✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/11/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.* 💥 ठळक घडामोडी :- १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर. १९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला. 💥 जन्म :- १९२५ - रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता. १९२८ - कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९३८ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार. १९५६ - स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. १९६१: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. २०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. २०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पुणे: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यातील पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे व राज्यातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंच्या संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.* ----------------------------------------------------- 2⃣ *कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत वीज खंडित होणार नाही.* ----------------------------------------------------- 3⃣ *पुण्यात तापमानाचा पारा घसरला; किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सरकार एक हजार मोहल्ला क्लिनिक सुरू करणार* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे येथील गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस उमराणी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदावर नियुक्ती* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - पुणे प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार, वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान येणार, हायपर लूप वन आणि राज्य सरकार यांच्यात करार.* ----------------------------------------------------- 7⃣ *पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हाफिजची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळली; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हाफिजचे निलंबन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालविवाह कसे रोखता येतील ?* विवाहासाठी आता वयाचा दाखला अनिवार्य करत असल्या बाबतचे वृत्त वाचून आनंद वाटला. याबाबतीत एनसीपीसीआर'चे सदस्य यशवंत जैन म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर अंमलबजावणी न होणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे विवाह करताना वयाचा दाखला आता अत्यावश्यक करण्यात..... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला असुन मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबई येथे झाले आहे. हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. २३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *फक्त कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा*.. *प्रोत्साहित करणारी एक अशी व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?* 👉 नरेंद्र मोदी *२) भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?* 👉 सुषमा स्वराज *३) भारताचे सरंक्षणमंत्री कोण आहेत?* 👉 निर्मला सितारमण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनंत कदम, गीतकार, नांदेड 👤 गोविंद बैस 👤 संतोष भाले, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= " पिचले आहेत " कोणी कशात तर कोणी कशात पिचले आहेत जे पिचले नाहीत असे कोणी वाचले आहेत आज प्रत्येक माणूस कशात तरी पिचला आहे देव जाणे नेमका कोणता माणूस यात वाचला आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.* ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते.ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही.उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही.जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता -परिभाषा त्यागाची* लहानपणी शिकवले जातात तूला ती परिभाषा त्यागाची हातातील खेळणे घेऊनी तूला म्हणतात बहिण आहेस त्या भावाची... घरातील सण-सभारंभ असो किंवा असोत उत्साह साजरा तूम्ही मागे रहा माझ्या ताईनों आणि म्हणे ठेवा चेहरा सदा हसरा... जेव्हा तू एक स्त्री होते मूलीची माप उलटूनी जाता सख्याच्या घरी प्रथमच तूझी ओळख करुन दिली जाते परिभाषा त्यागाची तूझ्या स्त्रीत्वाच्या अस्तित्वाची पत्नी आई आणि लक्ष्मी बनते दिलेल्या त्या घराची जन्म घेतलेले माहेरास विसरण्यास शिकतेस परिभाषा त्यागाची ... स्वःताच्या ना उरल्या आवडी निवडी ना छंद उरला तूला तूझ्या त्या साधनेची उसंत ना तूला घडीभरची नाते जपूनी परिभाषा त्यागाची का तूझीच अशी परिक्षा पर्वा ना कोणा तूझ्या त्या जीवाची मर्यादा ओलांडून सहनशक्तीची तू ही जपतेस परिभाषा त्यागाची... *सौ.सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= 👉 _*तुमच्या आत दडलेल्या सिंहाला जागे करा!*_ जर जंगलाचा विचार केला तर... 1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे? उत्तर - हत्ती 2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे? उत्तर - जिराफ 3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे? उत्तर - कोल्हा 4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे? उत्तर - चित्ता असं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं? सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो. आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही. मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता. *प्रेरणात्मक*🦁 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment