✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले. १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार. 💥 जन्म :- १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर १९४८: डॉ. प्रकाश आमटे 💥 मृत्यू :- १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आज गुजरातमध्ये होणार भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा.* ----------------------------------------------------- 2⃣ *कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीचं पाकिस्तानकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग, इंटरकॉमच्या सहाय्याने 40 मिनिटं साधला संवाद.* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : रेल्वे विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत 623 विनातिकीट प्रवास्यांवर कारवाई. एका दिवसात 2 लाखाचा दंड वसूल.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : मराठा समाजाचे राज्य शासनाला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास १९ फेब्रुवारीपासून उग्र आंदोलनाचा इशारा.* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भव्य शोभायात्रा. तरुणांचे जोरदार शक्तिप्रदर्शन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक : नाशिककर गारठले, तापमानाचा किमान पारा ९.४ अंशावर पोहचला.* ----------------------------------------------------- 7⃣ *हैदराबादमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणा-या 4 जणांना अटक. एक लॅपटॉप, 6 मोबाईल फोन आणि 10 लाख रूपये रोख हस्तगत.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी - नांदेड जिल्हा परिषदेकडून आज प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आत्मकथा *मी एक शेतकरी बोलतोय.......* नमस्कार ....! मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा .......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबा आमटे* मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे ( डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर माजासे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात. ~ वपु काळे | गुलमोहर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दूरदर्शन न्यूजच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?* 👉 इरा जोशी *२) "योजना अवकाश" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कधी राबविण्यात गेल्या?* 👉 १९६६-६९ *३) मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्याने उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात?* 👉 ॲस्टीग्माटीसम *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नरसिंग जिड्डेवार, सहशिक्षक, भोकर 👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद 👤 कपिल जोंधळे 👤 अशोक लंघे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *हवा* कोणत्याच माणसाने हवेत रहायला नको हवेत राहून दुस-याला पाण्यात पहायला नको हवेत रहाणाराचा फुगा कधी तरी फुटत असतो हवेतल वर्तन आठवून अपराधीपना वाटत असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना आशेचे पंख आहेत ते नक्कीच सुखी जीवनाचा मार्ग शोधून जीवन जगण्यासाठी तत्पर असतात. त्यांची महत्वकांक्षाही जबरदस्त असते.ते आपल्या जीवनातही निश्चितपणे यशस्वी होतात.परंतु ज्यांची कोणतीच इच्छा नसेल तर ते सुखाने जीवन जगण्याचे स्वप्न पाहत असतील तर ते कधीच सुखाने जगू शकत नाहीत.या जगात प्रयत्नाशिवाय कुणालाही काही प्राप्त झालेले नाही. प्रयत्नही आशारुपी ठेवून त्या मार्गाने सातत्याने मार्गक्रमण केल्यास नक्कीच जीवन सुखावह होईल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* विद्यार्थ्याना इंग्रजीतून दिलेल्या सूचना समजत नाही. कृती करताना चुकतात, त्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे हा उपक्रम राबवावासा वाटला. *🌀Leader says🌀* हा उपक्रम राबविताना सर्वप्रथम शिक्षकांनी इंग्रजीतील इ.१लीते४थी पर्यंतच्या सूचनांची यादी बनवली. त्यातील सर्व सूचनांच्या पट्ट्या बनवल्या. शिक्षकांनी प्रथम कृती करून दाखविली व सराव घेतला. जे विद्यार्थी निरीक्षणातून योग्यप्रकारे सूचना पालन करून कृती करतात. विसरत नाही. (stand up,sit down,go back,come forward) इ.सर्व सूचना लक्षात ठेवतात. त्यांना leader बनण्याची संधी दिली. त्यामुळे मुले आनंदाने खेळत सहभागी होतात,कृती करतात लक्षात ठेवतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *👉🏽कष्टाची कमाई श्रेष्ठ* एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संतांनी त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाले ,तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे का ? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संतांनी आपल्या झोळीतून एक सुरा काढला आणि त्यांना देत म्हणाले ,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा सुरा घ्या व याने माझ्या देहाचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले व म्हनाले महाराज तुंमचा देह हा आमच्याही काही कामाचा नाही व ईश्वराच्याही ; त्या मुळे हे पाप आम्ही कशासाठी करु, त्यावर संत महाराज हासले " व म्हनाले जसे हे तुंमच्या कामाचे नाही म्हनुन तुंम्ही ते करण्यास नाकार दिलात तसेच दुसर्यांचे लुबाडलेले धन ईश्वराच्या काय कामी येणार, संतांच्या बोलण्याचा आशय समजून ते दोघेही म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून आपल्या नव जिवनाच्या वाटेवर निघून गेले. *👉🏽तात्पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment