✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार. १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *हिमाचल प्रदेशमध्ये नवीन सरकारचा शपथविधी सोहळासंपन्न, जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री.* ----------------------------------------------------- 2⃣ *समृद्धी महामार्गावर टोल लागणारच. 'समृद्धी हा विषेश महामार्ग, टोल असणारच', सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *बीड : माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजा आनंदगावकर विजयी.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : लघुबचत योजनांच्या व्याज दरात 0.2 टक्कांची कपात करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूरः राज्यातील वातावरण बदलांमुळे विदर्भात थंडीची लाट. नागपूरमध्ये सर्वात कमी तापमान ७.८ अंश सेल्सिअस.* ----------------------------------------------------- 6⃣ *डोंबिवलीत २८ जानेवारी रोजी सायकल मित्र संमेलन :नाट्यगृहाने अखेर दिली तारिख* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरुदक्षिणा* मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धीरूभाई अंबानी* धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी (गुजराती: ધીરુભાઈ અંબાણી ) (डिसेंबर २८, इ.स. १९३२ - जुलै ६ इ.स. २००२) हे गुजराती व भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. धीरूभाई यांचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी डिसेंबर २८, इ.स. १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य. धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एसबीआयने किती शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत?* 👉 १२०० *२) स्टेट बॅंकेचे प्रबंच निदेशक कोण आहेत?* 👉 प्रवीण गुप्ता *३) सध्या कोणती महाराष्ट्रीयन महिला पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे?* 👉 कश्मिरा पवार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साई पाटील, धर्माबाद श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस 👤 वृषाली वानखडे, अमरावती सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक 👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद 👤 अजय तुम्मे 👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती 👤 नंदकिशोर सोवनी, पुणे 👤 ओमसाई सितावार, येवती 👤 ओमकार ईबीतवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *नैतिकता* स्वहिता पुढे नैतिकता सहज विसरली जाते सुसंस्कृत माणसाची जीभ घसरली जाते छोट्याशा गोष्टीसाठी नैतिकता सोडतात लोक वागतात जसे की ते आहेतच बीन डोक शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *टिचकी मारूनी जावे.* *कृती—* 🔶प्रथम दहा दहा मुलांचे दोन गट करून समोरासमोर तोंड करून रांगेत बसवावे. त्यांच्या हातात शब्दाचे फलक द्यावे. *गटप्रमुखाने* रांगेतील एका मुलाचे डोळे झाकून पुढील वाक्य म्हणावे. *बदक ने यावे टिचकी मारूनी जावे.* 🔶ज्या मुलाजवळ ते शब्द फलक असेल तो मुलगा येऊन टिचकी मारून जाईल नंतर डोळे उघडल्यावर *बदक* शब्द फलक कोणाजवळ आहे त्याला ओळखेल. अचूक शब्द ओळखल्यास त्या मुलाला शाबासकी द्यावी. अशा प्रकारे आपण *अनेक कार्ड* हातात देऊन खेळ घेता येतो. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वासघात* एका धनगराचा आपल्या कुत्र्यावर फार विश्वास होता. जेव्हा त्याला कोठे तरी बाहेर जायचे असे, तेव्हा आपली मेंढरे तो कुत्र्याच्या स्वाधीन करत असे. कुत्र्याने आपली चाकरी इमानाने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला लोणी-भाकरी खाऊ घालत असे, पण त्याचा कुत्रा इतक्या विश्वासास पात्र नव्हता. त्याचा मालक त्याला इतक्या चांगल्यारीतीने वागवीत असूनही केव्हा तरी एखादी मेंढी खाण्यास तो कमी करत नसे. ही त्याची लबाडी एके दिवशी धनगराने पाहिली तेव्हा तो त्याला ठार मारू लागला, त्यावेळी कुत्रा त्याला म्हणाला, 'साहेब, माझ्याकडून चुकून एक वेळ अपराध घडला, तेवढय़ासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका. मला मारण्यापेक्षा जो लांडगा तुमच्या मेंढय़ा मारून खातो, त्याचा जीव तुम्ही का घेत नाही?' धनगर त्यावर म्हणाला, 'अरे लबाडा, लांडग्यापेक्षा तुझा दुष्टपणा अधिक भयंकर आहे. कारण लांडगा हा माझा शत्रूच आहे. त्याच्यापासून मला अपकार व्हायचाच, हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे त्याच्यासंबंधीने योग्य ती खबरदारी मी ठेवत असतोच, परंतु तू माझा विश्वासू नोकर असताना अन् मी तुला इतक्या चांगल्यारीतीने वागवत असताना तू ज्या अर्थी असा कृतघ्नपणा करायला प्रवृत्त झालास त्याअर्धी तू क्षमेला मुळीच पात्र नाहीस.' इतके बोलून त्याने त्याला एका जवळच्या झाडाला टांगून मारून टाकले. तात्पर्य :- विश्वासघातकी माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही व एकदा त्याचा विश्वासघातकीपणा उघडकीस आल्यावर लोकांनी जर त्याला यथायोग्य शासन केले, तर ते योग्यच झाले, असे म्हटले पाहिजे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment