✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले. १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर. 💥 जन्म :- १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. १९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबईच्या प्रवाशांसाठी नाताळचे गिफ्ट, 25 डिसेंबरपासून सुरु होणा एसी लोकल - रेल्वेमंत्री पीयूष गोयल* ----------------------------------------------------- 3⃣ *जालना शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम. शहरातील १०९ ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम.* ----------------------------------------------------- 4⃣ *गडचिरोली - घनदाट जंगलात फसलेल्या 60 जवानांना बाहेर काढण्यात सी-60 कमांडोंना यश.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण. आज कांद्याला जास्तीत जास्त 3380 रूपये भाव.* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स यंदाची मिस युनिव्हर्स.* ----------------------------------------------------- 7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर एक डाव 239 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत भारताची 1-0 आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले* भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सेनापती बापट* पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (नोव्हेंबर १२, इ.स. १८८० - नोव्हेंबर २८, इ.स. १९६७) हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी.ए. पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. अहमदनगरला मॅटिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना बी.ए. परीक्षेत इ.स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून त इंग्लंडला गेले एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे मूळ गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर हे आहे. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत . या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे या मार्गाची सध्या पडझड झाली आहे त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली?* 👉 १५ ऑगस्ट १९६९ *२) इस्त्रोचे मुख्य कार्यालय कुठे आहे?* 👉 बंगळूरू *३) यासाठी कुठे अवकाशतळ कार्यान्वित केले?* 👉 श्रीहरीकोटा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राम चव्हाण, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *खेळी* कोणा कोणाची कुटील खेळी असते त्या खेळीचा कोणी उगीच बळी असते कुटील खेळीत अशा जावो ना कोणी बळी कधी कोणी खेळू नये असली कुटील खेळी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मृत्यू' ही कल्पना अस्वस्थ करणारी असली, तरी अटळ आहे. " जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात" असे गीत रामायणात म्हटले आहे. माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या मृत्यूचाही जन्म होत असतो, हे अटळ सत्य कुणाला दु:ख देणारे, कुणाला भयभीत करणारे, कुणाला अंतर्मुख करणारे असते. मृत्यू अटळ असेलच तरी तो कसा यावा, त्यासाठी आपण काय करावे, कोणते संचित जमा करावे आणि जन्माचे सार्थक करावे याचा विचार मात्र माणूस करू शकतो.* *खुनी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते आणि क्रांतीकारकांनाही फाशीची शिक्षा होते. दोघांचाही फाशीनेच मृत्यू होतो. पण क्रांतीकाराच्या मृत्यूने लाखो अंत:करणे विदीर्ण होतात आणि खुन्याच्या फाशीने विषण्णता आली तरी अनेकांना हायसे वाटते. याबाबतीत दोन पोपटांची गोष्ट बोलकी आहे. पहिला पोपट अपचन होऊन पोट फुगून मरण पावला, तर दुसरा पोपट मोकळा श्वास घेण्यासाठी उपाशीपोटी लढत राहिला अन् तोही मरण पावला. एकाच्या मृत्यूने विषाद निर्माण केला तर दुस-याच्या मृत्यूने बघणा-यांच्या मनात निषादस्वर उमटले. " विषाद आणि निषाद यातला कोणता मृत्यू चांगला ?"* ••●🛡‼ *रामकृष्णहरी* ‼🛡●•• ❤❤❤❤❤❤ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते. तेथे कधीही वादविवाद,दुरावा, भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही. अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहो भाग्य समजावे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *।।सुविचार।।* अल्पसंतूष्ट सदा सुखी हाव करी तो होई दु:खी। जे मिळाले गोड मानावे पळत्या पाठी न धावावे। कुणाशी न करावी तुलना स्वत:चीच होते अवहेलना। जन्मास आलो मी दिगंबर परमार्थास नका देऊ अंतर। व्यर्थ हव्यास करू नये तो नशीबास दोष देवू नये तो। जे मिळाले ते दिले रामाने अर्पिले रामास सारे प्रेमाने। वडिलधाऱ्यांची करू सेवा प्रपंचात करू नये हेवा। हाच असे मंत्र जगण्याचा ठेवा जपून साठा सुविचारांचा। सौ.मनिषा वाणी, सुरत ०९४२६८१०१०९. =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment