✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :- २००३ -नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले. 💥 जन्म :- १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक. १९१५ - अनंत माने, चित्रपट दिग्दर्शक. १९२३ - रामकृष्ण बजाज, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती. 💥 मृत्यू :- १५३९ - गुरू नानक. १९९१ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. १९९४ - जी. एन. जोशी, जुन्या पिढीतील भावगीत गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा ही 78 दिवसांच्या पगाराएवढी रक्कम बोनस म्हणून देण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी* ----------------------------------------------------- 2⃣ *मेधा खोले यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने 25 सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित - समन्वय समिती चा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *नारायण राणे यांनी आमदारकीच्या पदासह दिला कॉंग्रेस पक्षाचाही राजीनामा* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी : श्रीकृष्ण पाटीलबाबावर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा मठ कायमस्वरुपी बंद करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी, दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ. ६ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसह १६ लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ.* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९८.०४% च्या पुढे गेल्यानंतर पाणी सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय. सध्या पाणीपातळी ९३% वर असून आवक सातत्याने घटत आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 50 धावांनी विजय. चायनामैन कुलदीप यादवनं घेतले हैट्रिक.* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गुरुजींना शिकवू द्या ......!* प्रत्येक बाबतीत समाजात आज प्रगती दिसून येत आहे. डिजिटलच्या तंत्रज्ञान युगात सर्व काही ऑनलाइन चालू आहे. प्रत्येक जण जे काही बोलत आहे ते सर्व ऑनलाइनच्याच भाषेत बोलत आहे. बाजारात एखादी चक्कर मारली तर लक्षात येते की येथे सुध्दा सारेच जण ऑनलाइन वरच काम............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/HwhHcUcvnn4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर * कोल्हापूर चे महालक्ष्मी मंदीर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.. कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.कांहीच्या मते महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ असत्य दुबळे असते. स्वत:च्या आस्तित्वासाठी त्याला सत्याची मदत घ्यावी लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) व्हॉलीबॉलच्या मैदानाची लांबीरुंदी किती असते?* 👉 १८× ९ मीटर *२) खो-खो च्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 २७× १६ मीटर *३) फूटबॉलच्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 १२०×९० मीटर *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाधर चिटमलवार 👤 सागर गडमोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " गाजर " गाजर दाखवले की काही सहज भाळतात एकदा माणूस भाळला की संधी न देता टाळतात गाजर पाहून कोणी कशाला भाळायचं गाजर दाखवणाराला आपणच टाळायचं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तुमच्यापैकी किंवा तुमच्यातलीच एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप काही चांगले काम करत असेल तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा म्हणजे ते अधिक जोमाने काम करतील आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात अधिक, अद्वितीय कामगिरी करुन ते स्वत:चे आणि तुमचेही नावलौकिक करतील. तुमची प्रेरणा हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य असेल. पण तुम्ही असे करु नका की, तो आपल्यापुढे चालला आहे त्याचा आपल्याला काय फायदा ?असं म्हणून त्यांचे पाय मागे खेचू नका किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळा ही आणू नका.कारण त्यांच्या होणा-या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचे कारण तुम्ही बनू नका.असे न करता केव्हाही जर कोणी चांगले काम करत असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून थोड्यातरी तुमच्या अंत:करणातून शुभेच्छा द्या म्हणजे त्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी मूठभर मांस चढेल हे निश्चित. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *💡 बचत विजेची 💡* बचत विजेची लाख मोलाची ती तर गरज आहे देशाची. जेव्हा हवे असले तेव्हा दिवे लावा. पाहायाच नसेल तर टिव्ही बंद ठेवा. विजेची शेगडी आणि गिझर कमी करा यांचा वापर. रात्रभर पंखा फिरतो गरागरा पहाटे पहाटे तरी बंद करा. वीज वाचवली तर देशाची भरभराट होईल. विकासाच्या मार्गावर देश पुढे पुढे जाईल. 🌹 *कवी* 🌹 *✍नागेश नारायण अमृते* *वर्ग 6 वा* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव ,जि.नांदेड.* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संकटाशी सामना* बनारसमध्ये असतांना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात. इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. `पळू नका ! त्यांना सामोरे जा !', असे तो त्यांना सांगत होता. त्याच्या सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे राहिले. आणि काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवावरून विवेकानंदांनी सर्वांना सांगितले की, संकटांना घाबरून पळू नका. त्यांना धैर्याने तोंड द्या. *तात्पर्य :-* संकटांना कधीही घाबरू नये. त्यांना धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलन -नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment