✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २०१६ - ५०० व १००० रूपयांच्या नोटावार बंदी 💥 जन्म :- १८५४ - योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १६६६ - हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती १९१९ - पु.ल. देशपांडे, मराठी साहित्यिक. १९२३ - जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता. 💥 मृत्यू :- १९६० : सुब्रतो मुखर्जी, भारताचे हवाई दलप्रमुख. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ८ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळण्याचे ठरविले आहे* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणेः राज्यातील वाढत्या पार्किंग समस्येचा आढावा घेऊन नव्या पार्किंग धोरणासाठी राज्य सरकारने नेमली चार सदस्यीय समिती* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे- जिल्हा परिषदेची निवडणूक 13 डिसेंबरला, 14 डिसेंबरला होणार मतमोजणी* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर - कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला पावणेदोन कोटींचे उत्पन्न* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी आठ नोव्हेंबर काळा दिवस - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,* ----------------------------------------------------- 6⃣ *शेतक-यांना ३१ कोटी ५० लाखांचा फटका, भाताला क्विंटलमागे १२० रुपये कमी, रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव केला जाहीर* ----------------------------------------------------- 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक टी-20 सामन्यात भारताचा सहा धावांनी शानदार विजय, भारताचा जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर, तर न्यूझीलंडचा ईश सोढी मालिकावीर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परीक्षा गुरुजींची* आज सदा पायमोडे गुरूजी फारच चिंताग्रस्त दिसत होते. त्यांचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, काय करावे त्यांना कळतच नव्हते. कारण ही तसेच होते. आज शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सहामाहीची परीक्षा सुरू झाली आणि वर्गातील अर्धे मूले अनुपस्थित होते. ज्यांना काहीच येत नाही ते नेमके......... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_69.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पु. ल. देशपांडे* पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठीलेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= विचारांच्या जोरावर अन् ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री कधीच दूर राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?* 👉 मराठी *२) केरळची राज्यभाषा कोणती?* 👉 मल्याळी *३) मध्यप्रदेशची राज्यभाषा कोणती?* 👉 हिंदी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागभूषण दुर्गम, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= " बोलायचे एक " बोलायचे एक अन् करायचे एक आहे लोकांना वाटते यांचा व्यवहार नेक आहे वरवर दिसतं तसं खरंच सगळं नसतं वरवर दिसतं त्यापेक्षा खुप सारं वेगळं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सर्वसाधारणपणे प्रत्येक केलेल्या कामातून काही ना काही कोणतीतरी अपेक्षा ठेवतो आणि त्यापध्दतीने काम करतो. परंतु प्रत्येक कामातून फळांची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.एखाद्या कामातून मोबदला मिळाला नाही म्हणून दु:की व्हायचे नाही किंवा आता आपल्याला काहीच मिळत नाही म्हणून पुढे करणारे कामही थांबवायचे नाही.तर याही पुढे जाऊन आपण सातत्याने आपण आपले मन प्रसन्न व शांत ठेवून चांगले काम कसे होईल याकडे लक्ष देऊन जर का आपण जीवन जगलो तर आपण पुन्हा प्रत्येकवेळी फळांची अपेक्षा ही करणार नाही आणि आपले मनही त्या अपेक्षेने धावणार नाही.जीवनात सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असे नाही. त्यापध्दतीने जीवनात रहायला शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - विद्यादान* गुरुंना मिळाला ऐसा मान करण्या आपुले ज्ञानदान जगात नाही ऐसा काम महान विद्यादान आहे श्रेष्ठ दान... अशी आहे एकच गोष्ट कितीही वाटली तरी संपेना आत्मसात केली कितीही तरी ज्ञानाचा बिंदू गाठेना... एकट्या पूरते जो ठेवी ज्ञान बूद्धी त्याची गंजेल पार जो करी सदा विद्यादान बुध्दी होई त्याची तल्लख छान... विद्यार्थ्यांस देऊनी ज्ञान देऊया ऐसा कानमंत्र करुया सगळे विद्यादान शिकवूया सुसंस्काराचे तंत्र... *सौ. सुचिता नाईक किनवट* 9767513499 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वेळेचे महत्त्व* क्रांतिकारकांच्या मालिकेत चाफेकर बंधूचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तीनही भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरिता हंसत हंसत फासावर चढले. त्या दिवशी दामोदार चाफेकर यांना सरवरा जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. दामोदरांनी त्या दिवशी प्रसन्न व आनंदी होते. त्यांच्या हातात गीतेचे पुस्तक होते. ते गीतेचे वाचन करता करता शिक्षेकरता तयार झाले होते. फासीची वेळ होत होती पण इंग्रज अधिकारी सुस्त होते. इंग्रज अधिकारी दामोदरजींना फाशी देण्याच्या ठरल्या वेळेपेक्षा पाच सात मिनिटे उशीरांनी त्यांच्याजवळ आले. इंग्रज सरकारची ही बेपर्वाई दामोदरजींना खूपच खटकली. त्यांनी सहज शब्दांत त्यांची निर्भत्सना करत म्हटले, मी तर समजत होतो की इंग्रज सरकार वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. पण माझी ही समजूत आज चुकीची सिद्ध झाली. फाशीच्या दिवसाची प्रतीक्षा करणार्या व्यक्तीला ठरल्या वेळेनंतरही वाट पहावी लागणेयाची इंग्रज सरकारला लाज वाटली पाहिजे. तो दिवस आता पार दूर नक्कीच नाही की ज्या दिवशी भारतीयांच्या हाती शासनाचा कारभार येईल. तेंव्हा इंग्रजी अधिकारी त्यांना स्पष्टीकरण देण्याचा खूप प्रयत्न केला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment