✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर. 💥 जन्म :- १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी. १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस. १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका 💥 मृत्यू :- १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक. २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं मत* ----------------------------------------------------- 2⃣ *वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'मध्ये संत्र्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची क्षमता असल्याचे मत पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त ,केले* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - महापालिका शाळांमध्ये गेल्या 4 वर्षांत तब्बल 90 हजारांची विद्यार्थी संख्येत घट, प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा अहवाल मंगळवारी प्रेस क्लबमध्ये जाहीर* ----------------------------------------------------- 4⃣ *स्टीव्हन स्पिलबर्गच्या 'द पोस्ट' सिनेमाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सहा नामांकने.* ----------------------------------------------------- 5⃣ *आमदार-खासदारांशी संबंधित विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी 12 विशेष न्यायालये स्थापन करणार असल्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - किरकोळ बाजारातील महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात 3.58 टक्क्यांवर होता तर नोव्हेंबरमध्ये वाढून 4.88 टक्क्यांवर पोहोचला* ----------------------------------------------------- 7⃣ *डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विद्याधर गंगाधर पुंडलिक* मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी. पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे. साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ? *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* *१) नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?* 👉 संत्र्यासाठी *२) लिंबामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?* 👉 क जीवनसत्व *३) जायकवाडी धरण कोठे आहे ?* 👉 पैठण औरंगाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद 👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड 👤 राजेश वाघ, बुलढाणा 👤 विनोद राऊलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* आवडीच्या कामात खुप उत्साह असतो त्रास झाला तरीही त्याचा दाह नसतो आवडीच्या कामात कशाचा आला त्रास कठीण काम वाटते उत्साही माणसाला खास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🚩🔻🔻🔻🚩🔻🔻🔻🚩 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्याजवळ खूप काही कला आहेत परंतु त्या कलेला प्रोत्साहन देऊन सादरीकरण करण्याची मनातून संधी द्या. त्यातून नवे काहीतरी करण्याची त्याला चालना द्या. तुमच्यातल्या कलेला बाजूला सारून दुस-याच्या कलेची नक्कल करु नका. ज्यामुळे तुमच्यातील सर्जनशीलतेला दडपून टाकून तुमच्या अस्तित्वाला ठेच पोहण्याची वेळ येईल असे प्रयत्नही करु नका. त्याच एका कारणाने तुमची मानहानी होईल व असे अपमानीत जीवन जगण्यास प्रेरित करेल असेही करु नका. तुमच्यातल्या नव्या अविष्काराला संधी देऊन स्वाभिमानाने आनंदी जीवन जगायला शिका म्हणजे तुम्ही खूप काही केल्याचे आणि जिंकल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.* हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . *उदा.*-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *रामबाण औषध* एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी. लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते . तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह म्हणाला . महाराज या प्राण्यांमध्ये मला कोल्हा दिसला नाही . नाही मी सहज विचारलं या कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही ,असे मला वाटते .नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे नंतर काय ते बोलावे. महाराज आजपर्यंत एवढे पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते औषध शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल . त्याच क्षणी लांडगा तेथे मारून पडला.कोल्हा म्हणाला,कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम ! 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment