✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/11/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९७१ - डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही. १९७६ - तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८७७ - कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर. १९५५ - इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६१ - अरुंधती रॉय, भारतीय लेखक. १९७८ - कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९६३ - मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री १९६५ - अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह, कुवैतचा अमीर १९९१ - फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार २००९ - समाक सुंदरावेज, थायलंडचा पंतप्रधान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - चेकबुक बंद करण्याचा कोणताही विचार नाही : अर्थ मंत्रालय* ----------------------------------------------------- 2⃣ *सरकारने माजी केंद्रीय अर्थसचिव विजय केळकर यांची समिती नेमावी. या समितीने जीएसटी समितीशी संवाद साधून कररचनेत बदल करावेतः यशवंत सिन्हा* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे : गुतंवणूकदारांचे पैसे परत करण्याची डी. एस. कुलकर्णी यांना एका आठवड्याची मुदत.* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबादः सरकारी कार्यालयात प्लास्टिक बंद करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांचे आदेश. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन दिले आदेश.* ----------------------------------------------------- 5⃣ *गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी, राष्ट्रवादी 8 ते 9 जागा लढवणार* ----------------------------------------------------- 6⃣ *पद्मावती 1 डिसेंबरला यूकेमध्ये होणार प्रदर्शित, ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनचा पद्मावती चित्रपटाला हिरवा कंदिल.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताची युवा टेनिसपटू अंकिता रैनाने मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *अरुंधती रॉय* अरुंधती रॉय ( जन्म: २४ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - हयात ) या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज या रॉय यांच्या कादंबरीने इ.स. १९९७ यावर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे. अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, मेघालययेथे झाला. त्यांचे हिंदूधर्मीय वडील रणजित रॉय हे चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. अरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत. दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?* 👉 राजा राममोहन रॉय *२) तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली?* 👉 देवेंद्रनाथ टागोर *३) परमहंस सभेची स्थापना कोणी केली?* 👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 खंडू मोरे, सहशिक्षक, नाशिक 👤 विक्रम कदम 👤 पंडित नालावडे 👤 व्ही. के. पाटील 👤 चरण इंदूर 👤 नागेश सब्बनवार, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *" ताठा "* ताठा असलेले लोक कधीच वाकतं नाहीत स्वतः च काम असलं तरी ही झुकतं नाहीत ताठरपणाने त्यांची होत असते तणतण तणतण करून त्यांच नसते समाधानी मन शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस जाणतो की तो स्वार्थधुंदीत असत्याचा प्रयोग करीत आहे; पण सुखकर जगण्याच्या नादात त्याला अंतर्मनाविरूद्ध व्यवहार करावे लागतात. म्हणूनच आजही आपण पहातोच की जो 'नंबर दोन'चे धंदे करतो त्याच्याकडे संपत्ती-सुखे नांदताना दिसतात. आणि जो सत्य घेऊन बसला तो जागोजागी निराश, हताश होत दु:ख भोगताना दिसतो. कालपरवापर्यंत सामान्य जीवन जगणारा माणूस राजकारणात सत्तापदी पोहचताच पाहता-पाहता तो संपत्तीच्या राशीवर लोळताना दिसतो. मग 'सत्यमेव जयते'चे काय? सत्याचाच विजय होतो हे माणूस जाणत असूनही तो असत्याचा कैवारी का होतो? का होतोच नव्हे, तर होत आला, होत आहे आणि होत राहील.* *माणूस असा का वागतो? चोरी, भ्रष्टाचार ही पापकृत्य माहित असूनही तो का अंगीकारतो? त्याचे बाह्यमन अंतर्मनापासून अंतर ठेवून वागत असते तेव्हा ते बेडर आणि बेपर्वा झालेले असते. तेव्हा माणूस अपकृत्यात यशस्वी होणे ही अक्कलहुशारी समजून असत्याच्या नरकातील राज्यपद भोगत जातो. पण एक क्षण केव्हातरी त्याच्या जीवनात असा येतो की तो आपली असत्य कार्ये आपल्या अंतर्मनाजवळ मान्य करतो. कबुलीजबाब देतो. पश्चातापदग्ध होतो. परंतु काही लोक मरेपर्यंत अंतर्मनाशी संवाद करू शकत नाहीत. अशांना त्यांच्या पापकृत्यांची तमा नसेल तर त्यांचे अंतर्मनही मुक्ती मिळू देत नाही. कारण मुक्तीचा मार्ग हा अंतर्मनातून जातो.* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे,चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चार अर्थपूर्ण वाक्य एकत्र आली की,सुंदर अर्थपूर्ण रचना किंवा परिच्छेद तयार होतो.अर्थात एक वाक्य दुस-यावर आधारीत असते त्यामुळेच एकमेकांचा एकमेकांशी सुसंगत अर्थ जुळतो. त्याचप्रमाणे चार माणसे एकत्र आली आणि एखाद्या चांगल्या आणि विधायक विषयावर चर्चा घडवून आणली तर एकमेकांचा जीवनव्यवहारही व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतो.म्हणून माणसाने एकत्र येऊन विचार विनिमय केल्यास जीवनविषयक असणारे प्रश्नही सहज सुलभतेने सोडविण्यासाठी मदत होईल.त्यासाठी माणसाने एकत्रीत येण्याची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्ह्याची बंडी...* एकदा काय झालं कोल्ह्याला भरली थंडी करकोच्यास तो म्हणाला शिवून दे बंडी कपडा काप करकर पाय हलव झरझर कर हिशोबही लगेच पैसे देतो भरभर बिचारा तो करकोचा शिवली त्याने बंडी मऊमऊ मस्त होती पळाली कोल्ह्याची थंडी शिलाई कधी देता सांगा हो कोल्हेभाऊ किती दिवस टिकते आधी ते पाहू दिवसामागे दिवस गेले शिलाई मिळाली नाही करकोचा मात्र आशेने उगीच वाट पाही फाटकी बंडी घेऊन कोल्हा आला घरी म्हणाला मोठ्या दिमाखात बंडीपेक्षा थंडीच बरी... मनिषा कुलकर्णी आष्टीकर परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment