✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 💥 जन्म :- १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स  💥 मृत्यू :-  १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे १९९७: स्वरराज छोटा गंधर्व *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अहमदपूर (जि. लातूर) : येथील साहित्य संगीत कला अकादमीतर्फे दिला जाणारा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१७’ ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी (मुंबई) यांना जाहीर* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्लीमधील आनंद पारबत परिसरात केमिकल फॅक्टरीमध्ये आहे, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल.* ----------------------------------------------------- 3⃣ *जम्मू काश्मीर - लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी राजौरी सेक्टरवर जाऊन घेतला सुरक्षेचा आढावा.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - एमआरटीपी अंतर्गत कमला मिल मालक रमेश गोवानी, मोजोस आणि वन अबोव्ह संचालक विरुद्ध गुन्हा दाखल, पालिकेकडून तक्रार दाखल.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त.* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशालता करलगीकर यांचे निधन, त्यांना 'आंध्रलता' म्हणून ओळखले जात असे.* ----------------------------------------------------- 7⃣ *२०१७ वर्ष क्रिकेटसाठी अत्यंत शानदार ठरले. अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन करताना हे वर्ष गाजवले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सौदागर नागनाथ गोरे* सौदागर नागनाथ गोरे, ऊर्फ छोटा गंधर्व, (१० मार्च, इ.स. १९१८ - ३१ डिसेंबर, इ.स. १९९७) हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावात १० मार्च, इ.स. १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत इ.स. १९४३मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्‍या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्याअध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत* 👉 रामनाथ कोविंद *२) प्रख्यात लेखिका तस्लीमा नसरीन कोणत्या देशाच्या आहेत?* 👉 बांग्लादेश *३) भारताचे २०वे सरन्यायाधीश कोण होते?* 👉 सब्यसाची मुखर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा 👤 ताहेर पठाण, धर्माबाद 👤 किरण अबुलकोड, समराळा 👤 अमोल बुरुंगुले 👤 शशांक पुलकंठवार 👤 सचिन चव्हाण *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *काळ* काळा सोबत चला तो कोणासाठी थांबत नसतो काळ कोणासाठी का कुठे सांगा तुम्ही लांबत असतो काळा सोबत चालतो त्याचा काळ चांगला जातो काळ वेळ न पाळणारा वर्षानुवर्षे ओरडत रहातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= पहायला आणि विचार करायला गेलो तर काळ आणि वेळ कुणासाठी कुणाच्या म्हणण्यानुसार थांबत नाही आणि थांबणारही नाही..मग एवढे असतानाही आपण उगीच म्हणत असतो की,आता हे वर्ष संपून नवे वर्ष लागत आहे.हे वर्ष केव्हा संपले काही कळलेच नाही. कळेल तरी कसे ? कारण आपण आपल्या धुंदीत होतो ना ! आपणास आपल्या कामामध्ये कुणाच्याही जीवनाकडे पहायला वेळही मिळाला नाही.जे काही आपण संकल्प केले होते ते पूर्ण झाले की नाही याचाही आपण विचार केला नाही. तुम्ही तुमच्या जीवनात संकल्प करा अथवा करु नका परंतु येणारा प्रत्येक दिवस,वार,महिना आणि वर्ष हे तुमच्यासाठी,तुमच्या जगण्यासाठी आव्हानात्मकच आहे. तुमच्यासाठी रोज काही ना काही प्रश्न घेऊन येणारच आहे.त्या प्रश्नांना किंवा येणा-या काळाला,वेळेला नि येणा-या नवीन वर्षाला रोजच्यासारखेच समजून जेवढे तुम्ही नव्या जोमाने काम करता तेवढ्याच पद्धतीने येणा-या वर्षाततही कामाला लागा निश्चितच तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी होईल. आपण समाधानी झालो तर इतरांनाही आपण काहीतरी करण्याची इच्छा प्राप्त होईल आणि तुम्ही आपोआपच सहज ते करु शकाल यासाठी संकल्प करायची गरजच नाही.चला तर मग नेहमीप्रमाणे आपण आपली कामे रोजच्यासारखीच करायला सज्ज रहा म्हणजे तुम्ही न ठरवताही तुमचे संकल्प पुर्णत्वाकडे जातील. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *वार काढा तोंडी* दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत १) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस, २) ३० तारिख ओलांडताना २ दिवस, ३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस, ४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल. उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१६ रोजी कोणता वार असेल? उत्तर:- ३१ मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल. तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घार व कबुतरे* एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्‍या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य - एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्‍या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

2 comments: