✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार. 💥 जन्म :- १८५५ : गोविंद बल्लाळ देवल, प्रसिद्ध मराठी नाटककार. १८७३ : बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९१७ : वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. १९५४ : स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी. 💥 मृत्यू :- १२४० : रझिया सुलतान, गुलाम घराण्यातील कर्तबगार राजकर्ती. १७७० : जॉर्ड ग्रेनव्हिल,युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८६७ : पोप निकोलस पहिला. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक, आगीत जवळपास ७० ते ८० लाखांच्या आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपीन्सच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी झाले रवाना* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : तांत्रिक कामांसाठी मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक. सकाळी १० ते ४.४५ दरम्यान वेगवेगळ्या लाईन्सवर करणार काम.* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : महिलांना स्वातंत्र्य द्या, महिला अत्याचार रोखण्यासाठी सांस्कृतिक परिवर्तन हवे. त्यासाठी गीता समजून घ्या. - खासदार सुब्रमण्यम स्वामी* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक : जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीच्या धडकेत समाधान वसंत वाघ (27) या शिक्षकाचा मृत्यू. जि.प.सदस्य गणेश अहिरे यांना अटक. सटाणा येथील घटना.* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक गारठले : राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका, नाशिकचा पारा घसरला, कालचे किमान तापमान १०.४* ----------------------------------------------------- 7⃣ *बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्या ज्युनियर पुरूष हॉकी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची करण्यात आली घोषणा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिण्याला पर्याय नाही* कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचे आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *वसंतदादा पाटील* महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *_आपली चांगली वेळ जगाला सांगते की,_* *_आपण काय आहोत._* *_परंतु_* *_आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की,_* *_जग काय आहे..._* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते* 👉 काळा रंग *२) समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतो?* 👉 आयस्टर *३) भारतात विवाहाला मुलींसाठी किमान वय किती आहे?* 👉 १८वर्षे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 दिनेश तोटावाड 👤 सागर सतिश मक्कम 👤 महेश बी. शेटकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *" वाईट "* कधी कधी रक्षक भक्षक बनतात असे झाले की लोक वाईट म्हणतात वाईट म्हणून घ्यायची कोणावर वेळ येऊ नये रक्षक कधीच कुठला कधीच भक्षक होऊ नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *असताना कोणीही दान करील, नसतानाही दान करता आले पाहिजे. स्वत: भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दु:खं आपलं वाटणं म्हणजे संवेदनशिलता. ती उसनी नाही घेता येत, ती असायला हवी नि असते. ती जाणिवेतून येते. 'चमडी देगा लेकिन दमडी नही,' म्हणणारी माणसं नुसती कंजुष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वत:च्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो मग त्याची परिणतीही हिंसक होते. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे 'स्वविसर्जन' खरे उच्चकोटीचे दान.* *निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात' घेण्याची कल्पना ही जगातली सर्वोत्तम कल्पना म्हणायला हवी. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहित असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपुर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगाना दान चांगलेच पण.. त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु बनविणे लाख मोलाचे. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं,'त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतेही काम हाती घ्यावे आणि प्रामाणिकपणे ते पार पाडावे त्यामध्ये यश मिळणारच हा काम करणा-यांचा सर्वसाधारण नियम आहे आणि तेही बरोबरच आहे. काम करत असताना जर काही कामात कुचराई केली तर केलेल्या कामात यश कसे मिळेल याची अपेक्षाही करणे चुकीचे आहे.काम पुर्ण न होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काढावे.काम करत असताना मनात कोणतेही चलबिचल करुन टाकणारे विचार आणू नये. त्यामुळे कामात व्यत्यय निर्माण होतो. पण ते काम आळस झटकून,जीव ओतून व ईमान इतबारे केले तर ते चांगल्या दर्जाचे व आत्मिक समाधान देणारे ठरेल.ह्या सा-या गोष्टीला तिलांजली दिली नाही तर काम तरी कसे होणार ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= होईन आई मी लेक तुझी लडिवाळ ! होऊन कुमाता नकोस तोडू नाळ... घेऊ दे मज नारी रूप तुझ्यासम अगं,जन्मू दे मज मी आता कळीसम... घेऊन जन्म मी फेडीन सारे पांग हे समजावूनी तू मूढ जनांना सांग... का नकोशी ? मी तुम्हांसी सांगा काही मी तर आहे या सृजनाची निर्माती... मजभोवती फिरती नात्यांचे हे बंध तरी पुत्र मोह का करतो तुजसी अंध... किती कपूत जन्मले सांग तुझ्या उदरात जे सोडून गेले तुजला वार्धक्यात... मजसाठी जागु दे तुझिया ठायी ममत्व मजविन कोठे या सृजनाला पूर्णत्व... घे समजून हे तू नकोस तोडू नाळ होईन आई मी लेक तुझी लडिवाळ... सौ प्रीती गोगटे 940437179 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुंदर बोधकथा* एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे. परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग. माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे. लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली. काही दिवसानंतर _ धाकटीसून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या . जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला. त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू. त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं. संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही. *तातपर्य* :- भांडण आणि इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं. ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते... *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment