✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 💥 जन्म :- १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८२ - आचार्य विनोबा भावे महाराष्ट्र, भारत *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत अद्याप निर्णय नाही, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याची सूत्रांची महिती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील; रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : सांगली आणि नाशिक येथे ड्राय पोर्टला मान्यता, या भागातला शेतीमाल निर्यात करण्याची होणार सोय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत घोषणा* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : बेस्टच्या भाडेवाढीविषयक सुधारणांना पालिकेत मंजुरी मिळाल्यास ४ किमीनंतर १ ते १२ रुपयांपर्यंत भाडेवाडीची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर : जिल्हा बॅंकेच्या ३५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अारबीअायने परत घेतल्या, बारा कोटी घेण्यास नकार* ----------------------------------------------------- 6⃣ *जालना : जिल्ह्यात ३६ कषी सेवाकेंद्राचे परवाने निलंबित. कषी विभागाने केली कारवाई.* ----------------------------------------------------- 7⃣ *६० वर्षात पहिल्यांदाच नामुष्की, चारवेळेचा चॅम्पियन इटली विश्वचषकाबाहेर, प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध सामना अनिर्णीत* ----------------------------------------------------- *विशेष बातमी - सोलापूरचे मधुकर माळी निर्मित शाळा अॅपचे काल झाले ऑनलाइन उद्घाटन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हेडफोनपासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विनायक नरहरी भावे* विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे) (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्म झाला. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केलाव गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= समता ही आजची हाक आहे. ती आपणास आवडो वा नाआवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. - विनोबा भावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा संलग्न आहेत?* 👉 आठ *२) महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा "मध्यप्रदेश" या राज्याशी संलग्न आहेत?* 👉 आठ *३) महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी "महाराष्ट्र एक्सप्रेस" किती जिल्ह्यातून प्रवास करते?* 👉 चौदा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती 👤 सुनील शिंदे, पांगरी 👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर 👤 भगवान भूमे, देगलुर 👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद 👤 दिनेश येवतीकर, येवती 👤 कमलेश परब 👤 मारोती कानगुलवार, येवती 👤 गंगाधर मरकंठवाड, येवती 👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= " सुगंध " सुगंध वाटणाराचा हातही सुगंधी होतो तो वाटतांना जगण्याची नवी नवी धुंदी देतो माणूस नित्य नव्या धुंदीत जगला पाहिजे स्वतःसह दुस-याला आनंद मिळेल असा वागला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= •••●⚜‼ *विचार धन* ‼⚜●••• *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध...........✍🏼 +++++++++++++++++++++ जीवनात तुम्हाला चांगले जगायचे तर येणा-या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.कारण कोणतीही परिस्थिती चांगली असतेच असे नाही.कधी कधी वाईट आणि बिकट परिस्थितीतून ही मार्ग काढून सुखी जीवन जगण्यासाठी एखादा आशेचा किरण सापडत असतो.पण आता आपल्याला आपल्या जीवनात दु:खच आहे आणि दुःखच भोगावे लागणार त्याच्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही असे जर म्हटले तर मग जीवनात दु:खाशिवाय दुसरे काहीच भोगायला मिळणार नाही. उलट जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल आणि सुखाने जीवन जगायचे असेल तर हातपाय तर हलवावेच लागतील. मेहनत करावी लागेल, काहीतरी काम शोधावे लागेल,आपले निराशावादी मन आशेकडे न्यावे लागेल, नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे न्यावे लागेल तर तुम्हाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग सापडेल. अन्यथा मग आपल्या जीवनाच्या जीवनशैलीला आहे तसेच स्वीकारुन जीवनभर यातना,दु:ख यांना जवळ करावे लागेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - बालगीत* माझे नाव चिंटू ईटूकूला पिंटू अभ्यासाचा येतो त्रास मला खूप परंतु... अक्षरांचे खेळ सारे इकडून तिकडे जाई वारे गणिताचे पाढे करतात माझी चाढे... इतिहासाची तासिका इतिहास जमा करते मला भूगोलातील पृथ्वीअभ्यास घोर लावी माझ्या जीवाला... विज्ञानाच्या पाठामध्ये अनेक पडतात रसायन मला मात्र तेव्हा आठवते शारीरिक शिक्षणातील शवासन... कधी तरी बाई मला स्वछंदी खेळूद्या दप्तराचे ओझे माझ्या पाठीवरचे उतरु द्या... प्रगत अप्रगत चा फेरा तूम्हास नाही चूकणार आवडीचे खेळ आमचे अभ्यासाने मूकणार... *सौ. सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *तेनालीराम की चतुराई* एक बार राज दरबार में नीलकेतु नाम का यात्री राजा कृष्णदेव राय से मिलने आया। पहरेदारों ने राजा को उसके आने की सूचना दी। राजा ने नीलकेतु को मिलने की अनुमति दे दी। यात्री एकदम दुबला-पतला था। वह राजा के सामने आया और बोला- महाराज, मैं नीलदेश का नीलकेतु हूं और इस समय मैं विश्व भ्रमण की यात्रा पर निकला हूं। सभी जगहों का भ्रमण करने के पश्चात आपके दरबार में पहुंचा हूं। राजा ने उसका स्वागत करते हुए उसे शाही अतिथि घोषित किया। राजा से मिले सम्मान से खुश होकर वह बोला- महाराज! मैं उस जगह को जानता हूं, जहां पर खूब सुंदर-सुंदर परियां रहती हैं। मैं अपनी जादुई शक्ति से उन्हें यहां बुला सकता हूं। नीलकेतु की बात सुन राजा खुश होकर बोले - इसके लिए मुझे क्या करना चाहिए? उसने राजा कृष्णदेव को रात्रि में तालाब के पास आने के लिए कहा और बोला कि उस जगह मैं परियों को नृत्य के लिए बुला भी सकता हूं। नीलकेतु की बात मान कर राजा रात्रि में घोड़े पर बैठकर तालाब की ओर निकल गए। तालाब के किनारे पहुंचने पर पुराने किले के पास नीलकेतु ने राजा कृष्णदेव का स्वागत किया और बोला- महाराज! मैंने सारी व्यवस्था कर दी है। वह सब परियां किले के अंदर हैं। राजा अपने घोड़े से उतर नीलकेतु के साथ अंदर जाने लगे। उसी समय राजा को शोर सुनाई दिया। देखा तो राजा की सेना ने नीलकेतु को पकड़ कर बांध दिया था। यह सब देख राजा ने पूछा- यह क्या हो रहा है? तभी किले के अंदर से तेनालीराम बाहर निकलते हुए बोले - महाराज! मैं आपको बताता हूं? तेनालीराम ने राजा को बताया- यह नीलकेतु एक रक्षा मंत्री है और महाराज...., किले के अंदर कुछ भी नहीं है। यह नीलकेतु तो आपको जान से मारने की तैयारी कर रहा है। राजा ने तेनालीराम को अपनी रक्षा के लिए धन्यवाद दिया और कहा- तेनालीराम यह बताओं, तुम्हें यह सब पता कैसे चला ? तेनालीराम ने राजा को सच्चाई बताते हुए कहा- महाराज आपके दरबार में जब नीलकेतु आया था, तभी मैं समझ गया था। फिर मैंने अपने साथियों से इसका पीछा करने को कहा था, जहां पर नीलकेतु आपको मारने की योजना बना रहा था। तेनालीराम की समझदारी पर राजा कृष्णदेव ने खुश होकर उन्हें धन्यवाद दिया। *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment