✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक एड्स निर्मूलन दिवस* *लोकशिक्षण दिन (भारत)* 💥 ठळक घडामोडी :- १८३५ - हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित. १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले. १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना. १९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली. 💥 जन्म :- १८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. १९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा. १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दिल्ली- रस्ते अपघात रोखण्यासाठी समिती गठन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्या जाणा-या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी यलो फेम गौरी गाडगीळची निवड करण्यात आली* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि जोरदार वा-यासोबत तामिळनाडू आणि केरळ धडक मारणा-या ‘ओखी’ चक्रीवादळात 8 जणांचा मृत्यू, शाळा, महाविद्यालये बंद* ----------------------------------------------------- 4⃣ *पंजाब- लुधियाना- संगरुर भागाला आज संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का* ----------------------------------------------------- 5⃣ *पिंपरी चिंचवड : जागतिक एड्स दिनानिमित्त नॅशनल एड्स रिसर्च सेंटर भोसरी येथे विविध संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून एड्स विरोधी जनजागृती केली* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : शिवाजी सावंत लिखित पुस्तकाच्या मराठी प्रकाशनाचे सर्व अधिकार कॉंटिनेंटलकडे कायम, साडेपाच वर्षांनंतर लवाद मंडळाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपः भारताच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त प्रासंगिक लेख *खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय* संपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळले की अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते.पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे................ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/a-i-d-s.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाळ सीताराम मर्ढेकर* बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. सौंदर्य आणि साहित्य'साठी इ.स. १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जागतिक एडस दिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १ डिसेंबर *२) एडस हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?* 👉 एच आय व्ही *३) भारतात एडसचा पहिला रुग्ण कधी सापडला?* 👉 १९८६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्यामसुंदर दरबस्तेवार, सहशिक्षक 👤 हेमंत बेंडे, सहशिक्षक, रातोळी 👤 मारुती गिरगावकर, सहशिक्षक 👤 विठ्ठलराव मुजळगे, सहशिक्षक 👤 राजकुमार दाचावर, सहशिक्षक 👤 श्याम नरवाडे 👤 योगेश पाटील जायशेट, धर्माबाद 👤 शिवाजी पुरी 👤 मारोती दिंडे 👤 सुभाष सोनटक्के 👤 श्रीकांत लाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अक्कल* नक्कल करायलाही अक्कल असावी लागते नकलेतूनही काही हुशारी दिसावी लागते अंगात हुशारी असेल तर नक्कल करता येते नक्कल करून कोणालाही नकलाकार ठरता येते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणत्याही परिस्थितीत आपण धीर सोडू नये. आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या किंवा अडथळे आले तरी आपण खचून जाऊ नये. कारण परमेश्वर नेहमीच आपल्याबरोबर असतो. सुभक्तिचे जीवन जगणे म्हणजे परमेश्वराबरोबरचे आपले नाते काय आहे हे ओळखून असणे. ज्या गोष्टींना जगात मान्यता मिळते, त्या सगळ्या आपणही केल्या पाहिजेत असे नाही. आपल्या भोवतीचे लोक ज्या मार्गाने चालले आहेत तोच मार्ग आपणही निवडला पाहिजे असे नाही.* *आपले विकल्प, आपले विचार निराळे असू शकतात. आपले आचरण वेगळे असू शकते. सुभक्तिशील जीवनात समाधान प्राप्त होते. बंधुप्रेमाचा अर्थ हा की, यशाचे ध्येय गाठण्यासाठी आपण स्वार्थी होऊ नये. आपल्या सामाजिक, कौटुंबिक जबाबदा-या आपण विसरू नयेत. व्यक्तिमत्वाचा विकास पूर्ण होतो तो प्रीतीमध्ये. प्रीतीशिवाय आपण काहीच नाही, म्हणून असे म्हटले आहे की, शेवटी प्रीती ही सर्वश्रेष्ठ ठरते.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे मधमाश्या प्रत्येक फुलातील एक एक मध जमा करून मधाचे पोळे तयार करते. त्यामागे त्यांची शोधनवृत्ती आणि चिकाटी हा गुण अत्यंत महत्त्वाचा घेण्यासारखा आहे हे विसरुन चालणार नाही. माणसाने सुद्धा कितीही जीवनात खडतर प्रवास असलातरी न घाबरता जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास आपल्यापासून यश दूर जात नाही असे समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चित्रांचा वापर करुन खेळ घेणे.* सलग तीन दिवस मुलांना चित्र शब्द कार्ड वाचन घ्यावे. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्यावे. सर्वांस शब्दकार्ड वाटावे व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवावे. चित्र शब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्यावे. अशीच सर्व चित्र शब्द कार्ड शोधण्याचा सराव घ्यावा. शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे असा खेळ घ्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची* एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले. समोर हजारो लोक बसलेले होते. तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्यासाठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली. जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त वीस लोक असतांना का दिली ? तथागतांनी खुप छान उत्तर दिले, "ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसापर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले. परन्तु जे मला फक्त बघण्यासाठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले. मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आणणारे अनुयायी हवेत. म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला." *बोध : जो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही. किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment