✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली. १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला. १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली. १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी. 💥 जन्म :- ६६६ - गुरूगोविंदसिंघ, शिख दहावे धर्मगुरू. १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ. १९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष. १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर - शिर्डी विमानतळाला श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा प्रस्ताव विधानाभेत एकमताने मंजूर, प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यस्थान सरकारने गुज्जर समाजाला व चार इतर मागासवर्गीयांना एक टक्टे आरक्षण देण्याच्या निर्णयाला दिली मंजूरी* ----------------------------------------------------- 3⃣ *शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाच्या टिजर लॉन्चला उद्धव ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुरुवात* ----------------------------------------------------- 4⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा वेळीच निकाली काढण्याचा कोर्टानं राज्य सरकारला दिला आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरून 60 करणार. नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकुमार बडोले यांचं आश्वासन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सर्व आरोपी दोषमुक्त, ए. राजा आणि कनिमोळीसह सर्व दोषमुक्त* ----------------------------------------------------- 7⃣ *विदर्भाने रचला इतिहास, पहिल्यांदाच पोहोचला रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांच्या 'बोलावे ते आम्ही' काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, तर प्रसिद्ध अनुवादक सुजाता देशमुख यांच्या 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *अवयवदानाचे संकल्प* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरुगोविंद सिंह* गुरुगोविंद सिंह (डिसेंबर 22, इ.स. 1666 जन्म, 7 ऑक्टोबर, 1708 मरण) शीखाचे दहावा गुरू होते. 11 नोव्हेंबर 1675 रोजी , त्यांचे गुरु , गुरु तेग बहादूर यांच्या मृत्यूनंतर ते गुरू झाले. ते एक महान योद्धा, एक कवी, एक भक्त आणि आध्यात्मिक नेते होते.1699 मध्ये, बेसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली जी शिखांच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. नांदेड येथे त्यांची समाधी असून गुरुद्वारा असे म्हटले जाते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)आंतरराष्ट्रीय वाररेषा ही कोणाच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात आली?* 👉 अमेरिकन प्राध्यापक डेव्हिडसन *२) आंतरराष्ट्रीय वाररेषा कधी निश्चित करण्यात आली?* 👉 १८८४ मध्ये *३) हवाई दलाने सुखोई-३० प्रकारच्या कोणती क्षेपणास्त्रे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे?* 👉 ब्रम्होस क्रूझ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सौ. राजश्री गैनवार-भुसेवार 👤 अनिल कोटीवले 👤 अनिल यादव 👤 दिलीप धुम्पलवर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अंतरीक झगडा* आतलं जग अन् बाहेरचं जग डोक्यात खुप झगडा आहे अंतरीक झगडा सोडवायला माणूस खुप तगडा आहे अंतरीक झगडा सुटेल बाहेरचा सोडता येत नाही कोण कुठे कसा वागेल कोणाला जोडता येत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणे हे ध्येय उराशी ठेऊन आपले सारे आयुष्य समर्पित करणारे,विद्यार्थ्यांच्या अंगी स्वाभिमान, स्वावलंबन, आई-वडील आणि मोठ्यां विषयी आदराची भावना, दीनदुखितांची सेवा, समाजाप्रती आदर , राष्ट्राविषयी अभिमान व प्रेम तसेच आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ? १) शाळेत नवीन धडा शिकवण्यापूर्वी मुलांना वाचायला सांगा. २) धडा शिकवून झाल्यावर शिक्षकांना प्रश्न विचारून शंकेचे निरसन करणं गरजेचं आहे. याबद्दल मुलांशी बोला. ३) घरी पुन्हा धडा वाचायला सांगा. ४) त्यानंतर महत्त्वाच्या मुद्यांच्या नोटस् तयार करायला सांगा. ५) परीक्षेच्या वेळी स्वतच्या नोटस् वाचण्याकडे मुलांचा कल हवा. ६) प्रश्न-उत्तराचा सराव करताना लिहून काढायला सांगा. ७) लिहिलेले दीर्घकाळ स्मरणात राहते. अभ्यास करताना पिक्चर ज्या आवडीनं पाहतो, त्या आवडीनं झोकून देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. हे स्वानुभवाचे बोल आहेत. माझ्या मुलांनीअभ्यासक्रमासाठी ही पद्धत अनुसरली होती. त्यामुळे नोकरीला लागल्यावर शालेय पाठय़पुस्तकातील अभ्यास त्याच्या मनात ताजा आहे. अभ्यास करताना पालकांनी टीव्ही बंद करून पाल्याजवळ बसलं म्हणजे त्यांची एकाग्रता साधली जाते. बराच वेळ आई-वडील आपला अभ्यास घेतात. ही भावनिक सुरक्षितता पाल्यासाठी यशदायी ठरते *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वडिलांना मदत* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment