :- १८७२ - रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू. १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते. १८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक. १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. १९८९ - संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार. 💥 मृत्यू :-  १९८३ - जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. २००६ - टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव करण्यात आलेल्या अलंकारांचे एकूण मूल्य 98 लाख 48 हजार एवढे आहे, सोन्याच्या वीटेला सर्वाधिक म्हणजेच 31 लाख 25 हजारांची किमत मिळाली.* ----------------------------------------------------- 2⃣ *डीआरडीओने नाग क्षेपणास्त्राची घेतली यशस्वी चाचणी.* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्व जिल्हा रुग्णालयांना पेडियाट्रिक व्हेंटिलेटर पुरविणार - दीपक सावंत, आरोग्यमंत्री.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवरात्रीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ११ सप्टेंबरला राज्यील सर्व जिल्ह्यात काढणार मोर्चा* ----------------------------------------------------- 5⃣ *महात्मा कृषि विद्यापीठाच्या वतीने पासून 4 दिवस कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते महोत्सवाचे होणार उद्घाटन.* ----------------------------------------------------- 6⃣ *यूएस ओपन : राफेल नदाल अंतिम फेरीत, नदालचा अर्जेंटिनाच्या डेल पोत्रोवर 4 सेटमध्ये विजय.*  ----------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेला 3-0 ने पराभव केल्यामुळे कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर विराजमान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *👜🦋 काटकसर 🦋💼* जीवनात काटकसर खुप महत्वाचे आहे. त्या शिवाय जीवनात प्रगती कधीच शक्य नाही. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असेल तर त्या घरा चा विकास तरी कसा होईल. म्हणून मराठीत एक म्हण आहे की, अंथरण पाहून पाय पसरावे. याचा विचार............ हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/3zA2TfNSDCY आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *के.एस.रणजीतसिंह* ‘के.एस.रणजीतसिंह’ किंवा ‘रणजी’ या नावाने क्रिकेटविश्वात ओळखले जाणारे जामनगरचे जामश्री रणजीतसिंहजी जडेजा हे जगातील नामांकित क्रिकेट खेळाडूंपकी एक होते. रणजीत हा जामनगर राजाचा दत्तकपुत्र असूनही त्याला वारसा हक्क नाकारल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठविले. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर सन १८९० ते १८९३ या काळात केंब्रिज विद्यापीठाच्या क्रिकेट संघाकडून तो खेळला. एक निष्णात फलंदाज म्हणून रणजीतची ख्याती झाल्यावर तो ससेक्सकडून प्रथम श्रेणी काऊंटी सामने खेळू लागला. ससेक्स काऊंटीमधून सन १८९५ ते १८९७, १८९९ ते १९०४, १९०८ आणि १९१२ या काळात रणजीतने फलंदाजी केली. १८९९ ते १९०३ या काळात त्याने ससेक्सचे कप्तानपदही भूषविले. १८९९ साली एका मोसमात ३००० धावा काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात रणजीत एक अव्वल फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. जुल १८९६ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या संघातून खेळून रणजीतने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील सामन्याच्या दोन इिनग्जमध्ये त्याने ५४ आणि १५४ (नाबाद) अशी धडाकेबंद फलंदाजी केली. रणजीतसिंह एकूण १५ कसोटी सामने खेळला. या सामन्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत. इंग्लिश क्रिकेट संघातून खेळलेला हा पहिला भारतीय पुढे ‘ब्लॅक प्रिन्स ऑफ द क्रिकेटियर्स’ या नावाने ओळखला जाऊ लागला. १९०७ साली रणजीतसिंहची जामनगर राजेपदी नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर १९३४ सालापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या नावाने रणजी करंडक हे भारतीय क्रिकेट संघांमधील सामने भरविणे सुरू केले. ‘रणजी ट्रॉफी’ या क्रिकेट स्पर्धा आजही त्यांची प्रतिष्ठा टिकवून आहेत. जामनगरने भारताला एकूण सहा अव्वल क्रिकेटपटू दिले आहेत. रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, विनू मंकड, सलीम दुराणी, इंद्रजीतसिंह आणि अजय जडेजा.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता. सौ.भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 राजघाट(दिल्ली) *२) पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 शांतिवन(दिल्ली) *३) इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 शक्तिस्थळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 क्रांतिकुमार भूक्तरे, नांदेड 👤 ईश्वर येमुल, नांदेड 👤 विश्वंभर पपुलवाड, धर्माबाद 👤 संतोष पांडागळे, नांदेड 👤 राजेश बाबुराव चिटकुलवार 👤 संभाजी सालुंखे 👤 गणेश कोकुलवार, नांदेड 👤 प्रवीण भिसे पाटील 👤 ज्ञानेश्वर इरलोड 👤 गंगा पुट्ठेवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " गृहित " एक रडवतो तर दुसरा हसवत असतो रडवणारा अन् हसवणारा आपल्याला फसवत असतो ते आपले चोंभाळायचे काम करत असतात सामान्याला मात्र सारे गृहित धरत असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले*, ” देवा ” *तूच हे सर्व निर्माण* *करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस*. *तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे* ? *तुझेच तुला कसे अर्पण करणार* ?” *भगवंताने स्मित उत्तर दिले* ,” *बाळा, *तुझा अहंकार मी* *निर्माण केलेला नाही* . *तो तूच निर्माण केलेला आहेस*. *तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल* .” ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आगमन सोनपरीचे* आगमन सोनपरीचे झाले सोनपावलांनी आनंदाने भरले घर निघाले त्यात न्हाऊनी कौतुके तिला सारे पाहती देती प्रेमे आलिंगन पाहून तिचे मुखकमल झाले आनंदी मन सानुली बाहुली जणू गोड गोजिरी साऱ्यांचीच छकुली दिसे साजिरी पाहताच मोहवी मन घराला आले घरपण हर्षभराने करुया स्वागत तिचे आपण सारेजण सौ वैभवी गावडे , मुंबई 9221804027 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अधिक चतुर* बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले. पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण ? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो. पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती? बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात. बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/09/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले 💥 जन्म :- १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी. 💥 मृत्यू :-  २०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *जुलै महिन्यापासून स्वाईन फ्ल्यूने मध्यप्रदेशात 44 जणांचा मृत्यू.* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यात दोन नदी जो़ड प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - नितीन गडकरी* ----------------------------------------------------- 3⃣ *वर्धा : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारित असलेल्या राज्यातील 10 शिक्षण संस्थांचे (NON- AICTE) अभ्यासक्रम केले बंद, 9 संस्था विदर्भातील* ----------------------------------------------------- 4⃣ *नांदेड - कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जात मुदखेड तालुक्याचे नाव नसल्याने शेतकरी त्रस्त, शेकडो शेतक-यांनी तहसिलदाराना दिले निवेदन* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविली. मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने निर्णय.* ----------------------------------------------------- 6⃣ *हुशार विद्यार्थ्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक १० नोव्हेंबरला होणार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आज दैनिक देशोन्नती मध्ये प्रकाशित झालेला लेख *एक दिवस अंगणवाडीसाठी* शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत जावे लागणार, अंगणवाडीच्या ताई ला प्राथमिक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची एक बातमी नुकतेच वाचण्यात आली आणि मराठी शाळांचा दर्जा यापुढे सुधारेल असा एक आशावाद निर्माण झाली.......... हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/NRiJHKMDm4J आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *डेनिस मॅकॲलिस्टेर रिची* डेनिस मॅकॲलिस्टेर रिची  यांचा जन्म: सप्टेंबर ९, १९४१ रोजी झाला. हे एक अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अल्ट्रान, बी, बीसीपीएल, सी, मल्टिक्स, आणि युनिक्समधील योगदानाबद्दल ओळखले जातात. त्याना १९८३ मध्ये ट्युरिंग पारितोषिक आणि १९९८ मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले गेले. रिची ल्यूसेंट टेक्नॉलॉजीजचे प्रमुख म्हणून सिस्टीम सॉफ्टवेर संशोधन विभागामध्ये २००७ पर्यंत काम करत होते.डेनिस रिचींचा ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क येथे जन्म झाला. भौतिकशास्त्र आणि उपयोजित गणित या विषयात हार्वर्ड विद्यापिठातून पदवि संपादन केल्यानंतर इ.स. १९६७ मध्ये, त्यानी बेल लॅब्जच्या संगणन विज्ञान संशोधन विभागात कार्यारंभ केला. C आज्ञावली परिभाषेचा जनक म्हणून सर्वज्ञात असलेले डेनिस रिची युनिक्स संगणक प्रणालीचेप्रमुख विकासक, आणि C ची गिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सामान्यतः 'K/R' वा K&Rम्हणून उल्लेखिलेल्या (लेखक केर्निघन आणि रिची) The C Programming Language, या पुस्तकाचे सह-लेखक आहेत. डेनिस रिची बऱ्याचदा "डी एम् आर" (त्यांचा बेल लॅब्जमधील इ-मेल पत्ता) या नावाने ओळखले जातात.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ परिश्रम करूनच जीवनाचा खरा आनंद घेता येतो ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *गोवळकोंडा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या राज्यात आहे ?* आंध्र प्रदेश 2) *फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कोणते आहे ?* कच्छचे रण 3) *टेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात कोणती ?* एअरंडेल टेरिअर’ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 महेश ठाकरे 👤 गणेश कल्याणकर, नांदेड 👤 उमाकांत कोटूरवार, धर्माबाद 👤 पंढरीनाथ डोईफोडे, लोणारकर 👤 गंगाधर गुरलोड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " कुंपण " कुंपणच जेंव्हा कधी शेत खाते डोक्याची आग मस्तकात जाते असलं कुंपण झोडलं पाहिजे काहीला वेळीच तोडलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बहिणाबाईंनी सांगितलयं ,'जगण्या मरण्यात काय तर एका श्वासाचं अंतर ! एकच श्वास, फक्त एकच. पण तो एकच श्वास केवढं मोठ अंतर निर्माण करतो. असण्या-नसण्यातलं अंतर, जन्मा-मरणातलं अंतर, होत्या-नव्हत्यातलं अंतर, जागण्या-झोपण्यातलं अंतर, क्षणांत आहे आणि क्षणांत नाही, ही असामान्य गोष्ट श्वासाच्या अंतराने प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते.* *माणूस जातो, स्मृती उरतात. त्या चांगल्या उराव्यात असं सा-यांनाच वाटतं पण त्यासाठी काही चांगलं करावं लागतं, हे विसरून कसं चालेल ? मृत्यू अनेक गोष्टी शिकवितो, अर्थातच जिवंत असणारांना ! पण मृत्यूची शिकवण तरी किती वेळ स्मरणात राहते ? मृत्यू नावाचे जळजळीत सत्य उत्तम वागण्याचे, जगण्याचे आत्मभान निर्माण करून देते. माणूस गेल्यावर होणारी कालवाकालव, त्याच्या स्मृतींची असंख्य फुलंच म्हणावी लागतील. या फुलांसाठी तरी श्वासात अंतर पडण्यापूर्वी ' जे जे उत्तम ' आहे तेच करावयास हवे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला शारीरिक विकार आणि मानसिक विकार हे हतबल करुन टाकतात. त्यामुळे मनुष्याला काहीच करता येत नाही.कोणत्याही कामात मन लागत नाही किंवा कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडता येत नाही.मग तो आपल्या जीवनात निरुत्साही बनतो.अशा रुक्ष जीवनातून मुक्तता हवी असेल तर पहिल्यांदा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.नियमित ठरलेल्या वेळेत अन्न सेवन करणे,वाईट व्यसनापासून दूर राहणे, नियमित व्यायाम करणे यामुळे आरोग्य उत्तम राहील ,तर मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी अधिक कामाचा ताण न घेणे,अवांतर गोष्टींना प्राधान्य न देणे, समुहात राहणे, विविध उपक्रमात सहभागी होणे,वाचनात लक्ष केंद्रित करणे अशा विविध गोष्टींमध्ये लक्ष घातले तर मानसिक आजारातून ही मुक्तता मिळू शकते.अशा सवयी मनुष्याने जीवनात सातत्याने ठेवल्यास शारीरीक व मानसिक विकार होणार नाहीत हे निश्चितपणे काही प्रमाणात सांगता येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विषय-आक्रंदन* कोणत्याही जीवाचा। न होवो आक्रंदन प्रत्येक सजीवात। फुलावे नंदनवन। दुःख कुणाच्या। पदरी न येवो। न दिसो कुणाचा आक्रंदन। सारेच कसे हसत राहो। वसो साऱ्यांच्या ठायी। दया,क्षमा,शांती। हे सदगुण जोपासून। व्हावे लीन ईश्वराप्रती। उतरु दे स्वर्ग। या भूमीवर। फुले,फळे बहरुन। राहू दे नित्य अमर। सौ.वर्षा भांडारकर. त.मूल.जि.चंद्रपूर. 9422007150 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अहंकार* शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, ‘आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ! ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना! कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे! याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे ! महासागरासारखे ! त्यावेळी शंकराचार्यांनी हातातला दंड पाण्यामध्ये बुडवला, बाहेर काढला आणि आणि शिष्याला दाखवला. ‘बघ किती पाणी आले? एक थेंब आला त्याच्यावर.’ शंकराचार्य हसून म्हणाले, ‘वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू? अलकनंदेच्या पात्रात अवघे जल आहे ना, त्यातील अवघा एक बिंदू काठीला आला. तेवढेच माझे ज्ञान अवघ्या ज्ञानातील बिंदू एवढे आहे. आदी शंकराचार्य जर असे म्हणतात, तर मग तुम्ही-आम्ही काय म्हणायचे? तात्पर्य :- कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको. मीच मोठा , महान आहे ही वृत्ती माणसास घातक ठरते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

कथा....एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे ७ दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुत्तराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुत्तराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुत्तराने मनातल्या मनात ठरवले. एकदा कबुत्तर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबुत्तर त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुत्तर उंदराच्या पिलांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना... तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले...! "उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुत्तराचे संपूर्ण पंख कुर्तडलेले होते." फडफडत फडफडत कसाबसा कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले..., "तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले?" बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली... _*"उपकार कधीही वाघा सारख्या पुरुषी व्यक्तित्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याय शोधात असतात... स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*_ संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९२६ : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला. 💥 जन्म :- १९२६ : भपेन हजारिका, प्रसिद्ध गायक, संगीतकार. १९३३ : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :-  १९८१ : निसर्गदत्त महाराज उर्फ मारोती शिवरामपंत कांबळी, नवनाथ सांप्रदायाचे पुरस्कर्ते. १९८२ : शेख अब्दुल्ला, काश्मीरचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *1993 मुंबई साखळी स्फोट : फिरोज खान,  ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा तर अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागासांना सर्वसामान्य कोट्यातून 25 टक्के आरक्षण द्यावे - रामदास आठवले* ----------------------------------------------------- 3⃣ *एकनाथ खडसेंविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल* ----------------------------------------------------- 4⃣ *लोकमत गोवन ऑफ द इयर २०१७ पुरस्कार सोहळा - शिक्षण विभागातील पुरस्कार व्यंकटेश प्रभूदेसाई यांना प्रदान* ----------------------------------------------------- 5⃣ *कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नवीन पक्ष स्थापन करणार, स्वाभिमानीला सोडचिठ्ठीनंतर खोत यांचा मोठा निर्णय* ----------------------------------------------------- 6⃣ *पंढरपूर - विठू माउलीच्या दर्शनासाठी आता टोकन पद्धत लागू करणार, मंदिर समितीची माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *यू एस ओपन टेनिस टुर्नामेंट. रॉजर फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव. युआन डेल पोत्रोकडून रॉजरचा पराभव.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🦋 *स्वातंत्र्य* 🦋 ती खुप शिकलेली. तो देखील चांगला शिकल्यामुळेच त्याला एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी मिळाली. तसे दोघे पण पुरोगामी विचारांचे. एकमेकाला समजून घेणारे. मात्र घरात तसे वातावरण नव्हते.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/Sebdj2pCFLX आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आशा भोसले  आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदीआणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला.  राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार ही त्यांना देण्यात आला.      *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंकता येते. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) बालिका दिन कधी साजरा केला जातो?* 👉 ३जानेवारी *२) बालिका दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केल्या जातो?* 👉 सावित्रीबाई फुले *३) देशातील पहिली मुख्याध्यापिका कोण?* 👉 सावित्रीबाई फुले * संकलन : संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 माधव बाभळे, सहशिक्षक, माहूर 👤 योगेश जंगले, नांदेड 👤 कृष्णा हंबर्डे 👤 बालाजी वारले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बुडत्याचा पाय " बुडत्याचा पाय खोलाकडे असतो खरं सांगणाराच्या बोलाकडे नसतो खोलाकडे गेले की पाय खोलात फसतो खोल खोल फसला की मग रडत बसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *निसर्गात पाखरांचं एक निरागस अन् निर्लोभी असं जग असतं. आपल्या पिलांसाठी ते एक खोपा तयार करतात. आपल्या सुस्वर भाषेनं सारा निसर्ग आनंददायी करतात. त्यांच्या अंगावरील रंग किमयेनं सृष्टीच्या अगाध करणीचा सौंदर्यमय अविष्कार नजरेत येतो. त्यांच्या भरा-यांनी आभाळ हरखून जातं, सगळीकडे आनंदी आनंद गाजत राहतो. मात्र माणूस यापैकी बरंच हरवून बसतो.* *दुस्वास, खोटारडेपणा, लबाडी, हव्यास, अधाशीपणा, कुरघोडी, सत्ता यासारख्या विकारांनी माणूस आपले आयुष्य अशांत-दु:खीत करतो. आपल्या मुर्खपणामुळे इतरांचेही आयुष्य दुषीत करून रिकामा होतो. खरंतर--* *'आनंदाचे डोही, आनंद तरंग'* *यापरतं सुख नाही. आनंद निर्माण करणं, तो सगळीकडे पेरीत जाणं व सारं पर्यावरण प्रसन्नतेनं सुखावून टाकणं हा माणसाच्या जगण्याचा 'परिपाक' आहे.* ••●🍁 ‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई.* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ इतरांच्या कामाचे कौतुक मनातून भरभरुन करा.कारण तुमच्या कौतुकाची थाप त्यांच्यासाठी खुप काही प्रेरणा देऊन जाणारी असते.आपल्या प्रेरणेमुळे त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळते. पण असे करु नका की,तो पुढे जात आहे आपल्याला काय फायदा होणार.त्याचे आपल्याशी काय देणे-घेणे आहे.असं म्हणून त्यांचे मागे पाय खेचू नका.कधी तोही आपल्या आपण केलेल्या कामाचे कौतुकच करेल. त्यांचीही प्रेरणा आपल्याही खुप काही देउन जाणारी असतेच. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌸🌴🌸🌴🌸🌴🌸🌴🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वप्नपूर्ती* ----------------- सक्षम मी तुझ्या आशीर्वादाने जीवनाच्या या वाटे वरती सांग माझ्या सुखा साठी आई किती कष्ट तू करती जगता मधे थोर आहे ग कायम तुझी अनमोल किर्ती तुझ्या मुळे च लाभली मला संकटाशी लढण्याची स्फूर्ति तुझ्या अफाट ग थोरवी पुढे तुच्छ वाटते दगड देवाच्या मूर्ति जीवनभर करणार मी आई फक्त तुझीच सेवा आरती सुखात राहावी कायम तू येऊ दे तुझ्या आनंदा भरती हास्य माझे ग तुझ्या सुखात कणखर मी तुझ्या आधारा वरती आहे मी तर तुजविण पामर वंदन करतेय तुला ही धरती थकलिस आता कष्ट तू थांबव करणार मी तुझी *स्वप्नपूर्ती* *आजिनाथ वाडेकर* *आष्टी, बीड* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ कृष्णाने सांगितलेले *कलियुग* काय आहे? एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." *"जसे कर्म, तसे फळ."* *"कितीही विरोध होऊ देत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 📞9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

​​मैत्रिणी.....​​ दुःख वाटून घेणाऱ्या सुख वाटत जाणाऱ्या सल्ला देणाऱ्या सल्ला घेणाऱ्या खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणार्या. शाबासकीची पहीली थाप पाठीवर देणाऱ्या . खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या. मैत्रिणी आयुष्याला मिळालेलं एक वरदान. जागेपणीचं स्वप्न छान पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान. सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर हळूवार हात पुसतात डोळ्यातले नीर उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर मैत्रिणी गातात नाचतात खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम. त्या सुगरण असोत नसोत. प्रत्येक घास वाटतो अमृताहून गोड. मैत्रित नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती लहान थोर शहर गाव. मैत्री असते एक सरीता या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी. ,, मैत्री.... ​​माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी समर्पित...​​संकलित.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/07/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 घडामोडी १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण. १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी. १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या. 💥 जन्म १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक. 💥 मृत्यू २००१ - शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता. २००२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *गरिबांचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती भवनात जातोय - भारताचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले अभिनंदन* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - अतुल भोसले यांनी घेतला पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार* ----------------------------------------------------- 4⃣ *⁠⁠⁠⁠⁠नांदेड : लोहा येथील पाल वस्ती वरील भटक्यांना रेशनकार्ड व धान्य वाटप प्रसंगी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी भटक्यांना एका वर्षाच्या आत हक्काचे घर मिळेल असा आशावाद व्यक्त केला* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- महापालिका शाळामधील शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केले असतील त्यांचीं सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी आज झालेल्या महासभेत दिले.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 4 वर्ष पूर्ण अंनिसचे 'जबाब दो' आंदोलन सुरु.* ----------------------------------------------------- 7⃣ *डर्बी- महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दिमाखदार प्रवेश, भारतानं ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मिळवला विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     *✈  ✈  गुगलयान  ✈  ✈* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संस्काराचे महत्त्व* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/FHV28hBmrkW पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नांदेड* हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून आले असल्याचे सांगण्यात येते. नांदेडात शिखांचे शेवटचे गुरू गोबिंद सिंग यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड हे संतकवी विष्णुपंत, रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   चांगली भुमिका आणि चांगले विचार असणारे, लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दांतही आणि प्रार्थनेतही..! सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारत व चीनचे युध्द केव्हा झाले?* 👉🏼 १९६२ *२) भारताचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते?* 👉🏼 पंडित जवाहरलाल नेहरू *३) तत्कालीन सरक्षंण मंत्री कोण होते?* 👉🏼 कृष्ण मेनन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 वृषाली शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रतिलिपी डॉट कॉम 👤 चिंतामणी जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "खोटी प्रतिष्ठा " जो तो आसुसला आहे खोटी प्रतिष्ठा जपायला त्याचे त्यालाच लागते वर्तन आपले वपायला त्याचे त्याला आपले वाईट वर्तन वपते चांगले सांगितले कोणी की खरे फार खुपते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.* *देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ? प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. "सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्‌भावना' आणि 'सद्‌विचार' प्राप्त होतात."* ••●♻ ‼ *रामकृष्णहरी* ‼♻●•• ☘☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्याकडे श्रीमंती आहे पण माणुसकीचा थोडाही ओलावा नाही.चांगला विचार नाही,दानधर्म करण्याची इच्छा नाही, श्रीमंतीच्या नशेत चूर होतात.त्यांना इतर जगाचे काय होते हे काहीच माहीत नाही आणि अशा स्वार्थी,मतलबी माणसांना सर्वसामान्य माणूसही ओळखत नाही.अशा माणसांचं जीवंतपणी कोणी नाव घेत नाही आणि त्यांच्या पश्चात ही नावं कोणी घेत नाही. पण ज्यांच्याकडे माणुसकी नावाची श्रीमंती आहे, 'मी 'पणाचा गर्व नाही, दुस-या बद्दल मायेबद्दलचा ओलावा आहे.आहे त्या परिस्थितीला सामावून घेण्याचे धैर्य आहे.कोणत्याही प्रसंगी दुस-यांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी आहे .अशाच माणसांची नावे सारे लोक घेतात आणि अशाच माणसांचा पश्चातही उदो उदो होतो .त्यांचेच नाव इतरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.८०८७९१७०६३ ९४२१८३९५९०. ☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा." ब्राह्मण "हो" म्हणाला ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले. *भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात. नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते. ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते." तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले, आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला. चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती. म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते. शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते. यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला. यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ? चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो." दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले. हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या. एकबाई ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?" ताई म्हणाल्या, "नाही हो" तेंव्हा एक बाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले." चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा. आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांना या कर्माचे भागिदार बनवले...व जे जे बोलतात.. अफवा पसरवतात.. एखाद्याची बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माथी मारले गेले. थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे. म्हणून आजचा सुबोध दिला आहे. *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.* *माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो* *म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.* ============================= *" आयुष्य खुप सुंदर आहे "* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ बाथ क्रांती दिन - इराक. लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको. संविधान दिन - दक्षिण कोरिया. 💥 घडामोडी १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. २००४ - भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार. 💥 जन्म :- १९२० - हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष. १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राष्ट्रपती पदासाठी आज होणार मतदान, कोण निवडून येणार जनतेमध्ये उत्सुकता* ----------------------------------------------------- 2⃣ *नाशिक : मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर धरणांमधून मोठा विसर्ग* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक - ओरटीओत दलालांकडून पैसे जातही असतील, मात्र यासाठी नागरीक जबाबदार - दिवकर रावते, परिवाहन मंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली, जम्मूच्या बनिहाल येथे झाला अपघात* ----------------------------------------------------- 5⃣ *आयआयएफए अवॉर्ड 2017, सोनम कपूर आणि शबाना आझमी स्टारर नीरजाला मिळाला बेस्ट फिल्म अवॉर्ड* ----------------------------------------------------- 6⃣ *विम्बल्डन : रॉजर फेडरर बनला विम्बल्डन चॅम्पियन, विक्रमी आठव्यांदा घालती विजेतेपदाला गवसणी* ----------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली- ऑनलाईन बेटिंगला अधिकृत करण्याचा कोणताही विचार नाही, मी त्याच्या विरोधात असलो तरी अंतिम निर्णय सरकार घेईल- विजय गोयल, क्रीडा मंत्री* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 __ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ _विशेष बातमी :- जागतिक सर्पदिनानिमित्त हेल्पिंग हैंड्स वाइल्डलाइफ वेलफेयर सोसाइटी नांदेड व जिल्हा परिषद शैक्षणिक संकुल जारीकोट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबादच्या जिल्हा परिषद हायस्कूल च्या सभागृहात आयोजित सापांची ओळख आणि माहिती प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद_ __ *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कश्यासाठी ? मुलांच्या शिक्षणासाठी ...!* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/T7ttYqmUVSw पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   *जे शिक्षक विद्यार्थ्याना शिकविण्यापेक्षा अभ्यास करण्याची प्रेरणा देतात तेच खरे आदर्श शिक्षक होत.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) जगातील सर्वात लांब नदी कोणती?* 👉🏼 नाईल नदी *२) ही नदी कोणत्या देशात आहे?* 👉🏼 इजिप्त *३) या नदीची लांबी किती आहे?* 👉🏼 ६,६५० कि. मी. *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 माधव गैनवार, चिकना 👤 दिगांबर कदम, नांदेड 👤 आरिफा शेख, पुणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " देवपण " घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही कष्टा शिवाय कधीच कोणी मोठ होत नाही जे कष्ट करतात त्यांनाच मिळते यश देत बसतील बाकीचे आपल्या नशिबाला दोष शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.* *प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.* ••●🌟‼ *रामकृष्णहरी* ‼🌟●•• ☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल - 9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..८०८७९१७०६३/९४२१८३९५९० 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संशय* हा आपल्या जीवनाच्या वाटेवरील शञू आहे.खरं पाहता माणूस स्वतःच स्वतःचा मिञ असतो आणि शञू असतो ! संशयग्रस्त *मन* तात्काळ अनिष्ट विचारांनी व्यापल जातं.संशय आणि *भीतीमुळं* माणसाचं मन अस्वस्थ होतं.अशावेळी आपलं मन शांत , स्थिर , स्वस्थ आणि विचारी बनवल की घडणार अनिष्ट कृत्य टाळता येतं. आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवून आपलं मन द्वेषमुक्त व संशय विरहीत करावं.आणि जर का आपण असे नाही केले आणि आपल्या मनात संशयाचं वारं भिनू लागलं की आपण आपल्या सुखाला आणि आनंदाला पारखे होतो. आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होत असला तरी त्याचे रुपांतर संशयात झाले तर ती व्यक्ती जीवनात स्वतः तर सुखी राहूच शकत नाही.परंतु तिला दुसऱ्याचे सुख आनंद हे सुद्धा नकोसे वाटते.कारण गैरसमजुतीचा एक क्षणदेखील माणसाचे जीवन उध्वस्त करु शकतो. अशावेळीआपण आपल्या मनातील संशय काढून टाकण्यासाठी कराव तरी काय? मोकळ्या हवेत फिरायला जावं, सदा मन प्रसन्न , आनंदी, उत्साही ठेवावे , कलेची जोपासना करावी हसत -खेळत वागावे, होईल तितके चांगली कर्म करावे आणि दुसरे जर चांगले कामे करीत असेल तर त्यांच्याबद्दल सहकारी वृत्ती बाळगावी. *एवढं केल्यावर आपल्यातला द्वेष , संशय आपल्याला भिऊन मनातून पळून जाईल आणि आपल्याला आनंद घेता येईल आणि देताही येईल.* *जीवन जगण्यासाठी आणि आपल्या जीवनात आनंद मिळविण्यासाठी गैरसमज न होऊ देता समजपूर्वक वागणे हेच योग्य आहे*. 〰〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 *✍शब्दांकन /संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार .

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 02/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वायु सेना दिन - रशिया* 💥 घडामोडी :- १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार. १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले. 💥 जन्म :- १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. १९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा. १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई- खासगी मेडीकल कॉलेजांची प्रवेश यादी जाहीर. खासगीसोबत शासकीय कॉलेजांचीही यादी जाहीर. 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत.* ----------------------------------------------------- 2⃣ *काबूल - अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील मशिदीत झालेल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : सुप्रसिद्ध पत्रकार रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : रेशन दुकानदारांचा संप सुरू, कमिशन वाढीसाठी सुरू केलेल्या संपात 2600 पैकी दीड हजार दुकानदार सहभागी* ----------------------------------------------------- 5⃣ *पाकिस्तान पंतप्रधानपदाची निवडणूक शाहिद अब्बासी यांनी 221 मतांनी जिंकली- पाक मीडिया* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मेंदूरोग चिकित्सक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार घोषित* ----------------------------------------------------- 7⃣ *परभणी: मराठवाडा विकास आंदोलनातील मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमराज जैन यांचं निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/UJfMQi8RpTF वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गोंदिया* गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत. *पर्यटनस्थळे* - नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जर तुमचे विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील, तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही !!!* खंडु यरकलवाड बेळकोणीकर मो : 7758845592 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) सुप्रसिद्ध "फकिरा" या कादंबरीचे लेखक कोण आहेत?* 👉🏼 अण्णाभाऊ साठे *२) अण्णाभाऊ यांचे पूर्ण नाव काय?* 👉🏼 तुकाराम भाऊराव साठे *३) अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला?* 👉🏼 १ ऑगस्ट १९२० *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 आर्यन अनिल चौगले, रा. कोनवडे पो. कूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर 👤 वाघमारे रविंद्र, सहशिक्षक, धर्माबाद 👤 जी.पी. मिसाळे, अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, धर्माबाद 👤 दिगांबर वाघमारे, पत्रकार, कंधार 👤 शिलानंद गायकवाड 👤 कैलाश चंदोड, येताळा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "आचार ना विचार " आचार ना विचार कसे ही बोलतात काहीही बोलले की थरथर पाय हालतात बोलतांना कधी ही तोलून मापून बोलावं सरळ बोलून होते मग वाकड कशाला चालावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *हत्ती आणि सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे आपापल्या खिडकीतून दिसलेला आभाळाचा तुकडा म्हणजेच ते विस्तीर्ण, अमर्याद आभाळ असल्याचा भ्रम निर्माण होतो. शोध मागे पडतो. माझ्याच मोजपट्टीनं जगाला मोजायच्या नादात मी विसरून जातो की एकाचवेळी आपापल्या अनुभवांच्या आणि अनुभूतींच्या खिडक्यांतून असंख्य डोळे या आकाशाकडे बघताहेत. मी माझी खिडकी मोठी करण्याऐवजी माझ्याच खिडकीची चौकट भक्कम करून घेतोय आणि आभाळाच्या कितीतरी रंगछटांना, आकारांना मुकतोय.* *हे सवंग...हे भिकारडं...हे सखोल.....हे बाजारू...* *असे शिक्के मारण्याच्या नशेत मीही एखाद्या साम्राज्यवाद्याच्या पंगतीत जाऊन बसल्याचं मला कळतही नाही. सत्य गवसल्याच्या भ्रमात मी सत्यापासून अधिकाधिक दूर जात राहतो. जर दुस-याच्या खिडकीचा आदर करणंही जमणार नसेल तर कशाला गप्पा मारायच्या वैश्विकतेच्या ?* *"सारं जग जोडायला निघालेल्यानं आधी स्वत:ला मोडायला शिकलं पाहिजे...'* ••●🍁‼ *रामकृष्णहरी*‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रकाशातून मार्ग तर काहीही प्रयत्न न करता सहजपणे सा-यांनाच काढता येतो आणि सहजच जीवनाचा प्रवास करता येतो.त्यात काही अवघड नाही,परंतु अंधारातून मार्ग शोधून काढणे फार कठीण आहे. त्यालाही धैर्य लागते. अशी धैर्यवान माणसे कितीही अंधार असला तरी ते प्रकाशाचा शोध काढल्याशिवाय थांबत नाहीत.कारण मार्ग जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्यांचे मनही स्वस्थ बसू देत नाही. मनाने एकदा निश्चय केला की, कितीही अवघड प्रसंगातून चांगला मार्ग शोधता येतो हे मात्र सत्य आहे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🛡 आजची काव्यसरिता 🛡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता - वंचिता* अवघे विश्व पूजे तूला सृष्टी ची तू रचियता... भाग्य रेषा कशा ललाटी तूला बनवली वंचिता.... संकटाच्या पथमार्गावर तूझ्यात वसते निर्भिडता भ्याड म्हणूनी तूजला हासे हास्यापुढे बनवली तूला वंचिता... शिक्षणाचा हक्क तूझा पायदळी तूडवली तूझी अस्मिता जीव तूझा घुसमटतो तरी अंगठा दाखवूनी केलीया तूला वंचिता... काय गुन्हा झाला तूझा तू नारी होती जन्मतः अबला म्हणूनी हिणवती तूजला सबला बनली तरी वंचिता... ऊठ आता तू मार्ग सापडेल शोधता सावित्री आणि लक्ष्मीबाई बनूनी तू भाग्यरेषा पूस आपली नको ती वंचिता... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक* *जि.प.उ.प्रा.शाळा सिंदगीतांडा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अहंकारी राजाला धडा* एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला, *तात्‍पर्यः-* जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

☘💐☘💐☘💐☘ *माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ *आरोग्य शिक्षण व जनजागृती*💊💊💊💊 *जि. प.प्रा.शा वाटेगाव* 〰〰〰〰〰〰〰 *आज दि. ०२-०८-२०१७*रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा वाटेगाव येथे *राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम* या अंतर्गत आरोग्य सेविका सौ.आर.एस.भाले व मदतनीस सौ.मोरे.यांनी भेट दिली व शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांची तपासणी केली.तसेच कृष्ठरोगाचे संशयीत लक्षणे , निदान व उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या जनजागृती आरोग्य शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य कसे राहील ह्या संदर्भात आरोग्याची माहिती सांगण्यात आली. 〰〰〰〰〰〰 *वर्ग तिसरीचा विद्यार्थ्यांची तपासणी करतांनाची क्षणचित्रे*.👇 〰〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांकन लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका) जि. प.प्रा .शा.वाटेगाव ता.हदगाव जि. नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. /09/2017 वार - वार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता. १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक. १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार* ----------------------------------------------------- 2⃣ *हिंगोली : कळमनुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाच संगणकांची चोरी.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबईः ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन. शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईत दीड वर्षांत होणार सायकल ट्रॅक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर - गायिका रजनी करकरे- देशपांडे यांचं रात्री ११.१५ वाजता फुप्फुसाच्या विकाराने निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *न्युयॉर्क : अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. त्यांनी हीदर वॅटसन आणि हेन्री कोन्टीनेन या जोडीला ६-४, ४-६, १३-११ असे पराभूत केले.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी : वसमतच्या सौ. संगीता देशमुख यांच्या विचारवेध या पुस्तकाचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते आज नांदेडात प्रकाशन सोहळा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    *बायको* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/X2H6Tz7P1ia वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                       *महाड* महाड हे अष्टविनायकां पैकी असलेले वरदविनायक गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महड गाव जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खालापूर तालुक्यात खोपोलीपासून ६ किमी अंतरावर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा  पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होत, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो..* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *वर्हाड निघालय लंडनला या एकपात्री नाटक कोणाचे आहे ?* डॉ. लक्ष्मण देशपांडे 2) *फास्टर फेणे हे पुस्तक कोणाचे आहे ?* भा.रा. भागवत 3) *रक्तचंदन हे कथा संग्रह कोणी लिहिले ?* जी. ए. कुलकर्णी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 भिमराव माधवराव सोनटक्के, पाटोदा बु. 👤 आशिष हातोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "झुलवा झुलवी " स्वप्न पाहणारे आशेने स्वप्न फुलवत असतात स्वप्न दाखवून झुलवणारे उगीच झुलवत असतात  झुलवणाराला वाटते झुलवण्यात मजा आहे स्वप्न पहाणाराला मात्र वाटते ही तर सजा आहे      शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.*                     •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••             🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण निसर्गातल्या प्रत्येक घटकांकडून अपेक्षा करतो. ढगांकडून पावसाची, वृक्षांकडून फळांची नि सावलीची,नदीकडून पाण्याची,माती आणि शेतीकडून अन्नधान्याची आणि इतरही काही गोष्टी सतत काहीना काही घेतच असतो पण त्यांच्या मोबदल्यात निसर्गाला काही देतच नाही.आपण जसे मुक्तपणे घेतो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. पण निसर्गाला काहीतरी देण्याचाही संकल्प करायलाच हवा.देणा-याचे ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडायलाच हवे.त्यासाठी निसर्गाचे संतुलन बिघडू द्यायचे नसेल तर किमान आपण वृक्षांचे संगोपन करायला हवे.कारण वृक्ष हेच आपल्या सर्वांचे पालनहार आणि तारणहार आहेत.त्यांच्याकडूनच शुद्ध हवा,पाणी,अन्न आणि आरोग्य मिळू शकते.त्यांचे आपल्या जीवनापेक्षा ही अधिक जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे.वृक्षांशी आपले नाते अधिक दृढ केले पाहिजे.तरच आपण पुन्हा निसर्गाकडून घेऊ.नाही तर आपले जीवन जगणे असह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*    संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आत्महत्या* सुटले का कधी सारे प्रश्न केवळ आत्महत्या करून उलट गुंता वाढतच जातो जाता हे जग कायमचे सोडून हे जीवन घटनांचे रांजण जे नेहमीच असते भरून बऱ्यासह वाईटही असती पण त्याही जाती सरून केवळ क्षणिक नैराश्यापोटी कुणी कशास जावे हरून झटकून टाकता मरगळ चैतन्य येते नवे अजून सकारात्मकतेने सदा जीवन पहावे जगून नकारात्मकतेलाही मग जावे लागते पळून जीवन खरेच सुंदर आहे अनुभवावे नव्याने जगून  उगाच गुंता न वाढवावा आत्महत्या कुणी करून ----- प्रविण शांताराम, पनवेल, रायगड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *स्वतःला सुधारणे आवश्यक !* एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोडा युवराज्ञीला दिला. *तात्पर्य :* जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे, त्याला काटे बोचत नाहीत; म्हणूनच स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी. 💥 जन्म :- १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार. १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु. १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत आज संपूर्ण राज्यात मराठी विषयाची होणार पायाभूत चाचणी* ----------------------------------------------------- 2⃣ *स्वातंत्र्य लढ्यात म्यानमारची भूमिका महत्त्वपूर्ण, आपल्या सीमाच नाही तर भावनासुद्धा एकमेकांशी जोडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई- परदेश शिष्यवृत्ती प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडून मागवली सर्व माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे - जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणा-या 'टाइम्स' या संस्थेने मानांकन केले जाहीर, क्रमवारीत पुणे विद्यापीठ देशात सातव्या क्रमांकावर, तर पारंपरिक विद्यापीठात संयुक्तपणे पटकावलं अव्वल स्थान* ----------------------------------------------------- 5⃣ *अंदमानला बसला भूकंपाचा धक्का, रिष्टर स्केलवर 5.2 तीव्रतेचा भूकंप.* ----------------------------------------------------- 6⃣ *लंकेत विराटसेना अजिंक्य! कसोटी, वनडेपाठोपाठ ट्वेंटी-२० मालिकाही जिंकली* ----------------------------------------------------- 7⃣ *युएस ओपन टेनिस - स्पेनच्या राफेल नदालने अपेक्षेप्रमाणे रशियाच्या आंद्रे रुबलेववर मिळवला विजय, युएस ओपनच्या उपांत्य फेरीत दिली धडक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वाढदिवसाची भेट* आज ती फारच अस्वस्थ होती. घरात तिच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. ऑफिसची वेळ संपून दोन तासाचा कालावधी संपला होता. तो एवढ्या वेळात घरी यायला हवा होता. पण अजुन आला नाही म्हणून तिला जास्त काळजी वाटू लागली होती. तिची काळजी वाढण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता........ https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/2NunSTYiidY वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बी.रघुनाथ*          भगवान रघुनाथ कुळकर्णी  ऊर्फ  फुलारी ऊर्फ बी.रघुनाथ (१५ ऑगस्ट, इ.स. १९१३ - ७ सप्टेंबर, इ.स. १९५३) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते. बी. रघुनाथ यांचा जन्म १५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले. बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले. आपल्या कार्यालयात काम करीत असतानाच बी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर, इ.स. १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० ते इ.स. १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आनंदी राहण्याचा सरळ साधा एकच उपाय आहे......."अपेक्षा"....स्वतःकडुनच ठेवा, समोरच्या कडुन नको !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *बी. रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय होते ?* भगवान रघुनाथ कुळकर्णी 2) *त्यांचा जन्म केंव्हा झाला ?* 15 ऑगस्ट 1913 3) *त्यांनी एकूण किती पुस्तके लिहिली ?* 15 पुस्तके *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्र श्री जाधव, सहशिक्षक, नांदेड 👤 त्र्यंबक स्वामी 👤 सुमीत पेटेकर, करखेली 👤 हणमंत गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अजीर्ण " तळं राखतो तो पाणी चाखत असतो माघं टाकता येईल तेवढे टाकत असतो फुकट मिळत म्हणून कितीही घेतात चाखून अजीर्ण झाले की मग सारे देतात ओकून शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●💧‼ *रामकृष्णहरी* ‼💧●•• 💧💧💧💧💧💧 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्याप्रमाणे एखादा मूर्तीकार एखाद्या ओबडधोबड दगडाला आपल्या बुध्दीने आणि कौशल्याने एखाद्या सुंदर कलाकृतीला जन्म देतो आणि सा-यांना पाहण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याचप्रमाणे माणसालाही माणूसपण मिळवण्यासाठी किंवा चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे ते संस्कार होण्यासाठी एखाद्या जेष्ठ,अनुभवी,आदर्श कलावंतांच्या किंवा विचारवंतांच्या सान्निध्यात राहून आपल्याला आदर्श माणूसही होता येते त्यासाठी आपल्या मनाचीही तयारी असावी लागते हे निश्चित . * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शाळेच्या पहिल्या दिवशी काय शिकवले आठवत नाही पण जसं कळायला लागले तेव्हा पहिले वाक्य कानी पडलेचे नक्की आठवते, गुरूजी म्हणाले होते, नेहमी खरे बोलावे... नंतर शाळेच्या भिंतीवर ते वाक्य अनेकवेळा वाचले भिंतीच त्या जे लिहाल ते लिहून घेतील मला मात्र कुतूहल वाटत रहीले की गुरूजींनी नेहमी खरे बोलावे हे वाक्य सुरूवातीलाच कसे शिकविले त्यांनी धडा म्हणून शिकविले की धडा मिळण्यासाठी या जगाच्या अंधारात प्रकाश शोधण्यासाठी सोडले हे मात्र अजून समजले नाही खरे बोलावे, या पेक्षा बरे बोलावे असे शिकविले असते तर मी अजून बरेचसे अंतर कापू शकलो असतो आणि मी जगाची भाषा सोडून माझी भाषा बोलू शकलो नसतो तर मी जिवंत राहू शकलो असतो ? अभिजीत पाटील सांगली 9970188661 ©®© ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मानवता* जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’ संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. *तात्‍पर्य :-* ईश्‍वर भक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच खरी सेवा आहे.दुःखी लोकांचे दुःख जरी आपल्याला कमी करता आले नाही तरी त्यांना दुःख देण्याचा प्रयत्न करु नाही *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/09/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला. 💥 जन्म :- १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी 💥 मृत्यू :-  १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती  २०१३ - सुश्मिता बॅनर्जी, भारतीय लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *ब्रिक्‍स संमेलन: ९व्या ब्रिक्स संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल.* ----------------------------------------------------- 2⃣ *मंत्रीमंडळाचा विस्तार, नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा आणि गंगा शुद्धिकरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर : गृहमंत्री पद आपल्याकडे असल्यामुळे नागपुरात थोड़े काही झाले तरी राष्ट्रीय बातमी ठरते, नागपुरात आता पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 4⃣ *अहमदनगर: राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पाटील यांचे निधन* ----------------------------------------------------- 5⃣ *सांगली : सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे, व्हीडीओ आणि मेसेज पाठवणाऱ्या चार जणांना अटक. व्हॉट्स अँप ग्रुपवर मेसेज आढळले, या ग्रुपच्या अँडमीनवरसुद्धा कारवाई होणार : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे* ----------------------------------------------------- 6⃣ *पाचवी वन-डे : भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द मॅच, जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सीरीज, विराट कोहलीचे 30 वे शतक पूर्ण* ----------------------------------------------------- 7⃣ *युएस ओपन टेनीस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मारिया शारापोवाला पराभवाचा धक्का* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय संस्कृती वाचविण्याची गरज* भारतीय संस्कृतीला एक परंपरा आहे, इतिहास आहे. पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहतात. भारतीय आदर्श संस्कृती विषयी अभ्यास करण्यासाठी विदेशातील अनेक ज्ञानी लोक याठिकाणी येऊन गेल्याचे इतिहासात पुरावे मिळतात......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/hSSioKE1NZo आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ बल्लाळेश्वर (पाली)  हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडकऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.      *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ सकारात्मक विचार सर्व निराशा दूर करते. सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता?* 👉🏼      बुध *२)  सूर्यमालेतील शेवटचा ग्रह कोणता?* 👉🏼      प्लूटो *३)  सूर्यमालेत कोणत्या ग्रहाभोवती कडे आहेत ?* 👉🏼      शनि *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 मुकेश धर्मले, नांदेड 👤 सायरेड्डी सामोड, सहशिक्षक, येताळा 👤 जयेंद्र कुणे 👤 मुकेश पाटील 👤 श्रीपाद जोशी येवतीकर 👤 संगमेश्वर नळगिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "धमकी " प्रेमाने जग जिंकता येते धमकी देऊन नाही मनात शिरायचे कोणाच्या तर मुजोर होऊन नाही मनात घर करायचे तर मुजोरी कशी चालेल मुजोरी करणाराला प्रेमाने कोण बोलेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्राचीन काळापासून एखाद्या नैसर्गिक घटनेनंतर अनुभवास आलेल्या चांगल्या अगर वाईट गोष्टींशी त्या घटनेचा संबध जोडला जातो. यातून शकुन आणि अपशकुनाच्या कल्पना जन्म पावतात. भारतातील बहुतांश प्रदेशात 'घुबड' अशुभ मानले जाते. मात्र बंगालमध्ये ते लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. वैदिक संस्कृतीने कबुतराला मृत्यूच्या देवतेशी संबधीत ठरवून अशुभ मानले होते-इतके की कबुतर घरात शिरल्यास शांती करावी लागते. मात्र आता अनेक ठिकाणी लोक कबुतरांना मुद्दाम खाऊ घालतात. पाश्चात्य संस्कृतीने तेरा हा आकडा अशुभ मानल्याने मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्समध्येसुद्धा त्या क्रमांकाचा मजला किंवा खोली नसते.* *चमत्कृतींनी भरलेल्या मानवी मनाचा थांग लागणे कठीण असते. लबाड आणि संकुचित मनोवृत्तीचे लोक अनेकदा केवळ आपण असहिष्णु आणि पुढारलेले आहोत हे भासविण्यासाठी आपण रूढी परंपरा वगैरे मानत नाही असे दाखवतात. वास्तविक पाहता पारंपारिक पोशाखातील खेडवळ माणूस विश्वासार्ह, मनमिळाऊ असू शकतो आणि आधुनिक पोशाखातील उच्चशिक्षित व्यक्ति बुरसटलेल्या विचाराची, अहंमन्य आणि लबाड असू शकते.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण निसर्गातल्या प्रत्येक घटकांकडून अपेक्षा करतो. ढगांकडून पावसाची, वृक्षांकडून फळांची नि सावलीची,नदीकडून पाण्याची,माती आणि शेतीकडून अन्नधान्याची आणि इतरही काही गोष्टी सतत काहीना काही घेतच असतो पण त्यांच्या मोबदल्यात निसर्गाला काही देतच नाही.आपण जसे मुक्तपणे घेतो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. पण निसर्गाला काहीतरी देण्याचाही संकल्प करायलाच हवा.देणा-याचे ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडायलाच हवे.त्यासाठी निसर्गाचे संतुलन बिघडू द्यायचे नसेल तर किमान आपण वृक्षांचे संगोपन करायला हवे.कारण वृक्ष हेच आपल्या सर्वांचे पालनहार आणि तारणहार आहेत.त्यांच्याकडूनच शुद्ध हवा,पाणी,अन्न आणि आरोग्य मिळू शकते.त्यांचे आपल्या जीवनापेक्षा ही अधिक जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे.वृक्षांशी आपले नाते अधिक दृढ केले पाहिजे.तरच आपण पुन्हा निसर्गाकडून घेऊ.नाही तर आपले जीवन जगणे असह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ पर्जन्यराग तापल्या धरेवर थेंबांची शिंंपण ओलेल्या सरीवर स्वप्नांची गुंफण तापल्या दिशांना मृदगंधाची ऊटी थंडगार वार्‍याची हलकेच मिठी म्यॅओ म्याॅओ मोरांचा हुंकार हिरव्या कोंबावर जगाची मदार शहारा पानांवर थेंबाची नशा सरीत बांधल्या ऊद्याच्या आशा पिकल दाणा धरतीला पान्हा पहिल्या थेंबाला गार्‍हाण घाला अंजना कर्णिक , मुंबई ९८२०७५८८२३ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वक्ता आणि श्रोते* एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले. तात्पर्यः काही ठिकाणी आपल्या युक्तीचा वापर करून घेणे गरजेचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* 📞9403046894 http://www pramilasenkude blogspot.in. *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/09/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिक्षक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 💥 मृत्यू :-  १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली : महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण* ----------------------------------------------------- 2⃣ *शांती, विकासासाठी सहकार्य गरजेचं. भारत गरिबीशी लढत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ब्रिक्स परिषदेत वक्तव्य.* ----------------------------------------------------- 3⃣ *कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ८० डेसिबलवर आवाज वाढवणाऱ्या मंडळांवर कारवाई - पोलीस प्रशासन* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पुढे ढकलला- दीपेंद्र लोखंडे, प्राथमिक, शिक्षणाधिकारी, नागपूर* ----------------------------------------------------- 5⃣ *माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सुल्तान अहमद यांचे निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *अमरावतीच्या शुकमणी बाबरेकरची आर्चरी ज्युनिअर वर्ल्डकपसाठी निवड* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - आयपीएलचे मीडिया हक्क घेण्यासाठी स्टार इंडियाची सर्वाधिक बोली, 5 वर्षांच्या हक्कांसाठी 16347.50 कोटी रुपयांची बोली* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* शिक्षक हा समाजसुधारणा करणारा देशातील सर्वात महत्वाचा समाजसेवक आहे. प्रत्यक्षपणे जरी नसेल तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचे मानले जाते. अगदी पुरातन काळापासून गुरु किंवा शिक्षकांच्या कार्याचा मागोवा घेतला तर ही बाब नक्की आपल्या मनाला पटेल......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/M481U5SZekF आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन*           डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शतकांनी इतिहास बनतो पण अशी कित्येक शतके रूढी पाडण्यासाठी खर्ची पडतात. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म केंव्हा झाला ?* 05 सप्टेंबर 2) *हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात ?* शिक्षक दिन 3) *त्यांना कोणत्या विषयाची आवड होती ?* तत्वज्ञान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शेषराव माडेवार, मुख्याध्यापक जि प प्रा शा पाटोदा बु 👤 सतिश कामिनवार, सहशिक्षक 👤 सौरभ सावंत, पक्षीमित्र, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "शिक्षक " विद्यार्थ्यांच्या नजरेत आदर्शाची मुर्ती आहे विद्यार्थ्यांच्या मनात गुरूजींची किर्ती आहे या स्वतःसह आपण आदर्श समाज घडवू चला स्वतःसह देशाचा नावलौकिक वाढवू शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणे हे ध्येय उराशी ठेऊन आपले सारे आयुष्य समर्पित करणारे,विद्यार्थ्यांच्या अंगी स्वाभिमान, स्वावलंबन, आई-वडील आणि मोठ्यां विषयी आदराची भावना, दिनदुखितांची सेवा, समाजाप्रती आदर , राष्ट्राविषयी अभिमान व प्रेम तसेच आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे . 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त अर्थात " शिक्षक दिना "निमित्त सर्व शिक्षक बंधुभगिंणीना मनस्वी हार्दिक शुभेच्छा.....!!!💐💐💐💐 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०् 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शिक्षक दिनानिमित्त कविता मी एक शिक्षक आहे ..! जनगणना असो वा निवडणूक  सदैव मी सज्ज असतो  देशातल्या प्रत्येक कामात मी नेहमीच दक्ष असतो  कारण मी एक शिक्षक आहे ।। 1 ।। लहानमोठे सान थोर  सर्वच नमस्कार करतात गावातील सर्व लोक मला  मान सन्मान देतात  कारण मी एक शिक्षक आहे ।। 2 ।। नाते अमुचे घट्ट झाले  ते मला मायबाप समजतात शाळेत माझी चिमुकली मुले  रोज आतुरतेने वाट पाहतात  कारण मी एक शिक्षक आहे ।। 3 ।। छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे निमंत्रण न विसरता देतात  लग्न असो वा इतर अन्य काम लोकं मला न विसरता बोलावतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 4 ।। माझ्या येण्यावर अन जाण्यावर लोक घड्याळाची वेळ ठरवितात किती वाजले गुरूजी असे खोचून विचारतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 5 ।। शासन सुद्धा प्रत्येक शासकीय काम  फक्त आणि फक्त माझ्याकडून पूर्ण करून घेतात  कारण मी एक शिक्षक आहे ।। 6 ।। मला चार चौघात अगदी  शिस्तबध्द राहावे लागते  नियमाचे पालन तंतोतंत करावे लागते  कारण मी एक शिक्षक आहे ।। 7 ।। इतर लोकांसारखे मला कसलेही  शान शौक करता येत नाही  सैराट होऊन जीवन जगता येत नाही कारण मी एक शिक्षक आहे ।। 8 ।। म्हणूनच समाजात, गावात माझी खूप शान आहे बान आहे  माझ्या बोलण्यात आजही जान आहे  कारण मी एक शिक्षक आहे ।। 9 ।। मला स्वतः चा खूप अभिमान आहे अन माझ्यात स्वाभिमान ही आहे  कारण मी एक शिक्षक आहे ।। 10 ।। मी एक शिक्षक आहे ..! - नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक जि. प. प्रा. शाळा चिरली ता. बिलोली जि. नांदेड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गुरुकृपा* *विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे* एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले. तात्पर्यः गुरूचे कार्य महान असते.गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 http:www pramilasenkude blogdpot.in. *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/09/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९६० : भारताच्या मिल्खा सिंगने रोम येथील ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत विक्रम तोडला. 💥 जन्म :- १८९२ : सर एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :-  १९७२ : अल्लाउद्दीन खॉं, सुप्रसिद्ध सरोजवादक. १९७९ : जे. जी. नवले, नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *महाराष्ट्रात श्रीचे विसर्जन उत्साहात संपन्न, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणरायाला भावपूर्ण निरोप, गणेश विसर्जनादरम्यान राज्यात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्रि सिद्धारमैय्या यांनी केला गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध* ----------------------------------------------------- 3⃣ *वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केली डिफर्ट अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल योजना, सात हजार भारतीयांना बसणार फटका* ----------------------------------------------------- 4⃣ *बंगळुरू- राजरेश्वरी नगरमध्ये वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश याची राहत्या घरात गोळी घालून केली हत्या* ----------------------------------------------------- 5⃣ *सातारा- कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के* ----------------------------------------------------- 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हतिन क्याव यांची भेट* ----------------------------------------------------- 7⃣ *शिक्षकांचा आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत! प्राथमिक शिक्षकांचे मिळणार मार्गदर्शन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मोबाईल डिजिटल शाळा* डिजिटल म्हणजे काय ? असा प्रश्न आज प्रत्येक गावकऱ्याच्या मनात पडलेला आहे. कारण सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहेत. राज्यातील एक तरी शाळा रोज डिजिटल होत असल्याची बातमी विविध वृत्तपत्रातून वाचण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे डिजिटल होय......लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/3UyeQNbhK1y आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मिल्खा सिंग* जन्म : ०८ ऑक्टोबर १९३५ ठिकाण : फैसलाबाद देश : भारत खेळ : धावपटू फ्लाईंग शीख' या टोपण नावाने ओळखला जाणारा धावपटू मिल्खा सिंग. रोम येथे झालेल्या १९६० व टोकियोतील १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. पतियाळा येथे १९५६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षांनी झालेल्या स्पर्धेत त्याने २०० व ४०० मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली. १९५८ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्याने आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.सहा सप्टेंबर १९६० ला ऑलिम्पिकमध्ये त्याने चारशे मीटर शर्यतीत त्याने आपला मागच्या वर्षीचा विक्रम मोजला. त्या शर्यतीत तो चौथा आला. ०.१ सेकंदाने त्याचे कास्य पदक हुकले होते. त्या स्पर्धेत तो कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावला होता. त्याआधी त्याने १९५८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर शर्यतीही सुवर्णपदक जिंकले होते. मिल्खा सिंग हा असा धावपटू होता की त्याने कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर त्याने ४५.९ सेकंदात पार केले. त्याचा विक्रम अजूनही कोणत्यही भारतीयाला मोडता आलेला नाही. त्या काळात मिल्खा सिंग देशभरातील तरूणांचा आदर्श होता. त्याने जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्याने विक्रम मोडला ते बूट त्याने राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचा मुलगा ‍जीव सिंग हा प्रसिध्द गोल्फपटू आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✍❣स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...* *संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते* *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*. *✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *जागतिक महिला दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 08 मार्च 2) *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 08 सप्टेंबर 3) *बालिका दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 03 जानेवारी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 सौ मुळावकर कल्पना धोंडू (स शि) जि प प्रा शाळा बामणी बु 👤 सुनील ठाणेकर, सहशिक्षक, देगलुर 👤 महेश वडजे 👤 रोहित पोकलवार 👤 प्रशिक कैवारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " शर्मिंदे " कोणाचे निंदा कोणाचे वंदा आहे काहींचा माती खाणे धंदा आहे बरं म्हणा की वाईट ते माती खातात उघड झाल की ते शर्मिंदे होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🔻🔻🔻🔻🔻🔻 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अज्ञानाचा अंधार सारुन ज्ञानाचा प्रकाश आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून जीवन समृद्ध करण्याचे महान कार्य केवळ ज्ञानी शिक्षकच करतात.त्याही पलिकडे जाऊन एक सुजाण, समृद्ध ध्येय उराशी बाळगून एक आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी ते सतत कार्यक्षम असतात.त्यांचे जीवन म्हणजे एक अखंड ज्ञानरुपी यज्ञाच्या चाललेला असतो.अशा शिक्षकांच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक करुन घ्यावे ही संधी सोडू नये.त्यांच्या बद्दलची कृतज्ञता नेहमी आपल्या हृदयात साठवून ठेवावी.ती नेहमी आपल्या भविष्यासाठी ज्ञानरुपी शिदोरीच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 📚📖📙📘📚📖📘📖📚📘 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवनगाणे* जीवन जगताना भेटतात ना ना प्रकारची माणसं म्हणे हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाई गातील एकतेचे जीवनगाणे जीवन चालतचं राहतं श्रमाचे चालते हात रहावे आले लाखो अडथळे तरी जीवनगाणे गात रहावे उगीच जाती-धर्म-पक्ष यांचा करू नका उदो उदो तुम्ही मानवता धर्म खरा पाळा हीच शिकवण शिकलो आम्ही. कवी : प्रमोद जाधव 9403669738 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरे काय नि खोटे काय* एका गावाच्‍या बाहेरच्‍या बाजूला एक झोपडी होती. त्‍यामध्‍ये एक गरीब कुटूंब राहत होते. कामानिमित्ताने घरातील यजमान बाहेरगावी गेले होते. झोपडीत फक्त आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा राहिले होते. आईकडे तो मुलगा काही तरी मागत होता व आईजवळ ती वस्‍तू आणण्‍यासाठी पैसे नसल्‍याने ती त्‍याला गप्प बसविण्‍याचा प्रयत्‍न होती पण मुलगा काही गप्‍प होईना. त्‍याने त्‍या वस्‍तूचा आपला हट्ट पूर्ण होत नसल्‍याचे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई त्‍याला गप्प करण्‍याचा प्रयत्‍न करू लागली पण मुलगा काही शांत होईना. त्‍याच वेळेस भूकेने व्‍याकूळ झालेला एक लांडगा त्‍या झोपडीपाशी आला व भक्ष्‍याचा शोध घेऊ लागला. आईला व मुलाला झोपडीबाहेर काय आले आहे याची किंचितशीसुद्धा कल्‍पना आली नाही. आई आपल्‍या रडणा-या मुलाचे रडणे थांबविण्‍यासाठी म्‍हणाली,'' अरे तुला कितीवेळा समजावून सांगितले तरी तू गप्‍प काही बसत नाहीयेस. आता जर तु गप्प बसला नाहीस आणि रडणे थांबविले नाही तर मी तुला लांडग्‍याला देऊन टाकीन. मग तो लांडगा तुला खाऊन टाकेल.'' आपल्‍या नावाचा उच्‍चार झालेला पाहून लांडग्‍याला खूप आनंद झाला व आपल्‍याला आता भूकेच्‍या वेळेस कोवळे लुशलुशीत माणसाचे मांस खायला मिळणार म्‍हणून लांडगा मनामध्‍ये खूप खूश झाला. त्‍याने तिथेच आपली बैठक मांडली व माणूस कधी बाहेर फेकला जातो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्‍याच्‍या कानावर त्‍या मुलाच्‍या आईचे शब्‍द आले की,'' अरे माझ्या बाळा, मी कशी बरे तुला लांडग्‍याकडे देईन, मी तुझी आई आहे रे. तो मेला, दुष्‍ट, धूर्त लांडगा मरू दे तिकडेच आणि चुकून जरी तो इकडे आला ना तर मी त्‍याला जळत्‍या लाकडाने बडवीन आणि बाळा तुझे रक्षण करीन.'' आईचे हे बोलणे ऐकून निराश झालेला तो लांडगा तिथून निघून जाताना मनाशीच बडबडला,'' माणसांचे जगच खरे निराळे आहे, *तात्पर्यः* ओठात एक आणि पोटात एक वागणाऱ्या माणसांपासून कायम सावध राहिलेलेच बरी.ते म्हणतात न गळ्यात माळ आणि पोटात गाळ तसे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे? एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." 🙏 *"जसे कर्म, तसे फळ."* *"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."* धन्यवाद.🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/08/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥ठळक घडामोडी :-  १८३३ : शिकागो शहराची स्थापना. 💥जन्म :- १९१९ : विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई : पावसाळी अधिवेशन संपले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 11 डिसेंबर 2017 पासून सुरू होणार, विधान परिषदेतील सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- शुद्ध खाद्यतेलावरील आयात कर 10 टक्क्यांनी वाढवून 15 टक्क्यांवरून केला 25 टक्के- सीबीईसी* ----------------------------------------------------- 3⃣ *पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, प्रसून जोशी यांची नियुक्ती.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- नेपाळचा विकास झाला पाहिजे, आम्ही त्यांच्याशी भागीदारी करतो, तसेच त्यांना साथ देऊ इच्छितो, सबका साथ सबका विकास पूर्ण क्षेत्रासाठी आहे- सुषमा स्वराज* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : चार-पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बेस्ट कर्मचा-यांना या महिन्याचा पगार वेळेत म्हणजे 10 तारखेला मिळाला* ----------------------------------------------------- 6⃣ *15 ऑगस्टला उत्तरप्रदेशातल्या सर्व मदरशांमध्ये ध्वजारोहण होणार, उत्तरप्रदेशातल्या मदरशा शिक्षा परिषदेचे निर्देश.* ----------------------------------------------------- 7⃣ *यावर्षी ग्रामीण आणि शेती क्षेत्रात 2.93 लाख कोटींची गुंतवणूक केली, ही विक्रमी गुंतवणूक आहे - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मी भारतीय आहे ......!* शाळेत असताना " भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." अशी प्रतिज्ञा करतो. या प्रतिज्ञेचा आणि आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचा काही एक संबंध नाही. म्हणजे आपले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत........ हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BDmiERKqz2w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सांगली* सांगली हे शहर दक्षिण महाराष्ट्रात वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या ५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगलीतील पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर सुप्रसिद्ध आहे.   सांगली शहर हे पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले. सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. भडंग(एक प्रकारचे चुरमुरे) हा सांगलीकरांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) वर्तुळाला व्यास किती असतात?* 👉🏼 असंख्य *२) सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती?* 👉🏼 ० शून्य *३) ६४चे घनमूळ किती?* 👉🏼 ४ चार *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 व्यंकटराव पाटील जाधव रोषनगावकर 👤 मंगेश राजेश पापनवार, वसमत 👤 रविकुमार येळवीकर, नांदेड 👤 श्रीनिवास बिचकेवार, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " बांड " केलेले उपकार विसरतात माणसं ज्वारीत येतात जशी बांड कणसं बांड म्हणून त्याला टाकून देतात माणसं बांडापेक्षा चांगली जास्त असतात कणसं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.* *देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.* *"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."* ••●🔶 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔶●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ धैर्य आणि संयम यांच्या वेलीवर तर सुख दु:खाची पाने आणि फुले उमलतात. त्यात कोमेजणारी फुलं ही दु:खाची असतात.त्यांना ऊन सहन होत नाही.म्हणून कोमेजून जातात.त्याच प्रकारे मानवी जीवनाचे असते.दु:ख सहन होत नाही म्हणून मनाने क्षीण होतात. त्यांचे धैर्य कमकुवत होत जाते.उलट ज्या फुलांमध्ये धैर्य आणि संयम असते ती बहरतात नि फुलतात. ज्यांच्या जीवनात धैर्य आणि संयम असते ती माणसे कोणत्याही परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने मन ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि तेच जीवनात फुलणा-या फुलाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063. 🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता -* 🌹 *वाढदिवसाच्या* *शुभेच्छा* 🌹 आज तूझ्या जन्मदिनी देते सख्या मनापासूनी शुभेच्छा जीव ही ओवाळून टाकेल तूझ्यावर सांग आज तूझी काय आहे ईच्छा... तू असा सदा हसत रहा खळखळत असाच वाहत रहा मनोकामना पूर्ण हो तूझी मनी माझ्या अशी सदिच्छा... हर सुख तूझ्या दारी प्राजक्त बहरो तूझ्या अंगणी मागे तू ना वळून पाहू सुख सारे राहो तूझ्या जीवनी... जीवनातील ध्येय तूझ्या तू असाच गाठीत जा यशाची शिखरे पार करीत स्वप्न तूझी गुंफित जा.... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक, किनवट* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जर मनच अशुद्ध तर.....* खूप जुनी गोष्ट आहे. एकदा संत कबीर बसले होते. त्यांच्याकडे एक व्यापारी धावत आला. त्याने कबीरांना विनंती केली, 'मला तुम्हाला माझा गुरू करायचे आहे, तुम्ही मला गुरुमंत्र द्या' तेव्हा संत कबीरांनी त्याला पैसे दिले आणि सांगितले आधी तू पटकन जाऊन दूध घेऊन ये, मग मी तुला गुरुमंत्र देतो.  त्या व्यापाऱ्याला खूप घाई होती. तो तडक धावत गेला आणि त्याने दूध कबीरांना आणून दिले. कबीरांनी त्याला एक भांडे दिले आणि सांगितले, हे दूध या भांड्यात ओत. त्याने ते भांडे घेतले, त्यात प्रचंड घाण साचली होती. त्या व्यापाऱ्याने कबीरांना ही बाब सांगितली. ते म्हणाले, बघ जर तू या खराब भांड्यात दूध टाकायला तयार नाहीस तर, मग मी तुझ्या अशुद्ध मनात राम नावाचा मंत्र कसा देऊ? '  कबीरांनी म्हटलेले वाक्य किती खरे आहे बघा? जर तुमचे मनच शुद्ध नाही तर तुम्ही देवाचे दर्शन घेतले काय, किंवा संत सानिध्यात राहिलात काय, त्याचा काय परिणाम होणार?  संतांनीही हेच सांगितले आहे. भलेही तुम्ही पुजा नका करू, परंतु तुम्ही तुमचे आचरण, आणि मन शुद्ध ठेवा. आपण इतरांना एखाद्या कामासाठी दोष देत असतो, पण त्याची त्यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे असते. आणि आपण नेमके या उलटच करतो.  आपल्या दैनंदिन कामात आपण अनेकांना भेटत असतो, यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगलीच भेटते असे नाही, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असून शकतो. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना काम देणे गरजेचे आहे.  बदलायची असतील तर त्यांची मने बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यांच्या मनातील कटुता कमी करा. कारण कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, खराब भांड्यात ज्या प्रमाणे तुम्ही दूध नाही टाकणार त्या प्रमाणेच एखाद्याचे मन परिवर्तन झाल्याशिवाय तुम्ही त्याला बदलू नाही शकणार. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖➖ *🌺जीवन विचार*🌺 〰〰〰〰〰〰〰 संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो. 'It is better to have loved and lost, than never to have loved at all!' अत्यंत महागडी,न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ". जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं. "आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो". smt.pramilatai senkude म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे'. आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही. आपले कर्म , कर्तव्य आपण जर का प्रामाणिकपणे निभावले तर आपल्याला आपल्या जीवनात समाधानाचे आयुष्य लाभते.कोणत्याही कारणाने आपण जर का आपला स्वार्थ पाहून स्वार्थी प्रवृत्तीने वागलो तर ही स्वार्थी प्रवृत्ती दुसऱ्याला नुकसानकारक ठरते.पण आपल्यालाही कधीना कधीतरी हानीकारक ठरते. *ज्यांचे कर्म , कर्तव्य निस्वार्थीवृत्तीचे , प्रामाणिकपणा जोपासणारे असते अशांचे स्थान महान असते.* ' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'. =================== 🙏शब्दांकन /संकलन🙏🏻 ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता. हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 💐🍀💐🍀💐🍀💐

नमस्कार 👏🏻🙏🏻मी प्रमिलाताई सेनकुडे जि.प.स.शि वाटेगाव ता.हदगाव , जिल्हा नांदेड. 🙏🏻🙏🏻 मी राबवित असलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम या अंतर्गतचा हा उपक्रम 🖊📚🖊📚🖊📚🖊 *आज दि.२९/०८/२०१७* *रोजी सायंकाळी हदगाव (तांडा) येथे श्री दत्त गणेश मंडळ येथे गरीब व गरजू मूलांना एक पेन एक वही वाटप करण्यात आली आहे.गणेश मंडळाला दान, अन्नदान तर आपल सर्वांच असतेच आणि त्यात समाजाच आपण काहीतरी देण लागतो ह्या दृष्टीने आणखी भर म्हणून मी हा सार्वजनिक उपक्रम राबविला.* काही क्षणचिञे 👇👇👇👇👇👇 यंदा श्री गणेशाच्या चरणी नारळ,पेढे अर्पण करु व १ वही १ पेन पण अर्पण करूयात. आपणही हि संकल्पना आपल्या मंडळात अथवा आपल्या गावी कुठेही साजरी करू शकता. संकल्पना :- श्री गणेशाच्या चरणी अर्पण करूया १ वही १ पेन प्रत्येक कमावत्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेनुसार श्री गणेशाच्या चरणी १ वही १ पेन अर्पण करावे. ज्याची किंमत फक्त १०-१५ रुपये असेल.अशा आपण कितीही वह्या पेनी अर्पण करु शकतो. आपण एखाद्या गावातील गरीब शाळेमध्ये अथवा अनाथाश्रमातील मुलांना मदत म्हणून देऊ शकतो. फक्त १०-१५ रुपयांमध्ये आपणा सर्वांकडून खूप चांगले काम होऊ शकते. आपण जितक्या भक्ती भावाने श्री च्या चरणी नारळ,हार,पेढे ई.अर्पण करतो त्याच श्रद्धेने १ वही १ पेन अर्पण करूया. श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांकडून भक्ती, श्रद्धा याचबरोबर समाजिक कार्य देखील होईल. *गणपती बाप्पा मोरया* 🙏🏻 🌹💐🌹🙏🏻

☘💐☘💐☘💐☘ *माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ *' अवयव दान दिन ' जनजागृती* *जि. प.प्रा.शा वाटेगाव* 〰〰〰〰〰〰〰 *दि. २९-०८-२०१७*रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा वाटेगाव येथे २९ आँगस्ट हा दिवस *'अवयव दान दिन '* म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत *प्रतिज्ञा* घेण्यात आली.व सदरील प्रतिज्ञेचे वाचन आम्ही सर्वांनी व आरोग्य सेविका सौ.आर.एस.भाले यांनी केले.अवयवाचे दान का करावे या संदर्भात शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी कसे राहील हे ही सांगितले व निदान उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आल्या.या जनजागृती आरोग्य शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य कसे राहील स्वच्छतेचे महत्त्व, अवयव दानाचे महत्त्व ह्या संदर्भात माहिती सांगण्यात आली. 👇👇👇👇 काही क्षणचिञे 〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांकन लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.) जि. प.प्रा .शा.वाटेगाव ता.हदगाव जि. नांदेड. ➖➖➖➖➖➖

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/08/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९४३ - रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती. १९९१ - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी. १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :-  १९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर कोरियासोबत वाद वाढेल अशा गोष्टी टाळण्याची केली विनंती* ----------------------------------------------------- 2⃣ *जम्मू-काश्मीर : शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन लष्कराचे जवान शहीद* ----------------------------------------------------- 3⃣ *एनडीए मधून बाहेर पडण्याबाबत 15 दिवसात निर्णय घेणार - खासदार राजू शेट्टी.* ----------------------------------------------------- 4⃣ *राजस्थान सरकारने विद्यापीठांसाठी सुट्यांची नवी यादी केली जाहीर, 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी रद्द.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला गोपीनाथ मुंडे यांचं नाव, बीड जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताच्या पहिल्या दिवस अखेर सहाबाद 329 धावा, शिखर धवनचे दमदार शतक.* ----------------------------------------------------- 7⃣ *लंडन : 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत जमैका संघाचा पराभव, उसैन बोल्ट जखमी, ग्रेट ब्रिटनने पटकावले सुवर्ण.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तंत्रस्नेही शिक्षक : काळाची गरज*         आजचे युग हे संगणकीय आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे आहे. रोज काही ना काही नवीन महितीची भर पडत आहे. संगणक, मोबाईल आणि स्मार्ट फोन मुळे घरबसल्या बरीच माहिती मिळत आहे. एका क्लिक वर हवी ती माहिती क्षणात मिळण्याची सुविधा आत्ता निर्माण झालेली आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेतील अध्ययन आणि अध्यापनात झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास.........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/LrHDpYFQK9w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वर्धा* वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याच ेमुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली सुमारे १.०६ लाख लोकसंख्या असलेले वर्धा शहर कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचेनिवासस्थान होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारतीय लष्करातील सर्वोच्च सन्मान कोणता?* 👉🏼 परमवीर चक्र *२) परमवीरचक्र आतापर्यंत कितीजणाना देण्यात आला?* 👉🏼 फक्त २१ जणाना *३) परमवीर चक्र पदकाचे डिझाइन कोणी तयार केले आहे?* 👉🏼 सावित्रीबाई खानोलकर *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 नरेंद्र रेड्डी, बाळापुर 👤 योगेश नारायण येवतीकर 👤 संदेश लोखंडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " वास्तव " कल्पने पेक्षा वास्तव एकदम वेगळं असतं कल्पना करतो ते वास्तवात सगळं नसतं कल्पना अन् वास्तव वेगवेगळेच असते कल्पनेत वाटते ते वास्तवात कधीच नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.* *माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.* *"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *☕ आली चहाची अॉर्डर ☕* नाही डब्यात साखर आली चहाची अॉर्डर आली चहाची अॉडर नाही चहा पावडर ।।धृ।। आली महिना अखेर महागाई बेसुमार खेळ दरमहा हाच असा चालतो संसार।।१।। संसारात नाही सार तरी चालतो संसार येवो किती झंझावात तरी चालतो संसार ।।२।। दोन जिवांचा संसार चालवितो हात चार आली चहाची अॉर्डर आम्ही पुरी करणार ।।३।। येवो कठीण समय तरी आम्ही तारणार साथ आम्हाला साथीची आम्हासाठी भरतार ।।४।। - सौ. मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *देवाचा मित्र* एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो. . *स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? देवाचा मित्र व्हा *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/08/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्रीकृष्णजन्माष्टमी* 💥 घडामोडी : १९२१ - तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना. 💥 जन्म : १९११ - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी. १९२५ - जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार. १९६८ - प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥मृत्यू : १९८४ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नागपूर - नागपूर मध्ये आंतरराष्ट्रीय मेडिकल टुरिझम साठी मेडिकल हब होण्याची क्षमता, इंडो यूके इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ मेडिसिटीमुळे मिहानचा चेहरामोहरा बदलेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये स्वाइन फ्लूचे आतापर्यंत 695 रूग्ण, लखनऊमध्ये 394 रूग्ण. स्वाइन फ्लूने आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : अंबाजोगाई येथे होणा-या 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय.* ----------------------------------------------------- 4⃣ *जम्मू आणि काश्मीर - शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील सुमेध गवई यांना वीरमरण, शहिद सुमेध गवई यांचे पार्थिव आज रात्री नागपुरात येणार ; उद्या अकोल्यातील गावी रवाना होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश : मंडी भूस्खलनमध्ये आतापर्यंत 46 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात यश, सकाळी पुन्हा मदतकार्य पुन्हा सुरु होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेविरूद्ध पाच वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, रोहीत शर्माकडे उपकर्णधारपद.* ----------------------------------------------------- 7⃣ *पल्लेकल कसोटी : श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांमध्ये संपुष्टात, 352 धावांनी अजूनही पिछाडीवर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रेल्वेत प्रवाश्याना होणारा त्रास* रेल्वेचा प्रवास सर्वात सुखकर आणि स्वस्त असल्या मुळे जास्तीत जास्त लोक या मार्गाने प्रवास करताना दिसून येतात. आज संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरले असून अनेक खेडी या रेल्वेने जोडली गेली आहेत. रेल्वेचा प्रवास फक्त नावाला च सुखकारक वाटते. पण येथे सुद्धा अनेक त्रासदायक गोष्टी घडतात......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/iCJoi1wUm93 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उस्मानाबाद* हे शहर उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या ८०,६१२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रिया होत्या. १४% व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. येथील साक्षरता प्रमाण ७४% आहे. ८०% पुरुष तर ६७% स्त्रिया साक्षर आहेत.उस्मानाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे सब कॅम्पस आहे. *इतिहास* उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. (आधार हवा!) शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव’ नावाची जैन लेणी आहेत. तुळजाभवानी ही उस्मानाबादची कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते.आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ✍🏻 *'इमानदारी'हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे.त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) क्रांतिदिन कधी साजरा केला जातो?* 👉🏼 ९ ऑगस्ट *२) "छोडो भारत" हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले होते?* 👉🏼 महात्मा गांधी *3) यादिवशी महात्मा गांधीनी भारतीयांना कोणता मंत्र दिला?* 👉🏼 करेंगे या मरेंगे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गजानन गंगाधरराव रामोड, जारीकोट 👤 राजू टोम्पे 👤 राम दिगांबर होले 👤 सुनील गुडेवार 👤 राहुल तलाठी, पुणे 👤 गजानन पाटील 👤 मुनेश्वर सुतार 👤 गणेश इबितवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "रूची " न आवडणाराला वाटते हे काही धड नाही साखर खाऊ घातली तरी वाटते गोड नाही रूची असल्या शिवाय निर्माण होत नाही आवड रूचीहीन कशाला कोण काढील सांगा बरं सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.* *शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.* *"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो.अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही.असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही.त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे.अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्रीकृष्णजन्माष्टमी* आज गोकुळात सखी मोद कसा आला, येईल ती गोपी घेई हाती फुलमाला। वसुदेव-देवकीला पुत्र आज झाला, नंद-यशोदेस परि मोद किती झाला। कंस किती दुष्ट कसा मामा म्हणु त्याला, जन्मताच मारितो तो देवकीसुताला। लपुनछपुन आला पहा यमुनेच्या तिरी, वासुदेवा वंदुनी त्या दुहिता नम्र शिरी। ओसरता पाणलोट वसुदेव धाला, यशोदेच्या हाती मग सोपविले त्याला। षड्रिपुसंगे होते जग हे भ्रमात, गीतेचे हो अमृत पाजी बालक ते शांत। उद्धरिण्या जगा त्याने गीता ही ओपिली, जन्माचिया सार्थकाने मती गुंग केली। अजि त्याचा आहे पहा जगी जन्मदिन, नाचु गाऊ चरणी त्या होऊ आता लीन!! @ डॉ श्रीकांत 9850923772 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये संकलक *ना.सा.येवतीकर* व टीमचा तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *भारतीय स्वातंत्र्य दिन* घडामोडी १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. जन्म १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *न्यू इंडियामध्ये सर्व भारतीय सुखी राहावेत, देशवासियांनी जीएसटीचा स्वीकार केल्याबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केला आनंद* ----------------------------------------------------- 2⃣  *झारखंडमधील बहारगोडा येथील रस्ते अपघातात दहा जणांचा मृत्यू तर 12 जखमी जखमी झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 3⃣ *पाटणा - बिहारला पुराचा तडाखा, १२ जिल्हे पुराच्या पाण्याखाली* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : सोलापूर येथील सुरक्षा शाखेतील सहा़ पोलीस फौजदार रऊफ शेख राष्ट्रपती पदकाचे मानकरी़* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणेः शहीद मेजर कुणाल गोसावी यांना लष्कराचे मरणोत्तर शौर्यपदक जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣  *भारताने तिसरी कसोटी 1 डाव 171 धावांनी जिंकली, मालिकेत 3-0 ने विजय.* ----------------------------------------------------- 7⃣ *रवी शास्त्रींनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मिळालेला विजय ही चांगली सुरुवात आहे - सी. के. खन्ना, बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्*ष ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या दोन वर्षपूर्ती निमित्त *कवयित्री शशिकला बनकर* यांची प्रतिक्रिया पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/VZVbajbejxt आपले अभिप्राय जरूर द्यावे. असेच क्रमशः प्रकशित होतील. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                    *वाशीम* वाशिम  हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस ही आहेत.    *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जेव्हा देव आपले संकट निवारण करीत नाही, तेव्हा देवाचा आपल्यावर विश्वास असतो कि ती संकटे आपण सहज पार करू शकू* - रामदास   पेंडकर (तानूरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?* 👉🏼     पंडित जवाहरलाल नेहरू *२)  भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा किती वर्षे पूर्ण झाली?* 👉🏼    ७०वर्षे *३)  स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?* 👉🏼     लॉर्ड माऊंट बॅटन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रमोद शेलार, सहशिक्षक, कोहळी ता हदगाव जि नांदेड 👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक       अहमदनगर 👤 शिवानंद सुरकुटवार, नांदेड 👤 साईनाथ चपळे, बन्नाळी 👤 किरणकुमार नामेवार, वसमत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अभिमान " भारतीय स्वातंत्र्य आमच्या अस्मितेची गाथा आहे तिरंग्या पुढे आमचा नतमस्तक माथा आहे तिरंगा म्हणजे आमचा जान की प्राण आहे तिरंगी झेंड्या आम्हाला तुझा अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *माझा भारत देश महान* अनेक राज्ये अनेक प्रदेश विविध जाती विविध भाष नाही कोणी इथे लहान माझा भारत देश महान तीन रंगाची बात न्यारी निळ्या रंगात चोवीस आरी तिरंगा आमुची आहे शान माझा भारत देश महान दिल्ली आहे देशाची राजधानी सर्वांचे लक्ष घेतो वेधूनी कारभार चालतो एकदम छान माझा भारत देश महान इथे नांदतो सर्वत्र समानता एकमेकामध्ये आहे बंधुता सर्वच गातात एकच गान माझा भारत देश महान जगाच्या कोपऱ्यांत कुठेही एक तरी भारतीय राही कष्टाने राखतो देशाची मान माझा भारत देश महान - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *भारतीय स्वातंत्र्य दिन* स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते संकलन :- प्रल्हाद कापावार  ( स.शि.)             विद्या निकेतन प्रा.वि. बिलोली. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

चांगली मैत्री गमावली एका नदीच्या ठिकाणी मगर 🐊🐒आणि माकड राहत होते. नदीच्या किनारी एक आंब्याचे 🌳झाड होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खुप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खुप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे . भूकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मिञ झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे, खाल्यावर मगराची पत्नी त्याला म्हणाली , ' इतकी गोड फळे खाणा-या माकडाचे ह्रदय किती गोड असेल नाही का ' ? माकडाचे ह्रदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट पत्नीने धरल्यामुळे मगराचा निरूपाय झाला. त्याला नाईलाजाने हट्टापायी मगर निरूपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुस-या दिवशी मगर माकडाला म्हणाला. प्रिय मिञ तुला माझ्या बायकोने जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. मगराला राहवले नाही म्हणून त्यांने प्रिय मिञाला सांगितले कीं, माझ्या प्रिय पत्नीला तुझे ह्रदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणा-या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले ' अरेरे - - - ! माझे ह्रदय तर झाडावरच आहे ! मगर म्हणाला मग आपण परत झाडाकडे जाऊयात. दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाला. 'मिञा तू विश्वासघातकी आहेस ' निघ आता - - - ! मगर खजील झाले. त्यांने स्वतःचा चांगला मिञ गमावला होता. *तात्पर्य*:- कोणाचाही विश्वास घात करू नये.कोणाचीही फसवणूक करून स्वतःचा स्वार्थ,इच्छा ,पाहू नये.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९६० : जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला. 💥 जन्म :- १९५७ : रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :-  १८८६ : श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भारतीय स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात उत्साहात साजरी* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबईः एअर इंडियाच्या विमानात चढताना जवानांना प्राधान्य, एअर इंडियाचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे : बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने नौपाड्यातील दहीहंडी उत्सवात लावले 9 थर,मंडळाने मिळाले 11 लाख रुपयांचे बक्षीस* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाजारात आला, 3 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश : मंडीमध्ये भूस्खलन झाल्यामुळे येथील हनोगी माता मंदिरजवळील राष्ट्रीय महामार्ग 21 बंद करण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन.* ----------------------------------------------------- 7⃣ *प्रो. कबड्डीः पुणेरी पलटनची बंगाल वॉरियर्सवर ३४-१७ अशी मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विचार बदला, देश बदलेल* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/MXWmLeEkQDd वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुणे*          पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे - पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर नैर्ऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्‍या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्‍या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जगाला काय या आवडतं, ते करू नका. तुम्हाला काय आवडते ते करा* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण कोणते?* 👉🏼 जायकवाडी *२) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉🏼 गोदावरी *३) जायकवाडी धरणाचे नाव काय?* 👉🏼 नाथसागर *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 कवी निखिल खराबे, कुही नागपूर 👤 कोंगीरी राममोहन 👤 कु. श्रध्दा रामेश्वर चिंतलवाड, धर्माबाद 👤 सुभाष पालदेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "उत्साहाच्या भरात " उत्साहाच्या भरात नको ते धाडस करतात कारण नसतांना ही काही उगीच मरतात क्षमता आणि मर्यादा ओळखून धाडस करावं उत्साहाच्या भरात उगीच कशाला मरावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोणत्याही गोष्टीचे सखोल चिंतन चांगले काम करण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे जाणिवा तर समृद्ध होतातच; पण समजही वाढत जाते. कळण्याची पातळी उंचावते आणि जगण्यातही आनंद निर्माण होऊ लागतो. आनंद आला की सौंदर्य आले. अशी ही श्रृंखला आहे. त्यात धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावाने अडसर तयार करणे आनंद मिळविण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. त्यामुळे शरीरस्वास्थ्याचा, मन:स्वास्थ्याचा आणि परिणामी समाजस्वास्थ्याचा विचार करताना आकाशासारखा व्यापक गुणधर्म ठेवायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.* *त्यासाठी रोजच्या वेळेतील सकाळची अगदी दहा मिनिटे स्वत:ला द्यावीत. त्यात सुरूवातीची तीन मिनिटे काल काय केले आणि काय राहिले याची उजळणी, पुढची दोन मिनिटे त्यात झालेल्या चुका आणि उरलेली पाच मिनिटे आज काय करायचे याला द्यायला हवीत. त्यात काल ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न होऊ देण्याविषयी स्वत:ला बजावायला हवे. तरच निश्चयाने पाऊल पुढे टाकता येईल. अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या' किंवा 'जन्माला आला.....' या दोन प्रसिद्ध म्हणी आपल्यासाठीच आहेत असे समजायला हरकत नाही.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात... ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अंक गीत* एक एक एक लाल चेंडू फेक दोन दोन दोन मला आवडतो फोन तीन तीन तीन डोक्याला लावा पीन चार चार चार सुट्टीचा दिवस रविवार पाच पाच पाच ताल धरून नाच सहा सहा सहा रांगेत उभे रहा सात सात सात खाऊ दाळ भात आठ आठ आठ बसा सरळ ताठ नऊ नऊ नऊ मुलांना देऊ खाऊ दहा दहा दहा शाळा सुटली पहा नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ चांगली मैत्री गमावली एका नदीच्या ठिकाणी मगर आणि माकड राहत होते. नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खुप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खुप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे . भूकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मिञ झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे, खाल्यावर मगराची पत्नी त्याला म्हणाली , ' इतकी गोड फळे खाणा-या माकडाचे ह्रदय किती गोड असेल नाही का ' ? माकडाचे ह्रदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट पत्नीने धरल्यामुळे मगराचा निरूपाय झाला. त्याला नाईलाजाने हट्टापायी मगर निरूपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुस-या दिवशी मगर माकडाला म्हणाला. प्रिय मिञ तुला माझ्या बायकोने जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. मगराला राहवले नाही म्हणून त्यांने प्रिय मिञाला सांगितले कीं, माझ्या प्रिय पत्नीला तुझे ह्रदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणा-या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले ' अरेरे - - - ! माझे ह्रदय तर झाडावरच आहे ! मगर म्हणाला मग आपण परत झाडाकडे जाऊयात. दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाला. 'मिञा तू विश्वासघातकी आहेस ' निघ आता - - - ! मगर खजील झाले. त्यांने स्वतःचा चांगला मिञ गमावला होता. *तात्पर्य*:- कोणाचाही विश्वास घात करू नये.कोणाचीही फसवणूक करून स्वतःचा स्वार्थ,इच्छा ,पाहू नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

एका विज्ञानाच्या वर्गात झालेला कीस्सा .. शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट एकदम शांत झाला . आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले. सरांनी आपला वर्ग सुरू केला, " फुलपाखराचे जीवन चक्र " शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं , पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं . त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं . ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत होतं. त्याची ती धडपड ,वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते . तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं .. ," सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .." शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले ," मुलांनो , मी जरा भेटुन येतो सरांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची , फुलपाखरु कितीही त्रासात आहे असं वाटलं, तरिही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे , तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते . " शिक्षक निघुन गेले . जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले . आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले . आता त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती . " ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय " "अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना ." " बापरे , कीती दुखत असेल त्याला " " काही होणार नाही त्याला , काढ तो कोष बाजुला ," अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला ,आणि कोष बाजुला केला .. मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते .. पण ते तसे न होता भलतेच झाले .... फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही .....दुसर्‍याच क्षणी ते कोलमडुन पडले ..... मुलं घाबरली ,, आता आपल्याला रागावणार सर ,,, शांत पणे जागेवर जाऊन बसली .. सर परत आले ... वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे . उत्तर समोरच दिसलं ... फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ... शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ... " मुलांनो ,,जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते ,, कारण ते कष्ट , त्या यातना त्याला ती सशक्षता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं , जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात. आयुष्यात सगळंच एकसारखं , सोप्प , सुंदर , मनाजोगं मिळेलच असं नाही , ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं . जीवनातले कष्ट हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे . " ही गोष्ट मी कधीतरी ऐकलेली आहे , शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय ..... पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ,, की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे .. सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढु बघतोय . बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी ,जी समयसुचकता , जो संयम हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो . त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेनी , अपयशाने खचुन जातात . सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही . प्रत्येक वेळी एक आधारस्तंभ म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं राहणं अशक्य आहे . म्हणुन मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं . त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी .

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००५ - बांगलादेशच्या ६४पैकी ६३ जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट. दोन ठार. २००८ - मायकेल फेल्प्सने २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला. 💥 जन्म :- १९१३ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबर्‍या. 💥 मृत्यू :-  १९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई- राज्यात तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज.* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर ग्रामीण भागात फक्त 12 तास वीज देणार, पाण्याच्या कमतरतेमुळे वीजकपात; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - लोकमतचे समीर इनामदार यांना किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार, नाना पाटेकर यांनी केला गौरव* ----------------------------------------------------- 4⃣ *बैलगाडी शर्यतींना हायकोर्टाची मनाई, राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश: चंबामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे. मागणीसाठी कुटुंबियांचं आझाद मैदानात उपोषण सुरू.*  ----------------------------------------------------- 7⃣ *शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार, नवी शेतकरी संघटना सुरु करणार - सदाभाऊ खोत.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *यंदा कर्तव्य आहे ......!* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/88Vmobw9iPh वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                     *रायगड* रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले. *सीमा* पश्चिम- अरबी समुद्र, उत्त्तरेला- ठाणे जिल्हा, पूर्वेला- पुणे जिल्हा दक्षिणेला- रत्नागिरी जिल्हा आहेत. *तालुके* पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणूस विचार करतो देव आहे का नाही पण .....हे कधी विचार करत नाही मी माणूस आहे का नाही सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत?* 👉🏼      आठ जिल्हे *२)  मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे?* 👉🏼     नांदेड *३)  मराठवाड्यात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत?* 👉🏼      तीन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 सौ. अरुणा राजीव भोसले 👤 सौ. श्रुतिका रवि यम्मेवार, धर्माबाद 👤 बालाजी बरडे, धर्माबाद 👤 अनिल मादसवार, हिमायतनगर 👤 सचिन एडके, धर्माबाद 👤 आदित्य अनिल चौगले रा. कोनवडे पो. कूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    *" खचू नका "* तुम्हीच सांगा मिञांनो किती जीव देणार आहेत जीवन संपवल्याने प्रश्न थोडे कमी होणार आहेत जीवन संपवून असे प्रश्न कधी सुटतं नाहीत संकट काळी खचून प्रश्न कधी मिटतं नाहीत     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*    ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••               🔱🔱🔱🔱🔱🔱     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांचे मन आणि विचार चांगले असतील तर त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि वैभव नांदत असते. * व्यंकटेश काटकर, नांदेड.   संवाद..9421839590. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                                          *विषय-हक्क*                                      निस्वार्थपणे वागणारी।                            हिरवी हिरवी झाडं।                                आपलं सर्वस्व।                                    देतात मानवाला।                                       कधीच आपल्या।                                  कर्तव्यात चुकत नाही।                            मग माणूसच का चुकतो?                           का घाव घालतो?                                     त्या निस्वार्थ झाडावर।                              एवढं जिव्हाळा,प्रेम देणारा।                               हिरव्या झाडावर आपलेही।                      काही *हक्क* अन् कर्तव्य                         त्याच्याप्रति नक्कीच आहे।                       त्याचं जीवापाड रक्षण करायचं।                  *हक्क*आहे आपला झाडावर।              म्हणून करु या त्याचे रक्षण।                     पर्यावरण संवर्धन व विकास साधून।          झाडे *जगवू* झाडे *वाचवू*                   सौ.वर्षा भांडारकर.                                 त.मूल.जि.चंद्रपूर. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ एका विज्ञानाच्या वर्गात झालेला कीस्सा .. शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट  एकदम शांत झाला .   आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले.  सरांनी आपला वर्ग सुरू केला,                                                                      " फुलपाखराचे जीवन चक्र " शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं , पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं . त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं . ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत  होतं.  त्याची ती धडपड ,वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते .   तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं .. ," सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .."     शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले  ," मुलांनो , मी जरा भेटुन येतो सरांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची , फुलपाखरु कितीही त्रासात आहे  असं वाटलं,  तरिही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे , तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते . " शिक्षक निघुन गेले . जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले . आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले . आता  त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती . " ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय " "अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना ." " बापरे , कीती दुखत असेल त्याला  " " काही होणार नाही त्याला , काढ तो कोष बाजुला ," अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला ,आणि कोष बाजुला केला ..   मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते .. पण ते तसे न होता भलतेच झाले .... फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही .....दुसर्‍याच क्षणी ते कोलमडुन पडले .....   मुलं घाबरली ,, आता आपल्याला रागावणार सर ,,, शांत पणे जागेवर जाऊन बसली ..   सर परत आले ... वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे . उत्तर समोरच दिसलं  ...    फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ... शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ...      "  मुलांनो ,,जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या  बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते ,, कारण ते कष्ट , त्या यातना त्याला ती सशक्षता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं , जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात.       आयुष्यात सगळंच एकसारखं , सोप्प , सुंदर , मनाजोगं मिळेलच असं नाही , ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं . जीवनातले  कष्ट  हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे .  "      ही गोष्ट मी कधीतरी ऐकलेली आहे , शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय ..... पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ,,       की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे ..   सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढु बघतोय .  बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी ,जी समयसुचकता , जो संयम  हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो . त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेनी , अपयशाने खचुन जातात. सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही . प्रत्येक वेळी एक आधारस्तंभ म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं  राहणं अशक्य आहे .   म्हणुन मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं . त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

*राजा आणि चोर* एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे." मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे जातील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. /08/2017 वार - वार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९२० : अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला. 💥 जन्म :- १८७२ : विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. 💥 मृत्यू :-  १९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यात 72 तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करा. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह येत्या 23 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीला हजर राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *मी मुख्यमंत्री पदी तर भाजपाच्या प्रदेशाध्यपदी रावसाहेब दानवेच राहणार असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *एनडीआरएफच्या 119 टीम्सनी आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये पूरात अडकलेल्या 1334 लोकांची सुटका केली, 35 हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपुर - राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांना आज दुपारी नागपुरात देवाज्ञा.* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली: 'ब्लू व्हेल' गेमविरोधातील याचिका हायकोर्टाने दाखल, 22 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी* ----------------------------------------------------- 7⃣ *सोलापूर - शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते वसंतराव आपटे यांचं निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कॉमन सेन्स......!*  .........म्हणजे काय ? जी व्यक्ती वेळ, काळ, परिस्थिती नुसार स्वतःचे वर्तन ठेवते तिला कॉमनसेन्स आहे असे म्हणतात तर जे याविरूध्द राहतात किंवा वागतात त्यांना नॉनसेन्स म्हणतात. ............. लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/jQ7Su9Fc4xD आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रत्नागिरी*          रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्त्‍न सचिन तेंडूलकर, भारतरत्त्‍न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *"" फ्रेश सुविचार ""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जीवनाचे सत्य आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता?* 👉🏼 अहमदनगर *२) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?* 👉🏼 मुंबई *३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते?* 👉🏼 कर्नाळा (रायगड) *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 अगस्त्य तावरे 👤 गजानन देवकर 👤 गणेश थेटे 👤 भाग्यश्री बिराजदार, लातूर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बनाव " स्वतःला पाहिजे तसा इथे बनाव केल्या जातो धोका दुस-याला नाही स्वतःला दिल्या जातो कितीही बनाव केला तरी तो स्वतः फसतो बनाव करणारालाच त्याचा फटका बसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,* *तर जरा विचार करून पहा* *"नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🌼 बालगीत 🌼* आली आली चिऊताई इथे तिथे चिमण्यांची झाली चिवं चिवं सुरू पाठोपाठ लागल्या गं पहा सार्या अवतरुं ।।धृ।। येगं चिऊ नको भिऊ अंगणात तुरुतुरु सिध्दी लागली गं बोलू गाणे तुझे चुरुचुरु ।।१।। पाण्यामध्ये साचलेल्या चल बाई उड्या मारु भिजण्यात काय मजा सांग कोणास विचारु ।।२।। चिऊताई चिऊताई किती बाई हाका मारु दुध-भात म्हणते गं तुला इवलाच चारु ।।३।। तुझ्या साठी म्हणते गं दुधामधे पोळी चुरुं नको उडुनी जाऊस पण अशी भुरुभुरु ।।४।। पंखावरुन इवल्या तुझ्या म्हणते ग फिरुं थांब जरा नको बाई पळू अशी तुरुतुरु ।।५।। ----सौ. मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 [ ठाणे येथून प्रकाशित होणार्या 'छोट्यांचा आवाज' दिवाळी अंक २०१२ मधून प्रकाशित ही माझी कविता ⬆ ] ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *राजा आणि चोर* एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे." मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे जातील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार

सबसे कीमती चीज एक जाने-माने स्पीकर ने हाथ में पांच सौ का नोट लहराते हुए अपनी सेमीनार शुरू की. हाल में बैठे सैकड़ों लोगों से उसने पूछा ,” ये पांच सौ का नोट कौन लेना चाहता है?” हाथ उठना शुरू हो गए. फिर उसने कहा ,” मैं इस नोट को आपमें से किसी एक को दूंगा पर उससे पहले मुझे ये कर लेने दीजिये .” और उसने नोट को अपनी मुट्ठी में चिमोड़ना शुरू कर दिया. और फिर उसने पूछा,” कौन है जो अब भी यह नोट लेना चाहता है?” अभी भी लोगों के हाथ उठने शुरू हो गए. “अच्छा” उसने कहा,” अगर मैं ये कर दूं ? ” और उसने नोट को नीचे गिराकर पैरों से कुचलना शुरू कर दिया. उसने नोट उठाई , वह बिल्कुल चिमुड़ी और गन्दी हो गयी थी. ” क्या अभी भी कोई है जो इसे लेना चाहता है?”. और एक बार फिर हाथ उठने शुरू हो गए. ” दोस्तों , आप लोगों ने आज एक बहुत महत्त्वपूर्ण पाठ सीखा है. मैंने इस नोट के साथ इतना कुछ किया पर फिर भी आप इसे लेना चाहते थे क्योंकि ये सब होने के बावजूद नोट की कीमत घटी नहीं,उसका मूल्य अभी भी 500 था. जीवन में कई बार हम गिरते हैं, हारते हैं, हमारे लिए हुए निर्णय हमें मिटटी में मिला देते हैं. हमें ऐसा लगने लगता है कि हमारी कोई कीमत नहीं है. लेकिन आपके साथ चाहे जो हुआ हो या भविष्य में जो हो जाए , आपका मूल्य कम नहीं होता. आप स्पेशल हैं, इस बात को कभी मत भूलिए. कभी भी बीते हुए कल की निराशा को आने वाले कल के सपनो को बर्बाद मत करने दीजिये. याद रखिये आपके पास जो सबसे कीमती चीज है, वो है आपका जीवन.”

हिऱ्याची परख थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !! सारांश जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖ *🌺 जीवन विचार🌺* ➖➖➖➖➖➖➖ *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.* *📚स्वामी विवेकानंद*🙏🏻 *माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी. पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.* *कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठ आणि कसे दाखविल हे*?????? 〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड *~~~~~~~~~~~~~~~~~* http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *©राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. १९७९ - पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक. १९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :-  १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु. १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली - माजी आयएएस अधिकारी सुनिल अरोरा यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत २३ ठार, १५ जखमी, ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भिती* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची केंद्र सरकारच्या संरक्षण निर्मिती विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 4⃣ *इस्त्रोने रिजनल नेव्हिगेशन सॅटलाइट IRNSS-1 चे प्रेक्षपण अयशस्वी.* ----------------------------------------------------- 5⃣ *पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली - केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी आणि उमा भारती यांचा मंत्रिपदाचा राजीनामा.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत विरुद्ध श्रीलंका चौथा एकदिवसीय सामना - विराट कोहलीचं शानदार शतक, फक्त 76 चेंडूत ठोकलं दणदणीत शतक, भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा " मला माणूस व्हावेसे वाटते. " https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/mala-manus-vhavese-vatte वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ओझर* अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यातमाणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्यातीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेलाशिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ विश्वास असेल तर न बोलता ही सारे काही समजून घेता येते.. आणि विश्वास च नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. - रामदास पेंडकर ( तानूरकर ) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *1) नेपाळ ची राजधानी कोणती ?* 👉🏻 काठमांडू *2) खारी साठी चे ग्रिझल्ड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?* 👉🏻 तामिळनाडु *3) गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे ?* 👉🏻 रत्नागिरी *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 विजय भगत, सहशिक्षक 👤 गणेश गिरी, धर्माबाद 👤 नवनाथ पिसे 👤 रामेश्वर चिंतलवार, धर्माबाद 👤 सुनीता गायकवाड 👤 धनराज पाटील बाभळीकर 👤 नवनाथ कौठगावे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " निकाल " नको त्या गोष्टीसाठी चाल ढकल करतात हास्यास्पद वाटेल अशी उकल करतात ज्याची नाही त्याची चाल ढकल नसावी कशाची करावी कशाची नाही अक्कल असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही.केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल.म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शब्दांनीच शिकवलय* *पडता पडता सावरायला,* *शब्दांनीच शिकवलय* *रडता रडता हसायला,* *शब्दांमुळेच होतो* *एखाद्याचा घात आणि* *शब्दांमुळेच मिळते* *एखाद्याची आयुष्यभर साथ* *शब्दांमुळेच जुळतात* *मनामनाच्या तारा आणि* *शब्दांमुळेच चढतो* *एखाद्याचा पारा...* *शब्दच जपून ठेवतात* *त्या गोड आठवणी आणि* *शब्दांमुळेच तरळते* *कधीतरी डोळ्यांत पाणी…* *"म्हणूनच जो जीभ जिंकेल* *तो मन जिंकेल आणि जो* *मन जिंकेल तो जग जिकेल"....!!* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *काका कालेलकर* काका कालेलकर उच्‍च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्‍यांची विचारक्षमता प्रत्‍येक विषयात खोल आणि व्‍यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्‍यांच्‍या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्‍यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्‍मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्‍यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्‍यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्‍याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्‍याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्‍हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्‍हापासून मी नव्‍याने तपासणी केली आहे तेव्‍हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्‍या तपासणीविषयी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा काका म्‍हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्‍हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्‍यामुळे जास्‍त दिवस मुक्काम करतो तेच त्‍याच्‍याशी उलटपक्षी वागले असता म्‍हणजेच घरातल्‍यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्‍यास तो अशा घराचा रस्‍ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्‍य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’काकांच्‍या नव्‍या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले. *तात्‍पर्य :-* आजारापेक्षा जास्‍त त्‍याची चिंता तणाव वाढवते. त्‍यामुळे कोणत्‍याही शारीरिक अस्‍वस्‍थतेला सकारात्‍मक विचाराने घेण्‍याचा प्रयत्‍न करा.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

मन माणसाचे अन डोके...??? एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडासाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले. तात्पर्य :- माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक होईल, भरकटेल.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/08/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जागतिक छायाचित्र दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८३९ : जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले. 💥 जन्म :- १९१८ : डॉ. शंकर द्याळ शर्मा, भारताचे माजी राष्ट्रपती. १९५० : डॉ. सुधा नारायण मुर्ती, ज्येष्ठ समाजसेविका 💥 मृत्यू :-  १९४७ : मास्टर विनायक, ख्यातनाम मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *विदर्भाप्रमाणे मराठवाडयातही पावासची स्थिती बिकट, नागपूर वेधशाळेची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣  *उत्तर प्रदेश: मदरशांच्या नोंदणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने वेबसाइट केली लाँच.* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : मनपा शाळेत वाटलेल्या जंतनाशकच्या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्याने विद्यार्थी मुजमील जमील शेख (१३) घाटी रुग्णालयात दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *गोरखपूर मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करा; अलाहाबाद उच्च न्यायायाचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश, पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार.* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली- जिल्ह्यात दोन ठिकाणांवरुन अडीच लाखांचा तबांखू जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई.* ----------------------------------------------------- 6⃣  *'नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे', महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरमध्ये वक्तव्य.* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई: मंत्रिमंडळातील जागेसंदर्भात भूमिका जाहीर करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारला अल्टिमेटम.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ फ्रेश मॉर्निंग बुलेटिन विषयी *शरद पाटील, बर्लिन जर्मनी* यांची प्रतिक्रिया https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/e7V4x7yojQd वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले बुलेटिन विषयी अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬          *उस्मानाबाद* उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे. कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे. परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही.... तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..... घेऊन, तीच दहशत.....अन तोच दरारा!!! --पेंडकर रामदास (तानूरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण?* 👉🏼 सुरेखा भोसले *२) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण?* 👉🏼 आनंदीबाई जोशी *३) अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पहिला महिला अध्यक्ष कोण?* 👉🏼 कुसुमावती देशपांडे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शिवा टाले, मुख्याध्यापक राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नांदेड 👤 महेश हातझाडे, गोंदिया *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "शब्द " दिला शब्द माणसा कडून हल्ली पाळला जात नाही विश्वासघात केला तरी आश्रू ढाळला जात नाही दिला शब्द माणसाला पाळता आला पाहिजे विश्वासघातकी प्रसंग टाळता आला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* •••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●••• 💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण सूर्याकडून प्रकाश, ढगाकडून पाणी, जमिनीकडून अन्न,वृक्षाकडून फळे आणि सावली,संत-सज्जनाकडून चांगले जीवन जगण्याचे उपदेश अशा कितीतरी अनेक गोष्टी आपल्या जीवनासाठी घेतच आलो आणि जीवन जगत आलो,पण थोडा आपणही विचार करायला हवा.जसा या सा-याकडून देण्याचा त्यांचा गुण आणि आपण घेण्याचा गुण नि:संकोचपणे घेतला आहे त्याचप्रमाणे आपणही काहीतरी देण्याचाही मानवतेचा धर्म स्वीकारायला हवा.यासाठी निसर्गाचे संगोपन,गरीब व होतकरुंना सहकार्य,भुकेल्या ना अन्न,तहानलेल्यांना पाणी,दु:खितांची सेवा आणि प्रसंगानुरुप मदतीला धावून जाणे ह्या देखील तितक्याच दातृत्वाच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत आणि हे निस्वार्थीपणे करायला हवे.यातच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ आहे.यासाठी आपले हात सदैव पुढे असू द्यावे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तो तुझा पावसाळा, हा माझा पावसाळा का वाटला खुळा. .. आपसात पावसाळा...ll का हे आपल्यात आज असे वैर जाहले किती होता तो उल्हासात पावसाळा ...ll कधी त्याने तुला भिजवले, कधी मला आज भिजतो स्वतःच्याच अश्रूंत पावसाळा...ll कधी तुला शोधतो, कधी शोधतो मला वणवण भटकतो विचारात पावसाळा ...ll त्याच्या पदरीचे जीणे न पाहवे मज आता शाल काळी पांघरून दडला ढगात पावसाळा ...ll तुझा पावसाळा कसा तुझे ते तुच जाणो भिजवत उशी जगतो माझा दिनरात पावसाळा...ll शैलजा वायझाडे ... ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सबसे कीमती चीज* एक जाने-माने स्पीकर ने हाथ में पांच सौ का नोट लहराते हुए अपनी सेमीनार शुरू की. हाल में बैठे सैकड़ों लोगों से उसने पूछा ,” ये पांच सौ का नोट कौन लेना चाहता है?” हाथ उठना शुरू हो गए. फिर उसने कहा ,” मैं इस नोट को आपमें से किसी एक को दूंगा पर उससे पहले मुझे ये कर लेने दीजिये .” और उसने नोट को अपनी मुट्ठी में चिमोड़ना शुरू कर दिया. और फिर उसने पूछा,” कौन है जो अब भी यह नोट लेना चाहता है?” अभी भी लोगों के हाथ उठने शुरू हो गए. “अच्छा” उसने कहा,” अगर मैं ये कर दूं ? ” और उसने नोट को नीचे गिराकर पैरों से कुचलना शुरू कर दिया. उसने नोट उठाई , वह बिल्कुल चिमुड़ी और गन्दी हो गयी थी. ” क्या अभी भी कोई है जो इसे लेना चाहता है?”. और एक बार फिर हाथ उठने शुरू हो गए. ” दोस्तों , आप लोगों ने आज एक बहुत महत्त्वपूर्ण पाठ सीखा है. मैंने इस नोट के साथ इतना कुछ किया पर फिर भी आप इसे लेना चाहते थे क्योंकि ये सब होने के बावजूद नोट की कीमत घटी नहीं,उसका मूल्य अभी भी 500 था. जीवन में कई बार हम गिरते हैं, हारते हैं, हमारे लिए हुए निर्णय हमें मिटटी में मिला देते हैं. हमें ऐसा लगने लगता है कि हमारी कोई कीमत नहीं है. लेकिन आपके साथ चाहे जो हुआ हो या भविष्य में जो हो जाए , आपका मूल्य कम नहीं होता. आप स्पेशल हैं, इस बात को कभी मत भूलिए. कभी भी बीते हुए कल की निराशा को आने वाले कल के सपनो को बर्बाद मत करने दीजिये. याद रखिये आपके पास जो सबसे कीमती चीज है, वो है आपका जीवन.” *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/08/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. १९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :-  १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई - पावसाचा जोर येत्या ४८ तासांसाठी कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : बँकिंग सुधारणांविरोधात देशभरातील 10 लाख बँक कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात, बँक कर्मचाऱ्यांनी 22 ऑगस्ट रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे मंगळवारी देशभरातील सर्व बँका बंद राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- पुढच्या वर्षापासून आयआयटीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेतली जाणार* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, नांदेडमध्ये १६ पैकी १२ तालुक्यात अतिवृष्टी, गेल्या २४ तासांत १४४ मिमी विक्रमी पावसाची नोंद* ----------------------------------------------------- 5⃣ *उत्तर प्रदेशः गोरखपूरमध्ये पुरात अडकलेल्या 450 लोकांना लष्करानं काढलं सुखरूप बाहेर* ----------------------------------------------------- 6⃣ *हॉलिवूडमधील विनोदी अभिनेते जेरी लेविस यांचे 91व्या वर्षी निधन* ----------------------------------------------------- 7⃣ *पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सोशल मिडीया: जरा जपून वापरा* सोशल मीडियामधील फेसबुक, ट्विटर, लिंकदिन, व्हाट्सएप्प, टेलीग्राम यासारख्या माध्यमाचा सध्या सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे...... https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/QLiHKmfBNs9 वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पालघर*          पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात ,आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दुंगा" हे कोणी म्हटले आहे?* 👉🏼 सुभाषचंद्र बोस *२) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?* 👉🏼 फॉरवर्ड ब्लॉक *३) आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले होते?* 👉🏼 सुभाषचंद्र बोस *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 भूषण परळकर, नांदेड 👤 विश्वास बदापूरकर, येताळा 👤 भीमाशंकर जुजगार, धर्माबाद सेवानिवृत्त, हु. पानसरे हायस्कूल 👤 संतोष गुम्मलवार, नांदेड 👤 दत्ता नरवाडे 👤 साईनाथ राचेवाड, सहशिक्षक जि. प. प्रा. शाळा बेळकोणी बु. 👤 साईनाथ हवालदार, येवती 👤 गोपाल पवार 👤 Feroj Shaikh, ( Plant head ) Badve Engineering Ltd, Aurangabad *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अंदाज " अंदाज सांगणाराच्या तोंडात आज साखर आहे धरणी मातेचाही पहा तृप्ततेचा ढेकर आहे अंदाज सांगणाराचा अंदाज सदा खरा ठरावा कोणी तरी त्यांच्या तोंडात गोड घास भरावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आज समाजात खलनायकी आणि नालायकीचे कौतुक, समर्थन केले जाते. दुर्दैवाने आज समाजाची अवस्था अशी झालीय की, लायक नायकांपेक्षा नालायक आणि खलनायकी वृत्तीचे नायक, नेतृत्व आणि वारस निपजत आहेत, पुढे येत आहेत. काळही लायकाला नालायक आणि नालायक खलनायकाला नायक ठरवतोय. ही शोकांतिका सारे गपगुमान बघत आहेत. 'एकेकाळी गुणवत्तेची कदर होती. आता फक्त दर आहेत'. पण गोष्ट फक्त दर आणि कदरपर्यंत राहिली नाहीय, तर पाणी घरात शिरलयं. पदर आणि चादरीपर्यंत आलयं. आम्ही मात्र काही माहितच नाही, असे सोंग पांघरून बसलोय.* *आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग , गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत नको नको ते बघायला मिळतयं. या सा-या खलनायकांना नायक म्हणून, लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतात. ज्यातून या सा-यांची हिमंत दिवसेदिवस वाढते आहे. ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटले जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे. 'आपण काहीच करू शकत नाही,' असे म्हणू लागलो आहोत.... हे आपण होऊन स्विकारलेलं षंढत्व😌 सर्वत्र निपजतयं जे समाजाचा घात करणारे आहे..?..?..?* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌻🌻🌻🌻🌻🌻 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणसाने एकदा एक काम हातात घेतले असताना दुसरे काम पुन्हा हातात घेऊ नये.जर घेतले तर कोणतेही एक काम पूर्ण होत नाही.हे काम करु की,ते काम करु अशा संभ्रमावस्थेत मग तो राहतो.त्यामुळे दोन्ही कामे अर्धवटच राहतात.असे न करता एकावेळी एकच काम करावे.असे केल्याने एकाच कामात पूर्ण लक्ष्य दिल्या जाते व काम वेळेवर पूर्ण होते आणि अधिक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट ही होते.काम पूर्ण झाल्याचे समाधानही लाभेल.म्हणून एकावेळी एकच काम हातात घ्यावे व पूर्णत्वास न्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....9421839590 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता - बैलपोळा* आला श्रावण सरत आनंदोत्सव भरला मनात अवनी हसली हिरवे साज नेसत... नंदीबैलाच्या नावाचा सर्जा राजाचा जोडीचा सण आला आवडीचा बैलपोळा सगळ्याच्या घरात... कृतज्ञ आपला व्यक्त कराया बळीराजा लागला पोळा साजरा कराया... हर सालातून एकदा बळीराजा करीतो तूझी पूजा मनोभावाने ओवाळूनी दान मागितो भरभराटीचा... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरा मित्र* रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, ''रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन.'' असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, ''काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?'' रामा बोलला, ''हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे.'' हे ऐकून हरी फारच खजील झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर. १९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता. १९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश* ----------------------------------------------------- 2⃣ *तिहेरी तलाकवर आज सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय, देशभरातील मुस्लीम महिलांचे याकडे लक्ष.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी व कर्मचा-यांनी आज एक दिवसाचा संप* ----------------------------------------------------- 4⃣ *गुजरातमध्ये स्वाइन फ्लूने आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर - मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागात भूकंप. घाबरून लोक घराबाहेर धावले.* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपः पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने स्पेनच्या पाब्लो अबियनचा २१-८, १७-४ अशा दोन सेटमध्ये केला पराभव* ----------------------------------------------------- 7⃣ *जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या लढतीत किदम्बी श्रीकांतचा रशियाच्या सेर्गेई सिरांतवर 21-13, 21-12 असा विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ श्रावण, पाऊस आणि पोळा या तीन शब्दाच्या आधार घेऊन लिहिलेला प्रसंग *श्रावणातील पोळ्याचा पाऊस* आज रामराव खुपच चिंताग्रस्त होऊन बसला होता. कोणत्याही कामात त्याचे मन लागत नव्हते. त्याला शेतातील पिकाची काळजी लागली होती. त्याला आपल्या सर्जा आणि राजा या दोन बैलाची काळजी लागली होती. नव्हे त्याला परिवारातील सर्वांची काळजी लागली होती......... पूर्ण प्रसंग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/bb4FAx7VF4w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬          *सिंधुदुर्ग* भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्राम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. *अर्वाचीन इतिहास* सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. *प्रेक्षणीय स्थळे** आचार खाडी (बेकवाटर) आंबोली थंड हवेचे ठिकाण कुणकेश्वर मंदिर (देवगड) तेरेखोल किल्ला देवगड किल्ला व दीपगृह राजवाडा (सावंतवाडी) विजयदुर्ग किल्ला संत राऊळ महाराज मठ कुडाळ सावडाव धबधबा सिंधुदुर्ग किल्ला सुवर्ण गणेश मंदिर मालवण *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬             *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " Whether you think you can, or you think you can't--you're right..." सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "मेरी झांशी नही दूंगी" असे कोण म्हणाले?* 👉🏼 राणी लक्ष्मीबाई *२) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी मिळवाणरच" असे कोण म्हणाले?* 👉🏼 लोकमान्य टिळक *३) ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तरली नसून,ती कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे",असे कोण म्हणाले?* 👉🏼 अण्णाभाऊ साठे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शिवा संजय गैनवार, धर्माबाद 👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद 👤 आशीष देशपांडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "पटत नाही " खरं सांगितलेले कोणाला पटत नाही कितीही खरं सांगा खरं वाटत नाही धुंदीतल्यांना वाटते माझं सारं खरं आहे सांगणाराला वाटते आपल शांत बरं आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नव्वदीनंतर जन्माला आलेली आजची तरूण पिढी प्रामुख्याने घरातील विभक्त कुटुंबपद्धतीत वाढली. एकुलतं एक मूल असणं आणि आई-वडिल दोघांचीही नोकरी या विशिष्ट रचनेमुळे पालकांच्या सर्व आशा आणि प्रयत्न त्या एकट्या मुलावर केंद्रित झाले. ज्याचा मोठा परिणाम त्या लहान मुलाच्या मानसिकतेवर, किंबहुना व्यक्तिमत्वावर झाला. परिक्षेतील यशामुळे झालेल्या कोडकौतुकानं त्या मुलाला जसं प्रोत्साहित केलं; तसंच काही प्रमाणात कधीतरी किंवा बरेच वेळा अपयशाला सामोरं जावं लागल्यास होणारा अस्विकार किंवा त्रास लहान वयातच खच्चीकरण करणारा ठरला. नकाराचा स्विकारही ही पिढी सकारात्मकतेने करते का ? हे सुद्धा महत्वाचे आहे.* *यश मिळविल्यानंतर कोडकौतुकाला सातत्यानं सामोरी गेलेली एकुलती एक मुलगी वैवाहिक आयुष्यात तेच यश चाखेल असं नाही. तिच्या सतत 'परफेक्ट' बनण्याच्या धडपडीत ती जास्त आग्रही किंवा दुराग्राहीसुद्धा होऊ शकेल. आजची पंचविशीत असलेली पिढी खरंच स्वत:ला, स्वत:च्या भावना आणि दृष्टीकोन यांना ओळखते का ? बरेचदा भौतिक सुखाच्या मागे लागून माझा पगार, माझं कुटुंब आणि मी यातच त्यांच जीवन गुरफटताना दिसतं त्यांच करिअर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर अतिक्रमण तर करत नाही ना ? आजच्या जमान्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा 'व्हर्च्युअल डायलाॅग' आधिक वाढतोय. पण तो खराखुरा संवाद आहे की वेगळंच काही ? हे स्वत:शी तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे.*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••             🍁🍁🍁🍁🍁🍁 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जी माणसे काहीच न करता स्वस्थ बसून राहतात.आहे त्याच परिस्थितीत धन्यता मानतात.त्यांना काहीच करावेसे वाटत नाही.दुस-यांकडे पाहूनही आपण काहीतरी करावे असेही वाटत नाही.अशांचे जीवन म्हणजे एका डब्यातील बेडकाप्रमाणेच असते.ते आपल्या जीवनात कधीही सुखी होऊ शकत नाही. * व्यंकटेश काटकर, नांदेड.   संवाद.9421839590. 🐸🌴🐸🌴🐸🌴🐸🌴🐸🌴 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बालगीत - पोळा " आला आला पोळा, बैलाची पाट चोळा /१/ साबनाने बैल धूवा, शिंगाला वारनेस लावा /२/ बैलाला नवीन म्होरकी, वेसनीला दोर बारकी /३/ बैलाला नवीन कासरा, शेतकरी आमुचा हसरा /४/ अंगावर काढा नक्षी, पाटीवर बसेल पक्षी /५/ बैलाला बांदावर चारा, गोठ्यात आणा गवताचा भारा /६/ पाटीवर झुली घाला, गळ्यात घुंगराच्या माळा /७/ मंदिराला माळा चक्कर, ढवळ्या - पवळ्या खेळेल टक्कर /८/ गाईसोबत लावा लग्न, गाव सगळा सणात मग्न /९/ खाऊ घाला पुरणपोळ्या, आनंदाने वाजवा टाळ्या /१०/ " आनंदाने वाजवा टाळ्या.... " *रचनाकार * श्री.नवनाथ श्रीहरि बोराडे लातूरकर. शाळा पिकुळे नं. ०३ ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग भ्रमणध्वनी - ९४२३२१६१०४ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                *हिऱ्याची परख*             थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!        सारांश जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी १९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. 💥 जन्म १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक. १८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार. अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *ओबीसींची ‘क्रीमी लेयर’ मर्यादा आठ लाख, जातींच्या पोटवर्गीकरणासाठी आयोग, केंद्र सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 2⃣ *१२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुणीच सुरक्षित नाही. दाभोळकर-पानसरे हत्याकांड खटल्यावरील सुनावणीत हायकोर्टानं व्यक्त केली चिंता.* ----------------------------------------------------- 3⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये रात्री अडीच वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 5.0 इतकी मोजण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *गेल्या आठ महिन्यात स्वाइन फ्लूने भारतात 1094 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप - सायना नेहवालने स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर मात करुन उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला.* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप - बी.साई प्रणीतने इंडोनेशियाच्या अॅन्थोनी सीनीसुकावर 14-21, 21-18,21-19 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.* ----------------------------------------------------- 7⃣ *ए. बी. डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे एकदिवसीय सामन्यातील कर्णधारपद सोडले* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- दुसरी वन डे आज, विजयाचा अश्वमेध दौडणार, लंकेला पराभूत करण्यासाठी भारत सज्ज* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गजानना श्री गणराया* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/cwutxUnr6oF वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *कंधारचा किल्ला* कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. *स्थापना* या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्‍या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्‍यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करुन बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपले अज्ञान ओळखणे हीच ज्ञानप्राप्ती ची पहिली पायरी होय* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "अभिनव भारत" या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली?* 👉🏼 वि. दा. सावरकर *२) सावरकराना काळ्या पाण्याची शिक्षा कोठे झाली?* 👉🏼 अंदमान *३) वि. दा. सावरकराना "स्वातंत्र्यवीर" ही पदवी कोणी दिली?* 👉🏼 प्र. के. अत्रे *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 जी. एस. ऐनवाले, सेवानिवृत्त 👤 हणमंत बोलचटवार, धर्माबाद 👤 संजय पाटील, पुणे 👤 ऋषिकेश शिंदे 👤 मा. श्रीकांत भुजबळ, तहसीलदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "तोंड गोड " साखर खाऊ घालून तोंड गोड केलं आहे शब्द पाळल्याने लोकांना नवल झालं आहे दिला शब्द पाळला म्हणजे नवल वाटतं सांगितलेल सारं काही मग सहज पटतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.* *कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जीवनात ० त ९ हे अंक अतिशय महत्वाचे आहेत. कारण या अंकाशिवाय कोणताही जीवन व्यवहार होत नाही.परंतु आम्ही काही अंकांना शुभ मानतो तर काहींना अशुभ.असे मानणे म्हणजे अज्ञान पणाचे लक्ष्मण म्हणावे लागेल.० ते ९ या अंकातल्या एक जरी अंक कमी केला तरी कोणतेही गणित जुळत नाही.गणिताचेच नाही तर जीवनात व्यवहारात देखील कोणत्याही अंकाला सोडता येत नाही.म्हणून ० ते ९ या अंकांना जीवनात समानतेचा दर्जा देऊन आणि तितकेच प्रत्येक अंकांना महत्वाचे मानून जीवनात मनात काही एक अविचार किंवा संकोच न आणता ते सहज स्विकारले पाहिजे. कोणत्याही अंकांना कमी दर्जाचे न लेखता सगळ्यांना सारखेच मानने हे सुज्ञ आणि शहाणपणाचे माणसाचे लक्षण समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔰हरवलेले डोळे🔰* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आज जरा तिला निरखून मी पाहिले भावनाशुन्य मन तिचे हरवलेले डोळे... थक्क मी झालो अवाक होऊन बसलो असा कसा तिच्याशी मी रिता होऊन गेलो... कधी केंव्हा कशी ती माझ्यापासून दूरावून गेली कळी माझी गूलाबाची कशी ही सूकून गेली... गूंग मी होतो नूसता पैश्यासाठी धावत मी होतो सार वैभव माझ्या जवळी अशा भ्रमात मी होतो... पैसा अडका नको माझा फक्त प्रेम हवे होते तिला रुपे अंलकार दागिने नाही तर वेळ हवा होता साधा... ऊशिर खूप होता झालेला तूटले होते तिचे मन भोळे येईल का तिच्या नयनी चमक होते तिचे हरवलेले डोळे... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏शब्दांकन/समूह सदस्या🙏* *✍ सुचिता नाईक* *जि.प.उच्च प्रा.शाळा सिंदगितांडा* *ता. किनवट जि.नांदेड* *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/groups/100274427177019/ ➖➖➖🌀🙏🌀➖➖➖➖ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *लबाड गाढव* एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖ *🌺 जीवन विचार🌺* ➖➖➖➖➖➖➖ *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.* *📚स्वामी विवेकानंद*🙏🏻 *माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी. पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.* *कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठ आणि कसे दाखविल हे*?????? 〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड *~~~~~~~~~~~~~~~~~* http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *©राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/08/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेश चतुर्थी* 💥 ठळक घडामोडी :-  २००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार. २००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार. 💥 जन्म :- १९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ. १९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता. १९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका. 💥 मृत्यू :-  १८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. २००० - कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. 'डोनाल्ड डक'चे रेखाचित्रकार २००१ - डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई - गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या, स्वागतासाठी भाविकांची जय्यत तयारी, ढोल-ताशा पथकंही सज्ज* ----------------------------------------------------- 2⃣ *शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 3⃣ *नंदन निलकेणी यांची इन्फोसिसच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी झाली नियुक्ती.* ----------------------------------------------------- 4⃣ *अश्वनी लोहानी यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य.* ----------------------------------------------------- 5⃣ *200 रुपयांची नोट आजपासून चलनात येणार - आरबीआय.* ----------------------------------------------------- 6⃣ *जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: भारताच्या किदाम्बी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक* ----------------------------------------------------- 7⃣ *दुसरा एकदिवसीय सामना भारताने तीन विकेटनं जिंकला, भुवनेश्वरने झळकावले दमदार अर्धशतक* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 2100 किलो वजनाच्या चॉकलेट केकचा नैवेद्य.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आधी वंदू तुज मोरया...!* वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:  निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला आपण तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/cwutxUnr6oF आपले अभिप्राय जरूर द्यावे. गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गणपतीपुळे*          गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ  (S.T.) मुंबई,  पुणे,  कोल्हापूर,  नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ  (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *त्याग जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो?* 👉🏼      २४ तास *२)  पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात?* 👉🏼       ३६५ दिवस *३)  सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो?* 👉🏼      ८ मिनिट *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाधर जारीकोटकर, धर्माबाद 👤 आदि रामचंद्र 👤 गणेश मैडमवार, धर्माबाद 👤 प्रमोद गुरुपवार, तळणी 👤 नयन पेडगावकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    "गणराज" वाजत गाजत गणराज येतील लहान थोर आनंदी होतील बाप्पा हा आनंद कायम टिकू द्या बळीराजाची शेती जोमात पिकू द्या   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 *गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आमची उत्सवप्रियता प्रेरक असावी, ती मारक असता उपयोगी नाही. येणा-या प्रत्येक नव्या पिढीला त्यात सृजनत्वाचे नवे बिंदू दिसावेत. त्यासाठी आम्ही काय करणार आहोत ? आम्ही जबाबदारी ओळखून वागणार आहोत की नाही ? की आला दिवस गेला दिवस, अशीच आमची उत्सवप्रियता असणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नवी पिढी आपल्याला विचारेल. त्यावेळी जर आपण निरूत्तर असू तर तर आपल्यावर पिढी नासवल्याचे आरोप होतील. म्हणून वेळीच सावध व्हायला हवे.* *आपली संस्कारांनी, परंपरांनी भरलेली ओंजळ येणा-या पिढीच्या हातात रिती  करण्याचे काम या गणेशोत्सवांतून झाले पाहिजे. उत्सवाच्या प्रत्येक क्षणांतून आज आपल्या समाजाला शिक्षणाची गरज आहे. संस्कृतीच्या या संघर्षकाळात तावून-सुलाखून निघण्यासाठी सुजाण नागरिकत्वाच्या दिशेने पावले पडली तरच गणपती आपल्याला पावला म्हणायचे. चला, तर मग असा गणेशोत्सव साजरा करू या आणि म्हणू या की--*               *'--देवा तूचि गणेशु..'*                                              •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••                 🔻🔻🔻🔻🔻🔻       *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ समाजाला एका चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाण्यासाठीधर्मग्रंथ,पुराणग्रंथ, लोककथा,संतविचार, थोरविचारवंत,समाजसुधारक व आदर्श समाजहित जोपासणा-या साहित्यिकांचे लेखन हे सदैव समाजाला मदत आणि मार्गदर्शनच करतात. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी सर्वात जास्त योगदान या सर्वांचे आहे. हे कधीही विसरून चालणार नाही.नेहमी त्यांच्या सहवासात राहून आपले जीवन समाजाप्रती सकारात्मक ठेऊन आपली व समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. - *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेशोत्सव -  सन 2017* *बाप्पाचे मनोगत* मनोगत सांगतो बाप्पा तुम्ही लक्ष देऊन ऐका गतवर्षी शांताबाईने किटले कान यावर्षी नको तो सोनूचा ठेका घरी गेल्यावर गुणगुणल्याने ऐकून ओरडते आमची माता म्हणते वैतागून आम्हांस ती हे कसलं संगीत तिकडून घेऊन येता झांजा , ढोल ताशांनी आमचे बहिरे होतात दोन्ही कान ध्वनी प्रदूषणाने होते हानी याचे नसते का तुम्हां भान नेत्रदीपक रोषणाईचाही आम्हाला होतो फारच त्रास झिकमिक दिव्यांऐवजी शांत तेवणारी समईच खास भजन कीर्तन क्वचित कुठेतरी नाचगाणी , डामडौलाचाच जास्त  थाट सरबराई आमची की मौज तुमची हाच प्रश्न घुमत राहतो डोक्यात तुमचे देव म्हणून आम्हास मानता आणि आम्हांस रस्त्यांवरही बसविता तेच तुमच्या मनात बसविलत तर कशाला राहील कसलीच चिंता ***************************** श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छांसह ! ----प्रविण शांताराम , पनवेल, रायगड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेश कथा* एक समय जब माता पार्वती मानसरोवर में स्नान कर रही थी तब उन्होंने स्नान स्थल पर कोई आ न सके इस हेतु अपनी माया से गणेश को जन्म देकर 'बाल गणेश' को पहरा देने के लिए नियुक्त कर दिया।  इसी दौरान भगवान शिव उधर आ जाते हैं। गणेशजी उन्हें रोक कर कहते हैं कि आप उधर नहीं जा सकते हैं। यह सुनकर भगवान शिव क्रोधित हो जाते हैं और गणेश जी को रास्ते से हटने का कहते हैं किंतु गणेश जी अड़े रहते हैं तब दोनों में युद्ध हो जाता है। युद्ध के दौरान क्रोधित होकर शिवजी बाल गणेश का सिर धड़ से अलग कर देते हैं।  शिव के इस कृत्य का जब पार्वती को पता चलता है तो वे विलाप और क्रोध से प्रलय का सृजन करते हुए कहती है कि तुमने मेरे पुत्र को मार डाला। माता का रौद्र रूप देख शिव एक हाथी का सिर गणेश के धड़ से जोड़कर  गणेश जी को पुन: जीवित कर देते हैं। तभी से भगवान गणेश को गजानन गणेश कहा जाने लगा।   *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖➖ *🌺जीवन विचार*🌺 〰〰〰〰〰〰〰 संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो. 'It is better to have loved and lost, than never to have loved at all!' अत्यंत महागडी,न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ". जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं. "आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो". smt.pramilatai senkude म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे'. आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही. ' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'. =================== 🙏शब्दांकन /संकलन🙏🏻 ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता. हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 💐🍀💐🍀💐🍀💐

तांत्रिक कारणामुळे काल बुलेटिन पोस्ट करता आले नाही, त्याबद्दल बुलेटिन टीम दिलगीर व्यक्त करते. ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                 *राष्ट्रीय क्रीडा दिन* 💥 जन्म :- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू. १९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार. १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई : किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू मगरे यांनी मुंबई विद्यापीठाचे नवीन प्रभारी कुलसचिव म्हणून आजपासून पदभार स्वीकारला* ----------------------------------------------------- 2⃣ *अमेरिका: ह्युस्टन विद्यापीठात शिकणारे २०० भारतीय विद्यार्थी सुखरुप; चक्रीवादळामुळे ह्युस्टनमध्ये मोठं नुकसान* ----------------------------------------------------- 3⃣ *लखनऊ: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ५ सप्टेंबर रोजी लखनऊ मेट्रोचे उद्घाटन करणार; ६ सप्टेंबरपासून सुरू होणार मेट्रो सेवा* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना 9 महिने प्रसुती रजा मिळणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निर्णय, परिपत्रक जारी* ----------------------------------------------------- 5⃣ *हरयाणा - राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने एकूण 20 वर्षांचा कारावास ठोठावला* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर: गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास सामान जप्त करून मंडळांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे नोंदवा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश.* ----------------------------------------------------- 7⃣ *आंध्र प्रदेश : नंदयाल विधानसभा पोटनिवडणुकीत तेलगू देसम पार्टीचा विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गोष्ट एका रूपयाची* तसे तर एक रूपयाला आज तेवढी किंमत नाही. अगदी 20 - 25 वर्षापूर्वीची जर बाब विचारात घेतली तर लक्षात येईल की, एक रूपया किती महत्वाचे आहे ? त्या काळी 5 पैश्याला सुद्धा वस्तु मिळत होती आणि खिशात एक रूपया आहे म्हणजे खुप बरे वाटायाचे.........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/KCVxxKZocXo आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                       *थेऊर* अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातीलपेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांचीसमाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर,तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.) *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *"जे लोक नेहमी फुले वाटतात,* *त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत राहतो.*      सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  रेडिओचा शोध कोणी लावला?* 👉🏼      मार्कोनी *२)  गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?* 👉🏼        न्यूटन *३)  सापेक्षतावादाचा शोध कोणी लावला?* 👉🏼       आइनस्टाइन *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 योगिता सुरेश येवतीकर       गणेश नगर, नांदेड 👤 रविंद्र केंचे 👤 शिवराज पाटील चोळाखेकर, धर्माबाद 👤 ईश्वर शेठीये *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     "लबाड " डोळे झाकुन लहान मोठे बुवा बाबांच्या चरणीआहेत        विचार करवत नाही असल्या यांच्या करणी आहेत गरजच काय मग जायची यांच्या चरणाला नतमस्तक कसे होतात लबाडांच्या धोरणाला    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ?  बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!* *कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?* *" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "*         •••●💥‼ *रामकृष्णहरी*  ‼💥●•••                🚩🚩🚩🚩🚩🚩        *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जी माणसे कितीही कामे आपल्यासमोर असली आणि कोणत्याही कामात गुंतलेली असली तरी ती काम करत असताना किंवा रिकाम्या वेळी आपल्या मुखातून एखाद्या परमेश्वराचे नाम, एखादे आवडते गाणे किंवा काहीतरी गुणगुणत काम करत असतात.अशी माणसे नेहमी हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणारीच असतात.ते कधीही कितीही कामाचा व्याप असला किंवा कितीही अवघड असले तरी ते सहज त्यातून मार्ग काढत आपले सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा त्यांचा स्वभाव झालेला असतो. आपण जर त्यांच्या सहवासात राहून त्यांच्यासारखे  जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याही जीवनाला सहज जीवन जगण्याचा मार्ग सापडेल हे निश्चित. 🌴🌷🌴🌷🌴🌷🌴🌷🌴🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गणपती बाप्पा* बाप्पाला पाहताक्षणी मनाचा लागतो शोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद त्याच्या येण्याची उत्सुकता मला लागते वर्षभर तो आला वाजत गाजत की उत्साह पसरतो घरभर तयारी चाले आगमनाची मग काम करी दिवसभर त्याच्याकडे पाहून माझा संपतो सगळा क्रोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद अकरा दिवस चाले त्याची पूजा आराधना रोज वेगळा कार्यक्रम रोज आगळा सामना बाप्पा खुश व्हावा म्हणून आम्ही सारे करतो साधना उत्सवातील सेवा करून कमी होतो सर्वांचा रोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद - नागोराव सा. येवतीकर   प्राथमिक शिक्षक मु. येवती ता. धर्माबाद   9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                  *प्रामाणिकपणा* एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.'' *तात्‍पर्य :-* लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांना येतो.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. 💥 जन्म :- १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *जुलै महिन्यात 92 हजार 283 कोटींचा जीएसटी महसूल जमा झाल्याची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पातून 945 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग, प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले.* ----------------------------------------------------- 4⃣ *परभणी : सेलू तालुक्यातील पिंपरी गोंडगे येथील जि.प.शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी पालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनासमोर भरवली शाळा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पाटणा - बेहिशेबी संपत्ती प्रकरणी आयकर विभागाकडून आरजेडी नेता तेजस्वी यादवची चौकशी, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही चौकशी केली जात आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : इयत्ता 10च्या पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर. राज्याचा निकाल 24.44 टक्के.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक, बैठकीनंतर राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता - सूत्र.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" लिहिण्याला पर्याय नाही "* https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lihinyala-pryay-nahi वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सिद्धटेकचा सिद्धिविनायक* सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळीमखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतात. (हल्ली पूल झाला आहे, असे समजते.)           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो ; पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता?* 👉🏼 शुक्र *२) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?* 👉🏼 गुरू *३) हॅले हा धुमकेतू किती वर्षानी दिसतो?* 👉🏼 ७६ वर्षानी *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 नागभूषण माकोड, येवती 👤 अरुण चव्हाण 👤 गणेश बोळसेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "निसर्ग " आपत्ती व्यवस्थापनाचे नियम घोकलेले आहेत तरीही निसर्गाच्या पुढे मानवाने हात टेकलेले आहेत निसर्गाच्या पुढे मानवाचा निभाव लागत नाही निसर्ग कसा चांगला वागेल माणूस चांगला वागत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* ••●🔰‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही. केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल. म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌹शाळा 🌹 ------------------ स्वच्छ सुंदर शाळा माझी छान, आम्हा ती जपते तिचा आम्हा अभिमान. शिस्तीचे आम्हा मिळती हो धडे, रोज देती हो आम्हा शिकण्यास पाढे. क,ख,ग,घ अक्षर गिरवितो, हूशार होऊन मान मिरवितो. शाळेत आमच्या मिळते सर्व, म्हणूनच तिचा आहे आम्हा गर्व. घेती तिथे खेळ गोष्टी आणि गाणे, शाळेत आम्ही जातो अति आनंदाने... आनंद यडपलवार,जारीकोटकर प्राथमिक शिक्षक, प्रा. शा. पांगरी ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विद्या विनयेन शोभते* राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही. *तात्‍पर्य :-* आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ स्वभाषा दिन - मोल्दोव्हा. स्वातंत्र्य दिन - त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान. 💥 ठळक घडामोडी :-  १९९१ - किर्गिझस्तानला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. १९९७ - पॅरिसमध्ये अपघातात राजकुमारी डायना व तिचा मित्र डोडी फयेद ठार. 💥 जन्म :- १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८६ - उर्हो केक्कोनेन फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष. १९९५ -बियंत सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *अमेरिका - पेंटागनच्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये 11,000 अमेरिकी सैनिक आहेत.* ----------------------------------------------------- 2⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणाची पाणीपातळी 70 टक्क्यांच्या वर, मोठ्या प्रमाणात आवक सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ, लाभ क्षेत्रांना मोठा दिलासा* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - जे काळ्या पैशाविरोधात लढले नाहीत अशी मंडळी नोटाबंदीवरुन भ्रम निर्माण करत आहेत: अरुण जेटली, अर्थमंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्या - खासदार विकास महात्मे यांची मागणी.* ----------------------------------------------------- 5⃣ *स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर, खा. राजू शेट्टी यांची कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *बिहारमध्ये आतापर्यंत पावसामुळे आलेल्या पुरात 103 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत आणि श्रीलंका यांच्यात चौथा एकदिवसीय सामना, महेंद्रसिंग धोनीचा तीनशेवा सामना* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा *" रक्तदान सर्वश्रेष्ठ दान "* https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sarvshresth-dan अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि मित्रांसोबत शेयर करा वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रांजणगाव* अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीलामहागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूरतालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :-त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुरस्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;* *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* *कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!!!!!!!!!!!* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारताचा पहिला उपग्रह कोणता?* 👉🏼 आर्यभट्ट *२) तो कधी सोडण्यात आला?* 👉🏼 १९ एप्रिल १९७५ *३) भारतात उपग्रह कोणत्या संस्थेमार्फत सोडले जातात?* 👉🏼 इस्रो (ISRO) *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 रत्नाकर पाटील कदम, अध्यक्ष व्यापारी असोशिएशन, धर्माबाद 👤 सचिन वाघ, प्राथमिक शिक्षक 👤 सुभाष जाधव 👤 अशोक जायवाड 👤 संतोष पाटील साखरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "प्रगल्भ व्हा " कोणतीही जबाबदारी सहज टाळत असतात श्रेय घ्यायला मात्र पुढे पळत असतात श्रेय घ्यावं वाटतं तशी जबाबदारी घ्या सर्वांना सारं कळतं थोडे प्रगल्भ व्हा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येक व्यक्तिची एक स्वतंत्र ओळख असते. त्याची स्वत:ची एक प्रकृती असते. त्याचं अवतीभवतीचे वातावरण वेगळे असते. त्याची आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमी निराळी असते. त्याच्यावर झालेले संस्कार भिन्न असतात. एकाच पर्यावरणात राहिलेले व एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला आलेली भावंडसुद्धा सारख्या विचारांची नसतात.* *कारण प्रत्येक व्यक्तिचं भावविश्व वेगळं असतं. त्याची भावनिक व मानसिक गरज भिन्न असते. अंगभूत संवेदनशिलताही वेगळी असते. एखादा प्रसंग बघितला अथवा घडलेला असला तर त्यावरील प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो.* ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तुमच्या अवतीभोवती असणारी माणसे थोडं ओळखायला शिका म्हणजे तुम्हाला तुमची खरी माणसं कोण आहेत ते समजेल. तुम्हाला कामापुरती गोड बोलणारी,तुमच्यासमोर तुमची स्तुती करणारी, तुमच्यासमोर एक आणि तुमच्या माघारी एक बोलणारी,काम असेल तरच तुमच्याशी मैत्री करणारी, संकटाच्या वेळी आपल्यापासून दूर जाणारी आणि काय होते नि कसे होते असा विचार करणारी आणि ऐनवेळी धोका देणारी अशी माणसे यांच्यापासून थोडे दूर राहायला शिका म्हणजे आपण सुव्यवस्थित पणे राहून सुखाने आणि समाधानाने जीवन जगू शकू अन्यथा अशा व्यक्तींपासून पश्चातापाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही.अशी माणसे लवकरच ओळखायला शिकली पाहिजे आणि अशा माणसापासून नेहमी सावध रहायला शिकले पाहिजे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..9421839590. 🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌼 प्रथम प्रार्थिते प्रथमेशा 🌼 तुझिया चरणी सार्या अमुच्या आशा आकांशा अन् अभिलाषा मनी कोठली जागो मनिषा दिशा दाविसी तू अधिईशा ।।धृ।। अधरी तूच वदविली माझ्या बालसुलभ ही बोली भाषा त्यातून उद्भविला पसारा 'बालगीतोत्सव' सुंदर खाशा।।१।। प्रारंभ गीताने तुझ्याच ईशा प्रथमईशा हे प्रथमेशा प्रारंभ हेतू मंगल व्हावा प्रार्थिते तुज मंगलस्नुषा ।।२।। ----सौ.मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 [माझ्या 'बालगीतोत्सव' [२००६] ह्या कविता संग्रहाचा प्रारंभ मी ह्या प्रार्थनेने केला होता.] ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *समर्पण* एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. १९७९ - पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक. १९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :-  १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु. १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली - माजी आयएएस अधिकारी सुनिल अरोरा यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत २३ ठार, १५ जखमी, ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भिती* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची केंद्र सरकारच्या संरक्षण निर्मिती विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 4⃣ *इस्त्रोने रिजनल नेव्हिगेशन सॅटलाइट IRNSS-1 चे प्रेक्षपण अयशस्वी.* ----------------------------------------------------- 5⃣ *पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली - केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी आणि उमा भारती यांचा मंत्रिपदाचा राजीनामा.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत विरुद्ध श्रीलंका चौथा एकदिवसीय सामना - विराट कोहलीचं शानदार शतक, फक्त 76 चेंडूत ठोकलं दणदणीत शतक, भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा " मला माणूस व्हावेसे वाटते. " https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/mala-manus-vhavese-vatte वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ओझर* अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यातमाणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्यातीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेलाशिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ विश्वास असेल तर न बोलता ही सारे काही समजून घेता येते.. आणि विश्वास च नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. - रामदास पेंडकर ( तानूरकर ) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *1) नेपाळ ची राजधानी कोणती ?* 👉🏻 काठमांडू *2) खारी साठी चे ग्रिझल्ड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?* 👉🏻 तामिळनाडु *3) गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे ?* 👉🏻 रत्नागिरी *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 विजय भगत, सहशिक्षक 👤 गणेश गिरी, धर्माबाद 👤 नवनाथ पिसे 👤 रामेश्वर चिंतलवार, धर्माबाद 👤 सुनीता गायकवाड 👤 धनराज पाटील बाभळीकर 👤 नवनाथ कौठगावे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " निकाल " नको त्या गोष्टीसाठी चाल ढकल करतात हास्यास्पद वाटेल अशी उकल करतात ज्याची नाही त्याची चाल ढकल नसावी कशाची करावी कशाची नाही अक्कल असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही.केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल.म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शब्दांनीच शिकवलय* *पडता पडता सावरायला,* *शब्दांनीच शिकवलय* *रडता रडता हसायला,* *शब्दांमुळेच होतो* *एखाद्याचा घात आणि* *शब्दांमुळेच मिळते* *एखाद्याची आयुष्यभर साथ* *शब्दांमुळेच जुळतात* *मनामनाच्या तारा आणि* *शब्दांमुळेच चढतो* *एखाद्याचा पारा...* *शब्दच जपून ठेवतात* *त्या गोड आठवणी आणि* *शब्दांमुळेच तरळते* *कधीतरी डोळ्यांत पाणी…* *"म्हणूनच जो जीभ जिंकेल* *तो मन जिंकेल आणि जो* *मन जिंकेल तो जग जिकेल"....!!* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *काका कालेलकर* काका कालेलकर उच्‍च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्‍यांची विचारक्षमता प्रत्‍येक विषयात खोल आणि व्‍यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्‍यांच्‍या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्‍यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्‍मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्‍यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्‍यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्‍याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्‍याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्‍हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्‍हापासून मी नव्‍याने तपासणी केली आहे तेव्‍हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्‍या तपासणीविषयी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा काका म्‍हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्‍हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्‍यामुळे जास्‍त दिवस मुक्काम करतो तेच त्‍याच्‍याशी उलटपक्षी वागले असता म्‍हणजेच घरातल्‍यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्‍यास तो अशा घराचा रस्‍ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्‍य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’काकांच्‍या नव्‍या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले. *तात्‍पर्य :-* आजारापेक्षा जास्‍त त्‍याची चिंता तणाव वाढवते. त्‍यामुळे कोणत्‍याही शारीरिक अस्‍वस्‍थतेला सकारात्‍मक विचाराने घेण्‍याचा प्रयत्‍न करा.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

*🌹शिक्षण परिषद* *(केंद्र कन्या हदगाव)*🌹 *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ आज *दि.०१-०९-२०१७* रोजी केंद्राअंतर्गत शिक्षण परिषद जि.प.प्रा.शा.कन्या हदगाव , हदगाव तांडा, नवी आबादी हदगाव ह्या तिन शाळेची मिळून हायस्कुल येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. सदरील शिक्षण परिषदेस प.स. शिक्षण सभापती मा.सौ.दवणेताईसाहेब व त्यांचे पती तसेच उपसभापती मा.कदम साहेब ,प.स. चे मा.ग.शि.अ.ससाने साहेब तसेच केंद्रांतर्गत अधिकारीगण, सर्व शाळेचे मा.मु.अ. तथा शिक्षकवृंद. 👉 केंद्रीय मु.अ.मा.श्री खेडकर सर यांच्या आयोजना अंतर्गत स्वागत समांरभ सोहळा पार पडला. 👉 सेवानिवृत्त दांम्पत्य आदरणीय केंप्र.श्री सोनुले साहेब व त्यांच्या सौ.सोनुले ताई यांच्या सेवेचा कार्यकाल पूर्ण झालेला असल्यामुळे त्यांनी शाळेला १०,००० (दहा हजार) रुपयाचे 📚📚📚📚📚📚 पुस्तकरुपी ग्रंथदान दिले.त्यांच्या ह्या अभिनंदनीय कार्यास आमच्या केंद्रामार्फत लाखमोलाचा सलाम.🙏🏻👏🏻👏🏻🌹🌹 *दुपार सञ* 👉 आजच्या ह्या शिक्षण परिषदेत आदर्श व्यक्तीमत्व असलेले आमचे सहकारी श्री ए.टी.जाधव सर प्रा.शा.(तांडा) हदगाव येथील यांचा आदर्श पाठ घेण्यात आला.ह्या आदर्श पाठात आदरणीय सरांनी सर्व विषयावर कृतीयुक्त शैक्षणिक साहित्याचा भरपूर वापर करून आदर्श पाठ , सांकेतिक भाषा व शाळेचा उपक्रमाचा video पण दाखविला. 📚📚 👉 त्यानंतर केंद्रातंर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण (आढावा) करण्यात आले. 👉जि.प.प्रा.शाळा वाटेगाव येथील श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ह्यांनी आपल्या शाळेतील विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहितीचे सादरीकरण केले. (सोबतच शाळेचा उपक्रमाचा video सहीत) 👉 त्यानंतर स्वादिष्ट अशा भोजनाने सर्वजण तृप्त झाले.आजची ही शिक्षण परिषद अशा आनंददायी वातावरणात पार पडली. *काही क्षणचिञे* 👇👇👇👇 *〰〰〰〰〰〰〰* *✍वृत्तांकन लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ बाथ क्रांती दिन - इराक. लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको. संविधान दिन - दक्षिण कोरिया. 💥 घडामोडी १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. २००४ - भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार. 💥 जन्म :- १९२० - हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष. १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राष्ट्रपती पदासाठी आज होणार मतदान, कोण निवडून येणार जनतेमध्ये उत्सुकता* ----------------------------------------------------- 2⃣ *नाशिक : मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर धरणांमधून मोठा विसर्ग* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक - ओरटीओत दलालांकडून पैसे जातही असतील, मात्र यासाठी नागरीक जबाबदार - दिवकर रावते, परिवाहन मंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली, जम्मूच्या बनिहाल येथे झाला अपघात* ----------------------------------------------------- 5⃣ *आयआयएफए अवॉर्ड 2017, सोनम कपूर आणि शबाना आझमी स्टारर नीरजाला मिळाला बेस्ट फिल्म अवॉर्ड* ----------------------------------------------------- 6⃣ *विम्बल्डन : रॉजर फेडरर बनला विम्बल्डन चॅम्पियन, विक्रमी आठव्यांदा घालती विजेतेपदाला गवसणी* ----------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली- ऑनलाईन बेटिंगला अधिकृत करण्याचा कोणताही विचार नाही, मी त्याच्या विरोधात असलो तरी अंतिम निर्णय सरकार घेईल- विजय गोयल, क्रीडा मंत्री* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 __ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ _विशेष बातमी :- जागतिक सर्पदिनानिमित्त हेल्पिंग हैंड्स वाइल्डलाइफ वेलफेयर सोसाइटी नांदेड व जिल्हा परिषद शैक्षणिक संकुल जारीकोट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबादच्या जिल्हा परिषद हायस्कूल च्या सभागृहात आयोजित सापांची ओळख आणि माहिती प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद_ __ *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कश्यासाठी ? मुलांच्या शिक्षणासाठी ...!* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/T7ttYqmUVSw पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   *जे शिक्षक विद्यार्थ्याना शिकविण्यापेक्षा अभ्यास करण्याची प्रेरणा देतात तेच खरे आदर्श शिक्षक होत.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) जगातील सर्वात लांब नदी कोणती?* 👉🏼 नाईल नदी *२) ही नदी कोणत्या देशात आहे?* 👉🏼 इजिप्त *३) या नदीची लांबी किती आहे?* 👉🏼 ६,६५० कि. मी. *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 माधव गैनवार, चिकना 👤 दिगांबर कदम, नांदेड 👤 आरिफा शेख, पुणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " देवपण " घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही कष्टा शिवाय कधीच कोणी मोठ होत नाही जे कष्ट करतात त्यांनाच मिळते यश देत बसतील बाकीचे आपल्या नशिबाला दोष शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.* *प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.* ••●🌟‼ *रामकृष्णहरी* ‼🌟●•• ☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल - 9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..८०८७९१७०६३/९४२१८३९५९० 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संशय* हा आपल्या जीवनाच्या वाटेवरील शञू आहे.खरं पाहता माणूस स्वतःच स्वतःचा मिञ असतो आणि शञू असतो ! संशयग्रस्त *मन* तात्काळ अनिष्ट विचारांनी व्यापल जातं.संशय आणि *भीतीमुळं* माणसाचं मन अस्वस्थ होतं.अशावेळी आपलं मन शांत , स्थिर , स्वस्थ आणि विचारी बनवल की घडणार अनिष्ट कृत्य टाळता येतं. आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवून आपलं मन द्वेषमुक्त व संशय विरहीत करावं.आणि जर का आपण असे नाही केले आणि आपल्या मनात संशयाचं वारं भिनू लागलं की आपण आपल्या सुखाला आणि आनंदाला पारखे होतो. आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होत असला तरी त्याचे रुपांतर संशयात झाले तर ती व्यक्ती जीवनात स्वतः तर सुखी राहूच शकत नाही.परंतु तिला दुसऱ्याचे सुख आनंद हे सुद्धा नकोसे वाटते.कारण गैरसमजुतीचा एक क्षणदेखील माणसाचे जीवन उध्वस्त करु शकतो. अशावेळीआपण आपल्या मनातील संशय काढून टाकण्यासाठी कराव तरी काय? मोकळ्या हवेत फिरायला जावं, सदा मन प्रसन्न , आनंदी, उत्साही ठेवावे , कलेची जोपासना करावी हसत -खेळत वागावे, होईल तितके चांगली कर्म करावे आणि दुसरे जर चांगले कामे करीत असेल तर त्यांच्याबद्दल सहकारी वृत्ती बाळगावी. *एवढं केल्यावर आपल्यातला द्वेष , संशय आपल्याला भिऊन मनातून पळून जाईल आणि आपल्याला आनंद घेता येईल आणि देताही येईल.* *जीवन जगण्यासाठी आणि आपल्या जीवनात आनंद मिळविण्यासाठी गैरसमज न होऊ देता समजपूर्वक वागणे हेच योग्य आहे*. 〰〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 *✍शब्दांकन /संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 *〰〰〰〰〰〰〰* *माणसाचे जीवन हे विद्येवाचून निरर्थक आहे.* विद्येसारखी शोभा देणारी ,दुसरी कोणतीच वस्तू नसते. *विद्या* ही माणसाचे आईप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे कल्याणाची काळजी घेते,व कौटुंबिक उदासिनता घालवते.आणि आपली कीर्ती दशदिशांमध्ये उजळविते.म्हणूनच विद्या ही जणू आपली कल्पकता आहे असे म्हटले आहे. विद्येविना मनुष्य पशूच असतो. विद्यारूपी धन हे सर्व धनापेक्षा अधिक मौलिक आहे.आपल्या जीवनात ह्या रत्नरूपी विद्येचे महत्त्व किती महत्वपूर्ण आहे हे ह्या श्लोकांवरून अधिक कळून येते. "किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिनःl अकुलीनोsपि विद्यावान देवैरपि स पूज्यते l l" *विद्याहीन माणसाच्या थोर कुलाचा काय उपयोग? विद्वान मनुष्य कुलीन नसला तरी त्याची देवदेखील पूजा करतात.* आपल्या सुखी जीवनाची पायरी आहे विद्या.ज्ञानमुळं का जगावं आणि कस जगावं हे कळत.आणि असं जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कस असावं हा प्रश्न ??कधीच पडत नाही.ज्ञानाचा हा प्रकाश सर्वांमध्ये सर्वोतपरी सततचा असावा आणि पसरावा. 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 *✍शब्दांकन/संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड

घोषवाक्ये प्रभातफैरी

प्रभातफेरीसाठी घोषवाक्ये

: एक दोन तीन चार
मुला-मुलींना शिकवू छान
[
: मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान
[
: एक दोन तीन चार
 जि.प.शाळा छान छान
[
‬: चला चला शाळा झाली सुरू,
नका नका घरी आता राहू.
[
 सुंदर छान माझी शाळा.             गावाचा अभिमान माझी शाळा.🙏🏻🙏🏻
[
‬: चला जाऊ शाळेला
नव्या गोष्टी ऐकायला
[
 जि.प.शाळेची मुले न्यारी
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई
[
छान छान छान किती छान
नव्या पिढीचा मी अभिमान
[
 लहान मुले देवाघरची फुले अशीच माझ्या शाळेतील बाळे
[
‬: मला जायचंय शाळेला
नवं काहीतरी शोधायला
[
 लहान मुलांना लावी लळा
जि.प.ची मराठी शाळा  ।।
[
‬: एक दोन तिन चार
मराठी शाळेची मुले हुशार।।
[
 सब पढ़े सब बढे
अज्ञान से हम लडे
[
शाळा माझी सजली रे सजली रे,                                   मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे.
[
: करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा.     मुलगा असो की मुलगी  शाळेत नाव टाका.
[
: जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी ।
[
: आई आई मला आता शिकू दे,    सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे.
[
चला शिकू या,पुढे जावू या
जिल्हा परिषद शाळेत,प्रवेश घेऊ या

गीत

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
.......... *मोगरा फुलला*...........
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

मोगरा फुलला
हिरव्या हिरव्या पालवीला
मोगरा फुलला
सामाजिक न्याय दिनाला
सुगंध दरवळला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
सफेद रंग त्याला
मैत्रीचे प्रतिक दावुनी
समतेचा संदेश दिला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
सांगतो समाजाला
समान वागा सर्वांशी
द्या तडा भेदभावाला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
सुंदर फुले पालवीला
विभोर मन होई
पाहुनी त्याला
माळते गजरा केसाला
गं बाई बाई
मोगरा फुलला

मोगरा फुलला
बाई माझ्या अंगणी गं
फुले फुलली रोपट्याला
परिसर सारा गंधीत होवुन
सुगंध देई घराला
गं बाई बाई
मोगरा फुलला
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
✍ संकलित

पंढरीगाथा

*होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी॥*

वार म्हणजे दिवस, प्रत्येक दिवस जो वारी करतो तो वारकरी.

वारी कुठली? तर *पाहे पाहे रे पंढरी...*

पंढरीला पहाणे हीच खरी वारी व जो दररोज पंढरीला पहातो तो खरा वारकरी.

*शुद्ध परमार्थ केवळ पहाण्यात आहे हे वर्म उमजले नाही तर सर्व परमार्थ पाण्यात.*
                -  सदगुरु श्री वामनराव पै

*पंढरीला पहायचे कसे हे जे शिकवितात ते खरे सदगुरु...*

संत सांगतात,
*काया ही पंढरी। आत्मा हा विठ्ठल।*
*नांदतो केवळ। पांडुरंग।।*

*देह ही पंढरी। प्रेम पुंडलिक।*
स्वभाव सन्मुख। चंद्रभागा।
विवेकाची वीट। *आत्मा पंढरीराव।।*

शरीररुपी पंढरीत, प्रेम हे पुंडलिक असून स्वभावरुपी वाहणा-या चंद्रभागेत विवेकाच्या विटेवर आत्मरुपी विठ्ठल उभा आहे.

*अनंत रुपे अनंत वेषे। देखिले त्याशी।*
बापरखुमा देवीवरु। खुण बाणली ऐशी।।

म्हणजेच घरात व विश्वात देहरुपाने असणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्राणीमात्र इ. सर्वांच्या रुपाने हा विठ्ठल प्रगट आहे.

म्हणूनच *सदगुरु श्री वामनराव पै* सांगतात,
*परमेश्वर*
*विश्व रुपाने समोर,*
*शरीर रुपाने जवळ,*
*सच्चिदानंद स्वरुपात हृदयात* आहे.

देवाला पहाण्याची वारी करता करता म्हणजेच देवाला पहाता पहाता पाहणं दूर सरतं व पाहणारा विठ्ठलच प्रगट होऊन आपणच देव होतो.

*देव पहाया गेलो। तेथे देवची होऊन ठेलो।।*

*तुका म्हणे धन्य झालो। आजि विठ्ठला भेटलो।।*

म्हणूनच संत म्हणतात,
*होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।*

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

🙏🏾

कथा क्रमांक २०३

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग २०३*
〰〰〰〰〰〰〰
*🌺 थोड जगुया समाजासाठी*🌺〰〰〰〰〰〰〰
तीन वाटसरू एका धर्मशाळेत एका रात्रीसाठी एकत्र आले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं. तिघांनाही भूक लागलेली असते. मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं.

पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो. गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात.

थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो !!! तिघांनाही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपायला लागतं.

तात्पर्यः

आपण वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता,
ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं त्यांनी आपला हा भ्रम दूर सारून आपलीही मदत समाजात कशी उपयोगी येईल त्यानुसार समाजाच्या उपयोगी येण्याचा प्रयत्न करावा.
*-----------------------------------*
*📝 संकलन*

कथा क्रमांक २०२

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग २०२.*
〰〰〰〰〰〰〰
       *🌺श्रमाचे महत्त्व*🌺
〰〰〰〰〰〰〰
"धनासेठचा मुलगा  खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे असे दे हरी पलंगावरी किती दिवस चालणार कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.

दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.'

मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.

दुसर्‍या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.

तिसर्‍या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.

स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा प्रवासी माणूस  दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'.

ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?'

शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.

दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.'

तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.श्रमाचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतः कमवतो. "
*-----------------------------------*
*📝 संकलन*

कथा क्रमांक २०१

गुरू  चे माहात्म्य
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला   विचारले, "गुरुची कृपा किती होऊ शकते?" तो माणूस 🙁त्या वेळी एक सफरचंद 🍎खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, "सांगा पाहू यांत किती बिया असतील?"
सफरचंद 🍎कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, "यात तीन बिया आहेत"
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, "या एका बियेमध्ये किती सफरचंदे🍎🍎 असतील असे तुला वाटते?"
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो,एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार. अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या?. मी चक्रावलोच.
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, " अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते. आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे."

गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
गुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.
गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.
गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.
गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.
गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
गुरु म्हणजे केवळ अमृतच. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.
गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
गुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छाउरत नाही.

कथा क्रमांक २००

बोधकथा
*खरे स्वरूप*
फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी ओले केस सुकवण्यासाठी  राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान हार काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो गळ्यातील हार   म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो हार घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.'' राजा म्‍हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्‍याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्‍या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्‍या हाराचा शोध घ्‍या. जो कोणी तो हार आणून देईल त्‍याला आपण अर्धे राज्‍य बक्षीस म्‍हणून देऊ अशी घोषणाही त्‍याने त्‍यावेळी केली. अर्धे राज्‍य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्‍याच्‍या नाल्‍यामध्‍ये त्‍याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्‍या पाण्‍यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्‍य बक्षीसाच्‍या आशेने एका सैनिकाने त्‍या पाण्‍यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्‍याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्‍या मनातही लोभ निर्माण झाला. त्‍यानेही अर्धे राज्‍य मिळविण्‍यासाठी त्‍या नाल्‍यात उडी मारली. पण हार पुन्‍हा गायब झाला. त्‍या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्‍या आशेने त्‍या घाण पाण्‍यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्‍याच हातात येत नव्‍हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्‍य प्रधानजी यांनाही अर्ध्‍या राज्‍याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्‍हा कोणी उडी मारे तेव्‍हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्‍य त्‍या पाण्‍याच्‍या वास सहन न झाल्‍याने पटकन पाण्‍यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्‍हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्‍य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारून हार शोधण्‍यासाठी प्रयत्‍न केले हे राजाच्‍या कानावर गेले व त्‍याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्‍य गमवावे लागेल. त्‍यासाठी राजाही तेथे आला व त्‍याने आपली राजवस्‍त्रे उतरवली आणि त्‍यानेही त्‍या नाल्‍यात उडी मारली. त्‍याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्‍यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्‍या घाणेरड्या पाण्‍यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्‍यात पडला आहे म्‍हणून सर्वजण पाण्‍यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्‍याना विचारले काय झाले? संत त्‍यावर म्‍हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्‍ही ज्‍या हाराकडे पाहून पाण्‍यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्‍यात दिसते आहे ते त्‍याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्‍ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्‍यात शोधत आहात.'' लोकांच्‍या लक्षात खरा प्रकार आल्‍यावर लोक शरमिंदा झाले.

तात्पर्य :- मानवी जीवनाची   पण आज त्‍या लोकांप्रमाणेच अवस्‍था झाली आहे. जे आपल्‍याला पाहिजे आहे त्‍याच्‍या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्‍वास्‍थ्‍य हे शोधण्‍यापेक्षा आपण त्‍याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्‍यापेक्षा आपण कितीतरी गोष्‍टी गमावित आहोत.

कथा क्रमांक १९९

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷* http://www.pramilasenkude.blogspot.in
*📚अभ्यास कथा भाग १९९*
〰〰〰〰〰〰〰
*🌺भविष्यातील यशस्वीता*🌺
〰〰〰〰〰〰〰
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा ? दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होऊ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहयला हवे !.
*-----------------------------------*
*📝 संकलन*

जीवन विचार




*""नशीब""आकाशातून पडत नाही.*
*किंवा "जमिनीतून""उगवत"नाही.*
*"नशीब"आपोआप "निर्माण"होत नाही.*
*तर, केवळ "माणूसच" प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च "घडवत" असतो....*
*नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका.*
*कारण "आपण" जे "करू" त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा....*



जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁जीवन विचार 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आजच्या जगात जी विषमता दिसते , दुःखे , पापे दिसतात ती कां ?
त्याचे कारण हे आहे की मणुष्याने श्रमाचे स्थान पैशाला दिले आहे. पैशामुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातूनच तंटे निर्माण झाले.
प्रसिद्ध रशियन लेखक टाँल्स्टाय लिहितो ,  " जोवर नाणी चालत राहतील , तोवर जगात शांतता असणार नाही."
श्री शंकराचार्य म्हणतात ,  'अर्थमनर्थ भावय नित्यम्.'
अर्थाला म्हणजे पैशाला अनर्थ माना.हे तंटे नाहीसे करावयाचे असतील , तर भूक लागते त्या प्रत्येकाने शरीरश्रमाचे व्रत घेतले पाहिजे.कर्म केल्याशिवाय उत्पादन होत नाही आणि जीवनही चालत नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे.

      कर्म न करता जे चिंतन होते ते माणसाला योग्य मार्गाला लावत नाही , अयोग्य मार्गाला लावते,  विकासा ऐवजी विनाशाकडे घेऊन जाते. 'Empty mind devil's  workshop '  अशी म्हणच आहे.
श्रमाने बुद्धी अधीक सात्त्विक व तेजस्वी होते.
दुसऱ्याचे शोषण न करता आपल्या स्वतःच्या श्रमाने मिळवलेले खाद्यच शुद्ध , पवित्र आहार होय. तोच मानवाच्या नैतिक , आत्मिक उन्नतीला पोषक असतो.
〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✍  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
प्रकाश आणि अंधार ही सृष्टीची दोन रुपे आहे.अगदी परस्परविरोधी गुणधर्माने त्यांनी सर्व सृष्टीचा चराचराला व्यापले आहे आणि अशा युगायुगाचा काळ्यापांढर्या वाटेचा माणूस प्रवाशी आहे.युग संपतात पण अंधार उजेडाचा प्रवास माञ चालूच राहतो.एक पिढी दुसऱ्या पिढीला मार्ग मोकळा करून देते.खरे तर माणसाच्या यशपयशाची , सुखदुःखाची ही प्रतीके मानवी कर्तृत्वाला गती निर्माण व्हावी यासाठीच त्यांची निर्मिती झाली असेल.काहीजरी असले तरी माणसाची तेजस्वी बुद्धी आणि मनगट कधीच खचता कामा नये प्रयत्नांच्या काटेरी वाटा बिनधास्तपणे ओलांडून आपल्या आयुष्यातील ध्येय गाठायची असतात.

*तेची म्हणावे दीप जे*
*वादळातही टिकतात*
*अंधाराशी लढा देत*
*जळत राहणे शिकतात.*

जे प्रतिकुलतेवर मात करून आकाशाकडे भरारी घेतील तेच टिकतील.जे संकटाला घाबरून वादळाला भिऊन दरीतील अंधाराला पाहून जागीच  बसतील ते संपले.
आव्हानाचा वादळांना जे स्वीकारतील त्यांचीच स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

आरोग्य म्हणी संकलित

*आरोग्य म्हणी*

१.
खाल दररोज गाजर-मुळे,
तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२.
सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.

३.
डाळी भाजीचे करावे सूप,
अखंड राहील सुंदर रूप.

४.
तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५.
जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटातील वाजंत्री

६.
पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड.

७.
पालेभाज्या घ्या मुखी;
आरोग्य ठेवा सदा सुखी.

८.
भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
आरोग्य धोक्यात आणू नका.

९.
रोज एक फळ खाऊ या;
आरोग्याचे संवर्धन करू या.

१०.
भोजनोत्तर फळांचा ग्रास;
थांबवेल आरोग्याचा ऱ्हास.

११.
प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार;
आहारात यांचे  महत्व फार.

१२.
हिरवा भाजीपाला खावा रोज;
राहील निरोगी आरोग्याची मौज.

१३.
जेवणानंतर केळी खा;
पचनशक्तीला वाव द्या.

१४.
साखर व तूप यांचे अति सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.

१५.
खावी रोज रसरशीत फळे;
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.

१६.
गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

१७.
पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८.
सुका मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.

१९.
भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.

२०.
जो घेईल सकस आहार,
दूर पळतील सारे आजार.

२१.
भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्तात मिळेल भरपूर सत्व.

२२.
शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,
तिचा पाला तिच अंगं, सत्व आहे तिच्या संगं.

२३.
कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबीवाणी.

🌿🌱🍏🍎🍐🍊🍋🍌🍉🍇🍓🍈🍒🍑🍍🍅🍆🌶🌽🌿

पाऊस कविता संकलित

पाऊस

पाऊस तसा पहिला
अवचितच येतो
हवाहवशा मृदगंधाने
आसमंत दरवळतो

पाऊस तुझा माझा
जेव्हा असा बरसतो
कगदाच्या होडिवर
अजून जीव लोभतो

पाऊस जेव्हा केव्हा
मुसळधार कोसळतो
तुझ्या आठवणींचा घन
माझ्या मनी बरसतो

पाऊस गर्द रात्री
मनसोक्त बरसतो
विजांचा कडकडाट
माझ्याच मनात चालतो

मनामनाचा कोपरा
पाऊस जातो उजळून
इंद्रधनुचे रंग
आभाळभर उधळून

पाऊस जातो जिवाला
उगाच हुरहूर लावून
आभाळाच रितेपण
रहातं मन व्यापून

     संकलित 

कविता संकलित

. . .  जगण्यातच शान आहे . . .

जगून घे गड्या तू
जगण्यातच शान आहे
नसल्यावर तू जगी या
कोण तुला देणार मान आहे

फाटले जरी हे केवळ
जीवनाचे एकच पान आहे
अवघे आयुष्य थाटले समोर
जगण्यातच शान आहे

बघ त्या वठलेल्या वृक्षाला
पालवी पुन्हा फुटली आहे
तु तर मनुष्य का तुझी
आशा खुटली आहे

पाय रोव तू खंबीरतेने
ही केवळ लाट आहे
काळोख्या रात्रीनंतर उजाडणार
एक तेजोमय पहाट आहे

अभिनंदन ,कौतुक हा एक
केवळ आभास आहे
आई वडीलांच्या जीवनाचा
तू तर खरा श्वास आहे

शुन्यातून विश्व निर्मिले ज्यांनी
ती गाथा थोर आहे
सुरूवात ही जीवनाची
हीच का तुझी हार आहे

घे नव्याने पुन्हा भरारी आकाशी
माझी तुला आण आहे
जगून घे वेड्या जरा
जगण्यातच खरी शान आहे

✍ संकलित

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰〰*
कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अदभूत कार्य घडतात.आपल्या जीवनप्रवासात अनेकदा संधी येते.संधीची ही पाऊलवाट पकडून माणसाला आपल्या जीवनाचा राजमार्ग शोधता येतो फक्त त्यासाठी आपणास योग्य त्या संधीची निवड करून पुढं चालण्याच सामर्थ्य आपल्याला उमजलं पाहिजे.सर्वोत्तम माणूस तोच म्हटला पाहिजे जो आपल्या जीवनात आलेल्या योग्य संधीच सोनं करतो अशा योग्यमय संधीचा फायदा घेऊन आपलं जीवन यशस्वी करतो.
 *संधी* म्हणजे काळाच्या भुमीत कर्माचं बीज पेरणं होय. त्या बीजाचा वृक्ष होईल तेव्हा तो सर्वांना सावली आणि फळे देईल.
*संधी* आपल्याला नवं ज्ञान , नवी दिशा दाखविते.
*चालणाऱ्याला त्याचं नशीब भेटतं.थांबणार्याचं नशीबही थांबतं.*
*संधी* म्हणजे निराश माणसाला भेटलेली हिंमत होय.
म्हणून माणसाने कोणत्याही प्रसंगाला न डगमगता निराशावादी न राहता आलेल्या योग्य संधीचा फायदा करून घ्यावा व आपल्या जीवनात यशस्वी व्हावे.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन

कथा क्रमांक १९८

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १९८*
〰〰〰〰〰〰〰
*🌺जगात आईवडीलांचे प्रेम अनमोल*🌺
〰〰〰〰〰〰〰
मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला. म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.... मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला, "अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ? सकाळी फोन करता आला नसता का ?" शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला..
          काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला, तब्बल दोन तास बोलला. नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला, शेवटी तिनंच फोन कट केला..
            नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला. आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, "बाबा, सकाळी करायचा ना फोन ... आताच आईचा फोन येऊन गेला. तिने ..."            
        वडील म्हणाले, "मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की तुझी आई खरंच वेडी आहे, मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली. खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते, की तातडीनं ऑपरेशन करून मूल अॅबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल. पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती. तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची. रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा. संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता. त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत ! पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली. डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून ...
तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
    आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली त्याबद्दल तिला माफ कर. एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का .... फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता. असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला.
       मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता. सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला. आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली. वडील म्हणाले , "ती नेहमी म्हणायची, आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही. आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन." आई म्हणाली, "असू द्या हो .... माफ करा त्याला ...."
      आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं. तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते. तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.
*-----------------------------------*
*📝संकलन*

ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁जीवन विचार  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
आपलं जीवन अनमोल आहे.आपलं जीवन निर्भय, निष्काम, प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यातच खरं यश आहे.
जीवनात आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करण्यातच खरं मर्म आहे.
          यासाठी माणसांना सतसंगतीची गरज असते. माणसाला जर सतसंगती लाभली तर त्याला परोपकाराचा आणि सदवर्तनाचा धडा शिकवून जाते.दुसऱ्याशी प्रेमानं कसं वागावं हे शिकवते आपण निःस्वार्थी राहून कार्य कसं करावं हे सांगते. सुख-दुःखात आपण मनाचा समतोल कसा राखावा हे समजावते.

    सज्जनांच्या संगतीत एखादा दुर्जन मनुष्य आला तर सज्जन आपले सारे गुण त्याच्यावर बहाल करत असतो.चंदनाच्या झाडावर कु-हाड कोसळली तरी चंदन आपल्या सुंगधाने ती कु-हाड देखील सुगंधीत करून सोडत असतो.या विचाराच मर्म ओळखून माणसानं दुर्जनापासून दूर राहावं.

  🙏 समर्थ रामदासांनी म्हणूनच सांगितले की,
   
' घडीने घडी सार्थकाची करावी l सदा संगती सज्जनाची धरावी ll
====================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✍〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in

कविता संकलित

💥💥 सत्य आणि स्वप्न 💥💥

स्वप्न आणि सत्य
दोघे परं मित्र
भविष्य घडवण्यासाठी
सर्वात कोण समर्थ?

स्वप्न म्हणाला सत्याला
मी नसेल तर
अर्थच मुळी नसेल
तुझ्या जगण्याला

सत्य म्हणाला स्वप्नाला
का उगाच स्वप्नात जगतोस?
भ्रमाच्या जाळ्यात
का उगाच गुरफटतोस?

माझ्या अस्तित्वाचे मोल
तुला ठरवेल फोल
आत्मविश्वासाची धरावी कास
यश मिळेल हमखास


दोघांचेही झाले खूप भांडण
 देवाकडे गेले घेऊन प्रकरण
देव म्हणाले दोघांना
स्वप्न आणि सत्य   दोघांनी करावे प्रयत्न

 सत्याने केला प्रयत्न
जमिनीवर पाय टेकले
हात मात्र आकाशाला
ठेकेनासे झाले

मग केला स्वप्नाने प्रयत्न
आकाशाला हाथ टेकले
मनातून आनंदले
पाय मात्र जमिनीवर उंच उडाले

दोघांनाही चूक कळली
भविष्य घडवायचे असेल तर
स्वप्नांना सत्याच्या खांद्यावर बसवायला हवे
स्वप्न, आणि सत्याची साथच खरी असायला हवे

संकलित 

कविता संकलित

त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे .....
त्याच्यासाठी विरह र्‍हदयी
भरले अत्तर घडे ....

स्पर्श तयाचा पहिला होता
दरवळ वार्‍यावरी .....
पुलकीत होईल रोमरोम अन्
शहारा अंगावरी
थेंबथेंब तो पिऊन घेता
मन होईल वेडे ...
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

सृजनबीज ते बघ कधीचे
सुप्त निजले आहे
तु येण्याचा निरोप ऐकून
किती गजबजले आहे
मिलनाच्या कल्पनेनेचं
अंगी रोमांच होती खडे
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

तू यावे वेळेवर अन्
बरसावे मनमुराद
अतृप्त जीवाची ऐक ना रे
केविलवाणी साद
कुणाकडे मी यासाठी
घालू बरे साकडे ?
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

नैऋत्येतून म्हणे निघाला
मोसमी वार्‍यावरी
निरोप कळता हे मनही
कुठेयं थार्‍यावरी
मेघांच्या पालखीत बसूनी
ये आधी इकडे
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

मिलनघटीका जवळ येता
धडधडे र्‍हदय बाई
विद्युल्लतेची आतापासूनी
मनात रोषणाई...
अंबराच्या अंगणी ढगांचे
वाजतील सनई चौघडे ...
त्या मृगाला या मातीचा
निरोप सांगा गडे

आतूरले रे गंध उधळण्या
हे भरले अत्तर घडे ...... !
✍ 🙏🙏

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖
   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*जगातील सर्व माणसं सुखासाठी धडपडतात.अनेक संकटांना तोंड देतात.कधी हरतात ,तर कधी जिंकतात. जिंकण आणि हरणं हे शेवटी एका क्षणाचं असतं.हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो.*

    *आपल्या आत्मयाचा आवाज परमात्मयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो देवापुढं काही मागणं मागतो.अस मागण म्हणजे तो प्रार्थना करतो.*👏🙏
*या प्रार्थनारुपी हाकेतून आत्म्याची निश्चित उत्कंठा करतो.प्रार्थना ही पण दोन प्रकारे केली जाते.सकाम आणि निष्काम प्रार्थना.जेव्हा आपण देवापुढ काही मागतो ते सकाम प्रार्थना आणि जेव्हा आपलं काही देवापुढ मागणं नसतं आहे त्यात समाधान मानने असते ही झाली निष्काम प्रार्थना.*

*प्रार्थना ही धैर्य आणि आत्मबलाची जननी आहे.आपले जैविक आणि आत्मबल वाढविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत* *आहे.स्वार्थारहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना होय.*
 *संत तुकाराम म्हणतात , 'न लगे मुक्ती धनसंपदा ' संत तुकाराम महाराजांनी देवापुढं मुक्ती मागितली नाही तर भक्ती मागितली.ईश्वराविषयीचा उत्कट प्रेमातून प्रार्थना जेव्हा जन्म घेते तेव्हा ती खरीखूरी भक्तीमय प्रार्थना असते.*👏🙏
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰〰*
*एखादे काम करताना चित्त शांत असले म्हणजे ते काम अधिक सुंदर होत असते, चित्ताचे समत्व हा एक मोठाच गुण आहे.आणि समत्व हीच जीवनाची कला आहे.*

   *कोणतंही कर्म करणाऱ्याची मनोवृत्ती उच्च दर्जाची असावी लागते.खरं तर स्वतःसाठी केलेले कर्म सर्वसामान्य मध्यम प्रतीच असतं. दुसऱ्याच्या हितासाठी केलेले कर्म सर्वश्रेष्ठ असतं.समाजाच्या सेवेसाठी केलेलं कर्म हे उच्च दर्जाच असतं.अशा कर्मातूनच आपल्याला मुक्त होता येतं.*

कोणत्याही कर्माची श्रेष्ठता कर्म करणाऱ्याच्या मनावर अवलंबून असते.जगातील सर्व सुंदर गोष्टींची निर्मिती सुंदर विचारांनी नटलेल्या सुंदर कर्मातूनच होत असते.
*कर्म हे जीवनविकासाचे एकमेव साधन आहे.*
कर्माचा हेतू आनंदलब्धी आणि आनंदशुध्दी असा दुहेरी असायला पाहिजे.म्हणूनच टाँलस्टाँय यांच्या विचाराने कर्म म्हणजे कार्यमग्नता.
 *" कार्यमग्नता ही मानवी जीवनाची अटळ अशी व्यवस्था आहे ."* मानवाच्या संतोषासाठी केलेले कर्मच शुद्ध असते , सात्विक असते.
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

कथा क्रमांक १९७

🌹देव दगडात असतो कि नसतो?

☝एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान(अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.
👉जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी  विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की,
    " स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही."
     सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?❔
       आणि.....
तो व्यक्ती खदखदा हसू लागला. 👉हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
 " तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "
  त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."
  ✨    स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
     तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
     त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
  स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि,
🌟आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
       तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.  "काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."
          स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत."
त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
 ✨🌟
यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि
👉 "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते."
 हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.

☝     परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.

  💐  संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ।
तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।
 
☝ देव जाणून घेण्यासाठी पैसा  नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
  ☝देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.

मुलीचे आदर्श विचार

मुलीचे विचार
बाबा - " बाळा तुला हे स्थळ पसंत आहे ?"

मुलगी - हो बाबा छानच आहे.
नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?"
.
बाबा - हो, पण घर बघितलंस का, कसलं साधं आहे ? दगडमातीचं !
त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत."
.
मुलगी - म्हणून काय झालं ?"
.
बाबा - त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ?
एवढा मोठा बंगला, नोकर चाकर, दहावीस गाड्या !
नुसता आरामच आराम !"
.
"ते स्थळ नको."
.
"का ?"
.
मुलगी-  मी त्या मुलाशी बोललेय.
त्याचे काही प्लॅनच
नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी.
तिथं गेले तर
माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही.
सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय. नवीन काय करायचं
म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका !
त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही..

त्याउलट आजचं स्थळ बघा ना !
सगळ्या गोष्टी अजून
प्राथमिक स्टेजला आहेत.
चांगलं घर नाही, घरात
कुठल्याही सुखसोयी नाहीत,
स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !"
.
बाबा - पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल.
धारा काढाव्या लागतील, गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागेल."
.
मुलगी - मला आवडेल...
स्वतःचा संसार उभा करायचा तर
कामं ही करावी लागणारच.
यश आणि सुख हे
सहजासहजी मिळत नाही."
.
बाबा - अगं, पण सगळं सुख तुला तयार मिळेल ना,
परवाच्या स्थळाचा विचार केलास तर !"

मुलगी - तेच तर नकोय.
मी केवळ इतरांनी मिळवलेल्या
ऐश्वर्याचा उपभोग घेत राहिले तर माझं अस्तित्व कुठं राहिलं ? "
.
 बाबा - म्हणजे ?"
.
मुलगी - "मलाही श्रीमंत व्हायचं आहे पण ते स्वतः
प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ही संधीही सर्वत्र मिळत नाही.
हा मुलगा चांगला आहे. निर्व्यसनी आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा आहे.
लहानपणी वडील वारले ही खूप मोठी हानी झाली त्याची.
बापाचं छत्र नसतानाही तो डगमगला
नाही , भरकटला नाही. स्थिर राहिला.
एक दिवस जगात माझंही नाव करून दाखवीन म्हणाला.
सगळे माझे विचार.
एकमेकांचे विचार जुळले की संसार सुखाचाच होणार.
.
एक बैल कामसू आणि दुसरा आळशी झाला की चांगली मशागत कधीच होणार नाही.
तसंच संसाराचंही आहे.
आता त्याच्याकडे किंवा माझ्याकडे काहीच नाही.
पण दहावीस वर्षांनंतर आमच्याकडेही गाडी असेल, बंगला असेल ;
त्यावेळी आम्हांला अभिमानाने सांगता येईल की
यातली प्रत्येक काडी आणि प्रत्येक वीट आम्ही आमच्या कष्टाने
मिळवलेली आहे.
अभ्यास करून नंबर मिळवण्यात खरी
मजा असते !
नुसतं खाऊन पिऊन लोळणं याला जर कुणी सुख म्हणत असतील तर ते सुख मला नकोय . "


🙏🏼आवडलं तर नक्की पुढे पाठवा🙏🏼

बेटी

*बेटी...*👌🏼


एक बेटी ने अपने पिता से एक प्यारा सा सवाल किया कि पापा ये आंगन मे जो पेड़ है, उसे पीछे वाले बगीचे मे लगा दे तो ? पिता असमंजस मे और बोले बेटी ये चार साल पुराना पेड़ है नई जगह, नई मिट्टी मे ढल पाना मुश्किल होगा । तब बेटी ने जलभरी आंखो से पिता से सवाल किया कि एक पौधा और भी तो है आपके आंगन का जो बाईस बरस पुराना है क्या वो नई जगह पर ढल पाएगा ? पिता बेटी की बात पर सोचते हुए कहा कि यह शक्ति पुरी कायनात मे सिर्फ नारी के पास ही है जो कल्पवृक्ष से कम नही है। खुद नए माहौल मे ढलकर औरो कि सेवा करती है । ताउम्र उनके लिए जीती है ।
बेटी से ही मां, बहन व पत्नि है ।

जीवन विचार

*कामयाबी कभी बड़ी नहीं होती,*
         *पाने वाले हमेशा बड़े होते है !*
*दरार कभी बड़ी नहीं होती,*
        *भरने वाले हमेशा बड़े होते है !*
*सम्बध  कभी बड़े नहीं होते,*
         *निभाने वाले हमेशा बड़े होते है !...*

   बसमध्ये तुम्हाला हाक देवून तुमचा माजी विद्यार्थी तुम्हाला बसायला जागा देत असेल, तर तुम्ही राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकापेक्षाही श्रेष्ठ आहात. पण जर तुम्हाला बघून तो दुर्लक्ष करत असेल, तर तुम्ही आयुष्यात काय केलं आणि मिळवलं याचं गणित तुम्हाला दाखवणारा आरसा आहे.*
  

जीवन विचार

*पाण्यात आणि मनात साम्य ते काय?*
     *दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.*
    *दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.*
      *दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.*
      *पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?*
     *पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो.*
  

कथा क्रमांक १९६

```
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?

काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "

आणि

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

 माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो "यातले सगळ्यात किमती नाणे उचल" ..

आणि
मी रोज चांदीचे नाणेच उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......आणि असे रोज घडते

हे ऐकल्यावर विद्वानाला प्रश्न पडतो की आपल्या मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून का उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले "मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाहीस ? असला मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला घराच्या आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी पुर्ण भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला
 "पिताश्री ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी राजा हा खेळ बंद करेल ..

 त्यांना जर मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!

 काय वाटते ????

*समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो*

*काहीजण त्यातुन मोती उचलतात*,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

*हे विश्व पण सर्वांसाठी* सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे..

उत्तर सूची

*🎀 उत्तरसूची 🎀*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1⃣ मानवी लहान आतड्याची लांबी .... मीटर असते.

१) ५ ते ७
 २) ६ ते ८  ✅
 ३) ७ ते ९
 ४) ८ते १०

 2⃣ मानवाच्या उंचीचे नियंत्रण ...ही ग्रंथी करते.

१)  यकृत
२)  व्हेगस
३)  लसिका
४)  पियूषिका ✅

3⃣  इन्सूलीनचे इंजेक्शन कोणत्या रुग्णास देतात?
१) हृदयरोग
२)धमनीकाठिण्य
३) रक्तदाब
४) मधुमेह ✅
4⃣  मुत्रपिंडविकाराच्या रुग्णासाठी खालीलपैकी कोणती पध्दती वापरतात?
१) डायलँसिस ✅
२) अक्युपंक्चर थेरपी
३) रेडीओथेरपी
४) केमोथेरपी
5⃣ क्रिडामानसशास्ञ हे खेळाडूंच्या ....चा अभ्यास करणारे शास्त्र होय.

१ ) मनाचा
२) वर्तनाचा  ✅
३) बोधावस्थेचा
४) आत्म्याचा
6⃣पोलिओमूळे शरीराच्या कोणत्या भागास हानी पोहोचते?
१) मज्जासंस्था ✅
२) पचनसंस्था
३) त्वचा
४) हाडे
7⃣ अल्ट्राँसाँनिक तरंग लहरीच्या साहाय्याने खालीलपैकी कशाची खोली मोजतात?
१) विहीरीची खोली
२) तळ्याची खोली
३) कोळश्याच्या खाणीची खोली
४) समुद्राची खोली ✅
 8⃣ रेल्वेशी संबंधित असणारी ऊर्जा कोणती?

१) घर्षणजन्य
२) चुंबकीय
३) गतीजन्य ✅
४) स्थितीजन्य
9⃣ विलार्डने कोणत्या किरणांचा शोध लावला?

१ ) बिटा
२) गँमा  ✅
३) अल्फा
४) लेझर
 🔟 सूर्य व तारे यांमधील ऊर्जा कोणत्या प्रकारांमुळे निर्माण होते ?

१) अणुविघटन
२) अणुबंधन ✅
३) अणुस्फोट
४) अणुनिर्मीती

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰

*आजच्या वैज्ञानिक युगात मानवाचे प्रश्न फार व्यापक आणि कठीण झाले आहेत.प्रश्न हा सामाजिक असो,  व्यापाराचा असो की आणखी कोणता प्रश्न असो , त्यावर जलद निर्णय घेण्याची गरज उत्पन्न होते.अशावेळेस आपल्याला अचूक निर्णय घ्यावे लागतात. आपल्या जीवनात अचूक वेळेचं आणि कामातील कौशल्याचं महत्त्व  फार मोठ असतं.म्हणूनच कँनन फरार नावाचा एक विचारवंत सांगतो की, ' माणूस जे काम करतो त्यात अचूकता नसेल तर अपयश येणार.'*

    *आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर आपण आपलं काम सर्व ताकद आणि कौशल्य पणाला लावून केल पाहिजे.कारण प्रत्येक काम हे जीवनमरणाइतकं महत्त्वाच समजून केल तर यश नक्कीच आपल्या वाट्याला येणार.कोणत्याही कामातील अचूकता , सुक्ष्मता आणि एकाग्रता हे ञिसूञ  जीवनात फार महत्त्वाचे आहे.अचूकता तर कामाचा आत्मा असतो.आणि स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार आपण आपले वर्तन केले तर यश सहजतेने प्राप्त होते.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*
*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*〰〰〰〰〰〰〰〰*
*धैर्य* म्हणजे मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य आहे.ज्याच्याजवळ धैर्य आहे म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे अशी व्यक्ती कोणत्याही संकटाला , संघर्षाला घाबरत नाही.ज्यांना जीवनात काही ठोस करून दाखवायचे अशा व्यक्ती धैर्याने आपली वाटचाल करतात.

    धैर्य हे एक माणसाच्या हातातील एक मोठे साधन आहे.त्या जोरावरच मनुष्य समर्थपणे आपले जीवन जगू शकतो.जीवनातील संकटाचा समुद्र पार करण्यासाठी धैर्याच्या जहाजातूनच प्रवास करावा लागतो.जी व्यक्ती ध्येयध्यास सोडून मध्येच थांबते अशी व्यक्ती संपते.आपल्या सर्व इच्छा सफल व्हायचा असेल तर आपल्यात धैर्य आणि चिकाटी असली पाहिजे . धाडसी माणसाच्या श्रमापासून निर्माण होत असलेल्या प्रत्येक घामाच्या थेंबापासून कीर्तीरुप मोती तयार होतात.मशालीचे तोंड खाली केले तरी तिच्या ज्वाळा कधीही खाली जात नाहीत.तसेच धैर्यवान व्यक्ती
धैर्य असले की ञैलोक्यावर विजय मिळवू शकतो.

〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

उत्तरसूची

⭐💧 उत्तर सूची  💧⭐*

1⃣  भोपाळ शहरात कोणत्या वायुमूळे दुर्घटना घडली होती?
१) फाँस्जिन
२) क्लोरिन
३) मिथिल आसोसायनाईट✅
४) हायड्रोजन डाय सल्फाइड

2⃣  शहरी भागातील लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले दिसतात?
१) शेती
२) व्यापार
३) नोकरी ✅
४) उद्योगधंदे

3⃣  इन्सूलीनचे इंजेक्शन कोणत्या रुग्णास देतात?
१) हृदयरोग
२)धमनीकाठिण्य
३) रक्तदाब
४) मधुमेह ✅

 4⃣  मुत्रपिंडविकाराच्या रुग्णासाठी खालीलपैकी कोणती पध्दती वापरतात?
१) डायलँसिस ✅
२) अक्युपंक्चर थेरपी
३) रेडीओथेरपी
४) केमोथेरपी

5⃣  अल्ट्राँसाँनिक तरंग लहरीच्या साहाय्याने खालीलपैकी कशाची खोली मोजतात?
१) विहीरीची खोली
२) तळ्याची खोली
३) कोळश्याच्या खाणीची खोली
४) समुद्राची खोली ✅

6⃣  प्राथमिक आधुनिकीकरणामागील प्रेरणाशक्ती ............लोकांची असते.
१) मध्यमवार्गीय ✅
२) कनिष्ठ वर्गीय
३) गरीब
४) श्रीमंत

7⃣  वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याकरिता .........प्रमुख घटक आवश्यक आहे?
१) वस्तूनिष्ठता ✅
२) व्यक्तीनिष्ठता
३) सिध्दांत
४) उदगमणकरण

8⃣  भुकंपप्रवण क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारची घरे असू नयेत?
१) लाकडाची
२) प्लँस्टीकची
३)सिमेंट - क्राँक्रिटची
४) दगड-मातीची ✅

 9⃣  पोलिओमूळे शरीराच्या कोणत्या भागास हानी पोहोचते?
१) मज्जासंस्था ✅
२) पचनसंस्था
३) त्वचा
४) हाडे

🔟  भारतातील आधुनिकीकरण कोणत्या राष्ट्रांना आदर्श वाटते?
१) आफ्रिकेतील राष्ट्रे ✅
२)चीन
३) अमेरिका
४) आँस्ट्रेलिया
⭐💧⭐💧⭐💧⭐💧⭐
➖➖➖➖➖➖➖➖➖

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
〰〰〰〰〰*
*आजच्या वैज्ञानिक युगात मानवाचे प्रश्न फार व्यापक आणि कठीण झाले आहेत.प्रश्न हा सामाजिक असो,  व्यापाराचा असो की आणखी कोणता प्रश्न असो , त्यावर जलद निर्णय घेण्याची गरज उत्पन्न होते.अशावेळेस आपल्याला अचूक निर्णय घ्यावे लागतात. आपल्या जीवनात अचूक वेळेचं आणि कामातील कौशल्याचं महत्त्व  फार मोठ असतं.म्हणूनच कँनन फरार नावाचा एक विचारवंत सांगतो की, ' माणूस जे काम करतो त्यात अचूकता नसेल तर अपयश येणार.'*

    *आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर आपण आपलं काम सर्व ताकद आणि कौशल्य पणाला लावून केल पाहिजे.कारण प्रत्येक काम हे जीवनमरणाइतकं महत्त्वाच समजून केल तर यश नक्कीच आपल्या वाट्याला येणार.कोणत्याही कामातील अचूकता , सुक्ष्मता आणि एकाग्रता हे ञिसूञ  जीवनात फार महत्त्वाचे आहे.अचूकता तर कामाचा आत्मा असतो.आणि स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजानुसार आपण आपले वर्तन केले तर यश सहजतेने प्राप्त होते.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
   *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰〰
*शिक्षण ही मानवी जीवनशक्तीची प्रेरणा असते.शिक्षणाची मूळ भूमिका प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याची असते.संपूर्ण मानव संस्कृती एकाच ध्येयान नटलेली असते.मानवी जीवनसंस्कृती राखण्यासाठी शिक्षणाची गरज असते.*
*मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे.ज्ञानाइतके पवित्र,मंगल व उपयुक्त अन्य कांहीही नाही.🙏आईच्या कुशीतुन शिक्षणाला जी सुरूवात होते ती थेट अंत होईपर्यंत.म्हणूनच जीवनविद्या सांगते - 'शिक-क्षण','*📝
*"क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण"📚थोडक्यात, जीवनात ज्ञानाला पर्याय नाही आणि म्हणूनच जीवनविद्या सांगते*--

*ज्ञान हे शस्त्र,अस्ञ व शास्त्र आहे ,ज्ञान हे शक्ती,बल व सामर्थ्य आहे,ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे,ज्ञान हा देव,🙏ईश्वर व परमेश्वर* *आहे,म्हणून ज्ञानी 📝व्हा व धन्य व्हा.कारण ज्ञान आणि कर्म हे आपल्या जीवनाचे पंख आहेत.यामुळे आपण सुखरुपी आकाशात सहजतेने उडू शकतो. 🙏🙏*
==================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
e.blogspot.in

कथा क्रमांक १९५

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १९५*
〰〰〰〰〰〰〰
*🙏🙏आईवडीलांचा आशीर्वाद*🙏🙏
=================
*जगात आईवडिलच सर्वात श्रेष्ठ असतात.*
*एका पित्याने अापल्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.*
काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. झाली .उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.
एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला.
वडील म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.
हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !
ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले व तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की,
"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी स्मित हास्य करत आत्मविश्वासाने म्हणाली.
"माझ्याशिवाय कोण असू शकत बाबा ?"
वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती.
त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,
" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेच बनवलं!"
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी ह्या वेळेस म्हणाला की,
"बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"
वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले,
"अग,आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगते  आहेस " ?
मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली ,
"बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.
ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना ? हो की नाही बाबा " !
वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."
खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.

*आपल्या प्रगती व उन्नतिने जेव्हा जग जळत असते.*
*तेव्हा फक्त "आई-वडीलच"आपल्या प्रगतीवर खुश असतात.जोपर्यंत आईवडीलांचा आशीर्वाद आपल्यावर असतो तोपर्यंत या विश्वातील कोणीही आपले वाईट करु शकत नाही.म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडीलांची काळजी घ्यावी तनमनाने त्यांची सेवा करावी.*🙏
*-----------------------------------*
*📝 🙏संकलन*🙏

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
*लोभ* हा माणसाचा भयंकर शञू आहे. मानवाच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.

*काम , क्रोध , लोभ* ही तर माणसाच्या नरकाची व्दारे आहेत.माणूस कितीही क्रोधी झाला तरी वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही.
परंतु मनुष्याच्या लोभाची बरोबरी कोणीच करू शकत नाही.

जेव्हा गरिबी असते , तेव्हा मनुष्याला अल्प वस्तूची गरज असते , विलासवैभव आले की, त्याच्या गरजा पुष्कळ वाढतात.

परंतु जेव्हा मनुष्य *लोभी* बनतो तेव्हा त्याच्या गरजांना अंतच राहत नाही.अशा लोभी माणसाला सर्व सुखे प्राप्त झाली तरी कधीच समाधान लाभत नाही.

*म्हणूनच संत कबीर यांनी वैराग्याची शिकवण नव्हे तर साध्या व्यवहाराची शिकवण सांगितली आहे.  " पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"*

नावेत पाणी वाढल्याने जसा धोका होतो तसाच घरात धन वाढण्यात धोका आहे .
नावेला पाण्याची गरज आहे. पण ते नावेच्या खाली पाहिजे , आत नको.
*त्याचप्रमाणे माणसाला धनाची गरज आहे पण ते घरात नको , समाजात पाहिजे.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷

*〰〰〰〰〰〰〰*
*प्रत्येक माणसाचा एक खास स्वभाव असतो.*
त्याच्या  जीवनातील कार्यावर त्याच्या स्वभावाची छाप पडत असते.

आपले जीवन सुखी , आनंदी, संपन्न , निर्भय ठेवायचे असेल तर आपल्या सुस्वभावाचा बगीचा आपल्या मनात फुलला पाहिजे.आपल्यातील प्रसन्नता,  आनंदी वृत्ती ही आपल्या आत्म्याची शक्ती आहे. 😊

आपला स्वभाव आपण सतत प्रफुल्लित ठेवायला पाहिजे. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही म्हणूनच स्वभावाला औषध नाही असे म्हणतात.
प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार प्रत्येक प्रसंगाचं मूल्यांकन करत असतो.
आपल्यातील यश अपयशाची कारणे पण आपल्या स्वभावावर अवलंबून असतात.

*यश आणि अपयश यामधील फरक सांगतांना आचार्य विनोबा भावे म्हणाले  की , ' यशाने नम्रता आणि अपयशानं उत्साह येतो.'*

एकूण माणसांच्या स्वभावाचं गणित नक्की काही मांडता येणार नाही.आपण आपल्यातील सुस्वभावाविषयीच विचार केला पाहिजे. 😇
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*

कथा क्रमांक १९४

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १९४*
〰〰〰〰〰〰〰
*🌺जीवन दरीतील दूरावा*🌺
=================

एक छोटा मुलगा आईवर रागावला व म्हणाला ,"मला तू आवडत नाहीस ,मला तू आवडत नाहीस "शिक्षेच्या भितेतून तो घरातून पळाला व एका दरिजवळ गेला .तिथे तो पुन्हा ओरडला ,"मला तू आवडत नाहीस "दरीतून आवाज आला मला तू आवडत नाहीस .आयुष्यात पहिल्यांदा त्याने प्रतिध्वनि ऐकला होता .आपण कोणाला तरी आवडत नाही हे एकुण  तो नाराज झाला व पळत आई कड़े गेला व घडलेला सर्व प्रसंग त्याने आईला सांगितला.

 आईला म्हणाला त्या दरित कोणीतरी दृष्ट माणूस  आहे व त्याला मी आवडत नाही. आईला सर्व काही समजले ती म्हणाली तू पुनः दरिजवळ जा व म्हण की मला तू आवडतोस.

 मुलगा दरिजवळ गेला व म्हणाला ,"मला तू आवडतोस. "दरीतून आवाज आला ,"मला तू आवडतोस."मुलाला आनंद झाला तो आई कड़े आला व आई ची माफ़ी मागु लागला व म्हणाला ,"आई मला तू फार आवडतेस."आईने त्याला घट्ट मिठी मारली .आईच्या डोळ्यात आनंद अश्रु आले.

*तात्पर्यः*
*आयुष्य हे प्रतिध्वनि सारखे आहे जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळते.म्हणून आपण कोणाशी कसे वागावे ते आपले आपणच ठरवावे.कारण व्देषाने व्देष वाढते आणि प्रेमाने प्रेम वाढते.*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*

गीत ( आजोळ) संकलन

आजोळ किती
छान होतं... भावंडांशी
होती गट्टी...
     सा-यांशीच दो
     नव्हती कुणाशी तेव्हा
     कट्टी...
मामीच्याही कपाळावर
नव्हत्या तेव्हा आठ्या
कितीही खाल्या जरी
पापडाच्या लाट्या....
     आजीचे सांधे दुखत नव्हते
     नव्हते कुलर ए.सी
     ऊन्हाळ्याची सुट्टी तेव्हा
    वाटे हवीहवीशी....
पत्त्यांचे खेळ रंगत
माडीवरती अंगत पंगत
माचवलेल्या आंब्यांची
हवीहवीशी होती संगत....
      नदीवरती डुंबत होतो
      खरबुजांवर ताव होता
      गर्द अमराईत वसलेला
     माझ्या मामाचा गाव होता...
नाही आता ती वनराई
रूक्ष रस्ते ठाई ठाई
ओसाड वाडे..पडक्या भिंती
आजही पाणावते आई....
       भाग्यवंत आम्ही जाहलो
        आजोळाचे भाग्य लाभले..
        धाबे अन् कौलारू छपरे
       आठवणींशी बोलू लागले...
🌳🌳🌳🍋🍉🌳🌳🌳

संकलन

कथा क्रमांक १९३

अभ्यास  कथा क्रमांक १९३*

*अनुभवाच्‍या जोरावर यश*

         एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.


*तात्‍पर्य* :- अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो.

  *संकलन*

कविता संकलन

*शृंगार मराठीचा*

*शृंगार मराठीचा नववधू परी,*
*अनुस्वाराचं कुंकू भाळावरी.*
*प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी,*
*स्वल्पविरामाची नथ भर घाली.*
*काना काना जोडून राणी हार केला,*
*वेलांटीचा पदर शोभे तिला.*
*मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल*
*वेणीत माळता पडे भूल*
*उद् गारवाचक छल्ला असे कमरेला*
*अवतरणाची लट खुलवी मुखड्याला*
*उकाराची पैंजण छुमछुम करी*
*पूर्णविरामाची तीट गालावरी.*

कविता ( निवांत )

*🌷🌷क- कवितेचा🌷🌷*

    *🌹निवांत*🌹
*☘🍀☘🍀☘🍀☘🍀*

✍ शांततेशी मैत्री करणे,
शिकायला पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

बोलून बोलून शब्द झिजले,
अर्थ काय कुठे हरवले,
हरवलेले अर्थ शोधायला पाहिजे,
शब्दांची किंमत करायला पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे...

दरवेळेस बोलून दाखवून,
होत नसते काही,
काही गोष्टी जन्मोजन्मी,
जशास तशा राही,
हवे हवे तर हवेच आहे,
नको नकोही झेलायला पाहिजे...
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

असलेल्या गोष्टी ,
समजून घेतल्यावर,
सगळे सोपे होते.
थंड डोके नी शांत मन,
सर्वच सावरून घेते.
एकट्यात जरा वेळ घालवून,
व्यक्त झाले पाहिजे.
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे.

स्वतः स्वतःशी मैत्री करून,
मोकळा श्वास घेतला पाहिजे.
स्वभावाला औषध नाही,
कळायला पाहिजे,
नकळणार्या गोष्टी ,
सोडून द्यायला पाहिजे,
कधीतरी आपणही,
शांत बसायला पाहिजे........
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कथा क्रमांक १९२

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १९२*
〰〰〰〰〰〰〰
*🌺  अचूक निर्णय* 🌺
=================

चार जण प्रवासाला निघाले होते. चौघांनी मिळून एकच मोठी बॅग घेतली होती. त्यात त्यांचे कपडे, पैसे, सर्व सामान त्यांनी ठेवले होते. वाटेत एका म्हातारीचे घर लागले. तिच्या घरी ती  मोठी बॅग ठेवून ते चौघेही जेवायला गेले. जातांना त्यांनी त्या आजीला सांगितले होते. "आजी, आम्ही चौघे मिळून तुझ्याकडे येऊन बॅग मागू तेव्हाच तू आम्हाला बॅग दे. आमच्या चौघांपैकी बॅगची मागणी करतांना एकही जण कमी असल्यास तू बॅग देऊ नकोस"
आजीने मान डोलावली नंतर असे घडले की, त्या चौघांपैकी एक जण आजीकडे आला आणि त्याने बॅग घेऊन तो तात्काळ पसार झाला.
   मग ते तिघे आजीकडे आले. आणि त्यांना समजले की, त्याच्यापैकी चौथ्या माणसाने ती बॅग त्या आजीकडून नेली. ते तिघे संतापले. तेनाली रामनकडे गेले. घडलेली सर्व हकीकत त्यांनी सांगितली. आजीकडून नुकसान  भरपाई त्यांनी मागितली. तेनाली रामनने त्या तिघांना एक प्रश्न विचारला, तुम्ही चौघे मिळून बॅग मागितल्या नंतर म्हातारीने तुम्हला बॅग द्यावी, अशी तुमची अट होती ना ?
 "होय" तिघेही म्हणाले.
       "आजी तुम्हाला नुकसान भरपाई न देता तुमची बॅगच तुम्हाला परत करू इच्छिते. सबब, तुम्ही चौघे मिळून या ! तेनाली रामनने निकाल जाहीर केला.
         या निकालाने न्यायालयात हशा पिकला आणि त्या तिघांना कळून चुकले की, ते आपला दावा हरले आहेत.
*तात्पर्य - सर्व बाजूंनी पाहून विचार करुनच चोख निर्णय द्यायला हवा.*
*------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*


कथा क्रमांक १९१

 बोधकथा

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

 तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  *_सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,.

......_*

 *_"तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता,_*
*_कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे._*
*_क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो._*
*_मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’_*

*_तात्पर्य :_*

*_क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो._*
*_क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे,_* *_प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते._*
*_क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.🌼🌺_*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰 📚
शिकलेला समाजच देशाची सुधारणा करु शकतो. *देशाची शिकलेली , सुसंस्कृत ,स्वच्छ , सदाचारी, प्रामाणिक , शिष्टाचारी आणि शिस्तप्रिय लोक किती आहेत यावरुनच देशाची किंमत ठरत असते.*
 ' देशासाठी जगावं ' हा शिक्षणाचा महत्त्वाचा विचार आहे.म्हणूनच शिक्षणातून शीलसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न माणसं निर्माण करण्याच काम शिक्षणाचं असतं.
📚📚

    *तीन गुरू प्रमाणे माझी तीन उपास्थ दैवतही आहेत.*

📚माझे पहिले उपास्थ दैवत *विद्या.*
 विद्येशिवाय काही होऊ शकत नाही.
अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे . खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो ,तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर📚 प्रेम आहे .
 शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे.

  📚 माझे दुसरे उपास्थ दैवत *विनयशीलता* हे आहे. *विनय म्हणजे लीनता ,लाचारी नव्हे.*

माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे  असे मला वाटते . *चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही.*
मी माझ्या बुध्दीप्रमाणे चालतो. 🙏 परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही.

📚 *शीलसंवर्धन* हे मी माझे तिसरे उपास्थ दैवत समजतो.

  📚📖- *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर* 📚🖊
==================
*'सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही.'*
📚  📙  📖  📚  📝
*〰〰〰〰〰〰〰*
🙏🏼 *शब्दांकन/संकलन* 🙏🏼

🖊

डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सर्वांना शुभेच्छा

📘📕📒📔📙📕📒📘
युगायुगांचा तिमिर भेदुनी उगवलास तू प्रज्ञासूर्या
उजेड अमुच्या जीवनामध्ये फुलवलास तू प्रज्ञासूर्या

परंपरेच्या दगडांवरती उपेक्षितांचा फुटला माथा
विचार तेथे मानवतेचा रुजवलास तू प्रज्ञासूर्या

बा, करुणेने जवळ घेउनी, पंचशील हृदयास पाजुनी
 मग प्रज्ञेचा घास अम्हाला भरवलास तू प्रज्ञासूर्या

एकजुटीची करून मशागत संघर्षाचे बीज पेरले
ह्या मातीत मळा समतेचा पिकवलास तू प्रज्ञासूर्या

तुझ्या स्मृतींनी मन गहिवरते ; तुझ्यापुढे नतमस्तक होते
काठ पापणीचा नकळत रे भिजवलास तू प्रज्ञासूर्या … !!

*📚📘डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व*
*सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा!*💐💐👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शुभेच्छूकः💐💐 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे  (शिंदे)
🙏👏👏🙏
(म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हा सरचिटणीस नांदेड.)

कविता संकलित

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

मातृ म्हणा मदर म्हणा
*आई* शब्दात *जीव* आहे ....

पिता म्हणा पप्पा म्हणा,
*बाबा* शब्दात *जाणीव* आहे

सिस्टर म्हणा दीदी म्हणा
*ताई* शब्दात *मान* आहे ....

फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा
*मित्रा* शब्दात *शान* आहे ....

एन्ड म्हणा फिनिश म्हणा
*अंत* शब्दात *खंत* आहे .....

दिवार म्हणा वॉल म्हणा
*भिंत* शब्द *जिवंत* आहे

रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा
*नातं* शब्दात *गोडवा* आहे

एनेमी म्हणा दुश्मन म्हणा
*वैर* शब्द जास्त *कडवा* आहे..

हाय म्हणा हॅलो म्हणा,
*हाथ* जोडणे *संस्कार* आहे

सर म्हणा मॅडम म्हणा
*गुरु* शब्दात *अर्थ* आहे

ग्रँड पा ग्रँड माँ शब्दात
काही मजा नाही
*आजोबा,आणि आजी*
सारखे *नाते* सुंदर जगात नाही..

गोष्टी सर्व सारख्या
पण *फरक* फार *अनमोल* आहे

*अ ते ज्ञ शब्दात*
  *ज्ञानाचे भांडार आहे*..

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

कथा क्रमांक १९०


*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १९०*
〰〰〰〰〰〰〰
*🌺"कर भला तो हो भला"* 🌺
=================
〰〰〰〰〰
गंगा नदी के पास एक पीपल का पुराना पेड थाl उस पेड पर एक दिन एक कबूतर बैठा हुआ नदी की लहरें देख रहा थाl अचानक उसकी नजर पेड के नीचे वाले पानी में बहती जा रही चींटी की तरफ गयीl वह पानी से बाहर आने की कोशिश कर रही थी l  कबूतर ने अपने चोंच से एक पत्ता तोडकर पानी में चींटी की तरफ फेंका l चींटी पत्ते पर चढकर किनारे की तरफ आ गई और इस प्रकार उसकी जान बच गई l

     अब दोनों में मिञता हो गईl
अचानक एक दिन चींटी ने शिकारी को अपने मित्र कबूतर पर निशान साधते हुए देखा, उसने तुरंत शिकारी का पैर काट लिया l शिकारी का निशाना चूक गया l और गोली की आवाज से कबूतर उड गया l इस प्रकार चींटी ने कबूतर की जान बचाई l

*सीखः भलाई का बदला हमेशा भलाई ही होता हैl यदी हम भलाई करेंगे तो हमारी भी भलाई होंगीl*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*


कथा क्रमांक १८९

  अभ्यास कथा

 लोकराजा
आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून
घराकडे निघाली होती. आया-
बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या.
धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ
उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून
त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट
झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली.
लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत
चुंबळीच्या पदराखाली सरकवली.
आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते,
तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने
तिला हटकलंच,
म्हातारे, आज उशीरसा?'
माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज
बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं
खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं
सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात
समोरुन मोटार येताना दिसली.
आजीने चकटनं विचार केला, एस्.टी.ला दोन आणे
पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण
अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
आजीने आपला काळा फाटकोळा हात
झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून
थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला.
तो आजीकडे बघून हसला.
"काय पायजे आजी?" त्यानं
विचारलं.आजीला त्यातला त्यात बर वाटलं.
म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा.
सोडशील रे? "यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला.
म्हातारीची पाटी डिकीत
टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर
बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं
बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च
नाही. पण तिला हळहळपण वाटली.
बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.
ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.
मियां तुका तीन आणे देतयं. चलात?''
ड्रॉयव्हर हसत म्हणाला, "आजी, तुला परवडतील
ते दे. तू मला मायसारखी ''
आजीचाजीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच
हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु
झाली.बांगडीवालामुलगा तोंड वासून आश्चर्यानं
पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, "अगे
म्हातारे..... -पण आजीला आता त्याच्याकडे
बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं,
एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.
गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं
मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.
दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती.
आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली.
"आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं.
इथंच उतरायच ना?"
आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून
ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान
डिकीतून तिची पाटी काढून दिली.
म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं
अलवार हातानं पुडी उलगडली.
त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.
ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,
"खा माझ्या पुता! "
ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं
आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं
गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस
म्हणाला,
"कुणाच्या गाडीतून इलंय?""
"टुरिंग गाडीतनं." आजी म्हणाली
आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच
बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत
आवाजात म्हणाली
"तीन आणे मोजूनदिलंय त्येका",
"त्यांनी ते घेतलं?
अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार
नव्हती ती.आपल्या राजांची गाडी.
या आपल्या कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस
तू!'' दुसऱ्यानं माहिती पुरवली.
"अरे माझ्या सोमेश्वरा, रवळनाथा'' म्हणत
म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं
तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय'
म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू
खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं,तिच
अंतःकरण भरुन आलं.
याला म्हणतात " लोकराजा"....!

कथा क्रमांक १८८

पापाचा गुरू कोण?

एक पंडित काशीत अनेक शास्त्रांचे अध्ययन करून आपल्या गावात परतले.
संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणी एक पंडित, शास्त्रांचे
अध्ययन करून आला आहे आणि ते धर्मासंबंधी
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.

ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्याच्याकडे आला
आणि त्यांना विचारू लागला की
"पंडितजी तुम्ही आम्हाला हे सांगा की पापाचा गुरू कोण आहे?"
प्रश्न ऐकून पंडित गडबडले.....

त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरुंबद्दल तर ऐकलं होतं.
पण पापचाही गुरू असतो हे त्यांच्या समजण्याच्या
आणि ज्ञानाच्या पलीकडे होते.

पंडितजींना वाटलं की त्यांचे अध्ययन अजूनही अपूर्ण राहिलं आहे.
त्यामुळे ते पुन्हा काशीस निघाले.
अनेक गुरूंना भेटले, पण त्यांना
त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही.

अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी झाली.
तिने पंडितजींना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले,
तेव्हा त्यांनी तिला आपली समस्या सांगितली. गणिका म्हणाली,
"हे पंडित! ह्याचं उत्तर आहे तर अत्यंत सोप्पं,
परंतु उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही दिवस
माझ्या बाजूच्या घरात राहावे लागेल.

पंडितजी ह्या ज्ञानासाठीच तर भटकत होते.
ते लगेच तयार झाले.

गणिकेने त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली.

पंडितजी कोणाच्याही हाताने बनवलेले अन्न खात नसत.
ते आपले नियम-आचार आणि धर्म प्रपंचाचे कट्टर अनुयायी होते.
गणिकेच्या घरात राहून ते आपले जेवण स्वतःच बनवत होते.

अशा प्रकारे दिवस जात होते.

परंतु प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नव्हते.
ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले.

एक दिवस गणिका त्यांना म्हणाली, "पंडितजी! आपल्याला स्वतः जेवण
बनवण्यात अनेक अडचणी येत असतील.
इथे तुम्हाला बघणारा तर कोणी नाही.
आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन
तयार करून देऊ शकते.

ती म्हणाली "जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत,
तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपणांस पाच सुवर्णमुद्रा देईन".

स्वर्णमुद्रांचे नाव ऐकून पंडित विचार करू लागला.
शिजवलेले अन्न आणि त्याबरोबर पाच सोन्याची नाणीही !

अर्थात दोन्ही हातात लाडू आहेत.

तो म्हणाला जशी आपली इच्छा."

पंडित तिला म्हणाला, "फक्त एवढं ध्यानात ठेव की माझ्या खोलीत
जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहू नये."

पहिल्याच दिवशी अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवून
गणिकेने त्या पंडिताच्या समोर ठेवली.

पण जेव्हा पंडित खाण्यास हात घालू लागला तेव्हा
तिने लगेच पंडितांचे ताट स्वतःकडे खेचले.

तिच्या या वर्तनामुळे पंडित क्रुद्ध झाला
आणि म्हणाला "हा काय मूर्खपणा आहे?"

त्यावर गणिका म्हणाली "हा मूर्खपणा नाही, तर हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे.

इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच,
पण कोणाच्या हातातले पाणीही पित नव्हतात,

पण स्वर्णमुद्रांच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेल्या
अन्नाचाही स्वीकार केलात !

तुमच्या प्रश्नाचं हेच तर उत्तर आहे की 'लोभ' हाच पापाचा गुरु आहे..

कथा क्रमांक १८७

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
                 *संघर्षच खरे जीवन*
एका गावात एक म्‍हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्‍हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्‍यातरी आजाराने ग्रस्‍त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्‍हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्‍हातारी स्‍वाभिमानी असल्‍याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्‍या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्‍याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्‍हणायला आणि मृत्‍युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्‍यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्‍हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्‍यु समोर पाहून म्‍हातारी घाबरली आणि म्‍हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्‍हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्‍यूदेव निघून गेले आणि म्‍हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.
                     *तात्पर्य*
जीवनापासून पळ काढणे म्‍हणजे समस्‍येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत रा‍हणे, आपले नित्‍यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.
               〰〰〰〰〰〰〰

कथा क्रमांक १८६

*❝गाढव व माळी❞*

         *शहराजवळच्या वस्तीवर राहणार्‍या गाढवाचे शेपूट एके दिवशी कोठेतरी तुटून पडले.*

         *शेपटी नसल्याने त्या गाढवाला स्वतःची फार लाज वाटू लागली. तो आपली शेपटी शोधण्यासाठी म्हणून हिंडू लागला.*

           *तो एका बागेतून चालला असता तेथील माळ्यास वाटले की हे गाढव आपल्या फुलझाडांची नासाडी करण्यासाठीच आले आहे. म्हणून तो रागारागाने त्या गाढवाच्या अंगावर धावून गेला व त्याने झाडे कापायच्या कात्रीने गाढवाचे दोन्ही कान कापून टाकले.*

           *शेपूट हरवल्यामुळे आधीच दुःखी झालेल्या त्या गाढवाचे दोन्ही कान गेले म्हणून त्यास फारच दुःख झाले.*

               *❝ तात्पर्य ❞*
*~दुःखाच्या भरात अविचाराने एखादी गोष्ट केली जाते व त्यामुळे जास्तच संकटे निर्माण होतात.~.*

कथा क्रमांक १८५

अभ्यास कथा ...

*॥ भिक्षापात्र ॥*

"राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.
प्रसंगच तसा होता.
त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
पण, वचन देण्याआधी विचार कर.
जमेल का?
भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.
राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...
...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.
रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.
पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.
राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?
भिकारी म्हणाला,
ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
आणि
ते
*कशानेही भरत नाही!!"*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰

*संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.*

*'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो.*

*'It is better to have loved and lost, than never to have loved at all!'*

*अत्यंत महागडी,न परवडणारी     खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ".*

*जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं.*
*"आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो".*
 
*म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे*'.
*आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण  आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही.*

*' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'.*
==================
*🙏'वाणी,पाणी आणि नाणी' ह्याचा वापर जपुन करावा.*
🍀💦💦💦💦💦🍀
*〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन /  संकलन🙏🏼

कथा क्रमांक १८४

*माझी शाळा माझे उपक्रम*
*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १८४📚*
〰〰〰〰〰〰〰
     *🌺 ईश्वरी स्थान* 🌺

〰〰〰〰〰〰〰
एक वयोवृद्ध शेतकरी डोंगराळ प्रदेशातील शेतावर त्याच्या नातावासोबत राहत होता.
रोज पहाटे आजोबा लवकर उठून भगवद् गीता वाचत बसत. त्यांच्या नातवाची त्यांच्यासारखेच बनण्याची इच्छा होती आणि तो प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत असे.
एके दिवशी नातवाने विचारले,
" आजोबा, मी तुमच्यासारखाच गीता वाचण्याचा प्रयत्न केला पण मला ती समजली नाही, आणि जे काही थोडेफार समजले ते पुस्तक बंद करताच विसरले जाते. भगवद् गीता वाचून काय फायदा होतो? "
आजोबा शेगडित कोळसे टाकण्या आधी थोडे थांबले आणि म्हणाले, "ही कोळशाची टोपली घेउन नदीवर जा आणि माझ्यासाठी टोपली भरून पाणी घेउन ये."
नातवाने सांगितल्या प्रमाणे केले पण घरी पोहोचण्या पुर्वीच सर्व पाणी गळून गेले. आजोबा हसले आणि म्हणाले," पुढच्या वेळी तू थोडी घाई कर "आणि पुन्हा एक प्रयत्न करण्या साठी त्याला टोपली घेउन नदीवर पाठविले. या वेळी तो मुलगा जोरात पळत आला पण तरीही घरी पोहोचण्यापुर्वी टोपली रिकामी झाली होती. धापा टाकत त्याने आजोबाना सांगितले की टोपलीतून पाणी आणणे अशक्य आहे आणि तो बादली घेण्यासाठी गेला.
आजोबा म्हणाले," मला बादली मध्ये पाणी नको आहे; मला टोपली मध्येच पाणी हवे आहे. तू पुरेसे प्रयत्न करत नाहीस," आणि तो नातू पुन्हा कसा प्रयत्न करतो हे पाहण्या साठी घराबाहेर आला.
या वेळी, त्या मुलाला ही गोष्ट अशक्य आहे हे माहित असुनही त्याला आजोबाना दाखवून द्यायचे होते की तो कितीही जोरात धावत आला तरीही घरी पोहोचण्यापूर्वी पाणी गळून जाइल.
त्या मुलाने पुन्हा एकदा टोपली पाण्यात बुडविली आणि जोरात धावत आला. परंतु आजोबापर्यंत पोहोचण्यापूर्वी टोपली रिकामी होती. धापा टाकत तो म्हणाला," बघा आजोबा, हे निष्फळ आहे"
आजोबा म्हणाले," तर तुला हे निष्फळ वाटते मग जरा टोपली कडे बघ"
मुलाने टोपली कडे बघितले आणि पहिल्यांदाच त्याला टोपली वेगळी दिसत असल्याचे लक्षात आले. ती कोळशाने काळी झालेली टोपली आता आतून बाहेरून स्वछ झाली होती.
मुला, तु जेव्हा भगवद्गीता वाचतो तेव्हा असच घडते. तू प्रत्येक गोष्ट समजू शकणार नाही किंवा लक्षात ठेवू शकणार नाही, पण जेव्हा तू गीता वाचशील तेव्हा तू देखिल अंतर्बाह्य बदलून जाशील.
आपल्या आयुष्यात ईश्वराचे हेच तर वैशिष्ट आहे.
*-----------------------------------*
*📝 🙏संकलन*🙏

कथा क्रमांक १८३

अभ्यास  कथा ..*

*एक औरत अपने परिवार के सदस्यों के लिए रोज़ाना भोजन पकाती थी और एक रोटी वह वहाँ से गुजरने वाले किसी भी भूखे के लिए पकाती थी..।*

*वह उस रोटी को खिड़की के सहारे रख दिया करती थी, जिसे कोई भी ले सकता था..।*

*एक कुबड़ा व्यक्ति रोज़ उस रोटी को ले जाता और बजाय धन्यवाद देने के अपने रस्ते पर चलता हुआ वह कुछ इस तरह बड़बड़ाता- "जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा..।"*

*दिन गुजरते गए और ये सिलसिला चलता रहा..*

*वो कुबड़ा रोज रोटी लेके जाता रहा और इन्ही शब्दों को बड़बड़ाता - "जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा.।"*

*वह औरत उसकी इस हरकत से तंग आ गयी और मन ही मन खुद से कहने लगी की-"कितना अजीब व्यक्ति है,एक शब्द धन्यवाद का तो देता नहीं है, और न जाने क्या-क्या बड़बड़ाता रहता है, मतलब क्या है इसका.।"*

*एक दिन क्रोधित होकर उसने एक निर्णय लिया और बोली-"मैं इस कुबड़े से निजात पाकर रहूंगी।"*

*और उसने क्या किया कि उसने उस रोटी में ज़हर मिला दिया जो वो रोज़ उसके लिए बनाती थी, और जैसे ही उसने रोटी को को खिड़की पर रखने कि कोशिश की, कि अचानक उसके हाथ कांपने लगे और रुक गये और वह बोली- "हे भगवन, मैं ये क्या करने जा रही थी.?" और उसने तुरंत उस रोटी को चूल्हे कि आँच में जला दिया..। एक ताज़ा रोटी बनायीं और खिड़की के सहारे रख दी..।*

*हर रोज़ कि तरह वह कुबड़ा आया और रोटी ले के: "जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा, और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा" बड़बड़ाता हुआ चला गया..।*

*इस बात से बिलकुल बेख़बर कि उस महिला के दिमाग में क्या चल रहा है..।*

*हर रोज़ जब वह महिला खिड़की पर रोटी रखती थी तो वह भगवान से अपने पुत्र कि सलामती और अच्छी सेहत और घर वापसी के लिए प्रार्थना करती थी, जो कि अपने सुन्दर भविष्य के निर्माण के लिए कहीं बाहर गया हुआ था..। महीनों से उसकी कोई ख़बर नहीं थी..।*

*ठीक उसी शाम को उसके दरवाज़े पर एक दस्तक होती है.. वह दरवाजा खोलती है और भोंचक्की रह जाती है.. अपने बेटे को अपने सामने खड़ा देखती है..।*

*वह पतला और दुबला हो गया था.. उसके कपडे फटे हुए थे और वह भूखा भी था, भूख से वह कमज़ोर हो गया था..।*

*जैसे ही उसने अपनी माँ को देखा, उसने कहा- "माँ, यह एक चमत्कार है कि मैं यहाँ हूँ.. आज जब मैं घर से एक मील दूर था, मैं इतना भूखा था कि मैं गिर गया.. मैं मर गया होता..।*

*लेकिन तभी एक कुबड़ा वहां से गुज़र रहा था.. उसकी नज़र मुझ पर पड़ी और उसने मुझे अपनी गोद में उठा लिया.. भूख के मरे मेरे प्राण निकल रहे थे.. मैंने उससे खाने को कुछ माँगा.. उसने नि:संकोच अपनी रोटी मुझे यह कह कर दे दी कि- "मैं हर रोज़ यही खाता हूँ, लेकिन आज मुझसे ज़्यादा जरुरत इसकी तुम्हें है.. सो ये लो और अपनी भूख को तृप्त करो.।"*

*जैसे ही माँ ने उसकी बात सुनी, माँ का चेहरा पीला पड़ गया और अपने आप को सँभालने के लिए उसने दरवाज़े का सहारा लीया..।*

*उसके मस्तिष्क में वह बात घुमने लगी कि कैसे उसने सुबह रोटी में जहर मिलाया था, अगर उसने वह रोटी आग में जला के नष्ट नहीं की होती तो उसका बेटा उस रोटी को खा लेता और अंजाम होता उसकी मौत..?*

*और इसके बाद उसे उन शब्दों का मतलब बिलकुल स्पष्ट हो चूका था-*
*जो तुम बुरा करोगे वह तुम्हारे साथ रहेगा,और जो तुम अच्छा करोगे वह तुम तक लौट के आएगा।।*

              *" निष्कर्ष "*
           ==========
*हमेशा अच्छा करो और अच्छा करने से अपने आप को कभी मत रोको, फिर चाहे उसके लिए उस समय आपकी सराहना या प्रशंसा हो या ना हो..।*

जीवन विचार

*"चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची साथ  कधी सोडत नाही..*

*आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही..*

*ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.*

*सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.*
*जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची

सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते.....* ✍🏻


बक्षिस वितरण सोहळा

*🏆🏆🏆बक्षिस वितरण सोहळा🏆🏆🏆*
🌷🌹🌷 🌹 🌷🌹🌷 🏆👫👭👬👬👫👫🏆 आज दि.३१-०३-२०१७ रोजी आमच्या  *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*येथे बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

   विद्यार्थ्यांनी (जानेवारी) महिन्यात विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुण व सुप्तगुणांना दाखवून स्पर्धा जिंकून बक्षिसपाञ झाले.सदरील स्पर्धा ह्या पहिली ते सातवी पर्यंतचा सर्व विद्यार्थ्यांसाठी होत्या.स्पर्धेत प्रथम व व्दितीय असे प्रत्येक इयत्तेमधून नंबर काढण्यात आले होते.
स्पर्धेतील या चिमुकल्यांसाठी गावकरी मंडळीकडून भरपूर रक्कम स्वखुशीने मिळाली होती. त्या अनुशंगाने आम्ही बक्षिसे म्हणून विद्यार्थ्यांना थंडपेय बाँटल, चिञकला वही, टिफिन, कंपासपेटी, कलर बाँक्स.अशा वस्तू आणून त्याचे वितरण शाळेचे मा.मु.अ.श्री चव्हाण सर व शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचा हस्ते  केले.
सदरील कार्यक्रमाचे सूञसंचलन श्रीमती सेनकुडे मँडमनी केले तर आभार श्रीमती झाडे मँडमनी मानून अशा आनंदमय कार्यक्रमाची  सांगता केली.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🌹 *प्रेरणादायी संदेश* 🌹
*काही जिंकणं 👍बाकी आहे*
        *काही हरणं बाकी आहे*
*अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.*
*आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे*
*आपण पहिल्या पानावर आहोत*
    *अजून संपुर्ण पुस्तक📚 बाकी आहे.*
󞐰〰〰〰〰〰〰〰
*🙏 इहिवृत्त लेखन 🙏*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शी.)
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
*〰〰〰〰〰〰〰*

कथा क्रमांक १८१

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १८१*
〰〰〰〰〰〰〰
🌺 *महानता*🌺
=================
कटकमध्‍ये जानकीनाथ बोस हे एक वकील होते. एका रात्री ते, त्‍यांची पत्‍नी व मुलगा सुभाष आपल्‍या घरात झोपले असता काही वेळाने त्‍यांच्‍या पत्‍नीला जाग आली व तिने पाहिले आपला मुलगा सुभाष जमिनीवर झोपला आहे. त्‍याला थंडी वाजेल अशी तिला भिती वाटू लागली. पत्‍नीने मुलाला जागे केले व विचारले,'' बेटा सुभाष, तुला असे जमिनीवर का झोपावेसे वाटले'' सुभाषने उत्तर दिले,''आई, आपले पूर्वज असणारे साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे.'' आई म्‍हणाली,'' बेटा, ते महान होते आणि वयानेही मोठे होते. तुझे वय जमिनीची कठोरता सहन करणार नाही तू बाजेवर येऊन झोप.'' आई आणि मुलाच्‍या या चर्चेने जानकीनाथ बोस जागे झाले आणि त्‍यांनीही सुभाषला विचारले,'' सुभाष तुला जमिनीवर झोपायला कुणी शिकविले.'' सुभाष म्‍हणाला,''बाबा, गुरुजी सांगत होते साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच महापुरुष होते. तसेच ते जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे. मला महापुरुष व्‍हायचे आहे.'' जानकीनाथ बोस यांनी सुभाषला समजावले की,'' बेटा, जमिनीवर झोपून कुणी महान होत नसते तर कठोर तप, साधना आणि पीडीत मानवतेच्‍या सेवेतून व्‍यक्ती महान होते. आचरणात शुद्धता ठेवली तर मनुष्‍य महान होतो.'' सुभाषला वडीलांचे म्‍हणणे पटले व त्‍याने त्‍याचप्रमाणे वर्तन ठेवले व एक महान क्रांतीकारी हिंदूस्‍थानला मिळाला त्‍याचे नाव सुभाषचंद्र बोस. राष्‍ट्रासाठी संपूर्ण जीवन व्‍यतीत करून, समर्पण कसे असावे याचा संदेश देणारे जीवन त्‍यांनी जगले व वडीलांची शिकवण आचरणात आणली.
  *तात्पर्य*
त्‍याग आणि समर्पणातूनच देशहित जपले जात असते.
*-----------------------------------*
*📝 संकलन*

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उत्तम आहे.माणूस आयुष्यात प्रगतीसाठी अनेक कामे करत असतो. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. कष्ट सहन करतो. अनेक प्रसंगांना त्याला सामोरं जावं लागतं. हे सर्व करत असताना प्रतिकूल परिस्थितीच्या माराणं जो खचत नाही, माघार घेत नाही, तोच जीवनात यशस्वी होतो. जे या परिस्थितीच्या बसणाऱ्या घावांना घाबरतात, मनानं खचून जातात, ते मात्र अपयशी होतात. त्यांची अवस्था घडवलेल्या आणि हिऱ्या सारख्या दिसणाऱ्या चमकत्या काचेच्या थोड्या-थोड्या आघाताने तडकणाऱ्या, चुरा होणाऱ्या कच्या वस्तुप्रमाणे होते.*

*जेवढा संघर्ष बिकट , तेवढेच यश अधिक उज्वल.म्हणून जेवढं तुम्ही सहन कराल, तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल.*
〰〰〰〰〰〰〰

जागतिक जलदिन

💧 *22 मार्च हा "जागतिक जलदिन"* 💧


💧 *जल प्रतिज्ञा* 💧

मी प्रतिज्ञा करतो की,
पाणी हे जीवन असून,
त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन.
 मी पाण्याचा  अपव्यय व  गैरवापर करणार नाही. नेस्रगिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.
पाण्यविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व  पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकि मानून त्याचे सदैव पालन करेन.

जय हिंद! जय महाराष्ट्र ! !

💧 *"पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिर्ती"* 💧

💧💧💧💧💧💧💧💧💧

जीवन विचार

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान अपेक्षित करणे नसून तर त्या ज्ञानाचे कृतीत रुपांतर करणे हे आहे.खरी गुरुभक्ती ही ज्ञानभक्तीच असते. कारण शिष्याला जोपर्यंत ज्ञानाची तहान असते  तोपर्यंत या जगात गुरूभक्ती चाललेलीच असते.ज्ञान हे आपल्या मानवी जीवनाचे सार आहे असे म्हणायला काही हरकत नाही.*

   *आपलं जीवन सुंदर करणं, निष्काम करण ही तर फार मोठी विद्या आहे.जीवनातील ही विद्या आपण सद्गुरुकडून प्राप्त करून घेतो. सद्गुरु आपणांस नव वैचारिकता , सर्जनशीलता  यांना जन्म देतो.असे हे ज्ञान  आपण ज्यांच्याकडून प्राप्त करून घेतो त्यांस आपला गुरू मानावे.*

 *गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ असते.सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.गुरू हा आपल्या जीवनरुपी बागेचा माळी आहे.आणि आपल्या ज्ञानमृताने तो ती बाग फुलवीत असतो.अशा सर्व ज्ञानरुपी गुरुस शतशः वंदन*🙏👏
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

कथा क्रमांक १८०

अभ्यास कथा क्रमांक १८०

संघर्ष

एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला.

नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''

देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.

प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.

पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला.

 पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,

'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.

 त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

 सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.

तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले.

सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते.

हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''

आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

*तात्पर्य:-*

जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰

कथा क्रमांक १७९

अभ्यास कथा क्रमांक १७९

उपकार

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया  आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली

 *"उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापूरते असून आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याया मिळाला कि ,सच्च्या व प्रमाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*

_

कथा क्रमांक १७७


*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग . १७७*
〰〰〰〰〰〰〰
     *🌺 खरा न्याय*🌺
=================
  " एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मनाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
शामला खूप वाईट वाटते . राम खूप बदललेला असतो.

 शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.
*तात्पर्यःखरा न्याय करावा."*
*------------------------*
      📙   *संकलन*  📙

कथा क्रमांक १७६

अभ्यास कथा क्रमांक १७६

समाधान

जे असेल त्यात समाधानी असावे.
एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?

तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'

* तात्पर्य:-* सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.

कथा क्रमांक १७५

अभ्यास कथा क्रमांक १७५

स्‍वामी अखिलानंद

स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.'' दोघेही बिचारे मान अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.
                *तात्पर्य*
कुणालाही कमी समजू नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता येत नाही.                           〰〰〰〰〰〰〰