✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/09/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिक्षक दिन* 💥 ठळक घडामोडी :- २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 💥 मृत्यू :- १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली : महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण* ----------------------------------------------------- 2⃣ *शांती, विकासासाठी सहकार्य गरजेचं. भारत गरिबीशी लढत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ब्रिक्स परिषदेत वक्तव्य.* ----------------------------------------------------- 3⃣ *कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ८० डेसिबलवर आवाज वाढवणाऱ्या मंडळांवर कारवाई - पोलीस प्रशासन* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पुढे ढकलला- दीपेंद्र लोखंडे, प्राथमिक, शिक्षणाधिकारी, नागपूर* ----------------------------------------------------- 5⃣ *माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सुल्तान अहमद यांचे निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *अमरावतीच्या शुकमणी बाबरेकरची आर्चरी ज्युनिअर वर्ल्डकपसाठी निवड* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - आयपीएलचे मीडिया हक्क घेण्यासाठी स्टार इंडियाची सर्वाधिक बोली, 5 वर्षांच्या हक्कांसाठी 16347.50 कोटी रुपयांची बोली* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* शिक्षक हा समाजसुधारणा करणारा देशातील सर्वात महत्वाचा समाजसेवक आहे. प्रत्यक्षपणे जरी नसेल तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचे मानले जाते. अगदी पुरातन काळापासून गुरु किंवा शिक्षकांच्या कार्याचा मागोवा घेतला तर ही बाब नक्की आपल्या मनाला पटेल......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/M481U5SZekF आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शतकांनी इतिहास बनतो पण अशी कित्येक शतके रूढी पाडण्यासाठी खर्ची पडतात. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म केंव्हा झाला ?* 05 सप्टेंबर 2) *हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात ?* शिक्षक दिन 3) *त्यांना कोणत्या विषयाची आवड होती ?* तत्वज्ञान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शेषराव माडेवार, मुख्याध्यापक जि प प्रा शा पाटोदा बु 👤 सतिश कामिनवार, सहशिक्षक 👤 सौरभ सावंत, पक्षीमित्र, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "शिक्षक " विद्यार्थ्यांच्या नजरेत आदर्शाची मुर्ती आहे विद्यार्थ्यांच्या मनात गुरूजींची किर्ती आहे या स्वतःसह आपण आदर्श समाज घडवू चला स्वतःसह देशाचा नावलौकिक वाढवू शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणे हे ध्येय उराशी ठेऊन आपले सारे आयुष्य समर्पित करणारे,विद्यार्थ्यांच्या अंगी स्वाभिमान, स्वावलंबन, आई-वडील आणि मोठ्यां विषयी आदराची भावना, दिनदुखितांची सेवा, समाजाप्रती आदर , राष्ट्राविषयी अभिमान व प्रेम तसेच आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे . 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त अर्थात " शिक्षक दिना "निमित्त सर्व शिक्षक बंधुभगिंणीना मनस्वी हार्दिक शुभेच्छा.....!!!💐💐💐💐 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०् 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शिक्षक दिनानिमित्त कविता मी एक शिक्षक आहे ..! जनगणना असो वा निवडणूक सदैव मी सज्ज असतो देशातल्या प्रत्येक कामात मी नेहमीच दक्ष असतो कारण मी एक शिक्षक आहे ।। 1 ।। लहानमोठे सान थोर सर्वच नमस्कार करतात गावातील सर्व लोक मला मान सन्मान देतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 2 ।। नाते अमुचे घट्ट झाले ते मला मायबाप समजतात शाळेत माझी चिमुकली मुले रोज आतुरतेने वाट पाहतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 3 ।। छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे निमंत्रण न विसरता देतात लग्न असो वा इतर अन्य काम लोकं मला न विसरता बोलावतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 4 ।। माझ्या येण्यावर अन जाण्यावर लोक घड्याळाची वेळ ठरवितात किती वाजले गुरूजी असे खोचून विचारतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 5 ।। शासन सुद्धा प्रत्येक शासकीय काम फक्त आणि फक्त माझ्याकडून पूर्ण करून घेतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 6 ।। मला चार चौघात अगदी शिस्तबध्द राहावे लागते नियमाचे पालन तंतोतंत करावे लागते कारण मी एक शिक्षक आहे ।। 7 ।। इतर लोकांसारखे मला कसलेही शान शौक करता येत नाही सैराट होऊन जीवन जगता येत नाही कारण मी एक शिक्षक आहे ।। 8 ।। म्हणूनच समाजात, गावात माझी खूप शान आहे बान आहे माझ्या बोलण्यात आजही जान आहे कारण मी एक शिक्षक आहे ।। 9 ।। मला स्वतः चा खूप अभिमान आहे अन माझ्यात स्वाभिमान ही आहे कारण मी एक शिक्षक आहे ।। 10 ।। मी एक शिक्षक आहे ..! - नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक जि. प. प्रा. शाळा चिरली ता. बिलोली जि. नांदेड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गुरुकृपा* *विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे* एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले. तात्पर्यः गुरूचे कार्य महान असते.गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 http:www pramilasenkude blogdpot.in. *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment