✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी हक्क दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले. १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला. 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान* ----------------------------------------------------- 2⃣ *शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन* ----------------------------------------------------- 3⃣ *गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करणार गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *आगरी यूथ फोरम आयोजित १५ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन शनिवारी डोंबिवली क्रीडा संकुल मैदानात झाले.* ----------------------------------------------------- 5⃣ *बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून पाच झाला, मयतांच्या कुटुंबियाना मिळणार प्रत्येकी सहा लाख रु.* ----------------------------------------------------- 6⃣ *जळगाव : पर्यावरण संस्थेतर्फे जळगावात व्याघ्र परिषदेस प्रारंभ. व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे यांचे मार्गदर्शन. मुक्ताईनगर वनक्षेत्राला अभयारण्य घोषित करा. किशोर रिठे यांची मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल टी-२० क्रिकेटमध्ये ८०० षटकार ठोकणारा पहिला ठरला फलंदाज* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी हक्क दिन* लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यंकटेश बळवंत पेंढारकर* व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २२मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संदीप मस्के, सहशिक्षक 👤 दशरथ एम. शिंदे 👤 अनिल यादव, धर्माबाद 👤 शिवानंद हिंदोले 👤 श्रीकांत म्याकेवार 👤 अमोल पाटील सलगरे 👤 मच्छीन्द्र सपाटे 👤 मिलिंद गायकवाड 👤 स्वप्नील मसाने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अर्ध्या हळकुंडाने* कोणी कोणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात छोट्या यशानेही उतावळे की बावळे होतात छोट्याशा यशात असे उतावळे बावळे होऊ नये अर्ध्या हळकुंडाने कोणी उगीच पिवळे होऊ नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात.त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही.त्यांना वाटते की,आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो.अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत.इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *प्रसंग चित्र संभाषण ,लेखन* पाठ्यपुस्तक किंवा स्वतः विद्यार्थी निर्मित चित्र ..उपलब्ध करुन द्यावित.. प्रसंग चित्र पाहून मुल बोलती करण्यासाठी प्रश्न उत्तर स्वरूप आणि निरीक्षण मुलाबरोबर संवाद साधावा.. स्वनिर्मित चित्र मुलांच्या कल्पना आणि त्याची विचार करण्याची अभिव्येक्ती बाहेर येण्यास मदत होते. भाषा शिकण्यासाठी संभाषण खुप महत्त्वाचे असते .पाठ्यपुस्तकात प्रसंग चित्रे दिलेली असतात पण आपण त्याकडे तेवढे लक्ष देत नाहीत .प्रसंग चित्रे पाहून छोटी छोटी वाक्य लेखन करण्यास मुलांना सांगावे. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वीणा का मर्म* मंदिर के पास प्रकोष्ठ में भगवान् सुब्रह्मन्यम की मूर्ति थी, उसी के सामने वाले भाग में एक सुंदर वीणा रखी हुई थी। मंदिर में कई लोग कुछ तो वीणा के दर्शन कर लेते और चले जाते। कुछ उसे बजाने की इच्छा करते पर उसे बजाने की इच्छा करने पर वहाँ बैठा हुआ मंदिर का रक्षक उनसे मना करता और वे वहाँ से चल देते। इस प्रकार सुंदर स्वरों वाली वह वीणा जहाँ थी वहीं रखी रहती थी। उसका कभी कोई उपयोग न होता था। एक दिन एक व्यक्ति आया। उसने वीणा बजाने की इच्छा व्यक्त की, पर उस व्यक्ति ने उसे भी माना कर दिया। वह व्यक्ति वहाँ चुपचाप खड़ा रहा थोड़ी देर में सब लोग मंदिर से निकलकर बाहर चले गए तो उस व्यक्ति ने वीणा उठा ली और उसका लयपूर्वक वादन करने लगा। वीणा का मधुर स्वर लोगों के कानों तक पहुँचा तो लोग पीछे लौटने लगे और उस मधुर संगीत का रसास्वादन करने लगे। वाद्य घंटों चला और लोग मंत्रमुग्ध सुनते रहे। जब वह बंद हुआ तब भी लोग ईश्वरीय आनंद की अनुभूति करते रहे। लोगों ने कहा-आज वीणा सार्थक हो गई।’’ इतनी कथा सुनने के बाद गुरु ने शिष्य से कहा-तात इस कथा का भावार्थ यह है कि भगवान् मनुष्य शरीर सब को देता है पर कुछ लोगों को तो अज्ञान और कुछ लोगों को अहंकार उस महत्त्वपूर्ण यंत्र का उपयोग करने नहीं देता। पर यदि कोई इन दोनों की उपेक्षा करके शरीर रूपी वीणा से मधुर लहरियाँ निकालने लगता है, तो यह शरीर इतना परिपूर्ण है कि न केवल उसे ही वरन् उसके संपर्क के सैकड़ों दूसरे लोग भी उसमें ईश्वरीय आनंद की झलके पाने लगते हैं।’’ 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment