✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ. 💥 मृत्यू :- १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - केंद्र सरकारनं आधार कार्डला बँक खात्याशी जोडण्यासाठी वाढवली मुदत, आत्ता 31 मार्च 2018 पर्यंत करता येणार लिंक* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- मुंबादेवी मंदिरात कायद्यानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था लागू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पंढरपूर मंदिरासह अध्यक्ष नेमण्यासंदर्भातील विधेयक मंजूर.* ----------------------------------------------------- 3⃣ *मूग, उडीद, सोयाबीन यांच्या खरेदीची, काल संपणारी मुदत १ महिन्याने वाढवली, त्याचबरोबर नोंदणीची मुदतही वाढवण्यात आली सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती.* ----------------------------------------------------- 4⃣ *दिल्ली : कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी, दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निकाल.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : नॉन क्रिमीलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ८ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.* ----------------------------------------------------- 6⃣ *दुबई आेपन बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी, चीनच्या ही बिंगजीयाओचे कडवे आव्हान २१-११, १६-२१, २१-१८ असे परतावले.* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार रोहित शर्माची विक्रमी द्विशतकी खेळीमुळे अविस्मरणीय ठरलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 141 धावांनी धुव्वा उडवला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ग.दि. माडगूळकर* माडगूळकर गजानन दिगंबर : (१ ऑक्टोबर १९१९– १४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१). *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रामायण हा ग्रंथ कोणी रचला?* 👉 वाल्मिकी ऋषी *२) महाभारत हा ग्रंथ कोणी रचला?* 👉 महर्षी व्यास *३) अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 कौटिल्य *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सारंग भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *फसवलेले* हा म्हणतो फसवले तो म्हणतो फसवले आज पर्यंत खरं सांगा सामान्याला कोणी हसवले कोणाला ना कोणाला ईथे ज्याने त्याने फसवलेले आहे कशा वरून ना कशा वरून काळीज उसवलेले आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस हा एखाद्या हिमनगासारखा असतो. दिसतो छोटा, असतो मोठा. माणूस जसा नि जितका असतो, त्यापेक्षा कमी दिसतो नि समजतो. मनुष्य संबंधातले सारे ताण-तणाव निर्माण होतात, ते असण्या नि दिसण्याच्या गफलतीतून. माणसाचं असणं...त्याचा शोध-वेध घेऊ पाहाल तर कठिण! माणूस एकच असतो पण समाजजीवनात त्याला संबंधपूर्ततेचा भाग म्हणून वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पुरूष हा मुलगा, बाप, काका, मामा, भाचा, पुतण्या, शिष्य, प्रियकर, नवरा, बाॅस, नेता काहीही असतो. त्यामुळे एक माणूस एकास प्रिय तर त्याचवेळी दुस-या एखाद्या व्यक्तिस अप्रिय ठरतो.* *माहेरची मुलगी सासरी गेली की ती तेथे सून असते. माहेरी ती वळणाची असली तरी सासरच्यांच्या लेखी बिनवळणाची ठरू शकते. हे काय गौडबंगाल आहे माणसाचं? याचा शोध घेता लक्षात येतं की एकच माणूस अनेकांशी भूमिका, नाते, जबाबदारी संबंध लक्षात घेऊन नटासारख्या भूमिका वठवत असतो. त्यामुळे घरी मुलांना अतिशय प्रेमळ वाटणारा बाप कर्मचारी व सहका-यांना खाष्ट, कठोर वाटू शकतो. हे तो दायित्व म्हणून निभावत असतो, त्याच्यासाठी हे सारं अटळ होऊन बसतं. मग प्रश्न असा पडतो की नेमका माणूस कळायचा तरी कसा? ते कळणं महाकठीण गोष्ट आहे खरी! माणसातील ख-याचा शोध 'क्ष किरण' टाकले तरी लागणे अशक्य. पण एवढं नक्की म्हणता येईल..., जो माणूस भूमिका भान म्हणून स्विकारतो, तो आत-बाहेर एक असणं आदर्श असलं तरी कठीण! ते अवघड आहे. आपल्यातला हिंस्त्रपणा त्याने मारला, त्यामुळे खरंच का माणूस अहिंसक झाला?* ‼ *रामकृष्णहरी* ‼ ☀☀☀☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते. तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच. परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते. म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा. तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *वार काढा तोंडी* दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत १) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस, २) ३० तारिख ओलांडताना २ दिवस, ३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस, ४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल. उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१६ रोजी कोणता वार असेल ? उत्तर:- ३१ मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल. तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा वार शुक्रवार मिळेल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ह्रदय परिवर्तन* एक भक्त थे, कोई उनका कपड़ा चुरा ले गया। कुछ दिनों बाद उस भक्त ने वह कपड़ा एक आदमी के हाथ में देखा जो उसे बाज़ार में बेच रहा था। वह दुकानदार उस आदमी से कहता है "यह कपड़ा तुम्हारा है या चोरी का, इसका क्या पता। हाँ कोई सज्जन पहचान कर बता दें कि तुम्हारा ही है तो मैं इसे ख़रीद लूँगा।" वह भक्त पास ही खड़े थे और उनसे दुकानदार का परिचय भी था। उन्होंने उस दुकानदार से कहा मैं इस आदमी को जानता हूँ, तुम इस कपड़े के दाम दे, दो। दुकानदार ने कपड़ा ख़रीदकर कीमत चुका दी। यह सब देखकर भक्त के एक साथी ने उनसे पूछा कि आपने ऐसा क्यों किया? इस पर भक्त बोले कि वह बेचारा बहुत ग़रीब है, ग़रीबी से तंग आकर उसे ऐसा करना पड़ा है। भक्त कहते हैं ग़रीब की तो हर तरह से सहायता ही करनी चाहिये। इस अवस्था में उसको चोर बतलाकर फ़साना अत्यन्त पाप है। भक्त की इस बात का चोर पर बड़ा प्रभाव पड़ा और वह भक्त की कुटिया पर जाकर अपनी ग़लती के लिए रोने लगा। उस दिन से वह चोर भी एक भक्त बन गया। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment