✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अमरावती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अधिवेशन व शिक्षण परिषद 26 ते 30 डिसेंबरदरम्यान सिंधुदुर्गमधील ओरोस येथे आयोजित केले आहे. शिक्षणाचे खासगीकरण थांबवा प्राथमिक शाळेतच सर्व शैक्षणिक सुविधा द्या, हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर लागली आग; घटनास्थळी 4 बंब दाखल. अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - 15 व्या वित्त आयोगाच्या सदस्यांनी घेतली वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट* ----------------------------------------------------- 4⃣ *ओखी चक्रीवादळ दक्षिण गुजरातच्या दिशेने, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- बॉलिवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते शशी कपूर यांचं निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली कसोटी - तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 9 बाद 356 धावा, पाहुणा संघ अद्याप 180 धावांनी पिछाडीवर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *मुलांपेक्षा मुलगी बरी.....!* आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4739750601162752 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शशि कपूर* शशि कपूर ( जन्म: 18 मार्च, 1938, निधन : 04 दिसम्बर 2017 ) हिन्दी फ़िल्मों के एक अभिनेता थे। शशि कपूर हिन्दी फ़िल्मों में लोकप्रिय कपूर परिवार के सदस्य थे। वर्ष २०११ में उनको भारत सरकार ने पद्म भूषण पुरस्कार से सम्मानित किया। वर्ष २०१५ में उनको २०१४ के दादासाहेब फाल्के पुरस्कार से सम्मानित किया।इस तरह से वे अपने पिता पृथ्वीराज कपूर और बड़े भाई राजकपूर के बाद यह सम्मान पाने वाले कपूर परिवार के तीसरे सदस्य बन गये। शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. शशी कपूर यांनी आतापर्यंत 160 चित्रपटांत काम केलंय. त्यात 148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकातामध्ये झाला होता. 60 आणि 70 च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. मेरे पास माँ है । हे त्याचे डॉयलॉग जनता विसरू शकणार नाही. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ======== *१). सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे?* 👉 चादरीसाठी *२). गाजरामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?* 👉. अ जीवनसत्व *३). महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?* 👉 गंगापूर धरण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विकास गणवीर, नागपूर 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤 सूर्यकांत स्वामी 👤 राज डाकोरे 👤 संतोष रामराव शिंदे 👤 अशोक चिंचलोड, येवती, 👤 राजेश गटालावार 👤 राजू अलमोड 👤 योगेश पडोळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *भेव* कोणावर ठेवावी श्रद्धा कोणाला मानावे देव सभ्य माणसांचही आता वाटू लागलंय भेव सभ्य माणसांनी तरी का आपली सभ्यता सोडावी आपण का म्हणून किती कोणापुढे हातं जोडावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....* *माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...* *काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!* *"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"* ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून शांतपणे किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याचं किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला हर्षोल्हासित करतात. अशाच पध्दतीने मानवी मनाचेही तसेच आहे. काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चांगल्या चालत असलेल्या जीवनाला नुकसानच करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासार विचार पूर्वक निर्णय घेतले तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल. असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवन सुखावह जगले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *शब्दांचा डोंगर 📖* या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम एक शब्द दिला जातो. नंतर त्या शब्दास अनुसरन खालील प्रत्येक ओळीत एकेक शब्द / शब्दसमुह क्रमाने वाढवण्यास सांगणे. यावेळी विद्यार्थ्यांकडून खुप मोठ्या शब्दडोंगराची अपेक्षा करु नका. सुरुवातीला 3 ते 4 ओळींचा झाला तरी चालेल. मात्र हळूहळू तो वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. उदाहरणार्थ ✅आंबा ✅आंबा खातो. ✅रमेश आंबा खातो. ✅ रमेश गोड आंबा खातो. रमेश हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. ✅रमेश दररोज हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. ✅रमेश दररोज सकाळी हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नक्कल नाही ;अनुकरण करावे* सातवीतला तनिष हा नक्कला चांगल्या करायचा .मित्रांच्या बोलण्याच्या लकबी,शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे.शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय,पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षक दिनादिवशी सगळी मूल वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते.तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठीगेला.त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या . फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवतानात्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ,याचा विचारच त्याने केला नव्हता .सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली. त्यावेळी तनिषच्या मनात एक गोष्ट पक्की रुजली की सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते .कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो .अन्यथा आपण केवळ एखाद्या व्यक्तीची नक्कल करू शकतो .पण त्या व्यक्तीसारखे श्रेष्ठ बनू शकणार नाही. तेव्हापासून तनिष चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यावर भर देऊ लागला . 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment